Posts

Showing posts from May, 2026

पुरंदर तालुक्यातील यादववाडी हरगुडे येथील हॉटेल लोटस या ठिकाणी बेकायदा बिगर परवानग्याच्या बॉटल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: यादववाडी( हरगुडे) ता. पुरंदर येथील हॉटेल लोटस येथे दि. 31 रोजी रात्री 9:45 वाजता जयवंत गुलाब यादव वय 52 वर्ष राहणार यादववाडी (हरगुडे )ता. पुरंदर यांनी रुपये चौदाशे दहा रुपये किमतीचे वर्णनाचा प्रोव्हिजन माल बेकायदा परवाना जवळ त्या ठिकाणी बाळगून त्यांनी ओळखीच्या लोकांना विक्री करत असताना त्या ठिकाणी मिळून आला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सरकारतर्फे मु .प्रो. का कलम 65 प्रमाणे फिर्याद संजय हिरालाल लगड वय 38 वर्ष पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन यांनी सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. मिळालेला माल 450 रुपये क्लासिक गोल्ड व्हिस्की नावाच्या 180 मिली मापाच्या तीन बॉटल प्रत्येकी किंमत दीडशे रुपये प्रमाणे, 960 रुपये देशी दारू टॅंगो पंच नावाच्या 90 मिली मापाच्या 24 बॉटल प्रत्येकी किंमत चाळीस रुपये प्रमाणे एकूण चौदाशे दहा रुपये किमतीच्या वर्णनाचा प्रोव्हिजन माल बेकायदा बिगर परवाना जवळ बाळगून त्यांच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार संदीप पवार पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी येथील बिलियन्स या हॉटेलमध्ये सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने धूम्रपानासाठी अवैधरित्या पुरवली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ऑस्करवाडी ता. पुरंदर येथील गावच्या हद्दीमध्ये असलेली बिलियन्स या हॉटेलमध्ये दि. 31 मे रोजी रात्री 23 :30 वाजता यासंदर्भातील घटना बिलियन्स या हॉटेलमध्ये नितीन मुरलीधर वाडकर वय 40 वर्ष राहणार अस्करवाडी ता. पुरंदर जिल्हा पुणे हे ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवून त्या ठिकाणी हुका बार चालविताना आढळून आले असून, त्यांच्या विरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारण अधिनियम 2003 चे कलम चार अ 21 अन्वये कायदेशीर त्यांच्याविरुद्ध फिर्याद आहे. फिर्याद संजय हिरालाल लगड वय 38 वर्ष पोलीस कॉन्स्टेबल यांनी या संदर्भातील झिरो पाच काचेचे हुकाप पॅट हजार रुपये किमती प्रमाणे पाच हजार रुपये, किमतीचे केव्हा पान सलसा फ्लेवर बॉक्स किंमत 1900 रुपये, अफजल प्रीमियम कॉलिटी टोबॅको प्लेयर बॉक्स किंमत 1900 रुपये, तीन फुका पाईप प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे 300 रुपयाचे असा मुद्देमाल आढळून आला असून, त्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे .पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार हाके विनायक पुढील तपास करित आहेत.

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील कानिफनाथ मंदिराच्या रोडवरील पायथ्याजवळ चार अनोळखी इसमानी महिलेच्या अंगावरील सोन्याची दागिने व काही रोख रक्कम लंपास सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोपगाव ता. पुरंदर येथील दि. 30 रोजी दुपारी 12:45 वाजता बोपगाव कमानी कडून जाणाऱ्या कानिफनाथ मंदिराच्या रोडवरील गडाच्या पायथ्या जवळील बोपगाव या ठिकाणी चार अनोळखी इसम त्या ठिकाणी टू व्हीलर गाडीला अडवून शिवीगाळ करून, दमदाटी करून, छातीवर,तसेच लाथाने मारहाण केली ,निर्मला कांतीलाल घुले यांना चाकू व बंदुकीसारखी कालया रंगाची दिसणारी वस्तूचा दाख दाखवून अंगावरील सोन्याची दागिने व काही रोख रक्कम त्यामध्ये प्रामुख्याने सोन्याचे मनी घंटन किमतीचे 14.7 ग्रॅम वजनाची 68 हजार रुपये, सोन्याची पिळ्याची अंगठी 6.2 gm वजनाची तीस हजार रुपये किमतीची, सात पाचशे रुपये किमतीच्या पाचशे रुपयांच्या दराच्या 15 नोटा असे एकूण रोख रक्कम 1,05,500 रु किमतीचे जबरदस्ततीने व इच्छेविरुद्ध त्या ठिकाणी त्याच्याकडून काढून घेऊन, त्यांनी त्या ठिकाणावरून पलायन केले त्यामुळे फिर्याद राजकुमार विश्वनाथ हाके वय 58 वर्ष व्यवसाय वायरमन विद्युत विभाग पुणे महानगरपालिका सर्वे नंबर 56 बधे नगर राम मंदिरा शेजारी कोंढवा खुर्द पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशन गु. रजिस्टर नंबर 241/ 2026 भा. न्याय. सहित कलम 309(6) 126( 2) 115 (2) 351 (2) (3)352 (3) (5 )नुसार सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस परमेश्वर गोडसे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील निळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक संदीप कदम कामात हलगर्जीपणामुळे शिक्षण विभागाकडून निलंबनाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: निळूज ता. पुरंदर येथील समाजामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जडणघडणीमध्ये कशी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, परंतु त्या ठिकाणी शिक्षकाकडून आदर्श वर्तुणुकीचे अपेक्षेचा भंग केला जात आहे. आणि कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या शिक्षकांवर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने कठोर अशी कारवाई करत निलंबनाचा एक प्रकारे दणका दिलेला आहे. पुरंदर तालुक्यातील निलुज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक संदीप शशिकांत कदम यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांना मुळशी पंचायत समिती येथे या ठिकाणी हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, संबंधित शिक्षकाविरोधामध्ये पुरंदर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेकडे सातत्याने तक्रारी या प्राप्त होत होत्या, याच तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने तपासणी पथकाची नियुक्ती केली होती, 30 एप्रिल 2026 रोजी पथकाने मिळून येथील शाळेचे अचानक अशी तपासणी केली असता, संबंधित शिक्षक शाळेत अनुपस्थित होते काही वेळेनंतर ते शाळेत पोहोचले, असता शालेय कामकाजामध्ये अनियमितपणा आढळून आला शिक्षण विभागाच्या महत्त्वकांक्षी निपुण पुणे आणि निपुण महाराष्ट्र उपक्रमाविषयी संबंधित शिक्षकांनी पुरेशी माहिती नसल्याचेही तपासणी पथकामध्ये निदर्शनास आले, उपस्थितीच्या नोंदणी मध्ये अनियमितपणा आढळला शाळेतील विद्यार्थी संख्या केवळ पाच असतानाही उपस्थिती नोंदणी मध्ये अनियमितपणा आढळून आला असून, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक असलेली चाचणी परीक्षेचे रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध नव्हते, शाळेची पट कमी होत असतानाही तो वाढविण्यासाठी कोणतेही प्रभावी असे प्रयत्न करण्यात आले नसल्याचे, या पथकाने नमूद केलेले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळ वाया गेल्याची सुद्धा नमूद केले आहे. तपासणी अहवालानुसार संबंधित शिक्षक सामाजिक माध्यमावर अधिक सक्रिय असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याचे ,निरीक्षकांनी नोंदवण्यात आलेले आहेत .तपासामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळ वाया गेल्याचेही यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे, याच कारणामुळे नियमांचा भंग केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान आढळलेल्या गंभीर बाबींचा अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आलेला असून, त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियमाचा भंग केल्याच्या कारणावरून संदीप कदम यांच्यावर 30 एप्रिल 2026 रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांना मुळशी पंचायत समितीमध्ये हजर राहण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत.

पुरंदर तालुक्यात पांगारे या गावांमध्ये दोन गटात मोबाईलच्या स्टेटस वरून तुबळ हाणामारी सासवड प्रतिनिधी: बापू एक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पांगारे ता. पुरंदर येथील हरिजन वस्तीमध्ये लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमांमध्ये नाचताना दोन गटात हाणामारी झाली, यामध्ये दोन्ही बाजूचे लोक जखमी झाले असून, सासवड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण 13 जनाविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत, मिळालेल्या माहितीनुसार पांगारे येथे शुक्रवारी दि. 29 रोजी हळदीचा कार्यक्रम सुरू होता, यावेळी नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून आणि जुन्या सोशल मीडिया स्टेटस च्या वादावरून दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. याबाबत फिर्यादी सागर सुनील यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हळदीत नसताना धक्का लागल्यांचे निमित्य करून ,आरोपींनी त्यांचे मित्र मनीष पवार यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी घरात घुसून साहित्याची तोडफोड केली वाद सोडवण्यासाठी गेलेल्या आजीला दगड मारून जखमी केले तर दुसऱ्या एका व्यक्तीला कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली, सागर यादव हे मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, संतोष दिवार आणि त्यांच्या डोक्यामध्ये कोयता मारून गंभीर जखमी केले ,याप्रकरणी पोलिसांनी प्रणव धिवार, संतोष धिवार, विनायक धिवार, विक्रांत धिवार, अभि धिवार ,विनोद धिवार, आणि मयूर बेंगळे सर्व राहणार पांगारे या सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर दुसऱ्या.तक्रारीत संतोष धिवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिनाभरापूर्वी मोबाईलवर ठेवलेल्या स्टेटस च्या जुन्या रागातून पहिल्या गटातील मुलांनी ओळखा करून त्यांचा मुलगा प्रणव याला लाथा भुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, त्याची मुलगी प्रणिता भावाला सोडवण्यासाठी गेली असता, तिलाही ढकलून देण्यात आले संतोष धिवार हे मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेले असता, सागर यादव याने काही न ऐकता कुऱ्हाडीने संतोष यांच्या डोक्यामध्ये वार करून त्यांना गंभीर असे जखमी करून, फिर्यादीवरून पोलिसांनी सागर यादव, आदित्य त्रिवार गणेश पवार, विक्रांत पवार, निशांत आढाळगे आणि विजय मंडल सर्व राहणार पांगारे या सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. गु.र. नंबर 237 /2026 भा.न्या.सहिता कलम 189 (2 )190 191(1),152, 352, 351 (2 ),(3) 324 (4),333 118 (1) या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याकाली पोलीस हवालदार संदीप पवार हे पुढील तपामकरीत आहेत

२१ बळी घेतलेल्या हातभट्टीने घेतली २२ जणांची 'विकेट'राज्य उत्पादन शुल्काचे १३ तर पुणे-पिंपरीतील ९ पोलीस निलंबित सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दोन दिवसांत विषारी दारूमुळे २१ जणांचा हकनाक बळी गेला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे मोलमजुरी करणाऱ्यांचा यामध्ये बळी गेला आहे. तर, आणखी काही जण गंभीर आहेत. अजून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस खात्यावर रोष व्यक्त होत असल्यामुळे आता दोन्ही विभागांकडून हातभट्टी दारूला अभय देणाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्यातील १३ तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ९ अशा एकूण २२ जणांना निलंबित करण्यात आले आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ जणांचे झाले निलंबनमहाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांनी एकूण १३ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये तीन निरीक्षक, सहा दुय्यम निरीक्षक आणि चार जवानांचा समावेश आहे. हडपसरमधील तीन अधिकारी सस्पेंडपुण्याचे पोलीस आयुक्त यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणाची गंभीर दखल घेत हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारानंतर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे : १) संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर. २) हसीना शिकलगार, सहायक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस चौकी. ३) हसन मुलाणी, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शोध पथक, हडपसर पोलीस स्टेशन. या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात आणि हद्दीत अवैध व विषारी दारूची विक्री सुरू असताना त्यावर योग्य ती कारवाई न झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.पिंपरी आयुक्तांकडून सहा जणांचे निलंबनपिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांनीही दापोडी पोलीस चौकीशी संबंधित दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे १) विजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दापोडी पोलीस ठाणे. २) राजू भास्कर, फौजदार तथा तपास पथकप्रमुख. ३) जयदीप सोनवणे, कर्मचारी. ४) नवनाथ पोटे, कर्मचारी. ५) सागर जाधव, कर्मचारी. ६) विशाल काळे, कर्मचारी.

पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे शेतीच्या साहित्याची कामगाराकडून चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शेतावर देखरेखी साठी ठेवलेल्या कामगारांनीच बत्तीस हजार रुपयाची साहित्य चोरून नेले, पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे घटना घडली असून, याप्रकरणी सासवड पोलिसांनी गणेश पाटील राहणार मॉडेल कॉलनी पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, सुनील किसन धिवार राहणार येरवडा पुणे यांची खानवडी येथे शेती आहे, त्यांनी महिनाभरापूर्वी गणेश पाटील याला कामासाठी ठेवले होते, बुधवारी दि. 27 रोजी दुपारी दीडच्या सुमारामध्ये पाटील यांनी शेतातील खोलीतून 30 हजार रुपये किमतीचा पाण्याचा पंप आणि दोन हजार रुपयांचा टॅक्टर जॅक चोरून नेला असून, हा प्रकार दुसरे कामगार राजेश मुळेकर यांनी पाहिला होता, या प्रकरणी सुनील किसन धिवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलिसांनी गणेश पाटील या कामगारावर गुन्हा दाखल केलेला आहे, याबाबतचा अधिक तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस नाईक गोकुळ हिपरकर हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजाराच्या आवारा मधील बेवारस मोटार ही लोणी काळभोरची सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटच्या गजबजलेल्या आवारामध्ये गेल्या 18 ते 20 दिवसापासून एक इकोस्पोर्ट चार चाकी गाडी धुळखात उभी आहे. रविवारी दि. 10 मे पासून एकाच जागेवर उभे असलेल्या अनोळखी गाडीमुळे मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत निरा बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी सासवडचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांना ही सविस्तर माहिती दिली असून, गाडी मालकाचा शोध घेतला असून, ही चारचाकी लोणी काळभोर परिसरातील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून प्रतिनिधीला दिली आहे.यामधील व्यापारी अविनाश महाजन या विषयाशी बेवारस गाडीची काहीही संबंध नसून बेवारस गाडीचा तपास सासवड पोलीस स्टेशन करत आहेत.

पुरंदर तालुक्यातील विमानतळाला जमीन न देण्यासाठी कुंभारवळण ग्रामस्थ ठाम ! कायदेशीर मार्गाने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांचा पूर्णपणे निर्धार ! भूसंपादन हे बेकायदेशीर असल्याचा दावा सक्षम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कुंभारवळण ता. पुरंदर येथील वस्तीवरील बैठकीमध्ये प्रामुख्याने विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्याच्या प्रक्रियेला कुंभारवळण गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे, गावातील शेतकरी बांधवांची बैठक घेऊन, पुढील भूमिका ठरविण्यात आली असून, सप्टेंबर महिन्यामध्ये गावातील संमती 18 सप्टेंबर पर्यंत 75 टक्के होती, त्याचा उलगडा गावातील विमानतळाला एजंट म्हणजे दलाल हा कुंभारवळण गावचे सांगत होता की,75%संमती आहे. परंतु गावातील शेतकरी बांधवांनी कोर्टाच्या वकिलामार्फत स्टॅम्प वरती पूर्णपणे माहिती घेऊन 24 व 25 सप्टेंबर रोजी संमती फक्त जमीन मोजणीसाठी 72% दोन दिवसात दिली होती, त्यात माहिती अधिकारात जाऊन माहिती घेतली असता पहिली 75 टक्के व नंतरची 72 टक्के मिळून 147% कुंभारवळणची जमीन भूसंपादन करण्यासाठी संमती झाली होती, त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्या ठिकाणी सुरुवातीची संमती गावातील ही फक्त 22% माहितीच्या अधिकारांमध्ये निघाली ती चुकीची माहिती पुरवून जी संमती दाखवली हीच कुंभारवळणची खूप मोठी चूक केली, प्रत्यक्षात 22 टक्के व नंतरची 72 टक्के मिळून 94% संमती झाली परंतु आता जी संमती पत्र बनून देणे चालू आहे, त्यात सुद्धा बहुतेक बऱ्याच ठिकाणी विमानतळ बाधित गावात नव्याने केलेल्या झाडे ,झुडपे शेडची नोंद सुद्धा नवीन नोंदी केलेल्या आहेत ,अधिकाऱ्याला हाताशी धरून जो काही प्रकार चालू आहे, त्याची प्रथम चौकशी करून, त्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ,म्हणजे काही क्षमता मध्ये बहात्तर टक्के संमती असणारी ही फक्त जमीन मोजणीला संमती दिली होती, ती भूसंपादन विमानतळाला आमची अजिबात संमती नाही सक्तीने जमीन घेता येत नाही, गोड गोड अधिकारी बोलून जमीन लाटण्याचा प्रकार जो चालू आहे, त्यावर भूसंपादित करण्याच्या प्रक्रियेला कुंभारवळण गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे, प्रामुख्याने ऍडव्होकेट स्वप्निल होले, अडवोकेट शैलेश जगताप ,विकास खळदकर, मनीष हगवणे, नाना कुंभारकर, अशोक कुंभारकर, गणेश काशिनाथ मोरे यांनी विमानतळ भूसंपादन करण्यासाठी कडाडून याला विरोध दर्शवलेला आहे. विमानतळ प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्याच्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत ,उदाची वाडी येथील शेतकऱ्याला आम्हीष दाखवले जाते की, तुम्हाला ड्रेस दोन घेतो, मुलीला मुलाला कामाला लावतो असे प्रकार अधिकारी भूसंपादन करून घेताना आश्वासने देत आहेत ,हा कसला प्रकार ?त्यामुळे ठाम निर्णयावर आम्ही शेतकरी आहोत की, विमानतळाला जमीन भूसंपादन करण्यासाठी मनीष हागवणे यांनी यासाठी कडाडून विरोध दाखवला आहे. निवासी झोन करता तर स्वतःचे क्षेत्र संमती देऊन खानवडी येथे शेजारील क्षेत्र सुद्धा घ्यावे ,त्यावर शिक्के मारण्यासाठी लावलेले हे महाशय सुद्धा काढण्यासाठी दुसऱ्याच्या बागायती क्षेत्रावरील अडचणी करत आहेत, स्वतःची देत असाल तर दुसऱ्याची बागायती जमीन देण्यासाठी तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे? त्यावर त्यांचे म्हणणे अजिबात ऐकून घेतले जात नाही ,आमच्या सातबारा वरील शिक्के काढावेत एवढीच फक्त मागणी त्या ठिकाणी खानवडी येथील शेतकरी यांची आहे, निवासी झोन करता फळे बागायती जमिनी आमच्या शेत्र आहे, भूसंपादनासाठी संमती देणे अजिबात आमची तयारी नाही, असे एडवोकेट स्वप्निल होले यांनी सांगितले. मात्र कुंभारवळण येथील शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा करीत जमीन न देण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे, प्रामुख्याने कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी, खानवडी, एखतपुर- मुंजवडी, पारगाव येथील शेतकऱ्यांची संमती न घेता अपुरी माहिती देऊन आणि चुकीच्या पद्धतीने भूसंपादन प्रक्रिया राबवली जात आहे, त्यासाठी कायदेशीर पद्धतीने मार्गाने लढा देणार बाधित शेतकरी प्रतिनिधी आहेत,विमानतळ शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या भूसंपादन प्रक्रिया त्वरित थांबवली पाहिजे, ग्रामसभेची संमती घेतली पाहिजे ,पर्यायी जागा उपलब्ध असताना हा घाट कशासाठी? कुंभारवळण बागायती जमिनी 94% आहेत, त्या घेण्याचा हट्ट शासनाने सोडून दिला पाहिजे. शेतकऱ्यांनी वकिलांचा सल्ला घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, ती पूर्ण ताकतीने शेतकरी लढा देणार आहेत, त्यासाठी कुठलाही करार नामा करणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी मिळून केला आहे. यासाठी प्रमुख मार्गदर्शन ऍडव्होकेट राजेश टेकाळे, किशोर लासुरे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबई यांनी योग्य असे मार्गदर्शन विमानतळ भूसंपादन न करण्यासाठी बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी एक प्रकारे चांगले मार्गदर्शन केले .तर यावेळी कुंभारवळण या ठिकाणी रात्रीच्या वेळी 250 ते 300 शेतकरी महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते .याबरोबरच प्रशासकीय कुंभारवळण गावचे सरपंच मंजुषा गायकवाड यांच्यासह रामदास कामठे, सदाशिव कामठे, रोहित मोरे ,संदीप लोळे ,सोशल मीडियाचे पत्रकार, प्रिंट मीडियाचे पत्रकार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा शेतकरी देविदास कामठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विकास खळदकर यांनी मानले.

Image

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील झोपेतून उठल्यानंतर गॅलरीमध्ये गुळणा करण्यासाठी युवकाचा खाली पडून मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नारायणपूर ता. पुरंदर येथील एका शेतकऱ्याच्या घरातील पहिल्या मजल्यावरील गॅलरी मधून खाली पडून दुर्दैवी असा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, सचिन शिवाजी बोरकर वय 40 राहणार नारायणपूर ता. पुरंदर जिल्हा पुणे असे मृत व्यक्तीचे नाव असून, याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन बोरकर हे शेती व्यवसाय करत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते मंगळवारी दि. 26 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारामध्ये ते झोपेतून उठून घराच्या पहिल्या मजल्यावर गॅलरीमध्ये गेले असता, त्यांचा तोल जाऊन ते खाली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डोक्यावर पडले या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व परिसरामधील नागरिकांनी त्यांना तातडीने संत सोपानदेव हॉस्पिटल सासवड या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता, मात्र डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची घोषित केले होते ,या घटनेची माहिती सदानंद चंद्रभान बोरकर यांनी फिर्याद सासवड पोलिसांना देण्यात आली असून, मृतदेह ग्रामीण रुग्णालय सासवड येथे शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे, पुढील तपास अर्चना पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील देवडी येथे मोटार सायकलच्या अपघातामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा अकस्मात मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवडी ता. पुरंदर येथील मोटार सायकलचा अपघात झाला असता, त्या ठिकाणी धोंडीबा मालू हिरवे वय 55 वषॅ जाभली पोस्ट आसरे ता.वाई जि. सातारा यांना उपचारा कामी सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर पुणे येथे आणले असता, ऍडमिट केले असता, त्या ठिकाणी 17: 40 वाजता ते मयत झालेले आहेत अशा संदर्भातील उपजिल्हा रुग्णालय भोर येथे पोस्टमार्टमच्यानुसार त्यांचा अहवालानुसार एम एल सी 23/ 2026 दि. 22 रोजी हे इसम मयत झाले असल्याचे पोलीस स्टेशन हद्दीतील मजकुरानुसार राजगड पोलीस स्टेशन नुसार दाखल करण्यात आलेले असून, रिपोर्ट खबरीजबाब, इन्व्हेस्ट पंचनामा, शो तपासणी फॉर्म मयत वारस पावती एमएलसी रिपोर्ट सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर यांचा ऍडव्हान्स सर्टिफिकेट यानुसार सासवड पोलीस स्टेशन येथे अकस्मात मयत रजिस्टर नंबर 62 /2026 बी एन एस एस 194 प्रमाणे सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे, या संदर्भात फिर्याद औदुंबर नागनाथ अडवाल पोलीस हवालदार राजगड पोलीस स्टेशन यांनी या संदर्भातील फिर्याद दाखल केली. पुढील तपास अचॅना पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी टंचाईच्या चर्चांना पंपचालकाकडून पूर्णविराम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समाज माध्यमावरील इंधन तुटवडयाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सासवड शहर आणि परिसरामध्ये पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, सर्व पेट्रोल पंपावर पुरवठा सुरळीत असून, नागरिकांनी घाबरून न जाता अपफावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंप चालकांनी केलेले आहे, पुरंदर तालुक्यातील संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावरील झेंडेवाडी ते सासवड दरम्यानच्या पाचही पेट्रोल पंपावर इंधनाची कमतरता नाही, रिलायन्स पेट्रोल पंपाचे चालक प्रदीप लांडगे म्हणाले की, आमच्याकडे पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा आहे, टँकरद्वारे वेळेत पुरवठा होत असल्याने, ग्राहकांना मागणीनुसार इंधन दिले जात आहे, कुठेही रांगा लागलेल्या नाहीत भोगळे पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सचिन पाटणे यांनीही इंधन पुरवठा नियमित असल्याचे स्पष्ट केले आहे .समाज माध्यमावरील अफवामुळे काही काळ संभ्रम निर्माण झाला होता, मात्र दैनंदिन कामकाज आणि प्रवास सुरळीत सुरू आहे, तरी मशागतीचे दर वाढण्याची भीती इंधन तुटवडा नसला तरी दरवाढीमुळे शेती मशागतीचे दर वाढण्याची शक्यता ट्रॅक्टर चालक दिलीप चोरघडे यांनी व्यक्त केली आहे, सध्या तरी शेती कामावर कोणताही परिणाम झालेला नाही.

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,200दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,100 दर  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :                                                     पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.27 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,200 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,100 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,200 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,800 तर सरासरी 3,500 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,100तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,200 तर सरासरी 2,650 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, बाबा पवार ऋषिकेश  ट्रेडिंग, शैलेश विरकर, गुळाला 4,500रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 99 बॉक्स  20 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,500 कमाल दर 4,100रुपये तर साधारण4,400 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये[किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 2,800,4,200,3,500. बाजरी 2,100,3,100, 2,600. गहू 2,200,3,100,2,650. तांदूळ ---------------------------------- हरभरा 5,000, 5,300,5,150.

समाज जीवनातील वास्तव पुस्तकरूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न  सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज :  "समाज जीवनातील घडामोडी शब्दात पकडून पुस्तक रूपाने प्रसिद्ध होतात. तेच सत्य वास्तव हा खरा इतिहास असतो असे समाज घडविणारे सृजनशील साहित्य लिहिणाऱ्या लेखकांची खरी गरज आहे." असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.२३ व दि.२४ मे २०२६ रोजी दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी शिंदे बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, स्वागताध्यक्ष डॉ.रोहन खवटे, निमंत्रक डॉ.भरत खळदकर व सहनिमंत्रक रामचंद्र नातू, मराठी चित्रपट सैराट फेम अभिनेता सुरज पवार, अभिनेत्री कोमल शिंपी, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ समन्व्यक ह.भ.प संजय वाबळे, विनोद जगताप, कैलास शेलार, डॉ.अशोक जाधव, प्रमोद ढमाले, संभाजी फडके, एकनाथ अडसूळ, भाऊसाहेब फडके, तानाजी केकाण, अरुण यादव, बाळुतात्या यादव, चंद्रकांत बोरावके आदी उपस्थित होते.भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरवात बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी, साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, लोकरंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आणि समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन रंगले. जानकर म्हणाले, "ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व त्यांचे सहकारी हे अनेक अडचणी सहन करीत या साहित्य मेळाव्याचे आयोजन करतात. कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने त्यांची ताऱेवरची कसरत होते. नवोदित कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत त्यांना हे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. आम्ही सत्तेत असू की नसो, आम्ही नेहमी पाठीशी उभे राहून आपणास सहकार्य करू आणि या साहित्य चळवळीस पाठबळ देऊ."दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल म्हणाले, "दौंड तालुका हा नेहमी विकासकामात आघाडीवर आहे. भीमथडी मराठी साहित्य संमेलन ही साहित्य चळवळ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या तालुका सक्षम करण्यासाठी भीमथडी मराठी साहित्य संमेलन महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांना कायम मदत करू."ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, "साहित्य व मराठी संस्कृती मजबूत झाल्याशिवाय समाज हा सक्षम होणार नाही त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य भवन हे दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी पाच एकरात भव्य दिव्य स्वरूपात साकरण्यात येणार आहे. यामध्ये लोकसहभागातून व शासकीय मदतीने हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, मराठी साहित्य भवनात भव्य सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक उद्यान, साहित्यिकांसाठी आश्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असे विविध उपक्रम या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत."साहित्य संमेलनाची सुरुवात बोरमलनाथ देवाला भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक ह भ प संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महादेव जानकर, अरुण यादव, माजी न्यायाधीश वसंत पाटील उपस्थित होते.यावेळी भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय डाडर, सुशांत जगताप, अरविंद जगताप, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले.आभार भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सचिव दिपक पवार यांनी मानले.

Image

तोंडलच्या सुपुत्राची एमपीएससी मार्फत क्लास वन अधिकारीपदी निवड; गावात सत्काराने आनंदोत्सव सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील तोंडल येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागाच्या परीक्षेत तोंडल येथील आशिष नितीन वणवे यांची 'सहाय्यक नगर रचनाकार, श्रेणी-1 (राजपत्रित अधिकारी)' या मानाच्या Class-1 पदावर निवड झाली आहे. या निवडीमुळे तोंडल गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आशिष हे तोंडलचे माजी सब-रजिस्ट्रार दिगंबर संभाजी वणवे यांचे नातू व नितीन वणवे यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व जिद्दीच्या जोरावर आशिष यांनी हे यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या आशिष यांनी एमपीएससी चा अभ्यास करताना अनेक रात्री जागून काढल्या. त्यांच्या या यशात आई-वडिलांचे मार्गदर्शन, आजोबांचा आशीर्वाद व मित्रपरिवाराची साथ मोलाची ठरली.सहाय्यक नगर रचनाकार हे नगरविकासातील अत्यंत महत्वाचे पद असून या अधिकाऱ्यामार्फत शहरांचा विकास आराखडा, रस्ते, बागा, शाळा व सार्वजनिक सुविधांचे नियोजन केले जाते. आशिष यांच्या निवडीमुळे भविष्यात तोंडलसारख्या ग्रामीण भागातील तरुणांना स्पर्धा परीक्षांकडे वळण्यास निश्चितच प्रेरणा मिळेल.या यशाबद्दल आशिष यांचा ग्रामस्थ मंडळ, तोंडल यांच्या वतीने दि. 24 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री भवानी माता मंदिरासमोर भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच शरद वणवे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थ मंडळ, नवभारत तरुण मंडळ व समस्त तोंडल ग्रामस्थांनी आशिष वणवे व वणवे परिवाराचे हार्दिक अभिनंदन केले असून आशिषच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.---फोटो ओळ: एमपीएससी मार्फत सहाय्यक नगर रचनाकार, श्रेणी-1 पदी निवड झाल्याबद्दल आशिष नितीन वणवे यांचा दि. 24 मे 2026 रोजी तोंडल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना सरपंच शरद वणवे. सोबत दिगंबर वणवे, नितीन वणवे, शामकांत वनवे, चेअरमन अमोल वनवे, बाळासाहेब बाबर, हानुभाई इनामदार, व ग्रामस्थ उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय भवन मधील लिफ्ट बंद ; तर जेष्ठ नागरिक व दिव्यांगांचे प्रचंड हाल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित( दादा) पवार यांच्या अथंक प्रयत्नातून सासवड येथे भव्यदिव्य अशी प्रशासकीय भवन उभे करण्यात आले असून, जवळपास सर्वच शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आणण्यात आली असून, यामागे जनतेचा वेळ वाचावा हा मुख्य उद्देश होता, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सासवड येथील प्रशासकीय भवन येथील लिफ्ट कित्येक दिवस बंदच आहे, यामुळे नागरिकांनी तीव्र अशी नाराजी व्यक्त केलेली आहे. विशेषत जेष्ठ नागरिक दिव्यांग व्यक्ती तसेच महिलांना विविध शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त वरच्या मजल्यावर जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्या कारणामुळे, ही फरपट होत आहे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय भवनांमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्यात आली होती मात्र, सध्या ही सुविधा बंद असल्याने, नागरिकांची गैरसोय वाढली असून, प्रशासनाच्या दुर्लक्ष बाबत संताप व्यक्त केला जात आहे. शेजारीच असलेल्या लिफ्ट सुद्धा कधी आधी मधी बंदच असते, तत्कालीन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कारकीर्दीमध्ये प्रशासकीय भवनातील त्या वेळच्या लिफ्टची सोय करण्यात आली होती, तर आत्ताच्या सध्याच्या वातावरणामध्ये विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी लिफ्ट बंद पडण्याच्या मार्गात जास्त होत आहेत, याकडे नक्की प्रशासकीय बाजू व आमदार यांची लक्ष नाही प्रशासकीय भवनातील विविध सरकारी कार्यालयांमधील नागरिकांनी ये जा करावी सुरू असते, त्यामधील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक, सहाय्यक निबंधक, भूमी अभिलेख विभाग नगररचना विभाग, कृषी अधिकारी कार्यालय सतत गर्दीने गजबजलेली असतात, परंतु लिफ्ट अभावी गैरसोयीला सामोरे जावे लागते, सामान्य व्यक्तीला प्रशासकीय भवनांमध्ये येणाऱ्या मध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्यांची प्रमाण हे अधिक असून, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, महसूल विभागाशी संबंधित कामे, तसेच इतर शासकीय कार्यालयासाठी अनेकांना वरच्या मजल्यावर जावे लागत असते, लिफ्ट बंद असल्यामुळे वृद्ध नागरिकांना जीने चढणे कठीण जात असून, दिव्यांग व्यक्तींनाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, नागरिकांच्या सुविधासाठी उभारलेल्या यंत्रणा केवळ शोभे पुरत्याच आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे, प्रशासनाने तातडीने लिफ्ट दुरुस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी सासवड-करांकडून होत आहे, सर्वसामान्यांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय बाजूने त्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, यावर प्रामुख्याने दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी एक प्रकारे व्यथा व्यक्त केली असून, त्याबाबत सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित शेतकरी सोमवार किंवा मंगळवार या दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार ; भूसंपादन प्रक्रियेमध्ये चालू असलेल्या भ्रष्टाचाराची तक्रार करणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विमानतळ भूसंपादन प्रक्रियेमध्ये खोट्या सर्व नोंदी दाखवून, अधिकाऱ्यांच्या संगनमताने वाढीव मोबदला लाटण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रकार सध्या विमानतळाच्या संदर्भात चालू आहे, त्याचे सर्व पुरावे हे बाधित शेतकरी यांच्याकडे आहेत, ते घेऊन येत्या सोमवार किंवा मंगळवार या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती बाधित शेतकऱ्यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली. नवीन असा खुलासा विहिरी, बोरवेल, झाडे, शेड अशा अधिसूचना निघाल्यानंतर मोबदला वाढीसाठी गुंतवणूकदारांनी केलेले प्रकार रीतसर नोंदीत धरले जात आहेत, याच्या सर्व सॅटेलाईट इमेज या बाधित शेतकऱ्याकडे आहेत, त्या आणि इतर पुरावे सदरील मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत, खोट्या नोंदी व सर्वांचा प्रकार भूसंपादन प्रक्रियेमधील जमिनीचे चुकीचे मोजमाप, खोट्या नोंदी, बनावट दस्तऐवज तयार करून, काही मोजक्या लोकांनी जास्त मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा बाधित शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर काही ठिकाणी तर विहीर, झाडे झुडपे,बोअरवेल,शेततळी,पाईपलाईन हे लावली नाहीत त्याचा मनसंताप शेतकरी याना होत आहे. आत्तापर्यंत सात गावामध्ये असा प्रकार झालेला आहे, ज्या शेतकऱ्यांची शेतामध्ये पहिली झाडे झुडपे, त्या ठिकाणी शेड होते, परंतु संमती दिल्यानंतर त्या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी ज्यावेळेस आले त्याच्या आदल्या दिवशी काही ठिकाणी झाडे ,शेड साठी गावात उभारण्यात आली त्याचा मोबदला हा आता सध्या जो काही शेतकऱ्यांना मिळत आहे ,त्या शेतकऱ्यांच्या मोबदल्या मधून झाडे झुडपे, शेड लावलेले पेमेंट शेतकऱ्याकडून उकळण्याचा प्रकार सर्वात जास्त प्रमाणात चाललेला आहे, त्यासाठी शेतकऱ्यांची मागणी अशी की, भूसंपादनामध्ये पारदर्शकता ठेवावी, खऱ्या बाधित शेतकऱ्यांना न्याय मोबदला द्यावा, खोटे सर्वे व खोट्या नोंदी रद्द कराव्यात, दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल का ? आत्तापर्यंत झाली नाहीत, तर आत्ता पयॅत सावळा गोंधळ चाललेला आहे, त्यावर कधी फौजदारी गुन्हे दाखल करणार ? येथून पुढे काय होणार ? पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संख्येने शेतकरी बाधित होणार असून, मात्र भूसंपादन प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून ,येत्या सोमवार किंवा मंगळवार या दिवशी शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, त्यानंतर या आंदोलनाला अजून तीव्र स्वरूप येण्याची शक्यता आहे, अशी बाधित शेतकरी यांनी ही व्यथा आपली प्रतिनिधीला सांगितली.

Image

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे अज्ञात चालक मर्सिडीज गाडीने एक्टिवा मोटरसायकलला धडक दिल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोपगाव ता. पुरंदर येथील हद्दीमध्ये दि. 17 रोजी 12: 40 वाजता तुकाई दर्शन फुरसुंगी येथून बापू फडतरे व पुतण्या श्रीनाथ फडतरे असे एक्टिवा मोटारसायकल नंबर एम एच बारा एक्स डी 8549 या गाडीवरुन बोपगाव मधून गणेश वाडी येथे शेतामध्ये जात असताना, बोपगाव चौका मधून रस्ता क्रॉस करत असताना, मर्सिडीज गाडी नंबर एम एच बारा यु क्यू 0202 च्या गाडीवरील चालक आणि त्याच्या ताब्यातील गाडी भरदाव वेगाने बोपगाव बाजू कडून सासवड बाजूकडे जात असताना ,गाडीला ठोस देऊन अपघात झाला ,अपघाता मध्ये पायाला गंभीर अशी दुखापत झाली असून, श्रीनाथ याला डोक्याला गळ्याला व पायाला किरकोळ मार लागला आहे, त्यावेळी शामराव बाळासाहेब फडतरे यांचा फोन सत्यवान महादेव फडतरे यांना आला होता, त्यावेळी त्यांनी सासवड येथील चिंतामणी हॉस्पिटल येथे त्यांना घेऊन हॉस्पिटलला आले असता, अर्ध्या तासाने पुन्हा त्यांना फोन करून सांगण्यात आले की ,नोबेल हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेलेले आहेत, त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली वार्डामध्ये घेतले व तपासणी करून दुपारी 2:26 वाजता ते मयत झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशन व त्यांनी ए एफ एम सी हॉस्पिटल वानवडी येथे घेऊन, जाण्यास सांगितले त्या ठिकाणी डॉक्टरांनी पोस्टमार्टम केले. त्यानंतर तूकाईदर्शन फुरसुगीे येथे आणून त्यांच्यावर नातेवाईका समोर अमरनाथ हडपसर येथे अत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत फिर्याद सत्यवान महादेव फडतरे (वय 47) वर्ष व्यवसाय शेती इलेक्ट्रिकल दुकान सध्या राहण्यासाठी तुकाई दर्शन फुरसुंगी तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार बोपगाव ता.पुरंदर जिल्हा पुणे यांनी मर्सिडीज गाडी नंबर एम एच बारा 0202 वरील अज्ञात चालुका विरुद्ध तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे केलेली आहे .सासवड पोलीस स्टेशन ने गु.र. नंबर 220 /2026 बा न्याय संहिता कलम 281, 125(a ),125 (b),324( 4 )मो.वा.का.क 184 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी प्रियंका (वांजळे) पवार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र पोलीस दलामध्ये संवेदनशील प्रकरणी हाताळून विशेष ठसा निर्माण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक प्रियंका (वांजळे) पवार यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. महिला विषयीचे गंभीर गुन्ह्याचा तपास नागरिकांची सुरक्षा व समुपदेशन तसेच तपासातील कार्याची दखल घेत त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. या आधी( वांजळे) पवार यांनी मुंबई पोलीस पुणे शहर पोलीस दलात कर्तव्यावर होत्या सध्या त्या सीआयडी पुणे ग्रामीण येथे कार्यरत आहेत अशी माहिती प्रियंका (वांजळे) पवार यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Image

पुरंदर विमानतळ भूसंपादन: शेतकऱ्यांना त्याच दिवशी मोबदला देणार; जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडींची मोठी घोषणाअडचणींचे जागीच निवारण करण्यासाठी 'फोर टेबल' पॅटर्न; अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत, त्यांना नुकसानभरपाईचे पैसे मिळण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही. "ज्या दिवशी शेतकरी आमच्याकडे येईल, त्याच दिवशी त्याला पैशांचे वाटप केले जाईल," अशी महत्त्वपूर्ण घोषणा पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी केली आहे. मोजणी किंवा इतर प्रक्रियेत सुटलेल्या घटकांचा तातडीने समावेश करून शेतकऱ्यांना फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी प्रशासनाने 'फोर टेबल' (चार टेबल) यंत्रणा कार्यान्वित केली आहे.जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी पुरंदर दौऱ्यावरजिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी आज पुरंदर येथील उपविभागीय तथा उपजिल्हाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाला थेट भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रियेचा आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या अडचणी प्रशासकीय पातळीवर न रेंगाळता तात्काळ सुटाव्यात, यासाठी त्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून यंत्रणेला गती दिली.तक्रारींसाठी कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पुरंदर विमानतळ भूसंपादनाबाबत प्रशासनाकडे केवळ चार प्रकारच्या हरकती घेता येतील. मात्र, केवळ अर्ज देऊन चालणार नाही, तर अर्जासोबत वंशावळ किंवा संबंधित इतर कायदेशीर कागदपत्रे जोडणे बंधनकारक राहील. विनाकारण केवळ प्रकल्पात अडथळा आणण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या हरकतींची प्रशासन दखल घेणार नाही.सुटलेल्या घटकांचा त्याच दिवशी समावेश "मोजणीच्या वेळी जर काही शेतकऱ्यांचे विहीर, झाडे किंवा इतर निगडित घटक सुटले असतील, तर त्यांची कागदपत्रे तपासून त्याच दिवशी आमचे पथक शेतात पाठवले जाईल आणि त्या घटकांचा मोबदल्यात समावेश केला जाईल," असे जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांनी सांगितले. मात्र, हा लाभ केवळ २५ एप्रिल २०२५ च्या अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या मालमत्तांनाच लागू असेल, त्यानंतर केलेल्या नव्या कामांना मोबदला मिळणार नाही.निकालांसाठी '३१ मे'ची डेडलाईन भूसंपादनाशी संबंधित प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी) किंवा तलाठी स्तरावरील जे निकाल प्रलंबित आहेत, ते गुरुवारपर्यंत १००% निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, ज्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे, ती ३१ मे पर्यंत संपवून येत्या १० दिवसांत सर्व विषय निकाली काढले जातील, जेणेकरून मूळ शेतकऱ्याला तात्काळ पैसे देणे सुलभ होईल.'१० टक्के परताव्या'बाबत एमआयडीसीला पत्र पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असलेल्या १० टक्के परताव्याच्या कपातीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली. शासनाच्या नियमानुसार एकूण मोबदल्यातून १० टक्के कपात केली जाते. मात्र, "मी एमआयडीसीला विशेष पत्र पाठवून ही कपात एकूण मोबदल्याऐवजी केवळ भूखंडावर (जमिनीवर) करण्यात यावी, अशी विनंती केली आहे," अशी माहिती त्यांनी दिली. यावर लवकरच सकारात्मक निर्णय येण्याची शक्यता आहे.कोट / थेट प्रतिक्रिया"हा पुरंदर विमानतळ प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज दिले आहे. काही लोक स्वतःच्या 'इगो'साठी (अहंकारासाठी) शेतकऱ्यांची दिशाभूल करून प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये, कारण यात नुकसान केवळ शेतकऱ्यांचेच होईल."— डॉ. जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी,

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी कोळी महादेव संस्था सुरू सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथे रविवारी" सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमात" उत्कर्ष व प्रशिक्षण संस्था या राज्यस्तरीय संस्थेचे उद्घाटन आणि आढावा बैठक उत्साहात पार पडली .यावेळी समाजाच्या विविध समस्यावर आणि भावी वाटचालीवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्ग देवता आणि क्रांतिकारक कृष्णाजी साबळे, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमाची पूजन करण्यात आले. ही संस्थेद्वारे आदिवासी जमातीच्या शैक्षणिक आणि सामाजिक समस्या सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. अशी माहिती कोळी महादेव संस्थेकडून प्रतिनिधीला देण्यात आली.

अठरा पगड सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहिर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आचार्य अत्रे सांस्कृतिक सभागृह, सासवड (ता.पुरंदर) येथे रविवार दि.१७ मे रोजी अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. ट्रस्टचे पुरस्कार पुढील प्रमाणे : यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे जिल्हा कार्यवाह, शैक्षणिक कायद्याचे अभ्यासक, म. ए. सो. वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील विद्यार्थी प्रिय व उपक्रमशिल शिक्षक शिवहार लहाने यांना आदर्श शिक्षण सेवा रत्न : तसेच शिवरी येथे लोकसहभागातून चार कोटी रुपयांचे पत्रकार भवनाचे बांधकाम पूर्णत्वाच्या दिशेला नेले असल्यामुळे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाला : आदर्श लोकशाही स्तंभ रत्न , तसेच आदर्श समाज रत्न : बाळासाहेब काळे, आदर्श ग्राम सेवा रत्न : सूर्यकांत जगताप, आदर्श शिक्षक रत्न : मनीषा जगताप, आदर्श उद्योग सेवा रत्न : भुजंग गायकवाड, आदर्श समाज रत्न : सदाशिव बारसुडे, आदर्श समाजसेवा रत्न : गणेश शिंदे यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांच्या हस्तेव प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. वेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रसिद्धीप्रमुख दत्ता नाना भोंगळे हे होते. यावेळी संस्थापक-अध्यक्ष अप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल भोंडे, सल्लागार मंगेश गायकवाड,प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप,रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना अध्यक्ष दादासाहेब गायकवाड, सोनू जाधव,साहील चौरे, कविता अमराळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. ट्रस्टचे सल्लागार मंगेश गायकवाड व स्नेहा शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल भोंडे यांनी आभार मानले.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे आदर्श शिक्षण सेवा रत्न पुरस्कार शिवाहार लहाने यांना प्रधान करीत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता नाना भोंगळे शेजारी बळीराम सोनवणे,अमोल लोंढे, दिलीप गुरव व इतर.

Image

पुरंदर तालुक्यामध्ये सासवड या ठिकाणी बस मधून पडून मजुराचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : हडपसर जेजुरी बायपास रोड वरील आंबोडी गावाच्या हद्दीमधील खाजगी बस मधून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या बिहार मधील एका मजुराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिरजू बिंद (वय 37) रा. लखनबिंद कोसी आरवा तालुका बरावा जिल्हा जेहानाबाद बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई सागर चंद्रकांत महाद्वार हे डायल 112 कर्तव्यावर असतानाच बुधवारी सकाळी सुमारे आठ वाजून दोन मिनिटांनी वाजण्याच्या सुमारांमध्ये आंबोडी गावा जवळ एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती मिळाली असून, त्यानंतर पोलीस हवालदार होळकर अविनाश यांच्या सह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, हडपसर जेजुरी बायपास रोड वरील एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला ,तेच्या डोक्याला गंभीर दुखापता झाली होती व रक्तस्राव सुरू होता, मॉर्निंग साठी आलेल्या नागरिकांनी संबंधित व्यक्ती खाजगी बस मधून खाली पडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातानंतर बस घटनास्थळावरून पुढे निघून गेलेची माहिती ही समोर आली असून, पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून जखमीला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून सकाळी आठ पन्नास वाजता उपचारा पूर्वीच मृत घोषित केले. मृताच्या खिशामध्ये सापडलेल्या आधार कार्ड व मोबाईलच्या आधारित याची ओळख पटवण्यात आली असून ,याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शेगर हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी इंदिरानगर येथील झोपडपट्टी मध्ये गावठी हातभट्टीची दारू जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता.पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील इंदिरानगर येथील झोपडपट्टीमध्ये एका पत्र्याच्या आडोशाला जयसिंग बाळू माने (वय 52 वर्ष) राहणार इंदिरानगर सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे यांच्या जवळील मिळून आलेल्या दारूच्या मालाच्या वर्णनांमध्ये 900 रुपये की चे गावठी हातभट्टीची तयार दारू भरलेले 200 मिली मापाचे प्लास्टिकचे 45 फुगे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे तेथेच त्या ठिकाणी पडलेल्या एका 180 ml मापाच्या बाटलीमध्ये एक फुगा सॅम्पल करीता काढून, त्यावर बापू गायकवाड व पंचाच्या सह्यांची सिले लेबले जागीच करण्यात आली असून, उर्वरित माल जागीच पंचाच्या समक्ष नष्ट करण्यात आला असून, छापा घातला असताना 15: 20 वाजता हा देशी विदेशी दारू जवळ बाळगून ओळखीच्या लोकांना विक्री करीत असताना मिळून आला असून, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65( ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली असून ,निलेश तुकाराम पवार पोलीस कॉन्स्टेबल त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार बापू गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील राजुरी ते पिसर्वे पुलावरील खड्डे बुजवल्यामुळे सामान्य शेतकरी व प्रवासी आनंदीत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील पूर्व भागामध्ये राजुरी ते पिसर्वे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले असले, तरी मुख्य रस्त्यावरील पुलाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्याचा गॅप निर्माण झाल्या कारणाने, आत्तापर्यंत वाहन चालकासाठी गंभीर अशा प्रमाणामध्ये धोका निर्माण झालेला होता, या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात घडलेले होते, पुलावरून जाताना वाहनांना अचानक धक्का बसत असल्याकारणाने, अनेक वाहन चालकांचे संतुलन बिघडत होते, अपघात घडत होते, तसेच या ठिकाणी कोणतीही सूचनाफलक किंवा इशारे नसल्याचे अपघाताचा धोका व अधिक वाढलेला होता अनेक वाहन चालकांना किरकोळ दुखापती ही झालेल्या होत्या, या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी उद्योगपती संतोष हरिभाऊ मुळीक यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे, यावेळी रस्त्याच्या कामावर देखरेख ठेवणारे रमेश साबळे सुपरवायझर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, पुलाववरील खड्डे तातडीने बुजवण्यासाठी मागणी करण्यात आली होती, या भेटीमध्ये पिसे गावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास( बापू )मुळीक, संदीप गणपत मुळीक, नवनाथ बापूराव मुळीक, रमेश पांडुरंग मुळीक आदी उपस्थित होते. मागणीची दखल घेत साबळे यांनी दुसऱ्याच दिवशी पुलावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून गॅप ठेवण्याचे काम करण्यात आले, त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा असा दिलासा मिळाला असून, वाहन चालकांनी एक प्रकारे समाधान व्यक्त केले आहे. पुलावरील खड्ड्याचा गॅप बुजवल्या या कारणामुळे प्रवाशांचा त्रास कमी झालेला आहे, सामान्य शेतकऱ्यांचा शेतातील माल नेण्यासाठी सासवड या ठिकाणी त्यांना सोयीस्कर झालेले आहे, शाळा पुढच्या महिन्यामध्ये चालू होताना, प्रवासी यांचे ,व्यापारी वर्गांचे सामान्य शेतकरी यांचे सोईस्कर पद्धतीने मार्ग चालू झालेला आहे. यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला असून, मात्र अजूनही या ठिकाणी अधिक दर्जेदार आणि कायमस्वरूपी काम करणे गरजेचे आहे. संतोष हरिभाऊ मुळीक उद्योगपती.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,500दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,000 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                          पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.20 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,500 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,000 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,500 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 3,750 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,000तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,200 तर सरासरी 2,600 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, बाबा पवार ऋषिकेश ट्रेडसॅ ,शैलेश विरकर, गुळाला 4,525 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 6,91 बॉक्स 1,38क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,525 कमाल दर 4,400रुपये तर साधारण4,460 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,000,4,500,3,750. बाजरी 2,000,3,200, 2,600. गहू 2,200,3,000,2,600. तांदूळ ---------------------------------- हरभरा 5,000, 5,600,5,150.

पुरंदर तालुक्यातील मोहिनी हॉटेल शेजारील धनंजय वॉच दुकानासमोरील पार्किंग मधून अज्ञात चोरांनी मोटारसायकल चोरून नेली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील मोहिनी हॉटेल शेजारील धनंजय वाच दुकानाच्या समोरील पार्किंग मधून दि. 18 मे 2026 रोजी सकाळी सहा वाजता मोटरसायकल पार्किंग मध्ये लावली असताना त्या ठिकाणी पीएमटीने वेंकीज इंडिया लिमिटेड पानशेत येथे विवेक सुतार कामाला गेले होते, त्यानंतर दुपारी चार वाजता कंपनीतून सुटले असता, ते सासवडला सहा वाजता आले असता, मोहिनी हॉटेल शेजारील धनंजय वाच दुकानाच्या समोर पार्किंग मध्ये गाडी हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल नंबर एम.एच.20 बी. व्ही. 6153 ही त्या ठिकाणी आजूबाजूला पाहिली असता अजिबात दिसून आली नाही, म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे खात्री पटली असून, मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेली आहे, त्यासाठी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असता त्या ठिकाणी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी विवेक ज्योतिराम सुतार (वय 45 वर्षे) व्यवसाय खाजगी नोकरी राहणार भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पंधरा हजार रुपये एके काळे रंगाची हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटरसायकल नंबर एम.एच 20 बी.व्ही 6153 तीचा चॅशी नंबर mbcha10ahagj57966 व इंजिन नंबर ha10edagj56847 असा आहे ,याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार भिवराज शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत बनावट पत्र बनवून अज्ञाता विरोधामध्ये सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरून नागरिकांमध्ये सब्रम निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका कार्यालयाच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून, अफवा पसरवल्या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या प्रकारामुळे पुरंदर परिसरामध्ये खळबळ उडाली असून, पोलीस आता त्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत, याबाबत संतोष हरी बरगे( वय 37) राहणार बच्चे पाटील कॉलनी तिनेवाडी रोड राजगुरुनगर जिल्हा पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 336 (2) व 336 (4) अन्वये सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 12 मे 2026 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारामध्ये उदाची वाडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव, एखतपुर आणि मुंजवडी परिसरा मधील शेतकरी whatsapp ग्रुप वर एका अज्ञात व्यक्तीने कार्यालयाच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार करून, खोटे पत्र प्रसारित केले त्या पत्रामध्ये प्रास्तावित विमानतळासाठीची जागा तांत्रिक तपासणीनंतर आयोग्य असल्याचा मजकूर नमूद करण्यात आला होता, या बनावट पत्रामुळे संबंधित गावातील नागरिकांच्या मनात विमानतळ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रिये बाबत संभ्रम आणि गैरसमज निर्माण झाल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शेगर हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यामध्ये टंचाईच्या झळा तीव्र होत चाललेल्या आहेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागले आणि पुरंदर तालुक्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न हा गंभीर होत चाललेला आहे, सध्या तालुक्यामधील सात गावाची तहान ही शासकीय टँकरद्वारे अवलंबून आहे, आणखी काही गावांमध्ये टँकरची मागणी वाढत आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा टॅंकर ची संख्या कमी असली तरी, जलजीवन मिशनची कामे अर्धवट असल्याकारणाने, टंचाईच्या झळा अधिक तीव्र होत आहेत, तालुक्यातील पूर पोखर,पिसे, भिवरी, साकुर्ड, बहिरवाडी, वागदरवाडी आणि भिवडी या सात गावांमध्ये सध्या स्वतंत्र असा शासकीय टॅंकर द्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, यामध्ये साकुर्डे आणि पूर पोखर या गावात त्यांचाही तीव्रता जास्त असल्याने, तिथे दररोज टँकरच्या तीन खेपा सुरू आहेत, तर उर्वरित गावांमध्ये दररोजची एक खेप सुरू आहे ,पाटबंधारे विभागाची शाखाधिकारी अविनाश जगताप यांच्या माहितीनुसार पिलानवाडी तलावामध्ये 7.62 दशलक्ष गण फूट साठा असून, त्यातून शिवरी प्रादेशिक योजना सुरू, तलावात केवळ मृतसाठा असला तरी विहिरीद्वारे गराडे, बोपगाव, हिवरे, कोडीत व चांभळी या गावाच्या योजना सुरू, तलावात 7.45 दशरक्षक घनफूट साठा असून ,त्यावरून सुपे, पिंपळे ,बोराळवाडी व नवीन दिवे योजना सुरू, तलावात 1.66 दशलक्ष गण फूट साठा शिल्लक असून, माहूर, मांढर व धनकवडी परिसरात होतो पाणी पुरवठा पुरंदर तालुक्यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 67 योजना मंजूर आहेत, त्यापैकी 29 कामे पूर्ण आहेत, उर्वरित कामे निधी अभावी अर्धवट स्थितीमध्ये आहे, ज्या गावांमधून टँकरची मागणी येत आहे तिथे तातडीने आवश्यकतेनुसार पुरवठा करण्यात येत आहे. रितेश मुंडे उप अभियंता पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती पुरंदर .दृष्टिक्षेपात टँकर 07 सुरू असलेले 21 मागील वर्षीचे 04 प्रस्तावित असलेले प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत राख आणि राजुरी या गावासाठीचे प्रस्ताव सध्या प्रांत कायॅालयात मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, वाल्हा आणि शिवरी या गावासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर झाले आहेत, या व्यतिरिक्त दौंडज या गावातूनही लवकर टँकरची मागणी येण्याची शक्यता आहे, टँकर मंजुरीसाठी प्रथम ग्रामपंचायतकडून पंचायत समितीकडे तिथून तहसील आणि शेवटी प्रांत कार्यालयाकडे प्रस्ताव जातो ,प्रांतांच्या आदेशानंतरच संबंधित गावात टँकर सुरू होतो तालुक्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा सध्या पाझर तलावातील साठ्यावर अवलंबून आहे.

पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी शेतकरी प्रश्नावर काँग्रेसचे निषेध आंदोलन तर हमीभाव कर्ज माफी आणि खताच्या दर कपातीची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाढती महागाई शेतमालाला मिळत नसलेला योग्य असा भाव आणि शेतकऱ्याच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी दि. 18 रोजी सासवड येथील जयप्रकाश चौकातील जनसेवा बँके समोर शांततापूर्ण असे निषेध आंदोलन करण्यात आले, सकाळी 11 वाजता झालेल्या आंदोलनामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधामध्ये तीव्र अशा नाराजी व्यक्त करण्यात आली या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, प्राध्यापक सचिन दुर्गाडे ,लहू अण्णा निवगुणे, युवक अध्यक्ष उमेश पवार, ऋषिकेशी जगताप, तालुका अध्यक्ष साहेबराव फडतरे, संदीप भोसले, बापू मोकाशी, राजेंद्र बरकडे, बाळासाहेब कड, शंकर दांगट, आप आदमी पार्टीचे राजन पवार आणि अतिश जगताप आदी उपस्थित होते. या आंदोलनाच्या दरम्यान कांदा व इतर शेतीमाल जाहीर हमीभाव देऊन शासनाने थेट खरेदी केली पाहिजे, राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करून, सातबारा कोरा करावा, तसेच खत औषधे नियमानाच्या वाढत्या किमती तातडीने कमी केल्या पाहिजेत, अशा प्रमुख मागण्या त्यांच्या होत्या, नेत्यांनी भाष्य केंद्र व राज्य सरकारच्या कृषी धोरणावर टीका करताना शेतकरी दिवसोदिवस आर्थिक अडचणीत सापडत आहे ,उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात योग्य दर मिळत नाही, त्यामुळे महागाईमुळे शेतकरी आणि कामगार वर्गाची जीवन विस्कळीत होत चालले ,जी भावना त्यांनी व्यक्त केलीत या आंदोलनामधील तालुक्यातील शेतकरी कामगार विविध सामाजिक संघटना आणि पुरोगामी विचाराच्या संघटनांनी पाठिंबा दिला.

Image

पाठपुराव्याला यश!सासवड-जेजुरी रस्ता भूसंपादनाचा मार्ग अखेर मोकळा! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हडपसर-सासवड-जेजुरी-नीरा राष्ट्रीय महामार्ग (NH-965) अंतर्गत 'सासवड वीर फाटा ते बोरावके मळा' या टप्प्यातील रखडलेल्या कामासाठी केलेल्या प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर प्रशासकीय पातळीवर मोठे यश आले आहे.सन २०१३ पासून भूसंपादनाच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे आणि भरपाई न मिळाल्यामुळे स्थानिक शेतकरी आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.ना.नितीन गडकरी, मुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, मार्गदर्शक महसूल मंत्री मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री मा.ना.छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.या मागणीची तात्काळ दखल घेण्यात आली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) पुणे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत पत्र सादर केले आहे. या अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी जमीन मोजणी व भूसंपादन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि ती गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकारी (SLO) यांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आता तांत्रिक अडचणी दूर होऊन कामाला वेग येईल.सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नेहमीच न्याय देणारे, देशाचे कार्यक्षम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार. आपल्या खंबीर पाठबळामुळे आणि तत्परतेमुळेच वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न आता कायमचा मार्गी लागत आहे!यावेळी आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त निरंजननाथ महाराज, भाजपा पुणे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य गिरीश जगताप, भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, भाजपा सासवड शहर उपाध्यक्ष उदयराज जगताप, सचिन राऊत यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच बाधित शेतकरी ज्ञानेश्वर संताजी जगताप, दामोदर रामभाऊ जगताप, शत्रुघ्न पंढरीनाथ जगताप, ऋषिकेश जयवंत जगताप, प्रमोद मधुकर बोरावके, सूर्यकांत रामचंद्र गिरमे, अनिल मारुती गिरमे, अरुण सुभानराव जगताप, राजेंद्र दत्तात्रय बोरावके, कुमार मारुती जगताप, संतोष सुधाकर गिरमे, प्रदीप काशिनाथ राऊत, बाळासाहेब गेनवा बोरवके यांनीही प्रयत्न केले.

Image

मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 यांच्यावतीने दुसरा क्रमांक सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अजय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांना महाराष्ट्र शासन, पु .ल .देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025 याचे वतीन ने दुसरा क्रमांक मिळालेला आहे. सदर पुरस्कार एडवोकेट आशिष शेलार सांस्कृतिक कार्यमंत्री, माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी (भा. प्र. से.) सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग, माननीय मिनल जोगळेकर पु .ल .देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संचालक, यांच्या वतीने ज्योती कदम निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांच्यावतीने देण्यात आला. सदर पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष प्रवीण काळूराम पवार, विश्वजीत वसंतराव आनंदे व संजय उबाळे यांनी स्वीकारलाअजय गणेशोत्सव मंडळ स्थापनेपासून सामाजिक देखावे त्यास अनुषंगाने सामाजिक उपक्रम करणारे मंडळ आहे याचा विचार करून शासनाने मंडळाची निवड केली व पुरस्कार दिला आहे.अशी माहितीनुसार मिळाली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड पानवडी सुपा रोडवरील सुपा या ठिकाणी व्हॅगनार गाडीने एका युवकास जोरदार धडक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सुपे ता. पुरंदर येथील गावच्या हद्दीमध्ये वसंत विठ्ठल जगताप यांच्या घराच्या शेजारी रोहित दिगंबर ढाणे (वय 22) वर्ष हा त्याचे रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट गाडी नंबर एम एच पंचवीस बीजी 62 82 ह्या गाडीवरून, पानवडी सुपे रोडने सासवड बाजूकडे जात असताना, वसंत विठ्ठल जगताप यांच्या घराच्या शेजारी त्या ठिकाणी आला असताना, पाठीमागून एका पांढऱ्या रंगाची वॅगनार गाडीवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे रस्त्याच्या नियमाकडे दुर्लक्ष करून ,बुलेट गाडीला त्याच्या गाडीसहित डाव्या बाजूने ठोस देऊन, अपघात घडून आला, तर त्या ठिकाणी अपघाताची कोणती खबर न देता, तो तेथून निघून गेला, अपघातामध्ये त्या ठिकाणी डोक्यात, कपाळावर, नाकाला, पाठीवर डावे हातावर गंभीर अशा जखमा झालेल्या असून, अपघातामध्ये बुलेट गाडीचे प्रचंड असे नुकसान झाले आहे, रोहित ढाणे हा का लवकर येईना म्हणून त्या ठिकाणी पानवडी या ठिकाणी लग्नकार्य असल्यामुळे, बलभीम किसनराव जाधव यांनी त्या ठिकाणी चौकशी केली असता, एका वॅगनार गाडीने रोहित ढाणे यास व्हॅगनार गाडीने जोरदार धडक दिल्यामुळे, अपघात झालेला आहे असे समजल्यानंतर सर्व नातेवाईक त्या ठिकाणी येऊन त्या रोहित ढाणे यांना त्वरित ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुणे या ठिकाणी जाण्यास सांगितले आहे, पुढील उपचार नोबेल हॉस्पिटल दवाखान्यांमध्ये पुणे या ठिकाणी चालू आहेत, तर त्या संदर्भातील फिर्याद बलभीम किसनराव जाधव (वय 43 )वर्ष धंदा त्यांचा व्यवसाय रिक्षा चालक सध्या राहणार सर्वे नंबर 133/1a/ 2a/2 फ्लॅट नंबर 108 अष्टविनायक रेसिडेन्सी मांजरी बुद्रुक पुणे सासवड पोलीस स्टेशनला एका पांढर्या रंगाची वॅगनार गाडीवरील अज्ञात चालका विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे. यासंदर्भात गु. रजिस्टर नंबर 214/ 2026 कलम 281, 125(a), 125( b),324(4 ) मोटार वाहन अधिनियम कायदा कलम 184, 134/ 177 नुसार अज्ञात चालका विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अभिजीत कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील त्रिमूर्ती मोबाईल शॉपी मधून शेजारील साई ए 1 नावाच्या सलून दुकानातील कामगाराने काउंटर वरून विवो कंपनीचा एक्स 300 इलाईट ब्लॅक कलरचा मोबाईल चोरून नेला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील त्रिमूर्ती मोबाईल शॉपी असून, मोबाईल शॉपीच्या शेजारी साई ए 1 नावाचे सलून दुकान आहे, त्यामधील कामगार सानिब मलिक राहणार कुंडा राज्य उत्तर प्रदेश हा कामाला त्या ठिकाणी सलून दुकानांमध्ये असून, तो सतत दुकानांमध्ये मोबाईल शॉपी मध्ये येत असतो, त्यामुळे शॉपीतील कामगार हे सानिब यास चांगल्या पद्धतीने ओळखतात, दिनांक सात मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारांमध्ये मोबाईल शॉपी मधील साफसफाई करून, झाल्यानंतर दुकानांमध्ये येणाऱ्या गिरायकाला मोबाईल दाखवण्यासाठी पाच ते सहा डेमो मोबाईल काउंटर या ठिकाणी ठेवले असता, त्या ठिकाणी मोबाईल शॉपी मध्ये दहा पंचेचाळीस वाजता सानिब मलिक हा दुकानात आला असता, तो मोबाईल पहात होता, काही वेळाने तो आमच्या मोबाईल शॉपी मधून निघून गेला असता, मोबाईल शॉपीतील कामगार ऋषिकेश पिलाने यांनी काउंटर ठेवलेले मोबाईल पैकी विवो कंपनीचाx300 ही लाईट ब्लॅक बारा जीबी 256 क्षमतेचा डेमो मोबाईल देते, त्या ठिकाणी दिसून आला नाही, मोबाईल शॉपीच्या दुकानातील लावलेली सीसीटीवी कॅमेरे चेक केले असतास, आणि मलिककडे मोबाईल हातात घेऊन पाहत होता त्याचवेळी दुकानातील ऋषिकेश हा दुसऱ्या गिर्‍हाईकांना मोबाईल दाखवत असल्यामुळे, त्याचे लक्ष दुसऱ्या गिरायकाकडे होते त्यावेळी सानिब मलिक यांनी काउंटर मधील डेमो मोबाईल त्याच्या हातात घेऊन, बाहेर जात असताना कॅमेरा मध्ये दिसून आला, मोबाईल शॉपी मधून सानिब मलिक यांना फोन केला असता, त्याचा फोन बंद लागत असल्या कारणामुळे, त्याच्या राहत्या घरी तसेच सासवड परिसरामध्ये आजूबाजूला शोध घेतला असता तो दिसून आला नाही, त्यामुळे शॉपीतील मालकाची पूर्णपणे खात्री झाली की, शॉपीतील विवो कंपनीचा डेमो मोबाईल्स आणि मलिक याने चोरून नेलेला आहे. 45 हजार 599 रुपये vivo कंपनीचा एक्स 300 इलाईट ब्लॅक बारा जीबी 256 क्षमतेचा डेमो मोबाईल त्याचा आयएमई नंबर 8672030883157 93 असा आहे सानिब मलिक राहणार कुंडा राज्य उत्तर प्रदेश यांनीच हा मोबाईल चोरी करून नेलेला आहे, त्याची पूर्ण नाव पत्ता माहित नाही, त्यामुळे त्याच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिगंबर हेरंब बोरकर वय 42 वर्ष व्यवसाय मोबाईल शॉपी राहणार नारायणपूर ता. पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशन गु.र. नंबर 212/ 2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2) नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस नाईक चव्हाण सुनिल हे पुढील तपास करीत आहेत.

एसजीआरएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये १४ विद्यार्थ्यांची निवड सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे दिनांक १३ मे २०२६ रोजी “मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह” उत्साहात पार पडला. नामांकित औषधनिर्माण कंपनी Emcure Pharmaceuticals यांच्या वतीने “Sales – Medical Representative” पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. मुलाखतीनंतर एकूण १४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अविष्कार सुधाकर जाधव, आयेशा समीर अत्तर, ऋषिकेश राजेंद्र भगत, दानिश शहाबुद्दीन अत्तर, धनश्री गाडेकर, कोमल दुयोधन बर्गल, मनोज भगवान पालवे, प्राजक्ता राजकुमार गुजरे, सानिका विवेक पवार, सोहम उत्तम काळे, अनस अ. अत्तर, अनुप प्रमोद भड, कार्तिक राजेंद्र जाधव आणि शिवम जगदाळे यांचा समावेश आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी केलेली मेहनत, सातत्य आणि संवाद कौशल्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. अशा प्लेसमेंट ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत.” उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार म्हणाल्या, “मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी मिळून त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली आहे.” प्रवेशावेळी पालकांना दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असे ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गणेश निगडे यांनी सांगितले. डॉ. गणेश निगडे व सौ. अंकिता जवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, पालक व शिक्षकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Image

पुणे जिल्ह्यातील झेडपी शाळांना आता मिळणार 'शिपाई मामा'; ग्रामपंचायत स्तरावर भरतीचा बिगुल वाजला!शाळेच्या देखभालीसाठी स्थानिक तरुणांना संधी; मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे महत्त्वपूर्ण आदेश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वर्षानुवर्षे रिक्त असलेल्या शिपाई पदांचा प्रश्न आता स्थानिक पातळीवर सुटणार आहे. शाळांमधील दैनंदिन शिस्त, स्वच्छता आणि शालेय कामकाजात मदत करण्यासाठी ग्रामपंचायतींना आता स्वतःहून शिपाई नेमण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या संदर्भात ८ मे २०२६ रोजी सर्व पंचायत समित्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.••शाळेच्या कामात येणार सुसूत्रता••शिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानुसार, शाळांमध्ये शिपाई नसल्यामुळे दैनंदिन शालेय कामकाज, स्वच्छता आणि परिसर देखभालीवर विपरीत परिणाम होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ६१ चा आधार घेत, ग्रामपंचायतींना आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देता येणार आहे.••निवडीसाठी प्रशासकीय निकष••• निकड पडताळणी: शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष कामाची गरज पाहूनच नियुक्ती करावी.• आर्थिक तरतूद: ग्रामपंचायतीने स्वतःची आर्थिक स्थिती आणि उपलब्ध निधी विचारात घेऊनच ही कार्यवाही करावी.•शिक्षण विभाग समन्वय: नियुक्तीपूर्वी शिक्षण विभागाशी समन्वय ठेवून आवश्यकतेबाबत खातरजमा करणे अनिवार्य आहे.•नियमपालन: ही कार्यवाही करताना शासन निर्णय आणि प्रचलित ग्रामसूचीतील तरतुदींचे पालन करावे.••स्थानिक रोजगाराला मिळणार बळ••या निर्णयामुळे प्रत्येक गावात स्थानिक सुशिक्षित तरुणांना आपल्याच गावच्या शाळेत सेवा करण्याची आणि रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे शाळा व्यवस्थापनात गावचा सहभाग वाढून शाळांच्या भौतिक सुविधेत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.••प्रशासकीय संदेश••"शाळा हे गावचे भविष्य घडवणारे केंद्र आहे. तिथली स्वच्छता आणि व्यवस्थापन नीट राहण्यासाठी शिपाई पदाची मोठी भूमिका असते. ग्रामपंचायतींनी या पत्रातील तरतुदींनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार तातडीने नियमोचित कार्यवाही करावी."— गजानन पाटील (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद.बातमीचा संदर्भ:पुणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, पत्र क्र. जा.क्र.ग्रा.पं./आस्था-०२/५३०/२०२६, दिनांक ०८/०५/२०२६.फोटो ओळ:स्वच्छतेचा संकल्प: पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दैनिक कामकाज आणि स्वच्छतेसाठी शिपाई पदाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. (संग्रहित छायाचित्र:

Image

जेजुरीतील ‘भंडारा’ वापराबाबत सुरक्षिततेचे नियमभाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी गडकोटातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला आणि भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. अन्न व औषध प्रशासन लवकरच जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित करणार आहे, जे पारदर्शकता आणि शुद्धतेला प्राधान्य देईल. भाविकांच्या आरोग्यासाठी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले आहेत.जेजुरी गडकोटावर भंडारा उधळून आग लागल्याची घटना काही काळापूर्वी घडली होती. लोकप्रतिनिधींनी या घटनेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भंडाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी विशेष धोरण ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे, आमदार राजू नवघरे, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.विविध देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा ‘हळद भंडारा’ शुद्ध हळदीच्या स्वरूपातच उपलब्ध असावा, तसेच विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार अन्न परवाना घेऊनच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले जात आहेत. यामुळे भेसळयुक्त ‘हळद भंडारा’ विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने खालील उपाययोजना करण्याचे ठरवले आहे.सुरक्षितता उपाययोजना: मंदिर परिसरात भंडाऱ्याच्या वापराबाबत सुरक्षिततेचे नियम लागू करणे.जनजागृती: भाविकांना शुद्ध भंडाऱ्याची ओळख व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीफलक लावणे.आरोग्य मोहीम: आरोग्य विभागाद्वारे भंडाऱ्याच्या वापराबाबत आणि गुणवत्तेबाबत विशेष तपासणी मोहीम राबविणे.कायदेशीर दृष्टिकोनातून भंडाऱ्याचे वर्गीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सामान्यतः ‘ भंडारा’’ म्हणजे मोफत अन्न वितरण, परंतु जेजुरीत तो ‘हळद भंडारा’ या स्वरूपात पूजेसाठी वापरला जातो. जर हळदीचा वापर सौंदर्यवाढ किंवा उपचारासाठी केला जात असेल, तर तो औषध किंवा सौंदर्यप्रसाधन यामध्ये येतो, परंतु जेजुरीतला हळद भंडारा’ ‘धार्मिक विधी’ आणि ‘प्रसाद’ म्हणून वापरला जातो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन त्याचे विशेष नियमन करणार आहे.मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले, “जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”या निर्णयामुळे जेजुरीतील भंडाऱ्याला कायदेशीर ओळख मिळणार असून, देवस्थानांच्या ठिकाणी भेसळ रोखण्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

किल्ले पुरंदर वर जयंतू शंभू महानाट्य सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: किल्ले पुरंदर येथे बुधवारी दि. 13 रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शासकीय जयंती निमित्त शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'जयंतू शंभू 'महानाट्य सादर करण्यात आले. नाट्याचा शुभारंभ पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ , पुरंदर प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटणे, तसेच संभाजी ब्रिगेडचे सागर जगताप, नारायणपूर सरपंच प्रदीप बोरकर आदी उपस्थित होते. हे महानाट्य पाहण्यासाठी नागरिकांची उपस्थिती होती ,आज दि.14 रोजी सकाळी शंभू महाराज यांच्या पुतळ्याचे अभिषेक, पालखी सोहळा, मान्यवरांचे सत्कार, वितरण ,याशिवाय दिवसभर विविध कार्यक्रम असे घेण्यात आले.

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे मद्यधुंद अवस्थेमध्ये युवक युवतीचा गोंधळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : झेंडेवाडी ता. पुरंदर येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घालून पोलिसांची उद्धट भाषा वर्तन करणाऱ्या एका तरुणावर व महिलेवर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. किरण संजू झंजोट (वय 29) राहणार येरवडा आणि पायल गायकवाड वय 31 राहणार हडपसर असा गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत, पोलीस नाईक निलेश पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. झेंडेवाडी येथे गुरुवारी दि. 14 रोजी पहाटे चारच्या सुमारास काही व्यक्ती पाठलाग करत असल्याचा कॉल पोलिसांना मिळाला होता, गस्तीवरील पोलीस मदतीसाठी घटनास्थळी पोचले असता, किरण आणि पायल हे दोघे तेथे मिळून आले, पोलिसांनी मदतीबाबत विचारणा केली असता, दोघांनी मद्यधुंद अवस्थेमध्ये आरडाओरडा सुरू केला, पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घातली, या प्रकरणाचा सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अभिजीत कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथे 30 ब्रास मुरूम चोरीचा आरोप; तर दमदाटी व जीवे मारण्याची धमकी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी ता. पुरंदर येथे सामायिक शेत जमिनीतील 30 ब्रास मुरूम चोरून, नेल्याप्रकरणी आणि विचारणा केली असता शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी तनवीर कयूम शेख (वय 41) रा. हडपसर मूळ राहणार वनपुरी यांनी फिर्याद दिली असून, सुनील महादेव गायकवाड राहणार वनपुरी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविलेला आहे, शेख यांची वनपुरी येथे जमीन आहे, 24 एप्रिल रोजी ते शेतात गेले असता, आरोपी गायकवाड यांनी तेथील मुरूम काढून विक्री केल्याचे निदर्शनास आले, यानंतर 13 मे रोजी आरोपीने त्यांच्या 23 गुंठे क्षेत्राचे तारेचे कुंपण तोडून संपूर्ण 72 गुंठे क्षेत्रावर स्वतःच्या नावाची पाटी लावून, तेथे खडी आणून टाकली होती, याबाबत जाब विचारला असता, आरोपीने शिवेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सुहास लाटणे पुढील तपास करीत आहेत.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह उत्साहात सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. १३ मे २०२६ रोजी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात आयोजित करण्यात आला. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नामांकित औषधनिर्माण कंपनी Emcure Pharmaceuticals सहभागी झाली होती. कंपनीकडून “सेल्स – मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह” या पदासाठी बी.फार्मसी (२०२४, २०२५ व २०२६ उत्तीर्ण) विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया घेण्यात आली.कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुलाखत प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांच्या संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास व औषध विक्री क्षेत्रातील ज्ञानाचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन स्वतःचे कौशल्य विकसित करावे व व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन करावे, असे आवाहन उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार यांनी केले.या प्लेसमेंट ड्राइव्हचे समन्वयक म्हणून डॉ. जी. बी. निगडे व सौ. ए. ए. जावळकर यांनी कार्य पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Image

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटामध्ये पुण्यातील कोयता राज गॅग 100 ते 150 लोकांची टोळी कोयता तलवारीचा धाक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील दिवे या घाटामध्ये पुण्यातील कोयता राज गॅंगने 100 ते 150 लोकांची टोळी कोयता तलवारीचा धाक दाखवून, एक प्रकारे दहशत निर्माण केलेली आहे, यावर नक्की पोलिसांचा ताबा राहू शकेल का ? हा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहेच, दिवसेंदिवस या पुण्याच्या गॅंग मधील टोलकीने तलवार, कोयता हातात घेऊन, एक प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस चालूच आहे, यावर नक्की पोलिसांचा धाक बसेल का ? पुरंदर तालुक्यातील दिवेघाटामध्ये हातात तलवारी कोयता ते घेऊन 100 ते 150 गाड्यावर बसून या टोळक्यांनी दहशत माजवल्याची घटना रात्री साडेबारा च्या पुढे घडली, या टोळक्याला वेळीच व्यसन घातले नाही, तर कायद्याला भीक न घालणारे हे टोळके उद्या दहशत माजवून गुन्हेगारी कृत्य करून पुण्याच्या गुन्हेगारीत भर घालण्याचा काम करतील अशी एक प्रकारे चिंता व्यक्त केली जात आहे, पोलिसांनी तात्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी कोणाच्याही दबावाला बळी न पडता, या टोळक्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे यावर नक्की पोलिसांचा अंकुश बसेल का ? व कारवाई होईल का ? यांना पुढे त्या ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये प्रवृत्त करण्यासाठी त्यांना स्थान दिले जाईल का? हे असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहेत.

Image

पुरंदर तालुक्यात भरारी पथके तैनात करावीत ; बियाणे खताची चढ्या दराने विक्री रोखण्याची प्रयत्न करावेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खते ही उपलब्ध व्हावीत यासाठी बोगस बियाणे विक्रेत्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी, पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी प्रशासनाने व्यापक अशी जनजागृती करणे गरजेचे असून, असे निर्देश आमदार विजय शिवतारे यांनी दिले. बोगस बियाणे आणि खताची चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी तालुक्यामध्ये भरारी पथके तैनात करण्यात यावी, बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनाही बॅग आणि टॅग जपून ठेवावा, असे आव्हान तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी केले. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची निर्देशही देण्यात आले सासवड ता. पुरंदर येथे आयोजित तालुकास्तरीय खरीप हंगामी नियोजन सभेत ते बोलत होते. पुरंदर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मंगळवारी दि. 12 रोजी आढावा सभा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पार पडली. यावेळी शिवतारे यांनी शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे आणि खते उपलब्ध करून, देण्याच्या सूचना दिल्या यंदा तालुक्यात साठी 1400 क्विंटल भात, 1600 क्विंटल सोयाबीन, 315 क्विंटल बाजरी आणि 272 भुईमूग, बियाणे तर 13402 टन खताची नियोजन करण्यात आले आहे, प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ,या बैठकीस पंचायत समिती सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ , नायब तहसीलदार संदीप पाटील ,प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य, सदस्या, कृषी अधिकारी, पिक विमा प्रतिनिधी, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व शेतकरी आदी उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील सोलर प्रकल्पाचे काम बंद पडले ; तर गावकऱ्यांचा विरोध जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये बैठक संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राजेवाडी ता. पुरंदर येथील गायरान क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्री सौर ऊर्जा अंतर्गत सोलर प्रकल्प राबविण्यात येत असून, हा प्रकल्प राबवताना ग्रामपंचायत स्थानिकांना विश्वासात न घेता परस्पर सुरू झाल्याने, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा घेऊन सोलर प्रकल्पाला विरोध केला आहे, त्यानुसार हे काम बंद पाडलेले आहे, दरम्यान मंगळवारी दि. 12 रोजी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेण्यात आली, यावेळी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवण्यात आला, राजेवाडी येथील वीस एकर गायरान क्षेत्रातील जागेत हा सोलर प्रकल्प होऊ घातलेला असताना याला विरोध म्हणून ग्रामसभा घेतली, याबाबतचा पत्र व्यवहार सरपंच दत्तात्रय जगताप यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्याकडे मार्च महिन्यामध्ये केला होता, याबाबत आमदार विजय शिवतारे यांनीही जिल्हाधिकारी यांना प्रोजेक्ट करू नका, असे सांगितले होते, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा प्रकल्प राबवणार असल्याचे सांगून, पोलीस बंदोबस्तामध्ये प्रोजेक्टचे काम सुरू केले होते, ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना लेखी माहिती न दिल्याने, नागरिक संतप्त झाले होते, त्यामुळे सोलर प्रोजेक्टचे काम बंद पाडले असून, याबाबतचे जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी ठेकेदार व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, शेतकऱ्या समवेत जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेतली, बैठकीत ग्रामपंचायत शेतकऱ्यांनी आमचा सोलर प्रोजेक्ट ला विरोध असल्याचे स्पष्टपणे बजावले होते, ग्रामसभेचा ठराव असल्याची त्यांनी ठणकावून सांगितले तरीही, ठेकेदार दादागिरीची भाषा करून ऐकण्यास तयार नव्हते, म्हणून ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे यांनी आमदार विजय शिवतारे यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली, त्यानुसार आमदार शिवतारे यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सचिव यांच्याशी बोलून, ठेकेदार अधिकारी यांना खडसावून हा प्रकल्प बंद करा ,असे स्पष्ट आदेश दिले. याबाबत ग्रामपंचायत, शेतकरी व आमदार शिवतारे यांच्यात बैठक झाल्यानंतरच प्रकल्पाविषयी चर्चा केली जाईल ,असे सरपंच दत्तात्रय जगताप ,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, शेतकऱ्यांनी ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट केले, याबाबत निवेदनही यावेळी ठेकेदार यांना दिले. यावेळी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बाळासो जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र जगताप, महेंद्र जगताप, प्रवीण सणस, गणेश जगताप, महेंद्र जगताप, बाळासाहेब जगताप, मारुती जगताप, नंदू जगताप ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने आधी उपस्थित होते. गावकऱ्यांच्या माथी हा प्रकल्प मारू नका, भविष्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे, त्यामुळे तीन किलोमीटर ला राजेवाडी चा कायापालट होणार आहे ,राजेवाडी गावातील नागरिकांना सुविधासाठी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, क्रीडांगण, स्मशान भूमी, दपनभूमी, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, कचऱ्याचे वर्गीकरण प्लॉट, सरकारी दवाखाने सर्व शासकीय कार्यालयासाठी जागाच उपलब्ध राहणार नाही, हा प्रकल्प 40 वर्ष अस्तित्वात राहणार असल्याने, भविष्यामध्ये गावासाठी जागा उपलब्ध होत नसल्यासने सुरुवातीलाच ग्रामस्थांनी ग्रामसभा ठरावानुसार विरोध दर्शवला तरी ,हा प्रकल्प माथी मारण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर मार्गाने प्रकल्प बंद पाडला जाईल असा स्पष्ट इशारा सरपंच दत्तात्रय जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे व शेतकऱ्यांनी दिलेला आहे.अशी माहिती सरपंच दत्तात्रय जगताप यांनी प्रतिनिधीला दिली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी पुरंदर ऍग्रो एक्सप्रो च्या मंडपाचे पूजन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ आणि आधुनिक तंत्रज्ञानाची द्वारे खुली करून देण्यासाठी शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरंदर ॲग्रो एक्सप्रोच्या या कृषी व पशु प्रदर्शनाच्या तयारीला वेग आला आहे. सासवड येथील श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या परिसरामध्ये 22 ते 25 मे दरम्यान हे भव्य प्रदर्शन भरणार असून, त्या मंडपाचे विधिवत पूजन माजी आमदार संजय जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. कोरोनाच्या संकट काळा नंतर प्रदीर्घ विश्रांतीनंतर हे प्रदर्शन पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपात आयोजित केले जात असल्याने, शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे, शेतीमध्ये सध्या वाढत असलेला उत्पादन खर्च कमी करणे आणि एकरी उत्पादकता वाढवणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे, यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभाव वापर करून ,कमी खर्चात भरघोस उत्पादन कसे घ्यावे, याचे थेट मार्गदर्शन अनुभवी तज्ञाकडून शेतकऱ्यांना दिले जाणार आहे ,विशेषता ग्रामीण भागातील मजूर टंचाईवर मात करण्यासाठी उपायुक्त ठरणारे आधुनिक कृषी यंत्रे ,हरितगृह तंत्रज्ञान, मशरूम उत्पादन आणि कोल्ड स्टोरेज क्षेत्रातील नामवंत कंपन्या आपली उत्पादने आणि तंत्रज्ञान या प्रदर्शनात सादर करणार आहेत, शरद कृषी व पर्यावरण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात झालेल्या व्यापक जलशंधारणाच्या कामामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे, या उपलब्ध पाण्याचा उत्साह न करता त्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि ठिबक सिंचनाचे विशेष प्रशिक्षण या एक्सप्रो मुद्दे दिले जाणार आहे, त्याचबरोबर पशूंचे आहार व रोग याविषयी मार्गदर्शन तसेच पशुपालन कुकूटपालन आणि प्रक्रिया उद्योगातील नवनवीन संघाची माहिती देऊन तरुणांना शेती पूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्याचा संयोजकांचा मानस आहे.या चार दिवशीय प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय अनुभव राष्ट्रीय कंपन्याचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुधारित बी बियाणे खते आणि कीटकनाशकांबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील, ग्रामीण भागातील आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्थापनेसाठी तजण्यांचा विशेष असा सल्ला दिला जाणार आहे .उपनगराध्यक्ष मनोहर जगताप ,गटनेते अजित जगताप, माजी उपनगराध्यक्ष यशवंत (काका )जगताप, पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे, नगरसेवक सोपान रणपिसे ,संतोष गिरमे, सेवा निवृत्त कृषी अधिकारी संभाजी गरुड ,रवींद्र (पंत) जगताप, पुरंदर नागरी चे सरव्यवस्थापक अनिल उरवणे ,सतीश शिंदे, प्रताप गरुड, सुनील जगताप, एडवोकेट सौरभ वढणे, तुषार जगताप, संतोष गायकवाड, दीपक जगताप, विनोद राठोड, कैलास जगताप, गणेश सरनाईक आदी उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,000दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                        पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.13 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 4,000 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, बाबु पवार ऋषिकेश ट्रेडर्स सासवड गुळाला 500रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 2,50 बॉक्स 50क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,500 कमाल दर 4,300रुपये तर साधारण4,400 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,000,5,000,4,000. बाजरी 2,500,3,300, 2,900. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ 4,000,5,500,4,750 हरभरा 4,800, 5,600,5,200.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी एसटीची दुचाकीला जोरदार अशी धडक ; तर भीषण अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू ; एसटी चालकावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड जेजुरी रोड वरील बायपास चौकामध्ये भरधाव एसटी बसच्या धडकेमध्ये दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू ,घडल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले असून, संबंधित एसटी चालका विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारामध्ये विशाल ओव्हाळ हे त्याचे मित्र मुकेश पवार व आकाश कारके यांच्यासोबत दुचाकीवरून जेजुरी कडे जात होते, सासवड जेजुरी रोडवरील बायपास चौकामध्ये समोरून येणाऱ्या एसटी बस क्रमांक एमएचझिरो सहाएस 8334 ने दुचाकी ला जोरदार अशी धडक दिली, या अपघातामध्ये विशाल ओवाळ यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तसेच मुकेश दत्तू पवार व आकाश बंडू कारके हे गंभीर जखमी झालेले आहेत, अपघातानंतर या परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती, या प्रकरणी प्रिया विशाल ओव्हाळ यांनी फिर्याद दिली असून, एसटी बस चालक संदीप शंकर चव्हाण राहणार पिंपळे ता. पुरंदर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106 (1), 281, 125, 125 (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार कांबळे अभिजीत पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे शिवाजी चौकातून एका अज्ञात इसमाकडून स्प्लेंडर प्लस मोटरसायकलची चोरी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : बोपगाव ता. पुरंदर येथील आप्पा शंकर गवळी कुटुंबीयांसह राहण्यास असून, मोल मुजरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत आहेत ,स्प्लेंडर प्लस मोटरसायकल नंबर एमएचबारा जी जे 3509 ही 2010 साली त्यांनी आपल्या नावे घेतली असून, त्या ठिकाणी दैनंदिन कामासाठी ते त्याचा वापर करीत होते, दररोज ते सकाळी साडेआठच्या सुमारामध्ये घरून निघून, कात्रज येथे मोल मजुरी करण्यासाठी जात होते, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र बापू थोपटे सहित ते मोटरसायकल वरून कात्रज या ठिकाणी कामासाठी जात होते ,तर रात्री अकरा वाजता बोपगाव येथे ते कामावरून येत असताना ,त्या ठिकाणी बोपगाव येथील ती मोटरसायकल शिवाजी चौक बोपगाव तालुका पुरंदर या ठिकाणी लावत होते. दि. 9 मे रोजी नेहमीप्रमाणे ते आपले मित्र मोटर सायकल वरून कामावर गेले होते, कामावरून सुट्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी रात्री आल्यानंतर ते बोपगाव येथील नेहमीप्रमाणे आपल्या शिवाजी चौकामध्ये गाडी लावत असत, व सकाळचे त्या ठिकाणी साडेसातच्या सुमारांमध्ये शिवाजी चौकात गाडी पाहण्यासाठी गेले असता ,त्या ठिकाणी त्यांना गाडी दिसून आली नाही ,त्यामुळे त्या गाडीचा आजूबाजूला परिसरामध्ये शोध घेतला असता, गाडी त्यांना मिळून आली नाही, त्या ठिकाणी भिवरी, चाबळी सासवड या गावांमध्ये शोध घेतला असता, कुठेही त्यांची मोटरसायकल मिळून आली नाही, त्यामुळे त्यांची खात्री पूर्णपणे पटली असून, त्यांची मोटरसायकल कोणीतरी एका अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन गेलेले आहेत, मोटार सायकलचे वर्णन पंधरा हजार रुपये एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आरटीओ नंबर एम एचबारा जीजे 3509 चॅसी क्रमांक एमबी एलएचए10इझेडए एचजी87360 इंजिन क्रमांक एचए10इएफ एजीइ 3609 त्यामुळे बोपगाव येथील शिवाजी चौकातून मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेलेली आहे, तेव्हा त्या अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अप्पा शंकर गवळी (वय 48 वर्ष) व्यवसाय मजुरी राहणार बोपगाव तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे जावयाकडून सासऱ्यावर हल्ला ; तर दाताला अशी गंभीर दुखापत ; सासवड पोलीस ठाण्यामध्ये जावयावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मुलीला सासरी पाठवण्याच्या कारणावरून जावयाने सासऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे घडली असून, या मारहाणीमध्ये वृद्ध शेतकऱ्याच्या दाताला गंभीर अशी दुखापत झाली असून, सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, याप्रकरणी शंकर रामचंद्र रोकडे (वय 62 )राहणार भिवरी ता. पुरंदर त्यानुसार सचिन अर्जुन जाधव राहणार काळेवाडी पुणे यांच्या विरोधामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 117 (2), 115 (2), 352, 351 (2 )(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी रेणुका हिला तिचा पती सचिन जाधव यांनी घरगुती कारणावरून शिवीगाळ करून, मारहाण केल्याने ती माहेरी भिवरी येथे आली होती, मंगळवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारामध्ये सचिन जाधव हा भिवरी येथे फिर्यादी यांच्या घरी आला होता आणि रेणुकाला माझ्यासोबत पाठवा अशी मागणी करत होता,मात्र तू मुलीला वारंवार मारहाण करतोस त्यामुळे तिला तुझ्यासोबत पाठवणार नाही, असे सांगितल्याने आरोपी संतापला त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने गालावर जोरदार मारहाण केली, तसेच लाथा बुक्याने मारहाण केल्याने फिर्यादीच्या दाताला गंभीर अशी दुखापत झाली असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेले आहे, यावेळी आरोपीने माझा मोठ्या लोकांशी संबंध आहे, तुम्ही माझे काही वाकडे करू शकत नाही, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केलेला आहे. या घटनेनंतर जखमी शंकर रोकडे यांनी सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेतले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाताला गंभीर अशी दुखापत झाल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी टँकर व्यवसायाच्या वादा मधून मारहाण तर वडील व मुलाविरोधामध्ये गुन्हा सासवड पोलीस स्टेशन मध्ये दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: टॅंकर व्यवसायाच्या कारणावरून झालेल्या वादातून सासवड या ठिकाणी एका व्यवसायिकास त्याच्या आईला मारहाण करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सासवड येथील सोपानदेव मंदिराशेजारी घडली, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये दोघा विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी नितीन काशिनाथ शिवरकर (वय 38) व्यावसाय पाणी टँकर राहणार सोपानदेव मंदिर शेजारी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे, दि. 10 मे रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारामध्ये त्यांच्या घराशेजारी टँकर व्यवसायच्या कारणावरून आरोपी लालसिंग चांगदेव शिवरकर व जीवन लालसिंग शिवरकर दोघे सोपान देव मंदिराशेजारी राहणार असून ,या दोघांनी वाद घालत फिर्यादीस दगड व हाताने मारहाण केली, तसेच फिर्यादी यांच्या आई सुनंदा शिवरकर यांनाही लाथा भुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीमध्ये नमूद केलेले आहे .यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे, फिर्यादीमध्ये म्हटले आहे याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 118( 1), 115 (2), 352, 351, (2) (3) 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन मार्फत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस नाईक चव्हाण सुनिल हे पुढील तपास करीत आहेत.

काकासाहेब पुरंदरे स्मृती प्रतिष्ठान, मुंबईचा पञकारीता पुरस्कार सुनील लोणकर यांना जाहीर सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर,महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखा व काकासाहेब पुरंदरे स्मृती प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत उर्फ काकासाहेब दत्तात्रय पुरंदरे यांच्या नावाने पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा पुरस्कार पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार सुनील पांडुरंग लोणकर यांना जाहीर झाला, अशी माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. पुरंदरे यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त २४ मे रोजी सकाळी १० वाजता आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे. पुरस्काराचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड .दिलीप निरगुडे यांनी केले आहे.

Image

महाराष्ट्रातील होमगार्ड कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून ; होमगार्ड यांना 365 दिवस काम द्यावे! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: होमगार्ड गुहरक्षक कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून त्या ठिकाणी होमगार्ड बांधवांना कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे, या मागणी करता बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी सोमवारपासून आजाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे, राज्यामध्ये सध्या सुमारे 44 हजार होमगार्ड आहेत, तसेच 11,000 रिक्त जागा असून, सण ,उत्सव काळामध्ये होमगार्ड यांना काम फक्त असते, दिवसाला 1,283 रुपये भत्ता होमगार्ड यांना मिळतो, परंतु हा भत्ता सहा-सहा महिने मिळत नाही, त्यामुळे कायमस्वरूपी 365 दिवस काम द्यावे,सेवा निवृत्तीनंतर होमगार्ड बांधवांना पुढील उदरनिर्वाहासाठी 50 लाखाची आर्थिक मदत द्यावी, पोलीस भरतीमध्ये वयात 38 वर्षापर्यंत सवलत द्यावी, व भरतीमध्ये १५ टक्के कोठा ठेवावा, सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 करण्याची मागणी असल्याचे डॉ. रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या मागण्यांची जोपर्यंत दखल घेत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील, असेही डॉक्टर रामलिंग पुराणे यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथून व्ही.के. हॉटेल येथील पार्किंग मधून सावलीला लावलेली गाडी चोरीला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील विठ्ठल मूर्ती या ठिकाणी दि. 3 मे रोजी दुपारी 3: 54 वाजता कार्तिक दत्तात्रय गायकवाड यांनी किरण जाधव यांना फोनवरून असे कळवले असता की, तुम्ही मला विकलेली गाडी मोटरसायकल क्रमांक एमएचबारा जीपी 8484 त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी शौर्य मोरे, साईराज जाधव, कार्तिक गायकवाड राहणार दोन्ही फुरसुंगी पुणे पाथरकर राहणार हडपसर असे दोघेही फोटो काढण्यासाठी झेंडेवाडी येथील विठ्ठल मूर्ती जवळ त्या ठिकाणी फिरायला आले असताना, मोटरसायकल व्ही.के. हॉटेल येथील पार्किंग मध्ये सावलीला लावलेली होती, त्यावेळी विठ्ठल मूर्ती जवळ गेलो असता, कार्तिक गायकवाड यांनी आणलेल्या होंडा एक्टिवा मोटरसायकल क्रमांक एमएचबारा पाच 2121 या गाडीमधून पाण्याची बॉटल आणण्यासाठी गेलो असता, त्यावेळी तेथे बुलेट मोटरसायकल क्रमांक एमएचबारा जीपी 84 84 ही तेथे गाडी नसल्याकारणामुळे, त्यानंतर दोघांनी आजूबाजूला गाडीचा शोध घेतला असता, ती कोठेही मिळून आली नाही, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्या ठिकाणची मोटरसायकल क्रमांक एमएचबारा जीपी 84 84 चोरी करून नेलेली आहे अशी चोरीस गेलेल्या मोटरसायकलचे वर्णन हे पुढील प्रमाणे 35,000 रुपये किमतीचे एक काळे रंगाची बुलेट मोटरसायकल क्रमांक एमएचबारा जीपी 84 84 तिचा नंबर चेसी नं me3s5coba046689 इंजीन नं u355coba046689 अंदाजे 35 हजार रुपये असून ,झेंडेवाडी येथील विठ्ठल मूर्ती जवळ फिरायला गेलो असताना, मोटरसायकल व्ही.के हॉटेल येथे पार्किंग मध्ये सावलीला लावलेली असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने बुलेट मोटरसायकल चोरी करून चोरून नेलेली आहे, म्हणून अज्ञात चोरट्या विरुध्द तक्रार फिर्यादी किरण हनुमंत जाधव राहणार फुरसुंगी ( वय 42) व्यवसाय टूर्स ट्रॅव्हल्स राहणार मयूर कॉम्प्लेक्स फुरसुंगी यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस सुहास लाटणे करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी येथे हॉटेल साईरूपच्या पुढील बाजूच्या अंतरावर लेनवर एसटी थांबली असताना ; कंडक्टरला चार जणांची मारहाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील हॉटेल साईरूप च्या पुढे काही अंतरावर पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर दि. 12 मे रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारामध्ये गाडी नंबर एमएचबारा 8387 वरील सचिन मुरलीधर फाटे रा. वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे व त्यातील तीन जणांनी कंडक्टरची कॉलर धरून हाताने मारहाण करून, डोके कंडक्टरचे बोनेटवर दोन वेळा आपटले, त्यामुळे मार लागला असून, डोळ्याला सूज आली आहे, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ,जमिनीवर पाडले असता, मारहाणी मधील एसटी प्रवाशातील तिकिटाचे पैसे हे जमिनीवर पडले, एसटीतील प्रवाशांना त्याच्यामुळे थांबून राहल्या कारणामुळे, प्रवाशांमध्ये पुढील प्रवास करण्यास उशीर झाला, या सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे, क्रेटा गाडी नंबर एमएचबारा व्हीव्ही 8387 वरील सचिन मुरलीधर फाटे राहणार वडकी तालुका हवेली जिल्हा पुणे व त्याच्या तीन साथीदारा विरोधामध्ये कायदेशीर पद्धतीने तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल केलेली आहे, ही फिर्याद जीवन हरीशचंद्र चव्हाण (वय 30 वर्ष )व्यवसाय एसटी कंडक्टर रा. वाखरी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून, गु.र.नंबर 199/ 2026 भारतीय न्याय संहिता कलम 132, 115 (2), 351( 2)( 3) 352,3(5) या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस हिपरकर गोकुळ हे करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेवर वारंवार होणारा खंडित वीजपुरवठा आणि त्यामुळे विस्कळीत होणारे जल नियोजनाचे चक्र आता थांबणार आहे, या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय म्हणून शनिवारी दि. 9 रोजी 750 केवी क्षमतेचा जनरेटर बसवण्यात आलेला असून, यामुळे शहराचा पाणीपुरवठा आता सुरळीत होणार आहे, वीर धरण योजनेची जॅकवेल सातारा जिल्ह्यात येते ,तर पाणी पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी पंप हाऊस पर्यंत आणले जाते, तेथून पुन्हा उपसा करून पाणी पांगारे घाटा माथ्यावरील टाकीत साठवले जाते आणि तिथून सायफर पद्धतीने सासवड पर्यंत पोहोचते, या दरम्यान सातारा आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यातील वीज कपातीच्या वेळा वेगवेगळ्या असल्याने, भार नियमात अडचण निर्माण होते, त्यात गराडे आणि घोरवडी पाझर तलावातील पाणी बंद झाल्याने, शहराची दररोजची एक कोटी लिटर पाण्याची गरज पूर्णपणे वीर योजनेवर अवलंबून आहे, याबाबत पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले की, या योजनेवर 240 अश्वशक्तीचे तीन पंप कार्यरत आहेत, त्यापैकी एका अतिरिक्त पंपाला हा 750 केवीचा जनरेटर जोडण्यात आलेला आहे, आता महावितरणचा वीज पुरवठा खंडित झाला तरीही जनरेटर च्या साह्याने उपसा सुरू राहील, याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, गट नेते अजित जगताप, नगरसेवक राजन जगताप, प्रदीप राऊत, मयूर चौखंडे, नगरसेविका प्रियंका साकेत जगताप, स्मिता सुहास जगताप, लीना सौरभ वढणे व पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेतर्फे विशेष अशी स्वच्छता मोहीम सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या दिवशताबदी जयंती वर्षा निमित्त सासवड नगर परिषदेने सुरू केलेल्या विशेष अशा स्वच्छता मोहिमेचा दुसरा टप्पा रविवार दि. 10 रोजी प्रभाग क्रमांक 6 मध्ये पार पडला. या मोहिमेत संत सोपान काका महाराज समाधी मंदिर परिसरात संपूर्ण प्रभागाची स्वच्छता करण्यात आली, नगरपरिषदेचे 150 स्वच्छता दूध, 10 घंटा गाड्या, 8 ट्रॅक्टर आणि 2 जीसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर कचरा उचलण्यात आला. माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप आणि मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष मनोहर जगताप, अजित जगताप, राजन जगताप यांच्यासह नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, प्रदीप राऊत, स्मिता जगताप, ज्ञानेश्वर गिरमे यासह नागरिकांनी श्रमदान केले.

तांत्रिक अडचणीमुळे रखडलेला श्रेया वाईकर हिचा दहावीचा निकाल अखेर जाहीर जेजुरी प्रतिनिधी:मयूर कुदळे उपसंपादक पुरंदर प्राईम न्यूज: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर केला असताना, राज्यभर विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला असताना, सुद्धा जेजुरी येथील विद्यार्थिनी श्रेया संतोष वाईकर हिचा निकाल मात्र तांत्रिक अडचणीमुळे रखडल्याची घटना समोर आली असताना, अखेर पुणे बोर्डाच्या कार्यालयात दोन दिवस पाठपुरावा केल्यानंतर व पुरंदर प्राईम न्यूज च्या पाठपुराव्यामुळे शनिवारी सायंकाळी तिचा निकाल जाहीर करण्यात आला, जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी श्रेया वाईकर हिने जिजामाता हायस्कूल परीक्षा केंद्रावरून दहावीची परीक्षा दिली होती, इतर सर्व विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाईन प्रसिद्ध झाले होते, मात्र श्रेया चा निकाल संकेतस्थळावर दिसत नसल्याकारणाने, तिच्यासह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, पालकांनी शुक्रवारी पुणे येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात धाव घेतली, यावेळी पालकांनी अधिकाऱ्याकडे तक्रार नोंदवली बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काही तांत्रिक अडचणीमुळे निकाल प्रदर्शित होण्यास विलंब झाल्याचे सांगितले, या बऱ्याच कारणामुळे वेळ प्रतीक्षा केल्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारामध्ये सहाय्यक सचिव वैशाली काळे यांनी श्रेयाच्या तात्पुरत्या निकाल पत्रा ची प्रत तिच्या वडिलांकडे सुपूर्त केली, यात श्रेयाला 87.80% गुण मिळाल्याचे स्पष्ट झाले, निकालाची माहिती मिळताच श्रेया व तिचे कुटुंबीय व शिक्षकांनी जल्लोष केला व पुरंदर प्राईम न्यूज चे सुद्धा आभार व्यक्त केले.

Image

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटानजीकच्या झेंडेवाडीतील "हॉटेल विहक्टेरिया इन" हॉटेल वरील जुगार अड्ड्यावर छापा ; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई ;तर 18 जणांवर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने झेंडेवाडी येथील एका हॉटेलवर टाकलेल्या दाढीमध्ये सुरू असलेला जुगार अड्डा उध्वस्त करण्यात आलेला असून, या कारवाई मध्ये 18 जणाविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रोख रक्कम व मुद्देमाला सह एकूण तीन लाख 64 हजार 50 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे, याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/ 2026 अन्वये मुंबई जुगार कायदा कलम 4,5 व 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत एकशिंगे यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 8 मे रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुरंदर हवेली तालुक्याला जोडणाऱ्या दिवे घाटालगत पुरंदर तालुक्यातील झेंडे वाडी गावच्या हद्दीमध्ये पालखी विसाव्या शेजारी असलेल्या "हॉटेल व्हिक्टेरिया इन" च्या तिसऱ्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती, त्यानुसार पथकाने छापा टाकला असता तेथे तब्बल 18 जण पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले, या कारवाईत 1) राहुल निळोबा फंड वय 40 रा. रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे 2)विवेक माणिकराव काळभोर वय 64 राहणार कदम वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे 3) दत्तात्रेय राजाराम फडतरे वय 36 राहणार मुक्काम पोस्ट वरुड तालुका खटाव जिल्हा सातारा 4) रूपचंद तुकाराम साबळे वय 52 राहणार शिवधर सातारा 5) अहमद शबीर मोगल वय 43 राहणार लोणी स्टेशन कदम वाकवस्ती पठारे वस्ती लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे 6) जॉन सबस्टील नायर वय 55 राहणार दगॅवस्ती 173 खडकी पुणे 3 7)अर्जुन पन्नालाल येरवाल वय 28 वर्ष राहणार प्यासा हॉटेलचे पाठीमागे लोणी काळभोर पठार वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे 8) सुरेश भगवान घुले वय 55 राहणार मांजरी पोस्ट ऑफिस शेजारी तालुका हवेली जिल्हा पुणे 9) पुंडलिक गजानन काळभोर वय46 राहणार बाजार मळा लोणी काळभोर 10 )मंगेश कृष्णाकांत डोईजोड वय 53 राहणार ए 103 डब्ल्यू सेक्टर मसुळकर कॉलनी पिंपरी अजमेरा कॉलनी महानगरपालिका मागे पुणे 18 11) प्रज्वल संदीप अवगुडे वय 27 राहणार अवताडे वाडी हांडेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे १२) किरण रमेश बांदल वय 46 राहणार काळेपडळ हडपसर सर्वे नंबर 49 नेहरू पार्क 13) शिवकुमार विश्वनाथ मथपरी वय 52 राहणार वारजे गणेशपुरी सोसायटी सर्वे नंबर 45 घर नंबर 2403 वारजे पुणे 58 14) अमित शंकर घुले वय 40 राहणार मांजरी बुद्रुक चिलाही रोड तालुका हवेली जिल्हा पुणे 15) अमित पांडुरंग राऊत वय 39 राहणार शास्त्रीनगर कोथरूड सर्वे नंबर 82/ 22 गाढवे कॉलनी 16) राकेश बबन मोहिते वय 35 राहणार सणसवाडी बजरंग वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे हे पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले, तसेच बबन जगन्नाथ मानकर वय 44 राहणार लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे हा जुगारांचा अड्डा चालवीत असताना मिळून आला ,तसेच विजय बाबुराव कोल्हापुरे वय 66 राहणार कोल्हापुरे बिल्डिंग लक्ष्मी बिल्डिंग 15 नंबर हडपसर पुणे याने त्यांना जुगार खेळण्यासाठी त्याच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली, तसेच पार्टनरशिप मध्ये सदरचा धंदा चालविला त्यामुळे त्यावरील अनुक्रमांक 1 ते 16 तसेच बबन जगन्नाथ मानकर वय 42 राहणार लासुरणे तालुका इंदापूर जिल्हा पुणे व विजय बाबुराव कोल्हापुरे वय 66 राहणार कोल्हापुरे बिल्डींग लक्ष्मी बिल्डिंग 15 नंबर हडपसर पुणे यांचे सर्व विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 4,5, 12 (अ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकूण 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, या कारवाईमध्ये पोलिसांनी रोख रक्कम जुगार साहित्य व आणि या मुद्देमाल असा एकूण तीन लाख चौसष्ट हजार पन्नास रुपयाचा ऐवज जप्त केला असून, विशेष म्हणजे ही धाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे, पुढील तपासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास चालू आहे अशी याबाबतची माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील जेजुरी या ठिकाणी विद्यार्थिनीचा एसएससी चा निकाल न लागल्याने शिक्षण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह !परीक्षा दिली तरी पण निकालच गायब सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एसएससी फेब्रुवारी 2026 मध्ये परीक्षेत बसलेल्या जेजुरी येथील विद्यार्थिनीचा निकाल अध्याप उपलब्ध न झाल्याने पालक व विद्यार्थिनींमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झालेले असून, "वर्षभर अभ्यास करा, परीक्षा द्या आणि शेवटी निकालच दिसू नये? असे संतप्त सवाल आता पालकांमधून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे शिक्षण मंडळाच्या ऑनलाईन प्रणालीवर तसेच निकाल प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून, विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी संबंधित विभागाकडे तात्काळ दखल घेऊन निकाल जाहीर करण्याची मागणी केलेली आहे, पालकाची संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थीनी रात्र दिवस अभ्यास करून परीक्षा देण्याची आणि निकालाच्या दिवशी वेबसाईटवर नावच नाही आणि निकालच नाही हा कोणता कारभार? विद्यार्थ्याच्या मानसिक तणावाला जबाबदार कोण? दरम्यान :जेजुरी परिसरामध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, शिक्षण व्यवस्थेतील निष्काळजीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे का ?असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे .उपलब्ध हॉल तिकीट नुसार विद्यार्थिनीचे नाव वायकर श्रेया संतोष असे असून, ती जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल इंग्लिश मीडियम जेजुरी या विद्यार्थिनी आहे, विद्यार्थिनीने इंग्रजी माध्यमातून एसएससी परीक्षा दिली असून, तीचा सीट नंबर c 12 9765 असा आहे मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र असे सर्व विषयाची परीक्षा नियमानुसार दिल्याची माहिती हॉल तिकिटावरून स्पष्ट होत आहे. मात्र परीक्षा पुणॅ होऊन निकाल जाहीर झाल्यानंतरही संबंधित विद्यार्थिनीचा निकाल उपलब्ध नसल्याची तक्रार समोर आली आहे, त्यामुळे "विद्यार्थ्यांच्या भवितव्याची नेमका कोण खेळ करत आहे ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

Image

मोरगाव मयुरेश्वरनगरीत सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र आयोजित १०१ बटुंचा दिव्य उपनयन संस्कार महायज्ञ दिमाखात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मोरगाव, जि. पुणे : सुवर्णपुष्प संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने एक दिवस समाजासाठी या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला १०१ बटूंचा सामुदायिक व्रतबंध उपनयन सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. संस्कार, परंपरा आणि समाजभावना यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.नुकताच मोरगाव येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास सुमारे दहा हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती लाभली. सकाळी ६ वाजता वेदघोषांच्या निनादात विधींना प्रारंभ झाला, तर सकाळी भव्य मिरवणुकीने वातावरण उत्साही झाले. दिवसभर विविध कार्यक्रमांनी सोहळा रंगतदार झाला.या कार्यक्रमात १०१ बटूंचा उपनयन संस्कार, सुवर्णजोडी गौरव समारंभ, वधू-वर पालक परिचय मेळावा आणि आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गरजू कुटुंबांनाही या उपक्रमात सहभागी होता यावे, यासाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले होते, तसेच काहींसाठी विनामूल्य सुविधाही देण्यात आल्या. त्यामुळे हा उपक्रम अधिक सर्वसमावेशक ठरला.गुरुवर्य अनुपसिंह दत्तात्रय दीक्षित वीरकर, नमो गुरुजी, पुणे, श्याम पंडित, साकतकर, विवेक दीक्षित, धायरी, न्युमेश वेदपाठक, पुणे, अवधूत पंडित, शेळगाव, सत्यवान महामुनी, पुणे, ज्ञानेश्वर दीक्षित, वीरकर, डॉ. स्वानंद पंडित आदी गुरुजनांच्या वेदपठण व मंत्रोच्चारांनी वातावरण भारावून गेले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुवर्णपुष्प परिवारातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. विशेषतः सुवर्णपुष्प संस्था महाराष्ट्र चे संस्थापक शोभा महामुनी व यांच्या विशेष योगदानातून हा दैदीप्यमान सोहळा यशस्वी झाला! योगेश महामुनी सर यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. सुनील पंडित सर यांनी आभार मानले. स्नेहभोजन व्यवस्थेसाठी दत्तात्रय वेदपाठक पिंटू मामा, महेश दीक्षित आणि मधुसूदन दीक्षित सुवर्णपुष्प आम्ही मोरगावकर यांचे विशेष योगदान लाभले मोहिनी दीक्षित नूतन धर्माधिकारी, सुलभा वेदपाठक.,महिला राज्याध्यक्ष मनीषा पोद्दार., तेजश्री वेदपाठक, उज्वला वेदपाठक आशा हजारो कार्यकर्त्यांनी सोहळा यशस्वीतेसांठो परिश्रम घेतले! विविध क्षेत्रातील मान्यवरांमध्ये शशांक पालकर, संचालक, कराड अर्बन बँक, प्रमोद वेदपाठक, भारत वेदपाठक, ज्योती वेदपाठक, उप अभियंता, पुणे मनपा, किशोर पंडित, परशुराम पंडित आदींची उपस्थिती लाभली.यावेळी आयोजकांच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या दानशूर, दाते, मार्गदर्शक, गुरुजन, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिक यांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. आपले सहकार्य हीच या संस्कारयज्ञातील अमूल्य समिधा आहे, अशा शब्दांत सर्वांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच हजारो कार्यकर्ते स्वयंसेवक यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहयोग दिल्यामुळेच हा सोहळा यशस्वी झालेला आहे, *“हा भव्य दिव्य सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील सोनार समाजासाठी ऐतिहासिक क्षण – एकजुटीची ताकद दाखवणारा भव्य विक्रम!”* *“सुवर्ण पुष्प परिवाराचे हजारो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन … संघटित होऊन … इतिहास घडवलेला आहे !” श्री संत नरहरी सेवा कार्य केलेले आहे.* अशी भावना संयोजक जगदीश महामुनी यांनी व्यक्त केली. वेद घोषांच्या पावन निनादात , संस्काराच्या सुवर्ण क्षणी 'सुवर्ण पुष्प संस्था ' आयोजित १०१ बटुंच्या 'उपनयन सोहळ्याचा ' हा दिव्य सोहळा आतषबाजीने उजळून निघाला .या मंगल कार्यासाठी अहोरात्र तन, मन, धन , आणि श्रम अर्पण केले त्यांचे 'आभार ' मानावे तेवढे थोडेच आहे....सुवर्णपुष्प परिवाराच्या सहकार्याच्या प्रत्येक उस्फुर्त उर्जेने या सोहळ्याला तेजोमय प्रभा लाभली.ज्यांच्या नियोजन कौशल्याने कार्याला दिशा मिळाली व ज्यांच्या परिश्रमाने आयोजनाला पुर्णत्व आले आणि ज्यांच्या सदभावनेने या उपक्रमाला 'आत्मा' प्राप्त झाला त्या सर्व सहृदय, सज्जन, कर्तृत्ववान, व्यक्तीच्या प्रती आम्ही कृतज्ञतेची फुले अर्पण करतो...*आपले सहकार्य म्हणजेच या संस्कार यज्ञातील अमुल्य 'समिधा' आहेत.ज्याच्यामुळे हा यज्ञ अधिक पवित्र अन् प्रभावी ठरला.सर्वांचे शतशः आभार अशाही उत्स्फूर्त भावना बटुंचे पालकांनी व्यक्त केल्या!कार्यक्रमादरम्यान सर्वांसाठी स्नेहभोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी अन्न वाया गेल्याची खंत व्यक्त करत अन्न हे पूर्ण ब्रह्म या संस्काराची जाणीव ठेवण्याचे आवाहन आयोजकांनी केले.हा सोहळा केवळ एक धार्मिक विधी न राहता, एकजूट, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रभावी उदाहरण ठरला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत तो प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली.

Image

कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पुरंदर संचलित कृषी औद्योगिक विद्यालय चांबळी विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. चांबळी विद्यालयाचा 100%निकाल लागल्याने विद्यालयाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पश्चिम भागात हिवरे केंद्रामध्ये चांबळी विद्यालयाचे द्वितीय आणि तृतीय क्रमांक आले विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कु. माने श्रावणी संतोष हिने 93.40 टक्के गुण मिळवित विद्यालयात प्रथम क्रमांक व हिवरे केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला तर कु सई महादेव कामठे 92.60 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक व हिवरे केंद्रात तृतीय क्रमांक तर कु. पायल गोविंद कामठे हिने 91.60टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला.एकूण विद्यार्थी - ३४उत्तीर्ण विद्यार्थी - ३४विशेष श्रेणी - १०प्रथम श्रेणी - १६द्वितीय श्रेणी - ०८तृतीय श्रेणी - ०० विद्यालयाच्या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रामीण भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करुन जीवनात यशस्वी व्हावीत असे स्वप्न पाहीले होते ते आज या निकालामुळे पूर्णत्वास येताना दिसत आहे.” या यशामागील खरे शिल्पकार असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. श्रीनाथ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष भैय्यासाहेब खैरे व सचिव संतोष जगताप यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

पुरंदर तालुक्यातील 31शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के ; 3130 पैकी 3024 विद्यार्थी उत्तीर्ण ; तर पुरंदर तालुक्याचा दहावीचा निकाल 97% सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या निकाल हा जाहीर करण्यात आला असून, पुरंदर तालुक्यातील 64 माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 96.61 टक्के लागला असून, तालुक्यातील 31 शाळांनी शंभर टक्के निकालाची नोंद केलेली आहे ,पुरंदर तालुक्यातून एकूण 3134 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी फॉर्म भरले होते ,त्यापैकी 3130 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले यामधून 3024 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, 934 विद्यार्थ्यांना विशेष असे प्राविण्य मिळाले, 1168 विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, 731 विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी तर 191 विद्यार्थ्यांना तृतीय श्रेणी मिळाली, तालुक्यातील म.ए.सो माध्यमिक विद्यालय सासवड, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिवरी, बाल सिद्धनाथ विद्यालय बेलसर, पारेश्वर विद्यालय पारगाव मेमाणे, यशवंत विद्यालय मावडी कडे पठार, सिद्धेश्वर विद्यालय नायगाव, विद्या महामंडळ प्रशाला कोथळे, शिवशंभो विद्यालय एखतपुर ,माध्यमिक विद्यालय मांढर ,यादव वाडी माध्यमिक विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल जेऊर, मातोश्री जिजाई सोपान विद्यालय साकुर्डे, मावडी पिंपरी माध्यमिक विद्यालय, माहूर माध्यमिक विद्यालय माहूर, हरणी माध्यमिक विद्यालय हरणी ,आदर्श विद्यालय केतकावळे, न्यू इंग्लिश स्कूल जवळाअर्जुन, शिवशंभो माध्यमिक विद्यालय खळद, सद्गुरु नारायण महाराज विद्यालय नारायणपूर, बाबालाल साहेबराव काकडे विद्यालय पिंपळे खुर्द, गुरुवर्य नारायण महाराज विद्यालय हिवरे ,राजुरी माध्यमिक विद्यालय राजुरी, श्री सद्गुरू कानिफनाथ विद्यालय बोपगाव, अनुसूचित जाती नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा दिवे, जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल जेजुरी, शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वाघापूर, इंदू इंग्लिश मीडियम स्कूल कोळविहीरे ,श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल वीर आणि कल्याणी पब्लिक स्कूल बेलसर इत्यादी शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे ,या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य नंदकुमार सागर, मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप नेवसे, सचिव मारुती झगडे ,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे, सचिव सचिन धनवट, टी डी एफ चे अध्यक्ष जालिंदर घाटे ,सचिव रमेश बोरावके, शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सिद्राम कांबळे आणि सचिव कीर्ती कुमार मेमाणे यांनी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि शाळांचे अभिनंदन केले.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथे महाराज स्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ; तर 1200 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला शिबिरांमध्ये लाभ सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजासव अभियान अंतर्गत सासवड मंडल भागातील आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा महाराजसव समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहामध्ये पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सासवड नगरीच्या वतीने या शिबिराचे आयोजन नगराध्यक्षा आनंदी (काकी) जगताप यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते, जगताप यांनी या उपक्रमासाठी विशेष असा पाठपुरावा करत विविध विभागांना एकत्र आणत, नागरिकांच्या विविध समस्या एका छताखाली जलद गतीने सोडविणे शक्य झाले ,अशा भावना उपस्थितितांनी व्यक्त केल्या, सर्वसामान्य जनता शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत शिबिराचे सुयोग्य असे नियोजन करण्यात आले होते, सासवड, आंबोडी, दिवे, पवारवाडी, काळेवाडी, झेंडेवाडी, सोनोरी, कुंभारवळण, हिवरे, पिंपळे आदी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, पाणंद रस्त्यांना प्राधान्य द्यावे, शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आखलेल्या आहेत ,प्रशासनांनी पुरंदर तालुक्यातील पाणंद रस्त्यांचे काम विना तक्रार मार्गे लावून शेतकऱ्यांची जीवन सुखकर करण्यासाठी प्राधान्य द्यावे ,असे आवाहन पुणे विभागाचे उपायुक्त रोहयो विभागीय आयुक्त संजीव पलांडे यांनी केले. नामदेव टिळेकर रजा राखीव उपजिल्हाधिकारी पुणे यांनी सुद्धा शासकीय योजना या सर्व सामान्य नागरिकांना त्याचा लाभ व्हावा यावर असे त्यांनी आवाहन करण्यात आले ,या शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण ,अर्थसाह्य, वन विभाग आधी विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र ,निवासी दाखले, सात बारा उतारे ,फेरफार ,वारस नोंद, ई मोजणी ,तुकडे बंदी नियमतीकरण, पीएम किसान नमो किसान, संजय गांधी निराधार, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत कर संबंधित प्रश्नावर मोठ्या अर्ज सादर करण्यात आले ,अनेक प्रकरणाचा जागेचा निपटारा हा करण्यात आला, शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासनाने सत्र न्याय विशेष अशी पथके नियुक्त केली होती, संजीव पलांडे उपायुक्त रोहयो विभागीय आयुक्त, नामदेव टिळेकर रजा राखीव उपजिल्हाधिकारी, विक्रम राजपूत तहसीलदार, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद ,आनंदी (काकी )जगताप नगराध्यक्ष सासवड नगरपरिषद ,मनोहर (तात्या) जगताप उपनगराध्यक्ष ,श्रीधर चव्हाण कृषी अधिकारी पुरंदर, स्मिता गौड भूमी अभिलेख, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार ,नगरसेवक /नगरसेविका सासवड नगरपरिषद इत्यादी मान्यवर या सह महसूल विभागातील सुहास कांबळे सासवडचे मंडलअधिकारी, हरिश्चंद्र फरांदे तलाठी सासवड तसेच महसूल विभागातील तलाठी व मंडलाधिकारी, परिसरातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आजी माजी पदाधिकारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात आज 1290 प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे असे विक्रम राजपूत तहसीलदार यांनी नमूद केले. सूत्रसंचालन सागर जगताप यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद यांनी मानले.

Image

श्री केदारेश्वर विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काळदरी (ता. पुरंदर, जि. पुणे) :येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे. विद्यालयाचा ९७.५० टक्के निकाल लागल्याने विद्यालयाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. कु अक्षदा दत्तात्रय वांभिरे हिने ८८.६० टक्के गुण मिळवित विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर कु अमृता संतोष जगताप हिने ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कु अनुष्का अविनाश कवितके हिने ८२.८० टक्के गुण मिळवित तृतीय क्रमांक पटकावला. विशेष प्राविण्यासह ११ विद्यार्थी यशस्वी झाले तर प्रथम श्रेणी प्राप्त १० विद्यार्थी, द्वितीय श्रेणी प्राप्त ०८ विद्यार्थी तर १० विद्यार्थी तृतीय श्रेणी प्राप्त करीत यशस्वी झाले. विद्यालयाच्या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य विजय चिकणे यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले* . “संस्थापक अध्यक्ष स्व चंदुकाका जगताप यांनी काळदरी सारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील मुले शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करुन जीवनात यशस्वी व्हावीत असे स्वप्न पाहीले होते ते आज या निकालामुळे पूर्णत्वास येताना दिसत आहे.” असे ते यावेळी म्हणाले. या यशामागील खरे शिल्पकार असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संस्थेचे सचिव तथा माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप, भारतीय प्रशासन सेवा अधिकारी व संस्थेचे विशेष सल्लागार डॉ. राजेंद्रबापू जगताप, संस्थेचे संस्थापक-सचिव - विश्वस्त- प्रा. सीए. डॉ. एम एस जाधव (सर), सहसचिव दत्तात्रय गवळी, संस्थेच्या समन्वयिका सोनालीताई शिंदे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा वं संस्थेच्या विश्वस्त राजवर्धनी जगताप,भारती विद्यापीठाच्या संचालिका व संस्थेच्या विश्वस्त डॉ. अस्मिता जगताप, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे व संस्थेचे सहव्यवस्थापक रवींद्रपंत जगताप यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा संतोष नवले, पर्यवेक्षक पांडुरंग दुर्गाडे, संजय भिंताडे, सुनिल घोडके, शिवाजी गोडसे, बाळू पोमणे, पंडित चेंडके, सुनंदा टकले व कविता शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Image

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इ शारा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी १४९ रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र, काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अवाजवी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. यानुसार, काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, एसटी महामंडळाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत’ ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे.महामंडळाच्या सूचनेनुसार, लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबरच सवलतींचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे. तसेच, NCMC कार्डद्वारे तिकीट वितरण, कार्ड टॉप-अप आणि इतर व्यवहारांसाठी एकसंध मानक कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यात आली आहे. सर्व आगार व्यवस्थापकांना ही कार्यपद्धती काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.या उपक्रमामुळे एसटी सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.(अभिजीत भोसले)जनसंपर्क अधिकारी मा. मंत्री परिवहन

Image

पुरंदर तालुक्यात अधिक मासानिमित्त सासवड या ठिकाणावरून विशेष अशा बस सेवा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : अधिक महिन्याचे औचित्य साधत असताना, राज्य परिवहन महामंडळाच्या सासवड आगाराच्या वतीने येत्या 17 मे पासून विविध धार्मिक स्थळासाठी विशेष अशा बस फेऱ्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे, आगर प्रमुख मोहिनी ढेरे आणि वाहतूक नियंत्रक कैलास जगताप यांनी या उपक्रमाची माहिती प्रतिनिधीला दिली. या विशेष फेऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून ,यात अष्टविनायक दर्शनासाठी महिलांना 7,20 रुपये तर पुरुषांना 1,438 रुपये पंढरपूर -तुळजापूर- गाणगापूर यात्रेसाठी महिलांना 8,35 रुपये तर पुरुषांना 1,668 रुपये शिर्डी- नाशिक त्रिंबकेश्वर-वणी वारेसाठी महिलांना 6,65 रुपये तर पुरुषांना 1,330 रुपये आणि कोल्हापूर- ज्योतिबा- नाणीज गणपतीपुळे प्रवाशासाठी महिलांना 7,75 रुपये आणि पुरुषांना 1,550 रुपये भाडे आकारले जाणार आहे, याबरोबरच भाविकांच्या सोयीसाठी आगारांनी विशेष अशी सवलत दिलेली आहे, जर 40 व्यक्तीच्या गटाने 300 km अंतरावरील त्यांच्या आवडीचे कोणतेही धार्मिक स्थळ निवडले, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येईल या अधिकमासाच्या निमित्ताने भाविकांना आणि पर्यटकांनी या प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.

पुरंदर तालुक्यातून सासवडच्या वीर जलवाहिनीला भगदाड ; तर पाणीपुरवठा विस्कळीत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी गुरुवारी दि.7 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारांमध्ये परिंचे हायस्कूल जवळील शेतामध्ये फुटली असून, जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली, जलवाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठा त्वरित सुरळीत होणार आहे, अशी पालिका प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा समितीचे सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी सांगितले, पालिकेच्या वतीने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे, अशी माहिती पाणीपुरवठा समितीचे सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी प्रतिनिधीला माहिती दिली.

पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी टोल नाक्यावर वसुली थांबवण्यासाठी मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असताना, तक्रारवाडी तालुका पुरंदर येथील टोल नाक्यावर वसुली सुरू झाल्याने, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे, नियमबाह्य वसुली तातडीने थांबून स्थानिकांना पूर्ण माफी द्यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी टोल नाक्यावर व्यवस्थापकांना निवेदन देत निदर्शने केली ,पुरंदर मधील सर्व खाजगी व्यावसायिक व शेती पूरक वाहनांना टोल मधून पूर्ण सूट मिळावी, सेवा रस्ते दिशादर्शक फलक आणि वृक्षारोपणा सारखी कामे पूर्ण होण्यापूर्वीच, वसुली सुरू करणे हा कायदेशीर दरोडा आहे, इत्यादी वाहने, महिला ,चालक, दिव्यांग आणि आजी-माजी सैनिकांना नियमानुसार सवलत द्यावी, पत्रकार यांना सुद्धा सवलत द्यावी, टोल नाक्यावर पिण्याचे पाणी, शौचालय आणि टोईग फॅन ची माहिती देणारे फलक लावण्याची मागणी केली, या आंदोलनात तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, संतोष भोसले, राजाभाऊ शिरसागर, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते, मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे.

पुरंदर विमानतळ बाधितांच्या जमिनीचे संमती वाटप तहसीलदार कार्यालयात सुरू; कुंभारकर कुटुंबीयांच्या खात्यात १ कोटी ८ लाख जमापहिल्या टप्प्यात उदचीवाडी येथील ३३ गुंठे जमिनीचा व्यवहार पूर्ण; १० जूनपर्यंत संमती करार करण्याचे प्रशासनाचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींच्या मोबदल्याची प्रक्रिया आता प्रत्यक्ष जमिनीवर उतरली आहे. तहसीलदार कार्यालय पुरंदर (सासवड) येथे आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पहिल्या शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला देऊन या प्रक्रियेचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय) कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रशासकीय टप्पा पार पडला.पुरंदर विमानतळासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, आज ७ मे रोजी तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदचीवाडी येथील शेतकरी विलास कैलास कुंभारकर व कैलास पांडुरंग कुंभारकर यांच्या ३३ गुंठे जमिनीचा संमती करारनामा प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करून नोंदवण्यात आला. या जमिनीच्या मोबदल्यापोटी १ कोटी ८ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम तातडीने आरटीजीएस द्वारे कुंभारकर यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने जाहीर केलेले दर हे बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहेत. १० जून २०२६ पर्यंत सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपले संमती करार पूर्ण करावेत, जेणेकरून त्यांना सक्तीच्या भूसंपादनाऐवजी संमतीने मिळणारे जास्तीत जास्त लाभ घेता येतील.एमआयडीसी कायद्यांतर्गत होणाऱ्या या भूसंपादनात शेतकऱ्यांना केवळ रोख रक्कमच मिळणार नाही, तर इतरही अनेक मोठे फायदे देण्यात येत आहेत. यामध्ये १०% विकसित भूखंडाचा ताबा, कुटुंबातील सदस्याला नोकरीत प्राधान्य आणि पुनर्वसनासाठी साडेसात लाखांपर्यंतचे विशेष अनुदान यांचा समावेश आहे. १० जूननंतर संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत 'सक्तीचे भूसंपादन' केले जाईल, ज्यात काही सवलतींना मुकावे लागू शकते, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. बँक खात्यांशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या प्रतिनिधींचीही मदत घेतली जात आहे. कुंभारकर कुटुंबीयांप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन विकास प्रकल्पात सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.••प्रतिक्रिया••"उच्चाधिकार समितीने मंजूर केलेले दर हे अंतिम असून ते शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. आम्ही पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबवत आहोत. ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहे, त्यांना तातडीने मोबदला दिला जात आहे. १० जूनपूर्वी संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सवलती मिळतील, त्यामुळे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा."— कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन समन्वय).फोटो ओळ: पुरंदर विमानतळ भूसंपादन प्रक्रिया: तहसीलदार कार्यालय पुरंदर येथे उदचीवाडीतील शेतकरी विलास कुंभारकर व कैलास कुंभारकर यांचा संमती करारनामा पूर्ण करताना उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले.

Image

सासवडकरांच्या समस्या आता 'ऑन द स्पॉट' सुटणार; महसूल प्रशासनाचा मोठा निर्णयलालफितीच्या कारभाराला चाप: आचार्य अत्रे सभागृहात उद्या रंगणार 'महाराजस्व समाधान शिबिर' सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सामान्य माणसाला तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणारे दिवस आता संपणार आहेत. पुरंदर तहसील प्रशासनाने लोकाभिमुख कारभाराचा नवा अध्याय सुरू केला असून, उद्या शुक्रवार, दि. ८ मे २०२६ रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. या एकाच शिबिरातून सासवड मंडल क्षेत्रातील शेकडो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.अनेकदा किरकोळ त्रुटींमुळे ७/१२ च्या नोंदी, वारस हक्क किंवा दाखल्यांची कामे महिनोनमहिने प्रलंबित राहतात. ही अडचण ओळखून तहसीलदार कार्यालयाने ही सर्व यंत्रणा थेट लोकांच्या दारात आणली आहे. सासवडच्या या विशेष शिबिरात केवळ अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, तर त्यावर तात्काळ निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला जाणार आहे.दाखल्यांची चिंता मिटली: शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना लागणारे जातीचे, उत्पन्नाचे आणि रहिवासी दाखले 'कॅम्प मोड'वर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न: वारस नोंदी, जमिनीचे फेरफार आणि ७/१२ मधील दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना आता कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.योजनांचा लाभ: संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, जे अनेकदा माहितीअभावी वंचित राहतात, त्यांना या शिबिरात थेट मदत केली जाईल.सिंगल विंडो क्लिअरन्स: एकाच ठिकाणी सर्व टेबलवर कागदपत्रांची पडताळणी आणि मंजुरी.डिजिटल क्रांती: डिजिटल ७/१२ बाबत जनजागृती आणि डाऊनलोड करण्याची प्रात्यक्षिकेजागेवर पट्टे वाटप: घरकुल लाभार्थ्यांना प्रलंबित घरांच्या पट्ट्यांचे वाटप.या शिबिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 'विवादास्पद फेरफार'. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले जमिनीचे वाद सामोपचाराने आणि कायदेशीर प्रक्रियेने सोडवण्याचा प्रयत्न महसूल विभाग करणार आहे. तसेच, पाणंद रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता या शिबिराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिल्या जातील."महसूल प्रशासन आणि जनता यांच्यातील अंतर कमी करणे हा या शिबिराचा मुख्य हेतू आहे," असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सासवड मंडल क्षेत्रातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार विक्रम राजपूत व मंडलाधिकारी सुहास कांबळे याकडून करण्यात आले असून उद्याच्या या महसूल 'दरबारा'कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,000दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर                सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                        पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.6 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,000 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 3,500 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, शैलेश विरकर, गुळाला 4,600रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,50 बॉक्स 110क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,100 कमाल दर 4,600रुपये तर साधारण4,350 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,000,4,000,3,500. बाजरी 2,500,3,300, 2,900. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ ----‐------ हरभरा 4,500, 5,700,5,100.

नसरापूर येथील नराधमाच्या फाशीसाठी सासवड वासीय रस्त्यावर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नसरापूर येथे महाराष्ट्र दिनी साडेतीन वर्षीय बालकेवर झालेल्या अत्याचार आणि हत्तेच्या निषेधार्थ सासवडमध्ये मंगळवारी दि. 5 रोजी जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता, येथील शिवतीथॅावर जमलेल्या नागरिकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचे मागणी करत, पिडितेला श्रद्धांजली वाहिली. स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या निषेध सभेच्या आयोजन करण्यात आले होते, शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून, आंदोलनाची सुरुवात झाली, यावेळी उपस्थित त्यांनी हे घटना मानवतेला काळीमा फासणारी असल्याची भावना व्यक्त केली, अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगाराला तातडीने कठोर शासन व्हावे, अशी मागणी करण्यात आली, याप्रसंगी विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी, नागरिक आधी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांनी ही निवेदन स्वीकारले.

पुरंदर येथील विमानतळ भूसंपादनाला एकरी एक कोटी 61 लाखाचा दर ; तर 7 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी व्याजासह प्रति एकर एक कोटी 61 लाख एक हजार 925 रुपये एवढा दर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय या जमिनी मधील झाडे, विहिरी, बोरवेल, घरे असे सर्वांचे मूल्यांकन करून, स्वतंत्र मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे सरासरी एक एकर साठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये मिळणार आहेत, पुरंदर विमानतळा संदर्भात भूसंपादनाच्या पॅकेजची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली असून, भूसंपादनाचे संमती पत्र आणि करारनामा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 7 मे पासून पैसे वर्ग करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, सहमतीने जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 10% परतावा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाणार आहे, दहा टक्के परताव्यामध्ये शेतकऱ्याची जेवढी जमीन घेतली जाईल, त्याच्या दहा टक्के विकसित भूखंड युरो सिटी मध्ये दिला जाणार आहे, ज्या कुटुंबाचे घर जाणार आहे, त्यांना घरासाठी अडीच गुंठे अतिरिक्त जमीन दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, विमानतळासाठी एकूण 1216.75 हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे, जिल्हाधिकारी डुडी मनाले की, सहमतीने भूसंपादन करण्यात येईल, सिताफळ झाडाला 11 ते 13 हजार रुपये ,आंब्याला 50 ते 60 हजार रुपये, सिताफळ 11 ते 13 हजार, अंजीर 10 ते 13 हजार, नारळ 4 ते 6 हजार, चिंच 40 ते 50 हजार, चिकू 13 ते 17 हजार रुपये असा मोबदला प्रत्येकी झाडासाठी दिला जाईल, फळझाडांची मूल्यांकन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याशिवाय बाभुळसाठी 4,899 रुपये, कडुलिंब 6,392, निलगिरी 11,783, पिंपळ 21, 980, उंबर 11,783, वड 21 हजार 979 रुपये असा मोबदला दिला जाणार आहे. विहिरीसाठी 3 ते 17 लाख रुपये,बोरवेल साठी 40 ते 60 हजार रुपये, त्याचबरोबर पक्के घर असल्यास 3 ते 40 लाख रुपये मिळू शकतील, घरासाठी प्रति चौरस मीटर 5,700 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे,या प्रकल्पासाठीसुमारे सात गावातील 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे, जमिनी व्यतिरिक्त, घरे, विहिरी, बोरवेल, शेड, झाडे आधी घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून, त्यावर दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे ,आंबा, चिंच, सीताफळ यासारख्या फळ झाडासाठी बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे, विमानतळ प्रकल्प रद्द झाला आहे, अशा अफवा पसरविल्या जात आहेत, परंतु चुकीच्या माहितीला आणि संभ्रमाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, सुरुवातीला कमी आणि शेवटी अधिकचा दर मिळेल, अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यां निराधार असून, जो सुरुवातीला दर आहे तोच दर शेवटी जमीन देणाऱ्याला मिळणार आहे ,त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, भूसंपादन मोबदल्या पोटी मिळणारे सर्व पैसे हे करमुक्त असतील 6,000 कोटी रुपयांची कर्ज भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहे, त्यातील 500 कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे, टप्प्याटप्प्याने ही रक्कम मिळणार आहे, दहा टक्के जमिनीचा परतावा मागितल्यास दहा टक्के रक्कम मोबदल्या मधून कपात भूसंपादन होणारे शेत्र हेक्टर मध्ये उदाची वाडी 54.34 हेक्टर, वनपुरी 154.06 हेक्‍टर, कुंभारवळण 245.46 हेक्‍टर, खानवडी 279.22 हेक्टर,मुंजवडी 82.56 हेक्‍टर, एखतपुर 199.03 हेक्टर, पारगाव188.07 हेक्टर असे क्षेत्र केले जाईल ,10 जून नंतर सक्तीने भूसंपादन संमती पत्र व प्रतिज्ञापत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर, पुरंदर प्रांत अधिकारी कार्यालय सासवड येथे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे ,6 मे ते 10 जून पर्यंत या कालावधीमध्ये संमती पत्र सादर केल्यास घोषित पॅकेज प्रमाणे दर मिळेल ,मात्र संमती पत्र सादर न केल्यास सक्तीचा भूसंपादन निविदा जाहीर करून, जमिनी संपादित केल्या जाणार आहेत ,जे शेतकरी भूमिहीन होणार आहेत ,त्यांना 750 दिवसाची मजुरी रक्कम दिली जाणार आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यास पन्नास दिवसाची मजुरी रक्कम देण्यात येईल, घर स्थलांतर करण्यासाठी 40 हजार रुपये, तर गोठा स्थलांतरासाठी 20,000 रुपये दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.

पुरंदर तालुक्यातील पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला प्रचंड वेग;तर 450 एकर जमिनीला शेतकऱ्यांची संमती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादन प्रक्रियेला प्रचंड वेग आला असून, शेतकऱ्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कुंभारवळण ,वनपुरी, एखतपुर, पारगाव मेमाणे, उदाची वाडी मुंजवडी आणि खानवडी या सात गावांमधील सुमारे 450 एकर जमीन देण्यात शेतकऱ्यांनी संमती दर्शवली असून, सोमवारी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमती पत्रे तसेच प्रतिज्ञापत्रे सादर केल्याने, मोबदला प्रक्रियेला गती मिळालेली आहे, या प्रकल्पासाठी यापूर्वीच सुमारे 3200 शेतकऱ्यांनी जमीन देण्यास तत्त्वत मान्यता दिली होती, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांसाठी आकर्षक मोबदल्याची पॅकेज निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी समाधान व्यक्त करीत पुढे सरसावलेले आहेत, पॅकेज निश्चित झाल्यानंतर प्रशासनाने मोबदला वाटपाची प्रक्रिया सुरू करण्याची नियोजन केले आहे. शेतकऱ्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये संबंधित जमिनीवर कोणतीही खटला बोजा किंवा वाद नसल्याची हमी देण्यात आली आहे. तसेच भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी स्वतः घेण्याचे ही त्यांनी नमूद केले आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर ही प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली असून, प्रशासनाकडून त्याची सखोल छाननी केली जाणार आहे, यानंतर जमिनीचे संयुक्त मोजमाप, घरे, झाडे, पाईपलाईन यांचे मूल्यांकन करून, मोबदल्याच्या परिघना तक्त्यानुसार तयार केली जाईल, छाननी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना करारासाठी नोटिसा देण्यात येतील आणि भूसंपादन अधिकार या संवेद समिती करार केला जाईल, अंतिम टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर मोबदल्याची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, या दरम्यान सासवड येथील उपविभागीय कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकारी कार्यालयात संमती पत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अल्पभूधारक भूमिहीन व स्थानिक शेतकऱ्यांना मोबदल्यात प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, या प्रक्रियेमुळे विमानतळ प्रकल्पाच्या अंमलबजावणीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे, सोमरडी मधील घटना लग्नाच्या पंगती मधून 62 जणांना विषबाधा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे व सोमर्डी परिसरामध्ये रविवारी दि. 3 रोजी लग्न समारंभा मधील जेवणातून 62 जणांना अधिक त्यापासून नागरिकांना अन्नातून विषबाधा झाली असून, बाधिता मध्ये 28 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोग्य प्रशासनाने गावात तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे, मिळालेल्या माहितीनुसार लग्नातील रबडी, भाजी, गुलाबजाम आणि बटाटवडा खाल्ल्यानंतर नागरिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला होता, रुग्णसंख्या वाढताच बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गराडे उपकेंद्रातील पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, गंभीर रुग्णांना सासवड येथील खाजगी रुग्णालयात हालवण्यात आले असून, 12 जणांना सलाईन द्वारे उपचार सुरू आहेत, उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर असून, काहींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे यांनी रुग्णालयात व सोमरडी गावात जाऊन रुग्णांची माहिती घेतली त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी विक्रम काळे व जिल्हा परिषद सदस्या रूपाली अमोल झेंडे या उपस्थित होत्या .आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली असून, किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत, अशी परिस्थिती नियंत्रणात आहे .डॉ. विक्रम काळे आरोग्य अधिकारी पुरंदर तालुका. या घटनेमुळे लग्न समारंभातील अन्नाच्या गुणवत्तेवर गंभीर असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अन्नभेसळ प्रतिबंधक विभागात सोबत मंगळवारी दि. 5 रोजी तातडीची बैठक घेऊन, यापुढे लग्नसमारंभातील अन्नाची तपासणी करणे, बाबतचे निर्णय घेतले जातील. अमित झेडे सभापती, पुरंदर पंचायत समिती.

पुरंदर तालुक्यातील खळद मधील खुनाचा सासवड पोलीस आकडून छडा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खळद ता. पुरंदर येथील राकेश उर्फ मिस्त्रीलाल छोटेलाल (वय 33 राहणार उत्तर प्रदेश) या तरुणाच्या खुणाचा छडा लावण्यात सासवड पोलिसांना यश आले असून, गेल्या दोन महिन्यापासून फरार असलेल्या चेतन मुकुट मांढरे( वय 34 राहणार मांढर) याला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथून अटक करण्यात आली असून, खळद गोटे माळ येथे 14 फेब्रुवारीला राकेश हा तरुण जखमी अवस्थेत सापडला होता, उपचारादरम्यान 23 फेब्रुवारीला त्याचा मृत्यू झाला होता, सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक वाटत असला तरी, शिवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याचे समोर आले आहे, सात मार्चला खुणाचा गुन्हा दाखल झाला होता, कोणताही पुरावा नसताना सासवड पोलिसांनी विशेष पथकामार्फत तपास सुरू केला होता, पोलीस हवालदार सुरज नांगरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चेतन मांढरे यांचे नाव समोर आले पोलिसांनी गडहिंग्लज येथून त्याला ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे या पथकाने केली आहे.

पुण्यात भारतीय शिक्षण मंडळाचा निवासी परिचायक वर्ग संपन्न सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सागर ढोले पाटील शैक्षणिक संकुल येथे दि. २ व ३ मे रोजी एक दिवसीय निवासी परिचायक वर्गाचे आयोजन करण्यात आले.या वर्गासाठी अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख अजेयजी धाक्रस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी नीती, पाठ्यक्रम आणि शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयता आणण्यासाठी अनुसंधान, प्रबोधन, प्रशिक्षण, प्रकाशन आणि संघटन या घटकांवर व्यापक कार्य होणे ही काळाची गरज आहे*, असे प्रतिपादन केले. तसेच प्रांताध्यक्ष प्रा. आर. एम. चिटणीस यांनीही उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या वर्गात राज्यातील २१ विविध शैक्षणिक संस्थांमधून सुमारे ४० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. मैदानी खेळ, योगसाधना, प्राणायाम तसेच विविध बौद्धिक सत्रांच्या माध्यमातून सहभागी कार्यकर्त्यांना भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्यपद्धती व उद्दिष्टांची ओळख करून देण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांत व पुणे महानगरातील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Image

सासवड येथे "आपली सखीच्या" वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिलांच्या बुलेट रॅलीचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आपली सखी यांच्या वतीने महाराष्ट्राची अस्मिता व आपली संस्कृती जपण्यासाठी पारंपारिक वेशभूषा मध्ये साधारण 30 महिलांनी दोन चाकीवर रुढ होऊन "छत्रपती शिवाजी महाराज की जय" "छत्रपती संभाजी महाराज की जय" घोषणा देत सासवड येथील पालखीतळ येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली. पालखीतळ, सासवड एसटी स्टँड, शिवतीर्थ येथे किशोरी अतुल पवार यांनी शिवगर्जना दिली. त्यानंतर रॅली जयप्रकाश चौक मार्गे मुख्य बाजारपेठेतून भैरवनाथ मंदिर येथे आली. या ठिकाणी आरती होऊन रॅलीची सांगता. रॅलीचे आयोजन "आपली सखी" परिवाराच्या किशोरी अतुल पवार, अंकिता सटाले, शिल्पा हेंद्रे, प्रियांका पवार, सई ताकवले, रंजना कामथे, माधुरी पवार, योगीताई इनामके, विना खिल्लारी, वैशाली टपळे, सारिका कड यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

Image

पुरंदर तालुक्यात हॉटेलच्या पार्किंगच्या वादा मधून वनपुरी चौकामध्ये मारहाण ; तर दगड व खुर्चीने हल्ला चौघा विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : वनपुरी ता. पुरंदर येथील हॉटेल समोरील गाड्या पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादा मधून हॉटेल मालक व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्याची घटना घडली असून, याप्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फिर्यादी शहाजी आप्पासाहेब खेडेकर (वय 55) राहणार शहाजी नगर ,वनपुरी हे आपल्या हॉटेलमध्ये होते, त्यावेळी आरोपी अमोल सिताराम कुंभारकर यांनी हॉटेल समोरील पार्किंगच्या कारणावरून वाद घातला, तुमच्या हॉटेलमधील ग्राहकाने आमच्या हॉटेल समोरील गाड्या पार्क करू नयेत, अशी मागणी करत हा वाद चिघळला, यानंतर पिकअप चालक हेमंत झेंडे पूर्ण माहिती त्याची नाही, अमोल कुंभारकर, चेतन कुंभारकर आणि सिताराम कुंभारकर सर्व राहणार वनपुरी ता. पुरंदर येथील एकत्रित फिर्यादीला प्लॅस्टिकच्या खुर्चीने मारहाण करून, हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आल्याची तक्रारी मध्ये नमूद केलेली आहे, यावेळी तुला कापून टाकतो, अशी धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे, असे आरोप आहेत ,तसेच कामगार शंकर सावंत यांच्या डोक्यात दगड मारून, गंभीर दुखापत केली आहे. शूटिंग काढतो का? असे म्हणत हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर सायंकाळी पाच वाजता पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली असून, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पुरंदर तालुक्यातील चांबळी या ठिकाणी भरधाव पिकअपची दोन वाहनांना धडक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: चांबळी गावातील पुणे सासवड रस्त्यावरील मुख्य चौकामधील भरदार जाणाऱ्या पिकअप वाहनाने समोरील गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना शनिवारी दि. 2 रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारांमध्ये घडली असून, या अपघातामध्ये प्रवाशापैकी एक जण गंभीर जखमी झाला असून, काहीना किरकोळ धोका झालेली आहे, या दुर्घटनेमध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले असून, याप्रकरणी विश्वनाथ उद्धव शेंडकर पोलीस पाटील राहणार चांबळी ता. पुरंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासवड पोलीस ठाण्यामध्ये पिकअप चालक सोन्या उर्फ सौरभ सुनील चांगण राहणार दूधबावी ता. फलटण जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे, आरोपी चालक आणि पिकअप गाडी (एमएच 43 सीके 5308) भरधाव चालवली असून, त्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीला त्याने जोरदार धडक दिली आहे, त्या अपघातामध्ये प्रवाशांना धुकापत झालेला असून, एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे, आरोपी चालक जखमी झालेला आहे, या घटनेनंतर परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावर निर्माण झालेले होते, अपघाताची माहिती मिळवताच सासवड पोलीस घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून ,जखमीना तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, याप्रकरणी निष्काळजीपणा व जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळा एकाच मंडपामध्ये 27 संसाराचा आरंभ ;तर हा उपक्रम 20 वर्षापासून सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सामान्य कुटुंबांना आधार देण्यासाठी आदर्श क्रांती संघटनेने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये शुक्रवारी दि. 1 रोजी सासवड येथील पुरंदर हायस्कूलमध्ये हा विवाह सोहळा उत्साहा मध्ये पार पडला. यामध्ये 27 जोडपी विवाहबद्ध झाली गेल्या वीस वर्षापासून सुरू असलेल्या या उपक्रमामध्ये आत्तापर्यंत 750 विवाह लावले असून, यावर्षीच्या सोहळ्यामध्ये नवरदेवांना अभिजीत बारवकर यांच्याकडून पाच लाखाचा अपघाती विमा भेट देण्यात आला असून, या सोहळ्यास खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय (अण्णा )जगताप यांच्या संकल्पनेतून हा सोहळा पार पडला आहे, यावेळी नववधूवरांना संसार उपयोगी साहित्य, कपडे आणि मंगळसूत्र मोफत देण्यात आले, कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, भरत (नाना) शिरसागर, पोपट (महाराज) टेंबे स्वामी आदी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, कार्याध्यक्ष अभिषेक जगताप व सदस्यांनी सोहळ्याचे नियोजन केले .प्राध्यापक जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले, तर बंडूकाका जगताप यांनी आभार मानले.

Image

आर्या मोरेश्वर भोसले हिची GSPI मध्ये निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील माहूर येथील रहिवासी असलेली आर्या मोरेश्वर भोसले हिने GSPI या प्रतिष्ठित कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय यश संपादन करत निवड मिळवली आहे. हा कार्यक्रम NDA साठी तयारी करून, देणाऱ्या अत्यंत नामांकित उपक्रमांपैकी एक मानला जातो. या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यातून केवळ ३० मुलींची निवड केली जाते, आणि त्यामध्ये आर्या हिचा समावेश होणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. तसेच, GSPI निवड प्रक्रियेत आर्या हिने महाराष्ट्रातून चौथा क्रमांक मिळवला आहे.आर्या हिने आपले शालेय शिक्षण सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले असून तिने CBSE दहावी परीक्षेत 96.2% गुण मिळवले आहेत. आपल्या मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश मिळवले असून, तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून तिचे कौतुक होत आहे.आर्या ही ह.भ.प. शिवाजी महाराज भोसले यांची नात असून ,त्यांच्या संस्कारांचा प्रभाव तिच्या यशामध्ये दिसून येतो.भविष्यात ती NDA परीक्षेत यश मिळवून देशसेवा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड मधील वाघीरे कॉलेजची उत्कृष्ट यशाची सुवर्ण अशी नोंद ; समीक्षा गणेश गद्रे 93% गुणासह वाघीरे कॉलेज सासवडच्या कॉमर्स मधून प्रथम सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड ता. पुरंदर येथील वाघीरे कॉलेज सासवड या ठिकाणच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विज्ञान शाखेतून 98.23%, कॉमर्स मधून 78.18%, आर्ट्स मधून 77.66%, व्यावसायिक मधून 90.47% निकाल लागल्याने, विद्यालयाच्या गुणवत्तेची चिकाटी कायम ठेवलेली आहे, विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. विज्ञान शाखेतून प्रीती प्रदीप दुर्गाडे 82.50 टक्के प्रथम, समीक्षा सोमनाथ कामठे 73.17% द्वितीय, प्रांजली प्रदीप शेवाळे 71.67% तृतीय. कॉमर्स मधून समीक्षा गणेश गद्रे 93% प्रथम, श्रेया उमेश देशमुख 89.67% द्वितीय, प्राजक्ता संजय जगताप 85.83 तृतीय. आर्ट्स शाखेमधून श्रेया शिवबंधन चिंचकर 87.50% प्रथम, माधुरी सदाशिव मिसाळ 84% द्वितीय, वैष्णवी सतीश जाधव 73.33% तृतीय. व्यावसायिक माया संतोष पाचंगे 87.17% प्रथम, पुनम संभाजी पेटेकरी 84.83% द्वितीय, साक्षी नितीन कसबे 84.83% द्वितीय, राजश्री महादेव राठोड 84% तृतीय. या उल्लेखनीय यशाबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके सर यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनची यशाची हमी देत असते, असे ते म्हणाले, या यशा मागील खरे शिल्पकार म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतकर ,कर्मचारी, उपप्राचार्य यांचे विशेष असे त्यांनी कौतुक करण्यात आलेले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे कै. अजित दादा पवार अध्यक्ष यांच्या अथक परिश्रमातूनच या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश असे संपादन केले आहे, त्यानुसार सुनेत्रा अजित दादा पवार उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री, अध्यक्ष. संदीप कदम मानद सचिव, राजेंद्र घाडगे उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ, सदस्य, संस्थेच्या वतीने वाघिरे कॉलेज सासवड कर्मचारी, यांच्यावतीने विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे. अशी माहिती वाघिरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी याबाबत सविस्तर माहिती अशी ही सर्व प्रतिनिधीला दिली आहे.

Image

जेजुरीतील जिजामाता विद्यालयाची उत्कृष्ट यशाची सुवर्ण नोंद(तृप्ती गणेश खळदकर 89.67 टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम) सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी (ता. पुरंदर, जि. पुणे) : जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी या विद्यालयाने इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत विज्ञान व वाणिज्य शाखेतील शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली आहे.विज्ञान व वाणिज्य या दोन्ही शाखांमध्ये 100 टक्के निकाल लागल्याने, विद्यालयाच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आणि पालकांचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.विज्ञान शाखेत खैरे दिक्षा संपत हिने 88 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला टेकवडे उर्वशी शरद (72.33%) हिने द्वितीय, तर विभाड साक्षी मोहन (71.17%) हिने तृतीय क्रमांक मिळवला.वाणिज्य शाखेत खळदकर तृप्ती गणेश हिने 89.67 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. जगताप धनश्री पोपट (84.50%) द्वितीय, तर गरुड चेतन नरसिंग (78.33%) तृतीय क्रमांकावर राहिला.कला शाखेत माने ज्ञानेश्वरी मल्हारी हिने 82.17 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला माने सानिका काकासो (80.50%) द्वितीय, तर ताडे श्रावणी श्याम (80.33%) हिने तृतीय क्रमांक पटकावला.या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांनी समाधान व्यक्त करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. “परिश्रम, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शन यशाची हमी देतात,” असे ते म्हणाले.या यशामागील खरे शिल्पकार म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड या संस्थेचे अध्यक्षा आनंदी(काकी) जगताप, पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस व संस्थेचे सचिव, माजी आमदार संजयजी चंदूकाका जगताप, भारतीय प्रशासन सेवा अधिकारी व संस्थेचे विशेष सल्लागार डॉ. राजेंद्र(बापू) जगताप, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. एम. एस. जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी, संस्थेच्या समन्वयिका सोनाली शिंदे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त राजवर्धनी जगताप,भारती विद्यापीठाच्या संचालिका व संस्थेच्या विश्वस्त डॉ. अस्मिता जगताप, व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे व रवींद्र पंत जगताप यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना ज्युनिअर विभाग प्रमुख किरण मोडक, शोभा शिंदे, मधुसूदन जगताप, पांडुरंग भांड, संदीप भोंग, जयसिंग वसावे, सचिन निकुडे, पूनम बाठे, अमोल राणे, श्वेतांबर बेलसरे,वैष्णवी पवार, सुरेश शिंदे, सोनाली कोसे यांचे मार्गदर्शन लाभले.विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.पुरंदर तालुक्याचा इयत्ता बारावीचा निकाल 92.06 लागला आहे पुरंदर तालुक्यामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 2388 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परीक्षेसाठी 2358 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते विशेष प्राविण्यश्रेणीमध्ये 93 विद्यार्थी,प्रथम श्रेणीमध्ये 387 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीमध्ये 1,296 विद्यार्थी व पास श्रेणीमध्ये 395 विद्यार्थी एकूण 2171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे तालुक्यातील सर्व मान्यवरांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Image

"झाडे लावा झाडे जगवा" उष्माघातापासून स्वतःचे बचाव करा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सध्या सर्वत्र उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण आहेत.सध्या तापमान 40°c पेक्षा अधिक आहे, उन्हाळ्यात बाहेर फिरायला जाताना नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करणे आवश्यक आहे. नागरिकांनी बाहेर पडताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा, पातळ सैल, सुती कपडे घाला सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी छत्री/ टोपी /टावेलने आदींनी आपले डोके झाका. अनवाणी बाहेर जाऊ नका, दुपारी बारा ते चार या वेळेत बाहेर जाऊ नये. जास्त करून ज्येष्ठ नागरिकांनी उष्माघातापासून आपला बचाव करावा. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना कधीही उन्हात पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. सध्या सर्वत्र शहरी, भागात झाडे नष्ट होत चालली आहेत, त्यामुळे सावली गारवा पासून मनुष्य दूर चालला आहे, किमान उरलेली झाडे तरी सुरक्षित ठेवावी व नवीन झाडे लावण्याचा संकल्प करावा. सासवड नगरपरिषद राबवत असलेल्या 'माझी वसुंधरा' अभियानात प्रत्येक सोसायट्यांनी, मंडळांनी, बचत गटांनी, शासकीय कार्यालयांनी,वृक्षप्रेमींनी भाग घेऊन नगर परिषदेमध्ये आपली नोंदणी करावी व आपापल्या सोसायट्यांमध्ये, परिसरामध्ये मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेने नगर परिषदेच्या सहकार्याने किमान पाच ते दहा झाडे लावून झाडे जगवण्याचा संकल्प करावा जेणेकरून भविष्यात उष्ण तापमानापासून आपण स्वतःला व येणाऱ्या पिढीला वाचवू शकतो. चला तर संकल्प करूया येणाऱ्या जून पासून प्रत्येकांनी " झाडे लावूया व झाडे जगवूया"अस मोहन चव्हाण सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी सासवड नगरपरिषद यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरामध्ये राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या संस्थेमार्फत मार्फत स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी स्वच्छता साहित्य सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हॅन्ड ग्लोज, मास्क, स्लोर्थिग अप्राण , सेफ्टी शूज, आणि हेल्मेट कीट त्याअनुषंगाने या साहित्याचे वाटप 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधत सासवड नगरपालिकेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा आनंदि(काकी) चंदुकाका जगताप, आरोग्य सभापती राजन (भैया) जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, गटनेते अजित जगताप (हाप्पू काका ) व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महिला बालकल्याण समिती उपसभापती लीना सौरभ वढणे, नगरसेविका स्मिता उमेश जगताप, पाणीपुरवठा समिती सभापती, ज्ञानेश्वर साधू गिरमे, विरोधी पक्षनेता, वैभव बबनराव टकले आदी उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषद जनगणना 2027 -स्व -गणना अभियानाबाबत नागरिकांना आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पासवर्ड नगर परिषदेतर्फे भारत सरकारच्या जन -गणना 2027 च्या पहिल्या टप्प्या अंतर्गत स्व- गणना( self enumeration) अभियान राबवण्यात येत आहे, या अभियानाद्वारे नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती सुरक्षित व सुलभ डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ,या संदर्भात सासवड नगर परिषदेचे चाजॅ ऑफिसर तथा मुख्याधिकारी यांनी सर्व नागरिकांना पुढील प्रमाणे आव्हान केले आहे, नागरिकांनी अधिकृत पोर्टल(se.census.gov.in) वर जाऊन स्व-गणना करावी, मोबाईल क्रमांकाच्या साह्याने ओटीपी द्वारे लॉगिन करून माहिती नोंदवावी. आपल्या राज्याची जिल्हा व स्थानिक तपशील अचूकपणे निवडावेत. डिजिटल नकाशावर आपल्या घराचे स्थान चिन्हांकित करावे. घर व कुटुंबाशी संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी. अर्ज सादर केल्यानंतर मिळणारा se id सुरक्षित ठेवावा. प्रगणक भेट दिल्यास त्यांना se id दाखवावा पडताळणी सहकार्य करावे. स्व-गणना कालावधी महाराष्ट्र 1 मे ते 15 मे 2027 घरगुती नोंदणी कालावधी 16 मे ते 14 जून 2027 स्व-गणने मुळे वेळेची बचत, अचूक माहिती व जलद प्रक्रिया होण्यास मदत होते, नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जर कोणत्याही नागरिकाला स्व- गणना करणे शक्य झाली नाही, तर नियोजित कालावधीत प्रगणक त्यांच्या घरी भेट की देऊन, माहिती संकलित करतील. नागरिकांची सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित राहील, याची खात्री प्रशासनाने दिलेली आहे. "चला, आपली जबाबदारी पार पाडूया आणि जनगणना 2027 मध्ये सक्रिय सहभाग नोंदवूया." असे डॉक्टर कैलास चव्हाण चार्ज ऑफिसर तथा मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद सासवड यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.