Posts

Showing posts from July, 2026

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान - शिवहार लहानेसासवड येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची पुणे विभागाची वार्षिक नियोजनाची बैठक सासवड येथील म.ए.सो. वाघीरे विद्यालयात दि. १ व २ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पुणे विभागातील सातारा,सांगली, कोल्हापूर, सोलापूर व पुणे या जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून या दोन दिवसीय बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांसंदर्भात विचारमंथन होणार आहे. शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे उद्घाटन सत्र संपन्न होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, शिक्षक परिषदेचे राज्य संघटन मंत्री किरण भावठाणकर आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी सुद्धा मोठया संख्येने उपस्थित राहणार असून नोव्हेंबर २०२६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभागाच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात राष्ट्रहित, शिक्षणहित व शिक्षकहित या उद्देशाने अविरतपणे कार्य करत असून शिक्षण क्षेत्रातील अनेक सकारात्मक बदल या शिक्षक संघटनेच्या पुढाकारने झालेले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत मोठे योगदान असल्याचे मत महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा कार्यवाह शिवहार लहाने यांनी बोलताना व्यक्त केले. पुणे विभागाच्या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे अध्यक्ष सुरेश राठोड, कार्यवाह बाळासाहेब चोपडे, विभाग कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी,उपाध्यक्ष विजयकुमार माने, संदीप काळे , विभाग कोषाध्यक्ष महेश शेलार, संजीव मांढरे, संघटन मंत्री रामदास अभंग, सहकार्यवाह मोहन ओमासे, विभाग महिला आघाडी प्रमुख अंजली गोरे, सहप्रमुख श्लेषा कारंडे, सुजाता कुलकर्णी आदीं पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Image

" मोठी स्वप्ने पहा न्यायाधीश वा आणि समाजासाठी जगा" न्यायमूर्ती अरविंद वानखेडे यांचे प्रेरणादायी असे मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा सत्र न्यायाधीशांनी उलगडला बालगृहातील आपला मुली समोर जीवन प्रवास 'लाल दिव्याच्या गाडी'पासून जिल्हा सत्र न्यायाधीशापदापर्यंत जीवन प्रवासातून मुलींना दिली स्वप्नांची नवी दिशा' पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळामध्ये "मुलींनो, मी माझेच उदाहरण तुम्हाला देतो..."मी आठवी-नवीत शिकत असताना आमच्या शेतात जाण्याचा रस्ता बसस्थानकावरून जात असे. तिथून लाल दिव्याची एक गाडी जाताना दिसायची. ती कलेक्टरची गाडी असल्याचे बाबांनी सांगितले आणि त्याच क्षणी माझ्या मनात कलेक्टर होण्याचे स्वप्न निर्माण झाले. दुर्दैवाने कलेक्टर -आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले नाही, पण जिद्द सोडली नाही. त्याच चिकाटीमुळे आज मला जिल्हा सत्र न्यायाधीश या सर्वोच्च सांविधानिक पदावर सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करा, “मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा”, या भावनिक शब्दांनी आपल्या मनोगताची सुरुवात करत पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी बालगृहातील विद्यार्थिनींसमोर आपल्या आयुष्याचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील मुलगा ते पुणे जिल्ह्याचा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हा त्यांचा प्रवास ऐकताना उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर भारावून गेले.पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, येथे गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी आयोजित "गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात" ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. बालगृहातील मुलींशी अत्यंत आपुलकीने संवाद साधताना त्यांनी न्यायव्यवस्थेतील संधी, शिक्षणाचे महत्त्व आणि ध्येयवादी जीवनाची प्रेरणा दिली. "तुमच्यापैकी अनेक मुली उद्या न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर किंवा समाजसेविका होऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शिक्षणाला कधीही सोडू नका,""मोठी स्वप्ने पाहा, न्यायाधीश व्हा आणि समाजासाठी जगा" असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, "बालगृह, अनाथालय, मुकबधिर तसेच अंध विद्यार्थ्यांच्या शाळांमधील शिक्षण आणि तेथील उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत. येथे ऐकलेली 'माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे' ही प्रार्थना मानवतेचा खरा संदेश देते. प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचे रूप पाहून एकमेकांना मदत करणे हेच आपले कर्तव्य आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आम्ही विविध जनजागृती उपक्रम राबवत असून माईंच्या संस्थेला भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य कायम राहील." विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्न विचारले. मुलींनीही आत्मविश्वासाने दिलेल्या उत्तरांचे कौतुक करत त्यांच्या विचारक्षमतेचे अभिनंदन केले. "लहान वयातच मनात ध्येय, सकारात्मक विचार आणि संघर्ष करण्याची तयारी निर्माण झाली, तर यश तुमच्या पावलांशी नक्की येईल," असेही त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मा. रेवती देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. माईंच्या विचारांचा आणि संस्कारांचा अमूल्य ठेवा तुमच्याकडे आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रमाच्या बळावर इतिहास घडविला. त्यामुळे अपयशाकडे निराशेने नव्हे, तर पुढील यशाची संधी म्हणून पाहा. सकारात्मक दृष्टीकोन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तुम्हाला निश्चितच यश मिळवून देतील."असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ममता सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक (दादा) गायकवाड होते. या कार्यक्रमास पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे, सासवडचे दिवाणी न्यायाधीश टी. पी. मोटे, द्वितीय सह न्यायाधीश आर.b ए. सावंत, सह न्यायाधीश एस. जी. सावंत, ममताताई सपकाळ, विनय सपकाळ, सार्थक सेवा संघ (आंबळे)चे अनिल कुडीया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे, सूत्रसंचालन मुकेश चौधरी, तर आभार प्रदर्शन संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, मंजुषा गायकवाड, ज्योती गायकवाड, मोनिका राजगुरू, नाना कुंभारकर, पवन गायकवाड, रितेश जांभुळकर, आकाश गोगावले यांच्यासह ममता बाल सदनमधील सर्व कर्मचारीवृंद आणि विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले.चौकट ... अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी न्यायव्यवस्थेची पुढाकाराची ग्वाहीपद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक (दादा) गायकवाड यांनी अनाथ, निराधार व निराश्रित मुलांकडे आधार कार्ड, जन्मदाखला, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावर पुणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. अरविंद वानखेडे यांनी तातडीने दखल घेत, संबंधित यंत्रणांची बैठक बोलावून पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ठोस ग्वाही दिली. या आश्वासनामुळे अनाथ मुलांच्या शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर होण्याची आशा व्यक्त करण्यात आली.

Image

पुरंदर तालुक्यातील देवडी येथील हॉटेल कोळीवाडाच्या पाठीमागील बाजू मधून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: देवडी ता. पुरंदर येथील गावच्या हददी मधील सासवड कापूरहोळ रोडला हॉटेल कोळीवाडा च्या पाठीमागील बाजूच्या आडोशा मधून 30 जुलै रोजी 18: 15 च्या सुमारामध्ये विजय दशरथ यादव वय 30 वर्ष राहणार देवडी ता. पुरंदर जिल्हा पुणे यांनी त्याच्या ताब्यात असणाऱ्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या एक) तीन सहाशे देशी दारू टॅंगो पंच कंपनीचे 90 मिली मापाच्या 90 सीलबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये 40 रुपये, दोन)एक हजार पन्नास मेक डॉल नंबर वन व्हिस्की कंपनीच्या 180 मिली मापाच्या पाच सीलबंद प्लॅस्टिकच्या पांढऱ्या रंगाच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये दोनशे दहा रुपये, तीन) पंधराशे रॉयल चॅलेंज विस्की कंपनीच्या 180 मिली मापाच्या सहा सीलबंद लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये 250 रुपये, चार) 2,250 रुपये हे क्लासिक गोल्ड व्हिस्की कंपनीच्या 180 मिली मापाच्या पंधरा सीलबंद पांढऱ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये 150 रुपये, पाच) तेराशे वीस इम्पिरियल ब्लू व्हिस्की कंपनीच्या 180 मिली मापाच्या सहा सीलबंद काचेच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये 220 रुपये, सहा) 2,880 देशी दारू टॅंगो पंच कंपनीचे 180 मिली मापाच्या 36 सीलबंद प्लास्टिकच्या बाटल्या प्रत्येकी बाटली किंमत रुपये 80 रुपये एकूण 12,600 रुपये किमतीचा माल जवळ बाळगून त्यांच्या ओळखीच्या लोकांना चोरून विक्री करीत असताना जागीच मिळून आला आहे. म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्यादी किरण हनुमंत तुपे पोलीस शिपाई सासवड पोलीस स्टेशन यांनी कायदेशीर फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार एस.एल. जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी घरगुती गॅसची चोरी उघडकीस ; तर व्यावसायिक सिलेंडरचा साठा जप्त पुरवठा विभागाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधील अनुदानित गॅस अवैधरित्या काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये भरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा सासवड पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्त रीत्या कारवाई पर्दाफाश केला आहे. सासवड कोंढवा मार्गावरील सुप्रभा कंपनी जवळील एका ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस हस्ताक्षरांसाठी वापरला जाणारा वजन काटा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडालेली आहे. गुरुवारी दि. 30 जुलै रोजी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली. सासवड कोंढवा रस्त्यावर सुप्रभा कंपनी पासून सुमारे 900 मीटर अंतरावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या गॅस भरण्याच्या प्रकाराचा शोध घेण्यात आला. या कारवाई दरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या एचपी याच्या पाच आणि भारत गॅसच्या दोन अशा एकूण सात रिकामे घरगुती सिलेंडर आढळून आले .तसेच व्यावसायिक वापरासाठी असलेल्या वीस रिकाम्या एचपी गॅस 19 रिकाम्या भारत गॅस तसेच 28 भरलेल्या एचपी गॅस 18 भरलेल्या भारत गॅस आणि दोन इंडियन गॅस सिलेंडरसह मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय गॅस हस्तक्षणासाठी वापरला जाणारा वजन काटा हि ताब्यात घेण्यात आला आहे. असा एकूण रक्कम 11, 06 ,100 रुपये किमतीचा माल मिळून आला आहे. त्याविषयी पोलीस स्टेशन सासवड येथे त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर सिलेंडर मधून गॅस चोरी करणारा एक जण आरोपी सासवड पोलिसांनी जेरबद्ध केलेला आहे. आरोपी श्रवण कुमार बाबुराव भीष नोई राहणार सासवड हिवरे रोड तालुका पुरंदर जिल्हा पुणे मूळ राहणार विष्णू नगर तालुका लोहा जिल्हा जोधपुर राज्य राजस्थान व इतर एक फरार हे आरोपी असून, जप्त करण्यात आलेल्या सर्व गॅस सिलेंडर सुरक्षिततेच्या दृष्टीने सासवड येथील प्रवीण गॅस एजन्सी येथे जमा करण्यात आल्याची माहिती पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे यांनी दिली. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ही कारवाई मध्ये तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे, गणेश मखरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय शेगर तसेच सासवड पोलीस पथकाच्या संयुक्त सहभागामधून ही प्रक्रिया पार पडली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.

Image

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कुंभारवाळण गाव संपादन प्रकरणात राज्य सरकारला नोटीस बजावली;तर ३ आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: २९ जुलै २०२६ – छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ (पुरंदर) प्रकल्पासाठी कुंभारवाळण गावातील जमीन संपादनाला आव्हान देणाऱ्या रिट याचिकेवर मा. मुंबई उच्च न्यायालयात (दि. २९ जुलै २०२६) सुनावणी झाली.मा. न्यायमूर्ती मनिष पितळे आणि मा. न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने सदर याचिकेवर राज्य सरकार व इतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तसेच दुरुस्त याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.याचिकाकर्ते यांच्या तर्फे अ‍ॅड. राजेश टेकाळे यांनी बाजू मांडली.याचिकेतील प्रमुख मुद्देयाचिकेत मुख्यत्वे खालील कायदेशीर व वस्तुस्थितीविषयक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत:केवळ किमान आवश्यक जमीन संपादित करण्याची अट“जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना यात वाजवी भरपाई व पारदर्शकता हक्क अधिनियम, २०१३” (RFCTLARR Act) च्या कलम ४(४)(ड), ७(५)(ब) व ८(१)(क) नुसार केवळ प्रकल्पासाठी पूर्णपणे आवश्यक असलेली किमान जमीन संपादित करता येते. कुंभारवाळण गाव संपादनात ही अट पाळली गेलेली नाही, असे याचिकेचे म्हणणे आहे.सामाजिक प्रभाव मूल्यमापन (SIA) नसणेसंपादन प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी गावाबाबत स्वतंत्र व सर्वसमावेशक सामाजिक प्रभाव मूल्यमापन (Social Impact Assessment) करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रक्रिया कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन करते, असा दावा करण्यात आला आहे.विमानतळ प्राधिकरणाच्या तांत्रिक शिफारशीएयरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) च्या तांत्रिक अहवालानुसार कुंभारवाळण गाव समाविष्ट असलेल्या साइटला शिफारस करण्यात आलेली नव्हती. तरीही संपादन प्रक्रिया पुढे नेण्यात आली असल्याचे याचिकेत म्हटले आहे.संमतीबाबत वादकाही शेतकऱ्यांकडून घेतलेली संमती केवळ मोजमाप/सर्वेक्षणापुरती मर्यादित होती, ती पूर्ण माहिती न देता घेण्यात आली होती आणि नंतर अनेक शेतकऱ्यांनी ती मागे घेतली आहे. अशी संमती संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक होऊ शकत नाही, असे याचिकेचे म्हणणे आहे.नैसर्गिक न्यायाचे उल्लंघनशेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकतींवर योग्य सुनावणी न घेता व त्यांचा विचार न करता संपादन प्रक्रिया पुढे नेण्यात आली असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.गावाचे स्वरूपकुंभारवाळण हे पूर्णतः सिंचित, सुपीक व शेतीप्रधान गाव असून त्यात निवासी वसाहती, सांस्कृतिक वारसा व पर्यावरणीय महत्त्व आहे. अशा गावाचे संपूर्ण संपादन “कमीत कमी विस्थापन” या तत्त्वाच्या विरोधात असल्याचे याचिकेत नमूद आहे.पुढील कार्यवाहीमा. खंडपीठाने राज्य सरकार व संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर याचिकेवर पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे.ही याचिका शेतकरी दत्तात्रय बाळासाहेब कोंडे व इतर यांनी दाखल केली असून त्यात कुंभारवाळण गाव संपादन प्रक्रियेतून पूर्णपणे वगळण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा... गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात... सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांच्या हस्ते व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विविध भाषणे व माहितीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माधुरी साठे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसो येळे यांनी केले. "गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा" या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमात गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.

Image

पुरंदर तालुक्यातील 94 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मधील 3 925 शेतकरी पहिल्या टप्प्यात कर्जमुक्ती योजनेस पात्र सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील 94 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मधील पात्र शेतकऱ्या पैकी 3,925 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यातील एकूण 28 कोटी 66 लाख 23 हजार 350 रुपयाच्या कर्जमाफीस मंजुरी देण्यात आली आहे. पुरंदरच्या सहकारी संस्थांच्या सहाय्यक निबंधक डॉक्टर यशवंती मेश्राम यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील 91 गावांमधील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, याप्रसंगी विभागीय अधिकारी महेश खैरे, वसुली अधिकारी किरण जाधव, विकास अधिकारी जयेश गद्रे, शेतकरी व निरा मार्केट कमिटीचे माजी सभापती नंदकुमार जगताप, पुरंदर नागरीचे सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांच्यासह बँका व सोसायटी यांचे कर्मचारी आधी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यातील 6,534 थकीत शेतकऱ्यांच्या 7, 903 नोंदी याद्या जिल्हा बँकेच्या शाखा, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यातील पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. आत्तापर्यंत 2,900 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर प्रमाणीकरण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आव्हान एक प्रकारे बँकेचे संचालक माजी आमदार संजय जगताप यांनी केले आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,800दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर   सासवड प्रतिनिधी:   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                               पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.29 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,800 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,800 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,700 तर सरासरी 3,750 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब  जगदाळे,लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे,  सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश  टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 4,800 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 4,00 बॉक्स  80 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,800रुपये तर साधारण4,600 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर,  प्रतिक्विंटल,  मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 2,700,4,800,3,750. बाजरी 2,600,3,200, 2,900. गहू 2,800,3,300,3,050. तांदूळ ---------------------------------- हरभरा 4,500, 5,600,5,050.

Image

स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांची पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांच्या पुण्यतिथी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने कृषी औद्योगिक विद्यालय, कोडीत येथे विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी संतोष जगताप यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुरूंचे जीवनातील स्थान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण हीच खरी संपत्ती असून ज्ञानाच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.विद्यालयाच्या वतीने स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब खैरे होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव व स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, प्रतिष्ठानचे सदस्य माधव शिवरकर, नाना जगताप, शिक्षक जयप्रकाश सरक , सीमा शेंडकर, दीपक निकाळजे, सुरेश क्षीरसागर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उत्तम लकडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथाच्या साक्षीने संकल्प करून ग्राम सुधार संघटनेच्या माध्यमातून गावची स्वच्छतेचा अभियान दर रविवारचा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर ता. पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या पावित्र क्षेत्रांमधील 27 मार्च 2026 पासून श्रीनाथाच्या साक्षीने संकल्प करून ग्राम सुधार संघटनेच्या माध्यमातून गावच्या एक जुटीने ,स्वच्छता अभियान हे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आपापल्या परीने सर्वांचे योगदान ठरून साहित्य ,अल्पोपहार,वाहन, मार्गदर्शन, चांगला अभिप्राय वगैरे याद्वारे पहिले स्वच्छता अभियान 5 एप्रिल2026 श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसरात सुरू केले असून, दर रविवारी सकाळी सात वाजता नित्यनियमाने हा सलग चौदावा रविवार असून, गावातील विविध भागांमधील अविरत चालू ठेवलेले आहे ,तरी पाच जुलै रविवारपासून वृक्षारोपण साठी खड्डे घेण्याची सुरुवात केली असून, पावसाने सुद्धा कृपादृष्टी दाखवली आहे, दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वड पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ, पेरू तसेच विविध फुलझाडे शोभेची झाडे लावलेली आहेत, त्यासाठी गावातील तसेच गावाबाहेरील अगदी परदेशात नोकरीसाठी असणाऱ्यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे ,आषाढी एकादशीच्या शुभ दिनी वृक्षारोपण हे 25 जुलै रोजी सकाळी आठ वाजता वृक्षपूजन करून वृक्षारोपण सलग दोन दिवस केले असता, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्था तसेच सर्व गणेश मंडळे, सर्वपक्षीय प्रतिनिधी समस्त ग्रामस्थ ,यांच्या सहभागाने ग्राम सुधार संघटना समाज उपयोगी काम करत आहे. पुढील संकल्प शैक्षणिक मदत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अभ्यासिका निर्मीता हा आहे .यासाठी श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिराच्या पावित्र्य भूमीतूनच हा संकल्प पुढे नेण्याचा मानस हा वीरकर गावांचा आहे .

Image

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील गुरुपौर्णिमा 2026 च्या निमित्त वाहतूकीत बदल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस स्टेशन हद्दीतील श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर या ठिकाणी 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा श्री दत्त सेवेकरी मंडळ नारायणपूर यांच्यावतीने साजरी करण्यात येत असलेली, सदर या दिवशी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र इतर राज्यातून भाविक भक्त येत असतात, तसेच केतकावळे गावी असणारे श्री बालाजी मंदिर या ठिकाणी सुध्दा भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात, जात असतात त्याकरिता वाहतूक नियमन तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता 28 जुलै रोजी 23:00 वाजता ते 29 जुलै रोजी 24:00 वाजता या कालावधीमध्ये केतकावळे ते सासवड या मार्गावरील जड अवजड वाहतूक खालील प्रमाणे वळविण्यात येणार आहे,1) कापूरहोळ येथून सासवड कडे जाणारी वाहतूक कापूरहोळ पासून बेंगळूर हायवे मार्गे कात्रज चौक किंवा सारोळा वीर मार्गे सासवड कडे जातील. 2) सासवड येथून कापूरहोळ कडे जाणारी वाहतूक सासवड वीर मार्गे सारोळा येथून कापूरहोळ कडे जातील, तरी श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर गुरुपौर्णिमा निमित्त वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता 28 जुलै रोजी 23: 00 वाजता ते 29 जुलै रोजी 24:00 वाजता या रोजी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करून, वरील प्रमाणे देण्यात आलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्याबाबत कार्यालयाकडून अधिसूचना नियमित झाल्या आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील घटना गावठी पिस्टल व लोखंडी कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न करून मागितलेली एक कोटी रुपयांची खंडणी तर दहशत माजवणाऱ्या चार आरोपी सासवड पोलीस स्टेशन कडून अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 19 जुलै रोजी सासवड पोलीस स्टेशन येथे हजर असताना, दुपारी दोन वाजता च्या सुमारामध्ये फिर्यादी सतीश गायकवाड यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन नामे अभिषेक बोरकर, नानाजी बडधे, वेदांत कटके व त्याचे इतर साथीदार यांनी सासवड येथील बाळासो भिंताडे यांच्या श्री गणेश ऑफिस मध्ये येऊन, जमीन खरेदीच्या व्यवहारातून अभिषेक बोरकर व नानाजी बडधे यांनी त्यांच्याकडील पिष्टल काढून तसेच वेदांत कटके याने लोखंडी कोयत्याने मारण्याचा प्रयत्न करून, एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, जर खंडणी दिली नाहीत तर जीवे ठार मारण्याची धमकी देऊन, ऑफिसची तोडफोड करून पिस्टल व लोखंडी कोयता हवेत फिरवत दहशत माजून सदर इसम हे त्याच्या कालया रंगाच्या थार गाडी क्रमांक एम एच बारा झेड सी 73 व पांढऱ्या रंगाचे आय वीस गाडीमध्ये बसून बोपगावच्या दिशेने पळून गेले आहेत, अशा घडल्या प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस स्टेशन येथे रजिस्टर नंबर 335/ 2026 भारतीय न्याय संहिता कलम 109(1) ,308( 5),189 (2), 189 (4), 190(1), 191 (2), 191, 352, 351( 2)( 3) आमॅ अॅक्ट 3,4, 25 फौजदारी कायदा सुधारणा कलम 7 अन्वये 19 जुलै रोजी गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणी दोन पोलीस पथके तयार करून बोपगाव हिवरे गावच्या दिशेने रवाना केली होती, तेथे त्या ठिकाणी इसमांचा शोध घेण्याचा रवाना झाला असताना, आरोपी यांचा शोध घेत असताना, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे व त्यांच्या टीम यांनी आरोपी हिवऱ्या गावच्या हद्दीमध्ये स्मशानभूमी जवळ येथीला ठार गाडी व आय मिस गाडी दिसली सदर ठिकाणी जात असताना आरोपींना पोलीस गाडी आल्याचे चाहूल लागल्याने आरोपी व त्यांच्या ताब्यातील गाड्या सोडून पळून गेले, आरोपी यांचा चार किलोमीटर पर्यंत पाटलाग करून त्यांना कोडीत गावच्या हद्दीमधील पकडले आरोपी यांना त्यांच्या नावे पत्ता विचारला असता, त्यांनी एक) वेदांत मच्छिंद्र कटके वय 24 वर्षे सध्या राहणार भिवरी विठ्ठल वाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, दोन )निखिल दत्तात्रय कामठे वय 24 वर्ष राहणार कुंभार वळण तालुका पुरंदर जिल्हा पुणे,तीन) शुभम बाळासो बडधे वय 24 वर्ष राहणार कोडीत बुद्रुक तालुका पुरंदर जिल्हा पुणे, चार) न्यानेश्वर महादेव म्हेत्रे वय 23 वर्ष राहणार दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे अशी नावे सांगितली आहेत, आरोपी यांच्याकडील वरील घटनेबाबत विचारपूस चौकशी केली असता ,आरोपी यांनी प्रथम प्रकारे उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सदर गुन्हा हा नानजी उर्फ तुकाराम बडधे, अभिषेक बोरकर, सुरज जाधव असल्याचे सांगून सदर आरोपी पळून गेल्याची माहिती दिली आरोपीच्या वाहनांची झडती घेतली असता कालया रंगाचे थार गाडी मधील ड्रायव्हर सीटच्या खाली एक लोखंडी कोयता मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. 19 जुलै रोजी आरोपी यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस 27 जुलै रोजी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पोलीस कस्टडीमध्ये असताना सदर आरोपी यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्यात वापरलेले पिस्टल पळून जात असताना ज्या ठिकाणी लपून ठेवले आहे ते ठिकाण आरोपीने दाखवले आणि सदर ठिकाणावरून एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काढतोस जप्त करण्यात आली आहेत.

Image

जिल्हा गुणवत्ता मूल्यांकनामध्ये मठवाडी शाळेचा गौरव... तालुक्यात प्रथम शाळा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलसरची मठवडी शाळा ( ता.पुरंदर ) यांनी उत्तुंग यश संपादित केल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शिक्षणाधिकारी प्राथमिक, ललिता दहीतुले, शिक्षण अधिकारी माध्यमिक भाऊसाहेब कारेकर, जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश शेंडकर यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा मध्ये तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात चौथा क्रमांक आल्यामुळे दिनांक २३ जुलै २०२६ रोजी कौन्सिल हॉल, पुणे येथे सत्कार करण्यात आला.हा गौरव संपूर्ण शाळेचा, विद्यार्थ्यांचा, पालकांचा, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचा व मठवाडी शाळेच्या उपशिक्षिका उल्का दुर्गाडे यांचा असल्याचे प्रतिपादन विलास दुर्गाडे यांनी केले.फोटो : पुणे (कौन्सिल हॉल) येथे शाळा गुणवत्ता मूल्यांकन मध्ये मठवाडी शाळेचा तालुक्यात प्रथम आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलास दुर्गाडे सत्कार करताना पुणे विभागीय आयुक्त शितल तेली- उगले शेजारी गजानन पाटील व इतर.

Image

CBSE दक्षिण विभाग-II ज्युडो स्पर्धेत हर्षित साळुंखे याचे रौप्यपदक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवड येथील इयत्ता आठवी (जंजिरा हाऊस) मधील विद्यार्थी हर्षित भाऊसाहेब साळुंखे याने CBSE South Zone-II व CBSE Cluster IX ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा 2026–27 मध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या 72 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याष उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची हरियाणा येथे होणाऱ्या CBSE राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही प्रतिष्ठित स्पर्धा दि. 23 ते 26 जुलै 2026 दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यालय (TMV), मुकुंदनगर, गुलटेकडी, पुणे येथे पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा तसेच दमण आणि दीव येथील CBSE संलग्न शाळांमधील शेकडो उत्कृष्ट ज्युडोपटूंनी सहभाग घेतला होता.स्पर्धेतील अंतिम सामन्यात हर्षितने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकासाठी कडवी झुंज दिली. मात्र केवळ एका गुणाच्या फरकाने सुवर्णपदक हुकले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याच्या जिद्द, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि लढाऊ वृत्तीचे पंच, प्रशिक्षक व उपस्थित क्रीडाप्रेमींनी विशेष कौतुक केले.या उल्लेखनीय यशामागे शाळेचे क्रीडा प्रशिक्षक श्री. उदय चंद्रशेखर बोरावके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच हर्षितचे वडील श्री. भाऊसाहेब शिवाजी साळुंखे यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा, प्रोत्साहन आणि परिश्रम यांचाही या यशात मोठा वाटा आहे.हर्षितच्या या यशाबद्दल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवडचे प्राचार्य श्री. अनिल भाऊसाहेब पाटील, CBSE इन्चार्ज श्रीमती रेणुका सिंग मर्चंट, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक श्री. उदय चंद्रशेखर बोरावके यांचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे पदाधिकारी, माजी आमदार श्री. संजय (चंदूकाका) जगताप व सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती आनंदीकाकी (चंदूकाका) जगताप यांनीही हर्षितच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे विशेष अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेतही उज्ज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.हर्षितची ही कामगिरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड, शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), त्याचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक व सासवड परिसरासाठी अभिमानास्पद असून, हरियाणा येथे होणाऱ्या CBSE राष्ट्रीय ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत तो शाळेचे व महाराष्ट्राचे नाव अधिक उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Image

बसफेऱ्या बंद करून पीएमपीएमएलने पुरंदरकरांना दिला धक्का सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : नीरा, जेजुरी एमआयडीसी आणि मोरगाव या मार्गावरील पीएमपीएमएलची बससेवा अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पुरंदर तालुक्यातील हजारो प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रोजच्या प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.पुरंदर तालुक्यातील अनेक गावांसाठी पीएमपीएमएल ही केवळ बससेवा नसून दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार आहे. शिक्षण, रोजगार, शासकीय कार्यालये, दवाखाने आणि बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी हजारो प्रवासी या बससेवेवर अवलंबून आहेत. मात्र, सेवा अचानक बंद झाल्याने अनेकांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागत असून त्यासाठी जादा खर्च करावा लागत आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.सासवड–जेजुरी मार्गावरील तक्रावाडी येथे सुरू झालेल्या नव्या टोल नाक्याचा या निर्णयाशी संबंध असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे. यापूर्वी काही काळ बस तिकिटासोबत अतिरिक्त एक रुपया टोल शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, बससेवा बंद करण्यामागील नेमके कारण किंवा पुढील भूमिका याबाबत पीएमपीएमएल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.प्रवाशांच्या मते, कोणतीही पूर्वकल्पना न देता बसफेऱ्या बंद करणे हे नियोजनशून्य प्रशासनाचे द्योतक आहे. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, कामगार आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. पर्यायी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था नसल्याने अनेकांना वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणेही कठीण होत आहे.दरम्यान, बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी, बसफेऱ्या बंद करण्यामागील कारण स्पष्ट करावे आणि भविष्यात अशा प्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी प्रवाशांना पूर्वसूचना द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच पुरंदर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील सागर मेडिकल मधून 1.70 लाखाची रोकड चोरी ; तर अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ञ सासवड ता. पुरंदर येथील माऊली कॉर्नर या ठिकाणी पहिल्या मजल्यावरील सागर मेडिकल मधील 23 जुलै रोजी रात्री 9:30वा ते 24 जुलै रोजी सकाळी 9:00 वाजताच्या दरम्यान एक 1.700 50 रुपये रोख रक्कम त्यामधील 500 रुपये दराच्या 230 नोटा, 100 रुपये दराच्या 340 नोटा, 50 रुपये दराच्या 175 नोटा ,२० रुपये दराच्या विशेष 260 नोटा 10 रुपये दाराच्या 710 नोटा एकूण 1.700 50 रुपये पहिल्या मजल्यावरील सागर मेडिकल मध्ये प्रवेश करून मेडिकलचे शटर उचकटून, कुलूप तोडून मेडिकल मधील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे ,म्हणून फिर्याद सागर शहाजी सस्ते वय 38 वर्ष व्यवसाय मेडिकल दुकान राहणार सोपानगर सासवड यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशन गु.र. नंबर 343 /2026 भा .न्या.स. कलम 335 ,331 (4 )नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार भिवराज शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

स्व.मा.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. २० जुलै : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड यांच्या वतीने तसेच नॅशनल फार्मसी वेलफेअर असोसिएशन, पुणे यांच्या सहकार्याने स्व. मा. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त "नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि एमएसबीटीईच्या कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक कार्यपद्धती" या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय ऑनलाइन शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी पदविका महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. एनपीडब्ल्यूएचे कार्याध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले, तर पदवी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी शिक्षकांनी गुणवत्ता आधारित अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.कार्यक्रमाच्या पहिल्या तांत्रिक सत्रात शासकीय पॉलिटेक्निक, जळगाव येथील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. प्रशांत अरगडे यांनी "एमएसबीटीईच्या कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक कार्यपद्धती” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी एमएसबीटीईचे प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक फ्रेमवर्कनुसार अध्यापन, मूल्यमापन, दस्तऐवजीकरण आणि गुणवत्ता वृद्धीच्या प्रभावी पद्धती स्पष्ट केल्या.दुपारच्या सत्रात शासकीय फार्मसी महाविद्यालय, कराड येथील विभागप्रमुख डॉ. रेमेथ जे. डायस यांनी "नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती" या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी विद्यार्थी-केंद्रित अध्यापन, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, अनुभव आधारित शिक्षण, सक्रिय शिक्षण पद्धती आणि नाविन्यपूर्ण अध्यापन तंत्रांचा अवलंब करून गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल याविषयी मार्गदर्शन केले.या व्याख्यानास राज्यभरातील विविध फार्मसी महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी ऑनलाइन सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रश्नोत्तर सत्र, सहभागींचे अभिप्राय आणि चर्चेमुळे कार्यक्रम अधिक समृद्ध झाला. हा कार्यक्रम अध्यापनातील नाविन्यपूर्ण संकल्पना, गुणवत्ता वृद्धी आणि एमएसबीटीईचे प्रमुख कार्यप्रदर्शन निर्देशक आधारित शैक्षणिक उपक्रमांना चालना देणारा ठरला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सागर भिसे यांनी केले. दुपारच्या सत्रातील संसाधन व्यक्तींचा परिचय व अध्यक्षीय समारोप दीपाली जगताप यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सीमा केंजळे यांनी केले.या कार्यक्रमाचे समन्वय प्रा. विशाखा गायकवाड आणि प्रा. सागर भिसे यांनी प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले.

Image

टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी“बदलत्या सामाजिक परिस्थितीत टिळकांचे विचार तरुणांसाठी मौलिक”: डॉ. गणेश चव्हाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: "आयुष्यभर तर्कशुद्ध विचार, ठाम भूमिका तसेच प्रखर राष्ट्रनिष्ठा जपणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या विचारांची कास आजच्या तरुणाईने धरली पाहिजे. बदलत्या सामाजिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात टिळकांचे हेच तत्त्वज्ञान तरुणांना योग्य दिशा दाखवणारे आणि मौलिक ठरणारे आहे," असे प्रतिपादन डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.येथील टिळक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण होते.आपल्या व्याख्यानात डॉ. गणेश चव्हाण पुढे म्हणाले की, "लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच' ही घोषणा देऊन भारतीयांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरला नाही, तर शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक संघटन यांच्या माध्यमातून जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात तरुणांनी अफवा व अपप्रचाराला बळी न पडता सत्य, तर्क आणि राष्ट्रहिताचा विचार करून आपली भूमिका मांडायला हवी. शिक्षणातूनच स्वाभिमानी आणि कर्तबगार पिढी घडते, यावर टिळकांचा गाढ विश्वास होता. त्यामुळे भावी शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली पाहिजे."अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण यांनी लोकमान्य टिळकांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांच्या प्रगाढ संशोधक वृत्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, "लोकमान्य टिळक हे केवळ राजकीय नेते किंवा जननायक नव्हते, तर ते उच्च दर्जाचे गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि संस्कृतचे विद्वान संशोधक होते. मंडालेच्या तुरुंगातील प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी 'गीतारहस्य' आणि 'द आर्क्टिक होम इन द वेदाज' यांसारख्या अजरामर ग्रंथांचे लेखन केले. आजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी टिळकांची हीच चिकाटी, सखोल अभ्यासाची सवय आणि संशोधक वृत्ती अंगी बाणवणे गरजेचे आहे."कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि भावी शिक्षक (विद्यार्थी-शिक्षक) मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा वारे यांनी केले, तर पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. दीपक चव्हाण यांनी केले. वक्त्यांच्या ओघवत्या आणि विचारप्रवर्तक व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Image

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे येथे जीवनवर्धिनी दिव्यांग मुलांची शाळा या ठिकाणी मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व स्नेह भोजनाचा कार्यक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिवे येथे जीवन वर्धिनी दिव्यांग मुलांची शाळा या ठिकाणी मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व स्नेहभोजनाचा कार्यक्रम करण्यात आला व आंबोडी येथील विसावा माया केअर सेंटर वृद्धाश्रम याही ठिकाणी सर्व वृद्धांचे आरोग्य तपासणी रुटीन चेकअप व स्नेह भोजनाचा कार्यक्रम करण्यात आला .यावेळी अमोल जगताप मित्र परिवाराच्या वतीने हे कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले यावेळी याही पुढे प्रत्येक वंचित घटकापर्यंत पोचून त्यांचे काम करण्याचे व त्यांना मदत मिळवून देण्याचे काम अमोल जगताप यांच्या वतीने सांगण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे , युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष साकेत जगताप ,नगरसेवीका प्रियांका जगताप, पंचायतराज प्रदेश उपाध्यक्ष अंकुश देशमुख, प्रहार जिल्हाध्यक्ष सुरेश( दादा )जगताप, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष गौरीताई काळे, पत्रकार कृष्ण फुलवरे ,सागर पाटील, आर्यन जगताप ,प्रसाद अत्रे, स्वानंद आत्रे ,राजेश काकडे ,सिताराम भापकर ,डॉ भाटे ,बाळासाहेब झेंडे ,हनुमंत नेटके, शिवाजी साळुंखे उपस्थित होते.

Image

आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी प्रा.केशव काकडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्रसाहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे भरवण्यात येणाऱ्या २९ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सासवड येथील,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राध्यापक,जेष्ठ कवी, साहित्यप्रेमी, प्रा.केशव मुगुटराव काकडे यांची निवड झाली आहे. अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषदेच्या सासवड येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते,साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष अँड. अण्णासाहेब खाडे यांसह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. सासवड येथील,८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मध्ये, सुकाणू समितीचे सदस्य म्हणून,सक्रिय सहभाग घेऊन,संमेलन यशस्वी होण्याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले होते याची दखल घेऊन, दोन्ही संस्थांनी त्यांना स्वागताध्यक्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पुढील महिन्यात १३ ऑगस्ट रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडणार आहे.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर शैक्षणिक संकुलातून सेवा निवृत्त झालेले प्रा.केशव काकडे यांना महाराष्ट्र शासन सहित, अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांना कवितेविषयी विशेष रुची असुन,अनेक सामाजिक कार्यातही ते अग्रभागी असतात. डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावर, "शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे सुसंस्काराचे महामेरू"या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले असुन,त्यांच्या स्वतःच्या जीवनावरील "केशवायन* हे पुस्तक लक्षवेधी ठरले आहे. सेवा निवृत्तीनंतरही,पुरंदर शैक्षणिक संकुल सासवड येथील,डॉ.बापूजी साळुंखे यांचे स्मारक स्वखर्चातून, उभे करण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.प्रा. काकडे हे योगाभ्यासक असून, योगाभ्यासाचा प्रसार व प्रचार ते आजही करत आहेत. त्याचप्रमाणे,ते अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनातुन,आपल्या परिवर्तनशील काव्यरचना सादर करून,समाज परिवर्तन करण्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील ढुमेवाडी येथे फॉरर्च्यूनरची दुचाकीला धडक ; तर एक तरुण गंभीर जखमी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : 21 जुलै रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारामध्ये ओंकार विकास जगताप वय 22 वर्ष हे त्यांच्या मोटारसायकल नंबर एम एच बारा झेड टी 7857 घेऊन चालवीत येत असताना, पांढऱ्या रंगाची फॉरर्च्यूनर गाडी नंबर एम एच बारा एक्स क्यू 2509 यावरील अनोळखी चालकाने रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगात चालवून ओंकार यांच्या मोटार सायकलला पाठीमागून जोरात धडक देऊन त्याला गंभीर अशी दुखापत होऊन गाडीचे नुकसानीचा कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून अपघाताची खबर न देता निघून गेले, असताना फॉरर्च्यूनर गाडी नंबर एम एच बारा एक्स क्यू 2509 यावरील असणाऱ्या अनोळखी इसमा विरुद्ध तक्रार फिर्यादी ऋषिकेश विकास जगताप वय 23 वर्ष राहणार सुपे खुर्द तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 341/2026 भा. न्या.सं.का.क 281, 125( a), 125 (b) 324 (4)सह.मो. वा. का.क184, 134, 177 नुसार सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे .सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अभिजीत कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे राष्ट्रीय घाटाचा राजा ठरला कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत ‘गदिमा’त पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमीत्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र राज्यविधानसभा उपाध्यक्ष मा. ना. आण्णा बनसोडे यांच्या हस्ते बारामती येथील गदिमा सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी केले.आदरणीय अजितदादा पवार हे शेतकरी कष्टकरी फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारे नेतृत्व होते. दादा शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी सतत झटत राहिले. त्यांच्या अडीअडचणीत रात्री अपरात्री उभे राहून अश्रू पुसायचे. जाती पातीचा कधीच विचार न करता वंचितांच्या मदतीने धावून जायचे. दादांनी केलेला विकास पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिले की कळतो. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी मोठी संधी दिली. असे मत महाराष्ट्र राज्यविधानसभा उपाध्यक्ष मा. ना. आण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले. ही सायकल स्पर्धा आदरणीय अजितदादा पवार यांच्या प्रेरणेने सुरू झाली आहे. स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या देशभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी सायकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी सांभाळल्या. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी झाली. ही स्पर्धा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरत आहे. असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविकात सांगितले.*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे* (कंसात कि.मी. व वेळ)*घाटाचा राजा* (दिवे घाट) - राष्ट्रीय स्पर्धा- कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत (८. मी. ३२ सेकंद )*घाटाचा राजा* (दिवे घाट) - राज्य स्पर्धा - महाराष्ट्राचा निहाल नदाफ ( ८ मी. ४०सेकंद )१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२२ कि.मी.), प्रथम क्रमांक - मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे (२.२९.००), द्वितीय क्रमांक - तामिळनाडूचा जोएल सुंदराम (२.२९.३७), तृतीय क्रमांक - गुजरातचा ध्रुव दिया (२.३०.३०) याने पटकावला.२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर - (१२२ कि.मी.)प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अमन तांबोळी (२.३७.३३), द्वितीय क्रमांक -महाराष्ट्राचा हनुमान चोपडे (२.३८.२७), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा रेहान शेख (२.३९.४८) याने पटकावला३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.) प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा ओंकार खेडकर (२.४१.०९), द्वितीय क्रमांक - महाराष्ट्राचा स्वराज कराळे (२.४१.१२), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राचा वेदांत टिळेकर (२.४१.१५) याने मिळवला.४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी.)प्रथम क्रमांक - कर्नाटकच्या गंगा दांडीन ( २२. ११. ०८२ मिनिटात), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राच्या योगेश्वरी कदम(२२.१२.८१५ मिनिटात ), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राच्या राजनंदिनी सोमवंशी (२२.१२.९२० मिनिटात) यांनी पटकावला.सासवड - बारामती सायक्लोथॉन (८५ कि. मी.)प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अनुप पवार (२.१५.५४), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राचा अक्रम देवकाते (२.१६.०४), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा खदुस शेख (२.१८.२७)याने पटकावला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळसकांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे सादरीकरण केले.या प्रसंगी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष मा. विरधवल जगदाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. डॉ. पराग काळकर, बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्षा श्वेता नाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष मा. संभाजी होळकर, बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन मा. रमेश जगताप, माळेगाव सह. साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा. संगीता कोकरे, मालेगाव नगर पंचायत नगराध्यक्ष मा. सुयोग सातपुते, राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष बारामती तालुका अध्यक्ष संदीप बांदल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बारामती शहर अध्यक्ष  अॅड. किरण इंगळे, प्रवीण पाटील, प्राचार्य देविदास वायदंडे, जेष्ठ नेते विश्वास देवकाते, आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, आजीव सदस्य अशोक खळदकर, विद्या प्रतिष्ठानचे प्राचार्य भरत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव ए. एम जाधव तसेच सायकल असोसिएशनचे सचिव संजय साठे , दिपाली पाटील, श्रीनाथ थोरात, सुदाम रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेस विद्या प्रतिष्ठान बारामती व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड व प्रा. संध्याराणी आटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,100दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                            पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.22 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,100 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,100 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 4,150 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,500 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब  जगदाळे,लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश  टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 4,600 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 2,44 बॉक्स  48 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,200 कमाल दर 4,600रुपये तर साधारण4,400 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर,  प्रतिक्विंटल,  मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 3,000,5,100,4,150. बाजरी 2,500,3,300, 2,900. गहू 2,700,3,200,2,950. तांदूळ ---------------------------------- हरभरा 4,500, 5,600,5,050.

Image

बाल विकास मंदिर शाळेत बालदिंडीचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील वातावरण भक्तिमय झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले,मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.शाळेच्या परिसरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीत शाळेतील सर्व विद्यार्थी , मुख्याध्यापक, शिक्षक सहभागी झाले होते. मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, नरेंद्र महाजन , दिपक कांदळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. मंजुषा चोरामले , साधना राऊत व अमृता जगताप यांनी आरतीचे गायन केली.या दिंडीत विद्यार्थी , शिक्षक यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारली होती. तसेच सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातात टाळ, भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीची रोपे असल्याने दिंडीला खऱ्या वारीचे स्वरूप प्राप्त झाले.या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ' झाडे लावा, झाडे जगवा' , ' पाणी आडवा, पाणी जिरवा' असा संदेश दिला."ज्ञानोबा-तुकाराम" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभूषा, पालखी तयार करणे, अभंग गायन या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वाती बोरावके यांनी आषाढी एकादशी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता जगताप यांनी केले.

Image

एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा साजरा.... सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून पालखी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संतपरंपरेचा वारसा जपत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांनी संतरुपी बालकांचे व पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले.पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संतांची ओळख करून देणारी आकर्षक नाटिका सादर केली. तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, हार्मोनियम यांच्या सुरेल साथीने विविध संतांचे अभंग सादर करून संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.यावेळी भाऊसाहेब येळे, मानसी बोरकर व रुचिरा गार्डी यांनी पालखी सोहळ्याची परंपरा, वारकरी संप्रदाय आणि संतांचे समाजप्रबोधनपर कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पूर्वप्राथमिक विभागाच्या शिक्षिका अश्विनी खळदकर, अंकिता जगताप आणि योगिता जाधव यांनी सुश्राव्य भजन सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता जगताप यांनी केले. शेवटी सर्वांनी एकत्रितपणे 'पसायदान' म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील किती वर्षानंतर तरी ट्रस्टच्या बाजूने अखेर निकाल ; तर सासवड येथील काळभैरवनाथ देवस्थानच्या जमिनीचा प्रलंबित असणारा वाद अखेर मिटला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील श्री काळभैरवनाथ मंदिर जमिनीचा गेल्या किती वर्षानंतर तरी प्रलंबित असलेला वाद अखेर मिटला आहे. तहसीलदार न्यायालयाने पुराव्याच्या आधारे देवस्थान ट्रस्टच्या बाजूने निकाल दिला असून, या निर्णयामुळे ग्रामस्थांनी गुलालाची उधळण व फटाकेची आतिषबाजी करत जल्लोष केला. टकले व त्यांच्या कुटुंबीयांनी देवस्थानच्या जमिनीची किंमत निश्चित करण्यासाठी तहसीलदार न्यायालयात अर्ज केला होता, तहसीलदारांनी दोन्ही बाजूचे पुरावे आणि युक्तिवाद तपासून हा अर्ज फेटाळून लावला व देवस्थानच्या बाजूने कौल दिला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना पुजारी राजेंद्र भैरवकर यांनी व्यक्त केली. यावेळी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी) जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, चैत्रोत्सव समितीचे अध्यक्ष अजय जगताप, उपाध्यक्ष नितीन भोंगळे, रामभाऊ इनामके, प्रकाश जगताप, बाजीराव इनामके, दीपक जगताप ,चंद्रकांत गिरमे, संजय चव्हाण, विजय जगताप आदी उपस्थित होते. या प्रकरणांमध्ये ऍडव्होकेट युवराज वारघडे ,एडवोकेट अर्चना भैरवकर व सहकार्यांनी काम पाहिले. रमेश (कारभारी) जगताप यांनी प्रास्ताविक केले, तर रवींद्र पंत जगताप यांनी आभार मानले.

Image

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग हडपसर दिवे घाट मार्ग दोन तास बंद राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग लगत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवे घाट येथे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सोमवार दि. 20 जुलै 2026 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. या कामामुळे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत बंद ठेवण्यात येणार आहे ,पुणे शहर पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेकडून रविवारी दि. 19 जुलै रोजी व सायंकाळी सात वाजता याबाबत वाहतूक सूचना जारी करण्यात आली असून, आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामांतर्गत दिवेघाट येथे रस्ता बंदी करण्याचे काम सुरू असून, या कामासाठी संबंधित ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी एक ते तीन या कालावधीमध्ये हडपसर दिवेघाट मार्गावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी व वाहन चालकांनी या कालावधीमध्ये पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. ब्लास्टिंग चे काम सुरू असताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून, सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांनी केले आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी जमिनीच्या वादा मधून रिवाल्वर कोयत्यांचा धाक दाखवून एक कोटीची खंडणी द्या नाहीतर संपवून टाकू अशी धमकी दिल्याने पोलिसांची काही तासात म्हणजेच चार आरोपीवर कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील 19 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास सासवड मधील जमिनीच्या खरेदी विक्रीच्या कारणावरून बाळासो भिंताडे यांच्या श्री गणेश ऑफिस मध्ये दिलीप भिंताडे, अक्षय बोरकर, निखिल मोकाशी, कपिल म्हेत्रे, दिपक म्हेत्रे बसले असताना, तेथे अभिषेक बाळासो बोरकर राहणार नारायणपूर त्याचे दोन मित्र वेदांत कटके, राहणार भिवरी ता. पुरंदर 3) निखिल कामठे, 4) शुभम बडधे राहणार कोडित ता. पुरंदर 5) ज्ञानेश म्हेत्रे,6) नानजी उर्फ तुकाराम बडधे राहाणार कोडीत ता. पुरंदर 7) सुरज जाधव असे झालेल्या जमिनीचे वादाच्या कारणावरून ऑफिसमध्ये आले असताना, दिलीप भिंताडे यांनी अलका जगताप यांची जमीन घेतली आहे, ती जमीन तुम्हाला द्यायची नाही का असे म्हणत जास्त शहाणपणा करू नको, नाहीतर तुला येथेच गोळ्या घालतो, असे म्हणून तुझ्या गाढीत दम असेल तर तू आम्हाला या जागेवर येऊन बघ, एक पण जिवंत सोडणार नाही तुम्हाला जे करायचे ते करा ,असे सांगून आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील, असे ऑफिसमध्ये गोंधळ घालून, अभिषेक बोरकर यांनी त्याच्या हातातील बंदूक टेबलच्या काचेवर आपटून काच फोडून टाकली व पाठीमागून वेदांत कटके यांनी त्याचे हातातील कोयता डोक्यामध्ये मारला परंतु, पाठीमागे सरकल्यामुळे त्यांनी त्या डोक्यामध्ये केलेला वार हुकला व त्याच्या बरोबर असणारे नामजी बडधे यांनी त्या डोक्यात पिस्टल लावून त्या ठिकाणी तुझे जीवन संपवून टाकतो ,असे मोठमोठ्याने बोलू लागला त्यावेळी सर्व आलेल्या लोकांनी बाळासो भिंताडे यांची श्री गणेश ऑफिस मध्ये तोड फोड करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, तिथे जास्त गोंधळ आणि लोक जमा झाल्याने, वरील इसमानी ऑफिसच्या बाहेर येऊन त्यांच्या हातातील कोयते व लाकडी दांडके बाहेर घेऊन हवेत फिरवून, दहशत निर्माण केल्यानेच या दहशतीमुळे आजूबाजूच्या दुकानातील दुकानदार व त्यांनी त्यांच्या दुकानाची शटर खाली ओढून, आजूबाजूची लोक सैरावैरा पलू लागल्याने त्या तावडीतून कसाबसा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन पोहोचले असता, फिर्यादी संतोष शंकर गायकवाड वय 36 वर्ष व्यवसाय खरेदी विक्री राहणार भिवडी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनला गु. रजिस्टर नंबर क्रमांक 335/ 2026 भा. न्याय संहिता कलम 109(1), 308( 5), 189 (2),189( 4),190,191 (2),191 (3),352, 351( 3), भारतीय शस्त्र अधि 3/ 25, 4 /25 क्रिमिनल लॉ अमेंटमेंट कलम 7 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवडच्या रखडलेल्या विकासाला गती देण्यासाठी,राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट. सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची नुकतीच भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने सासवड शहरातील विविध नागरी समस्या आणि रखडलेल्या विकास प्रकल्पांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.या बैठकीत प्रामुख्याने सासवड शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक असणारा निधी, प्रस्तावित १४३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, रखडलेली ड्रेनेज योजना तसेच शहरातील उद्यानांच्या विकासासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सासवडकरांच्या या प्रश्नांवर राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.याप्रसंगी भाजपा सासवड शहर अध्यक्ष आनंद(भैय्या) संजय जगताप, भाजपा सासवड शहर सरचिटणीस राहुल भोंडे, उपाध्यक्ष उदयराज जगताप, सचिव ओंकार महागावकर, इ. उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यामध्ये सोमवार या दिवशी वैद्यकीय सेवा बंद राहणार सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यावर झालेल्या ब्याड हल्ल्यामध्ये अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र शाखेने एक दिवशीय राज्यव्यापी संपाची हाक दिलेली आहे ,यास पाठिंबा दर्शत पुरंदर मेडिकल असोसिएशन सोमवारी दि. 20 पुरंदर तालुक्यातील वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुरंदर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप यांनी दिली. हा बंद सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते मंगळवारी दिनांक 21 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 24 तासासाठी बंद असणार आहे ,या कालावधीमधील पुरंदर मधील सर्व डॉक्टरांचा नियमित बाह्य रुग्ण तपासणी आणि नियोजित वैद्यकीय सेवा बंद राहतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे अशी विनंती असोशियांनी केलेली आहे .रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या ठिकाणी त्या काळामध्ये अत्यावश्यक आणि आपत्यकालीन वैद्यकीय सेवा मात्र सुरू राहणार आहेत, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न आयरेणीवर आला असून, झालेल्या घटनेमुळे डॉक्टरांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे, दोषीवर कडक कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडवू नयेत यासाठी हा लढा असल्याचे असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर प्रवीण जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

म. ए. सो. प्रशालेत 'पावनखिंड दौड'चे उत्साहात आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'पावनखिंड दौड' या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शौर्याचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.कार्यक्रमात नरेंद्र महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते कुंडलिक पाटोळे यांनी पावनखिंडीच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व, वीर बाजीप्रभूंचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.यावेळी, बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , पर्यवेक्षिका अर्चना लडकत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने पावनखिंड दौडीत सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी प्रभावीपणे केले. आभार भाऊसाहेब बडधे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील शौर्यगाथेची प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी कल्याण बाजारामध्ये मटका जुगारावर सासवड पोलिसांचा छापा ; तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल 1.40 लाखाचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड ता. पुरंदर येथील दि. 18 जुलै रोजी सुमारामध्ये महाडा कॉलनी सासवड ता. पुरंदर बिल्डिंग नंबर तीचन रूम नंबर सात येथे 16,लाख रुपये किमतीचा iphone 13 प्रो कंपनीचा मोबाईल त्याचा आय एम नंबर 356942 289996855 त्यामधील एअरटेल कंपनीचे सिम असून त्याचा नंबर 7387 860559 असा असलेला जु.वा. की. अ.2) 20 हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल त्याचा आयएम नंबर 3503 86305484395 त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम असून त्याचा मोबाईल नंबर 8856014388 असा असलेला जु. वा.की. अं.3) दहा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल त्याचा आईएम नंबर 860360070630 695 त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम असून त्याचा मोबाईल नंबर 84 45008764 असा असलेला जु. बा.की. अं.4) दहा हजार रुपये किमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल त्याचा आय एम नंबर 868301043407 710 त्यामध्ये वोडाफोन कंपनीचे सिम असून त्याचा नंबर 8007075105 असा असलेला जु.वा. की. नं. 5)100 रुपये किमतीचे सिटीजन कंपनीचे कॅल्क्युलेटर जु.वा. की. नं. 6)200 किमतीचे मटका जुगाराचे 100 बुक नंबर. 7)20 किमतीची निळे रंगाचे चार बॉलपेन प्रत्येकी किंमत पाच रुपये जु.वा. की. नं.8) पन्नास रुपये किमतीचे हिशोब केलेली नोटबुक नंबर 9 झिरो झिरो रुपये किमतीचे दोन्ही बाजूने आकडे लिहिलेले दोन चार्ट जु.वा.कि. नं.1) वीरेश मलिकार्जुन वांगी मूळ राहणार वारजे माळवाडी पुणे सध्या राहणार म्हाडा कॉलनी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,2)सलीम रशीद शेख मूळ राहणार हंगारगा शीर्षो, तालुका निलंगा जिल्हा लातूर सध्या राहणार म्हाडा कॉलनी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 3) अब्दुल शेख मूळ राहणार पवनेर तालुका जिल्हा धाराशिव सध्या राहणार म्हाडा कॉलनी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 4) राजकुमार सुजाणदास रोहरा मूळ राहणार कसबा पेठ पुणे सध्या राहणार म्हाडा कॉलनी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी कल्याण बाजार नावाचा मटका जुगार स्वतःच्या मोबाईलवर व्हाट्सअप नंबर वर वेगवेगळ्या ओळखीच्या ग्राहकांचे मटक्याचे आकडे घेतल्याचे व जुगाराचे साहित्य असा एकूण 40. 370 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून, 5)सागर जगताप पूर्ण नाव माहित नाही राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी वरील हस्तकाकडून कल्याण बाजार नावाचा मटका जुगार हा मोबाईल वर चालून त्या पोटी लोकांकडून पैसे घेऊन व जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून त्याच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4,5 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद सासवड पोलीस स्टेशन येथे तुषार बाळू लोंढे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन यांनी गुन्हा दाखल केला आहे ,सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार भिवराज शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील खंडोबा नगर या ठिकाणी भाईगिरी करत दहशत निर्माण केल्याने तरुणावर लोखंडी रॉड दगड व लाकडी दांडक्याने हल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील खंडोबा नगर तालुका पुरंदर येथील 17 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता च्या सुमारामध्ये सोपान काका मंदिर ते हडको रोड कब्रस्तान समोरील, अंबाबाई मंदिर खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील मोटार सायकल वरून जात असताना, जुन्या वादाच्या कारणावरून विठ्ठल खोमणे लोखंडी सळई घेऊन गाडीला आडवा येऊन, गाडी थांबवली असता, गणेश पवार यांनी पाठीमागून येऊन गळा आवळून त्या ठिकाणी खाली वाकवले व रस्त्याने का ?आला म्हणून त्या ठिकाणी शिवीगाळ करून, विठ्ठल खोमणे याने त्याच्या हातातील लोखंडी रोड मारून दुखापत केली, वीरू सोळंकी याने तिथेच पडलेला दगड उचलून पोटात मारला, विकास मंडले याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. राम राठोड, गुंड्या शेलार, आर्यन सोळंकी, जितेंद्र ठोकळे, दत्ता शेलार ,चिक्या भोंडे, आर्यन सोळंकी व इतर चार अनोळखी इस्मानी आणि हातापायाने व लाथा भुक्क्याने मारहाण करण्यात आली. विठ्ठल विजय खोमणे व त्याचे साथीदार म्हणाले की, त्या ठिकाणी भाई तू आहेस का ? तुला येथे कोण सोडवतो ते बघून घेतो ,तुला सोडवण्यास येणाऱ्यांना सुद्धा सोडणार नाही, त्याच्या हातातील रॉड हवेत फिरूवून दहशत निर्माण केल्याने ,दहशतीमुळे तेथील लोकसैरावैरा पलत लागले.त्यामुळे तेथे राहणाऱ्या लोकांनी त्याच्या घरांना आतून कड्या लावून घेतल्या ,व त्या ठिकाणी त्याला कोणीही वाचवू शकले नाही, त्यामुळे तेथून पळून जात असताना विठ्ठल खोमणे याने तू चौकीत जाऊन कम्पलेट केली ,तर शंभर टक्के तुला खलास करून टाकणार, अशी एक प्रकारे धमकीच दिली. म्हणून फिर्यादी शुभम यल्लाप्पा गायकवाड वय 24 वर्षे व्यवसाय नोकरी राहणार, तारा दत्त पश्चिम शिवतारा दत्त फ्लॅट क्रमांक चार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी आरोपी 1) विठ्ठल विजय खोमणे, 2) राम राठोड, 3) गणेश पवार, 4) जितेंद्र ठोकळे,5) आर्यन सोळंकी, 6) विरु सोळंकी, 7) श्रीनाथ खोमणे,8) समर्थ खोमणे सर्व राहणार खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे,9) गुंड्या शेलार राहणार भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 10) विकास मंडले, राहणार नाईकवाडा कोडीत नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 11) दत्ता शेलार राहणार भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 12) चिक्या भोंडे साठे नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, इतर चार अनोळखी इसम यांच्या विरोधामध्ये सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 329/2026 भा.न्या. स.कलम 110, 126 (2 ),11 8 (1) ,189 (2), 190,191(1),191 (2) ,191( 3),115 (2), 352, 351 (2) 351( 3) फौजदारी कायदा सुधारणा अधि 2013 चे 7 कलम अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील गराडे मठवाडी येथील जमीन गट क्रमांक 1253 व 1252 मध्ये जगदाळे या दोन गटांमध्येच वादाच्या जमिनीमध्ये जेसीपी लावून तुंबळ हाणामारी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गराडे मठवाडी ता. पुरंदर येथील दि. 17 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारामध्ये जमीन गट क्रमांक 1253 मध्ये चंद्रकांत रघुनाथ जगदाळे व स्वप्नील चंद्रकांत जगदाळे यांनी वादाच्या जमिनीमध्ये जेसीपी लावून काम करून घेत असताना, त्या ठिकाणी विचारणा केली असता, स्वप्नील जगदाळे यांनी 'तुझा इथं काय संबंध' तू इथून निघून गेला नाहीस, तर तुला मारून टाकीन. अशी प्रकारची शिवीगाळ करून धमकी देऊन शेजारी पडलेल्या काठीने स्वप्निल याने उजव्या पायावर उजव्या हातावर मारहाण करून, दुखापत व शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली .चंद्रकांत रघुनाथ जगदाळे यांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, आता तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणून, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी सुजित सुरेश जगदाळे वय 34 वर्ष व्यवसाय शेती व झेरॉक्स दुकान राहणार गराडे मठवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपी स्वप्नील चंद्रकांत जगदाळे,व चंद्रकांत रघुनाथ जगदाळे राहणार दोघेही मठवाडी गराडे यांच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 328/ 2026 भा.न्या.स कलम 118 (1), 115( 2), 352, 351 (2)( 3), 3( 5) अन्वये सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. 17 जुलै रोजी 11:30 वाजता गराडे मठवाडी येथील क्षेत्र जमीन गट नंबर 1252 मधील स्वप्निल चंद्रकांत जगदाळे यांच्या मालकीची 36 गुंठे मधील नवीन घर बांधणी करत असताना, साफसफाई करत असताना त्या ठिकाणी गावातील सुजित सुरेश जगदाळे हा त्या ठिकाणी हातात' लोखंडी कोयता घेऊन येऊन मोठमोठयानी शिवीगाळ दमदाटी करीत असताना चंद्रकांत यांना हाताने मारहाण करून आई मालन हिचे साडीचे पदर ओढून तिला ढकलून दिले असताना, हातातील लोखंडी कोयता स्वप्निल जगदाळे यांच्या डोक्यात मध्यभागीे मारून त्या ठिकाणी त्यांना जखमी केले व जागेत पुढे उभा राहिला असताना , तुला जीवे ठार मारेल अशा प्रकारची धमकी दिली त्यामुळे फिर्यादी स्वप्निल चंद्रकांत जगदाळे वय 32 वर्ष राहणार गराडे तालुका पुरंदर आरोपी सुजित सुरेश जगदाळे यांच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे, सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 330/ 2026 कलम 118 (1) ,115 (2), 352, 351 (2), 351 (3) नुसार सासवड पोलीस स्टेशन येथे परस्पर विरोधी दोन्ही गटांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Image

गुरोळीमध्ये एसआयआर सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : गुरोळी गावात सुरू असलेले एसआयआर (Special Intensive Revision) सर्वेक्षणाचे काम सध्या वेगाने प्रगतीपथावर असून संबंधित अधिकारी व कर्मचारी घराघरांत जाऊन नागरिकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम करत आहेत. निवडणूक आयोगाद्वारे सध्या ग्रामीण भागात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (SIR) मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत मतदार याद्यांची अचूकता तपासणी, स्थलांतरितांची नावे वगळणे आणि २००२ च्या जुन्या याद्यांशी नवीन मतदारांचे मॅपिंग केले जात आहे.या सर्वेक्षणाद्वारे मतदारांची माहिती अचूक व अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून देत सर्वेक्षण पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.गावातील बहुतांश भागात सर्वेक्षण पूर्णत्वाकडे जात असून उर्वरित भागातही काम वेगाने सुरू आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे एसआयआर सर्वेक्षणाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास बी एल ओ स्वाती पाटील यांनी व्यक्त केला.चौकट निवडणूक आयोगातर्फे SIR मोहीम राबवली जात आहे यामध्ये प्रत्येक गावामध्ये बीएलओ यांची नेमणूक केलेली आहे.गावामध्ये प्रत्येकाने सहकार्य करावे व मतदान गावात आहे परंतु ती परगावी राहत असतील तर त्यांना याबद्दल सूचित करण्यात यावे व प्रत्येकाने सहकार्य करावे असे गावचे माजी सरपंच हिरामण खेडेकर यांनी सांगितले.

Image

प्रथमच चांबळी सोसायटीच्या चेअरमनपदी महिला श्रीमती वैशाली शेंडकर यांची बिनविरोध निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील चांबळी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रथमच महिला श्रीमती वैशाली संजय शेंडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी चेअरमन भाऊसो कामठे यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागी निवडणूक होऊन पुरंदर तालुका सहायक निबंधक यशवंती मेश्राम यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सोसायटीचे सचिव संपत शेडगे यांनी काम पाहिले.यावेळी माजी चेअरमन दत्तात्रेय शेंडकर(जि. एस.), संचालक भाऊसो कामठे, दशरथ ढवळे, विलास कामठे, बबन गायकवाड, मधुकर कामठे, बाळासो कामठे, प्रकाश भालेराव, मंगला कामठे, , प्रसाद कामठे आदी मान्यवर उपस्थित होते. व युवानेते गोरख शेंडकर यांच्या हस्ते सासवड येथे निवड झाल्यानंतर वैशाली शेंडकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी चांबळी गावातील महिला प्रथमच चेअरमनपदी विराजमान झाल्यामुळे महिलामध्ये नवचैतन्य आले असून सत्कारावेळी नितीन शेंडकर, रघुनाथ कामठे, अतुल शेंडकर, गणेश शेंडकरसर, रामदास शेंडकर, आदी मान्यवर व समस्थ ग्रामस्थ चांबळी ग्रामस्थ उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील गराडे येथील ढोणे वस्ती परिसरातील गोठ्यातून 9 गाई व 9 महशी एकूण 18 जनावरे चोरी प्रकरणी सासवड पोलिसांची मोठी अशी कारवाई आरोपी अटके मध्ये 29.10 लाखाचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील गराडे येथील ढोणे वस्ती येथील 9 गाई 9 म्हशी एकूण 18 चोरी प्रकरणाचा सासवड पोलिसांनी अवघ्या काही दिवसा मध्ये छडा लावून एका आरोपीला अटक केली असून, चोरीस गेलेली सर्व 18 जनावरे आणि चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 29 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात संतोष बापूसो कटके राहणार भिवरी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस ठाणे मध्ये फिर्याद दाखल केली होती. 13 जुलै च्या रात्री ते 14 जुलै च्या पहाटे दरम्यान गराडे येथील ढोणे वस्तीतील त्यांच्या गोट्यामधून 9 गाई 9 म्हशी असा एकूण 17 लाख 90 हजार रुपये किमतीची 18 जनावरे आज्ञात चोरट्याने चोरून नेली होती, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक 329/ 2026 भारतीय आणि संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यासाठी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांच्या नेतृत्वाखाली विशेष असे पथक तयार केले होते, घटनास्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटीचे परीक्षण आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा मागॅ काढण्यात आला जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सात लाख 70 हजार रुपये किमतीच्या मुर्रा जातीच्या सात म्हशी प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये, अंदाजे दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या जाफराबादी जातीच्या दोन म्हशी प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये, अंदाजे सात लाख वीस हजार रुपये किमतीच्या एक ए एफ जातीच्या नऊ गाई प्रत्येकी 80 हजार रुपये अंदाजे, बारा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा 1492 टेम्पो जुवा की आ एकूण 29 10 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सीसीटीव्ही मध्ये दोन आयशर टेम्पो मधून जनावरे नेताना आरोपी दिसून आले, त्यापैकी एका टेम्पोच्या पुढील कारचे छत्रपती शिवाजी महाराजांचा रेडियम फोटो असल्याचा महत्त्वाचा धागा पोलिसांना मिळाला होता, गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी मोजे गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथील गोठ्यावर छापा टाकला, तेथे फिर्यादीच्या मालकीच्या आठ म्हशी आढळून आल्यात ,याच ठिकाणी फिर्यादीच्या गोठ्यामध्ये काम करणारा महादेव यादव मूळ राहणार बिहार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ,त्याने दोन साथीदारांच्या मदतीने जनावरे चोरल्याची कबुली दिली, त्यानंतर न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीमध्ये आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, उर्वरित जनावरे फडतरवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथील एका गोट्यात लपून ठेवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता, उर्वरित नऊ गाई व दोन म्हशी जप्त करण्यात आल्या, त्या कारवाईमध्ये पोलिसांनी सात मुरारा जातीच्या म्हशी, दोन जाफराबादी म्हशी, नऊ एक्स गाई आणि चोरीसाठी वापरलेला टाटा 1492 टेम्पो असा एकूण 29 लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे, या गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग आहे का ? तसेच आरोपींना यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का ? याचा तपास सुरू आहे, ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारीच राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलीस हवालदार विशाल जाधव, पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण शेंडे, तुषार लोंढे आणि सचिन किवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Image

सासवड येथील पुरंदरेवाड्यात आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमात "राम पर्वा"त गीत रामायण सादर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बुधवार दिनांक १५ जुलै रोजी पुरंदरे परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येणारा "आषाढस्य प्रथम दिवसे" हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदा ५१ व्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. पुरंदरेवाडा, ब्राह्मण आळी, सासवड येथे आयोजित या कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.ज्येष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नानासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे आणि ना. सं. इनामदार यांच्या प्रेरणा व स्मृतीस अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी "व्यक्ताव्यक्त", पुणे प्रस्तुत "राम पर्व" हा रामायणातील विविध प्रसंग व पात्रांवर आधारित सुरेल संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात हेमंत आठवले, शुभदा आठवले, पार्थ गोखले, जान्हवी गोखले,अवधूत धायगुडे,वेधा पोळ आणि केदार तळवणीकर या कलाकारांनी आपल्या प्रभावी गायन व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग जिवंत करणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.या कार्यक्रमासाठी मा.आ.संजय जगताप, विजय कोलते, शशिकला कोलते, राजवर्धिनी जगताप, प्रकाश खाडे, दिलीप निरगुडे, सुनील लोणकर दत्ता भोंगळे, विजय पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरंदरे परिवारातील केशवराव पुरंदरे, कौशिक पुरंदरे, अजय पुरंदरे, विजय पुरंदरे, प्रसन्न पुरंदरे, आदित्य पुरंदरे तसेच सर्व आप्तेष्टांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थित मान्यवर व रसिकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमांचे स्वागत केले.

Image

पुरंदर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 5.09 कोटी पिक विमा मंजूर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यात खरीप 2025 मध्ये कांदा पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते ,प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सदर नुकसान झालेल्या पुरंदर तालुक्यातील एकूण 2066 शेतकऱ्यांना एकूण रुपये 50956064 (5 कोटी 9 लाख) इतकी विमा भरपाई रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे, खरीप 2025 या हंगामामध्ये कांदा पिकाचा विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 53,000 रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली असून, तालुक्यातील एकुण 80 गावातील शेतकऱ्यांचे ही नुकसान भरपाई मिळणार आहे. यात प्रामुख्याने पुढील गावाचा समावेश आहे.(गाव व शेतकरी संख्या)1) नायगाव-155 2)पिपरी-150 3)माळशिरस- 138 4) राख -121 5) राजुरी -116 6) रिसे- 85 7) नाझरे सुपे- 83 8) टेकवडी- 82 9) शिवरी- 72 इत्यादी , थोडक्यात माहिती1) योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना 2)पिक- कांदा 3) हंगाम खरीप -2025 4) एकूण मजूर रक्कम -509560 64 (5 कोटी 9 लाख) रुपये 5) शेतकरी संख्या- 2066 6) गावे संख्या -80 7) कांदा पिक विमा मंजूर झालेली एकूण क्षेत्र- 961 हेक्टर 8) हेक्टरी नुकसान भरपाई 53,000 रुपये अशी माहिती पुरंदर तालुक्याचे कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी प्रतिनिधीशी बोलताना ही सर्व माहिती सविस्तर दिली.

पुणे पंढरपूर रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे पंढरपूर ९६५ राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झालेल्या रस्त्याकडे प्राधिकरणाचे दुर्लक्ष कारवाईची मागणी.पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 965 वर अपघातांची मालिका सुरूच आहे. झेंडेवाडी जवळील उड्डाणपूल संपल्यानंतर सुरू होणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे गेली 3 वर्षापासून काम सुरू आहे .पुण्याला जाणाऱ्या वाहनांना व प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे.धूळ सुरू असणारे काम वाहतूक कोंडी सर्वच समस्या आहेत परंतु ज्या ठिकाणी रस्ते पूर्ण झाले आहेत तेही दर्जेदार नसावेत ही शोकांतिका आहे .रस्त्यावरील लाईट बऱ्याच वेळेस बंद असतात . रस्त्यावरील खड्यात गाड्या आपटतात . अचानक वाहनांनी ब्रेक लावल्यास मागील गाडी आदळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कधी रस्ता पूर्ण होईल आणि प्रवास सुखकर होईल असा प्रश्न पडलेला असतानाच पूर्ण झालेले रस्ते पहिल्या पावसातच राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते खराब झालेले आहेत याचे आश्चर्य वाटत आहे.कोण अधिकारी या रस्त्याची पाहणी करतात? काम करणाऱ्या ठेकेदारांवर काय कारवाई करतात ? यांना कोणी जाब विचारत आहे किंवा नाही?आषाढी वारीमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊ नयेत म्हणून तत्काळ दुरुस्ती जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सामाजिक कायॅकॅतेडॉ उदयकुमार वसंतराव जगताप यांनी केली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,211दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर  सासवड प्रतिनिधी:   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                          पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.15 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,211रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,211 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,100 तर सरासरी 4,155 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,700 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे,बाळासाहेब जगदाळे,संचालिका शहजान शेख,लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, बाबु पवार ऋषिकेश  टेडसॅ, गुळाचा आजचा बाजार भाव पालखीमुळे पाऊस असल्यामुळेच निरा बाजार भाव झाला नाहीच. उप बाजारातील धान्य आवक दर,  प्रतिक्विंटल,  मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 3,100,5,211,4,155. बाजरी 2,800,3,200, 3,000. गहू 2,700,3,300,3,000. तांदूळ ---------------------------------- हरभरा 4,500, 5,500,5,000.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात मतदार याद्या विशेष सकल पुनरिक्षण कार्यक्रमास सहकार्याचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सासवड शहरांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एस आय आर राबविण्यात येत असून, या कार्यक्रमास सर्व मतदार याद्यांचे पुनरिक्षण करण्यात येणार असून, मतदान केंद्रास्त्रतरीय अधिकारी बी एल ओ यांच्याकडून 19 जुलै रोजी पर्यंत घरभेटी द्वारे नोंदणी अर्ज भरून घेतले जाणार आहेत, मतदान केंद्रास्तरीय अधिकारी बेलो हे जास्तीत जास्त तीन वेळा घर भेट देणार आहेत, सदर वेळी संबंधित मतदाराने आपले नाव मतदार यादीतून वगळता जाणार नाही यासाठी आपल्या मतदार यादी भागासाठी नियुक्त मतदान केंद्रास्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्याशी संपर्क साधून स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांचा फार्म भरावा व त्यावर स्वाक्षरी करून तो फॉर्म आव शक्तीनुसार कागदपत्रे मतदान केंद्रास्तरीय अधिकारी बी एल ओ यांना सुपूर्त करणे आवश्यक आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ हे मतदारांच्या घरभेटीला आल्यास जर मतदारांचे घर बंद असल्यास, ते फॉर्म त्यांच्या घरी सरकवणार आहेत व जास्तीत जास्त तीन वेळा घर भेट देणार आहेत व त्यानंतर पंचनामा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे मतदारांना आव्हान करण्यात येते की, आपण थोडा वेळ काढून, आपल्या मतदान केंद्रास्त्रतरीय अधिकारी बीएलओ यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादी मध्ये सुनिश्चित करावेत.शहरातील सर्व नगरसेवक/ नगरसेविका तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी यांना आव्हान करण्यात येते की, घर भेटी दरम्यान मतदान केंद्रास्त्रतरीय अधिकारी बी एल ओ यांना सहकार्य करावे व कोणताही पात्र मतदार वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, तरी सर्व मतदारांना व पदाधिकारी यांना सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद डॉक्टर कैलास चव्हाण यांच्या मार्फत आव्हान करण्यात येते की, मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एस आय आर हा कालबद्ध कार्यक्रम असल्याने, सर्व मतदारांनी बीएलओसी संपर्क साधून आपले फॉर्म भरून जमा करावेत, असे आवाहन सासवड नगर परिषदेच्या तर्फे सर्व सामान्य नागरिकांना करण्यात आलेले आहे.

पुरंदर तालुक्यातील खळद येथील हद्दीतील रासकर मळा व्यंकटेश्वरा नाष्टा सेंटर तेथूनच दहा मोबाईल व काही रोख रक्कम मुख्य आरोपी व दोन अनोळखी इस्मानी चोरून नेली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खळद ता. पुरंदर येथील रासकर मळा येथील वेंकटेश्वरा नाष्टा सेंटर मधून सोमवार 13 जुलै या दिवशी रात्री 21: 38 वा. 1) दहा हजार रुपये किमतीचा विवो वाय19, 5जी सिल्वर रंगाचा कंपनीचा मोबाईल यमाई नंबर 8687700752072224, 86877007 52 07232, 2)20 हजार रुपये किमतीचा विवो 50 मरून रंगाचा कंपनीचा मोबाईल,3 )दहा हजार रुपये किमतीचा रियल मी 12 एक्स फाईव्ह जी सिल्वर रंगाच्या कंपनीचा मोबाईल, 4) दहा हजार रुपये किमतीचा मोटरोला मोटो जी 345 जी आकाशी रंगाच्या कंपनीचा मोबाईल, 5) 17 हजार रुपये किमतीचा विवो टी 5 एक्स 5जी सिल्वर रंगाचा कंपनीचा मोबाईल, 6) दहा हजार रुपये किमतीचा रेडमी 13 पाच जी पिस्ता रंगाच्या कंपनीचा मोबाईल त्याचा आय एम नंबर आय नंबर 866487 07250305, 8664 87072503313. 7 ) सहा हजार रुपये किमतीचा आयपीएल 90 ए 66 10 एल आकाशी रंगाची कंपनीचा मोबाईल त्याचा आय एम नंबर 353291 602181040,3532 91606671434,8) 5,000 रुपये किमतीचा नोकिया 6.1 कालया रंगाचा कंपनीचा मोबाईल, 9) दोन हजार रुपये किमतीचा आयटेल कंपनीचा केल्या रंगाच्या कंपनीचा मोबाईल त्याचा आयएम नंबर 3523 81742872128 ,352381746907 391, 10) 2,000 रुपये किमतीचा हिरो कंपनीचा निळ्या पट्टी असलेला काळे रंगाच्या कंपनीचा मोबाईल ,11) 970 रोख रक्कम असलेले चॉकलेटी रंगाचे पाकीट त्यामधील दोनशे रुपये दराची एक नोट, शंभर रुपये दराची 7नोटा, 50 रुपये दराची एक नोट, वीस रुपये दराची एक नोट, 12) पंधराशे रुपये रोख रक्कम असलेले इंग्रजी मध्ये गव्हर्मेंट नाव असलेले प्लॅस्टिकचे कागदाचे पाकीट त्यामधील शंभर रुपये दराची तीन नोटा ,50 रुपये दराच्या 16 नोटा, 20 रुपये दराच्या सतरा नोटा, 10 रुपयाची दराच्या झिरो सहा नोटा एकूण 94,470 रुपये मोबाईल व काही रोख रक्कम खळद गावच्या हद्दीतील रासकरमाळा येथील वेंकटेश्वरा नाष्टा सेंटर येथून आरोपी सुनील शंकर साळुंखे वय 65 वर्ष राहणार सोनंद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी साथीदार यांनी लबाडीच्या इराद्याने चोरी केल्याने त्यांच्याविरुद्ध फिर्यादी बालाजी साधू येलेवाड वय 41 वर्ष व्यावसाय शेती राहणार सांगवी तालुका मुखेड जिल्हा नांदेड यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गु रजिस्टर नंबर 318/ 2026 बी एम एस 303( 2)3 (5) सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्या दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस नाईक गोकुळ हिप्परकर पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील गराडे ढोणे वस्ती येथून 120 गाया पैकी नऊ म्हशी व नऊ गाई गोठ्यातून अज्ञात चोरट्याने लंपास केल्या सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गराडे ढोणे वस्ती येथील सोमवार या दिवशी 13 जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारामध्ये नेहमीप्रमाणे गोट्यातील काम झाल्यावर ते घरी निघून गेले असता, सकाळी सात वाजता च्या सुमारामध्ये 14 जुलै रोजी भाऊ ज्ञानेश्वर असे वीर येथे दर्शनासाठी गेले असता, ज्ञानेश्वर कटके यांना महेंद्र जगदाळे यांनी फोन करून कळवले की पहाटे पाच वाजताच्या सुमारांमध्ये गोठ्यावर गेलो असता, त्या ठिकाणी 120 गाया पैकी नऊ म्हशी व नऊ गाया गोठ्यामध्ये कमी दिसून आल्या आहेत, आजूबाजूला शोध घेतला असता, त्या मिळून आल्या नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी गोठ्यावर जाऊन पाहिले असता ,गाया काल बांधलेल्या ठिकाणी नव्हत्या, आजूबाजूला व परिसरामध्ये त्या कोठेही मिळून आल्या नाहीत, म्हणून त्या ठिकाणी नऊ म्हशी व नऊ गाया कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याचा ठाम विश्वास पटल्यामुळेच, सात लाख 70 हजार रुपयांच्या मुरा जातीच्या सात म्हशी प्रत्येकी किंमत एक लाख दहा हजार रुपये अंदाजे दुसऱ्या व तिसऱ्या वेताच्या, दोन लाख वीस हजार रुपये च्या जाफराबादी जातीच्या दोन म्हशी किंमत एक लाख दहा हजार रुपये अंदाजे दुसऱ्या व तिसऱ्या वेताच्या, 7 लाख,20 हजार रुपये जातीच्या जर्सी गाई, नऊ किंमत गाई प्रत्येकी किंमत 80 हजार रुपये अंदाजे दुसऱ्या व तिसऱ्या वेताच्या एकूण 17लाख, दहा हजार रुपये वरील प्रकारच्या वर्णनाच्या गाई व म्हशी कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेलेल्या आहेत, म्हणून अज्ञात चोरट्याने चोरून नेलेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संतोष बापूसो कटके वय 32 वर्ष व्यावसाय शेती व दूध व्यवसाय मूळ राहणार भिवरी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गु रजिस्टर नंबर 321/2026भा.नयाकलम.303(2)याप्रमाणे त्यांच्यावरील अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत..

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पीएमटी स्टॉप च्या पाठीमागील बाजू मधून आठवडे बाजारातून भाजी खरेदी करताना मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील सोमवार या दिवशी १३ जुलै रोजी सायंकाळी सात ते आठ च्या दरम्यान पीएमटी स्टॉप च्या पाठीमागील बाजू मध्ये आठवडे बाजारात मध्ये भाजी खरेदी करीत असताना, दहा हजार रुपये किमतीचा एक पांढऱ्या रंगाचा नथिंग कंपनीचा मोबाईल y नंबर 3543823745 86661 असलेला, जुन वाकी अंदाजे 14 हजार रुपये किमतीचा साक्षीदार जितेंद्र विजय शिंदे यांचा एक पांढऱ्या रंगाचा विवो वाय 11 कंपनीचा त्यांचे मॉडेल नंबर फी 2575 असे असून, त्याचा आय एम इ आय नंबर 868466 0887826214,86 8466087826206 असा असलेला यांचा मोबाईल हा अंदाजे 24 हजार रुपये असून, फोन कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या आर्थिक फायद्या करता चोरून नेल्या आहे. फिर्यादी संतोष दत्तात्रय भुजबळ वय 50 वर्ष धंदा एलआयसी एजंट राहणार सर्वे नंबर 73/7 उद्योग नगर श्रीराम चौक हांडेवाडी रोड हडपसर.यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. गु. रजिस्टर नंबर 319 / 2026 बी एन एस 303(2) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी या संदर्भातील गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अमोल लडकत हे पुढील तपास करीत आहेत.

Image

आषाढी पालखी सोहळा 2026' भक्ती विठ्ठलाची सेवा' ही आरोग्याची उपक्रम यशस्वी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आषाढी पालखी सोहळा 2026 च्या दरम्यान लाखो वारकरी बांधवांची वारी सुरक्षित निरोगी आणि सुखकर व्हावी या उद्देशामुळे पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने राबविलेला' भक्ती विठ्ठलाची सेवा' आरोग्याची उपक्रम यशस्वी ठरला असून,4 ते 12 जुलै या कालावधीमध्ये एकूण 52,429 वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला या कालावधीत 52 हजार 429 वारकऱ्यांची बाह्य रुग्ण, ओपीडी तपासणी करण्यात आली. त्यापैकी 793 रुग्णावर अंतर रुग्ण आयपीडी उपचार करण्यात आले, तर 137 रुग्णांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये रेफर करण्यात आले, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार तापाचे 6,739 सर्दी व अंगदुखीचे 3,374 उच्च रक्तदाबाचे 1,400 मधुमेहाचे 1,162 किरकोळ अतिसाराचे 4,44 शवानदंशाचे 1,22 तर सपॅदंशाचे 2 रस्ते अपघातातील 6,2 हृदयविकाराचे 8 तसेच इतर विविध आजारांच्या 34 हजार 391 रुग्णावर उपचार करण्यात आले. उपचारा दरम्यान आवश्यक औषधी आपत्कालीन सेवा आणि रेफर सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या. पालखी मार्गावरील प्रत्येक मुक्काम स्थळी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका, औषध साठा, अपत्यकालीन उपचार साहित्य पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, अन्नसुरक्षा पथके आणि साथीच्या आजारावरील देखरेख व्यवस्था 24 तास कार्यरत ठेवण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज तसेच संत सोपान काका पालखी मार्गावरही आरोग्य सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली, दिवेघाट परिसरात हृदयविकाराचा झटका आलेल्या 70 वर्षे जेष्ठ नागरिक वारकऱ्याला आरोग्य विभागाच्या प्रशिक्षित वैद्यकीय पथकाने वेळेवर सीपीआर देत जीवदान दिल्याने आरोग्य सेवेची तत्परता आणि संवेदनशीलता अधोरेखित झाली. जिल्हा परिषद पुणे चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी आषाढी वारीही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती आणि सेवाभावाचे प्रतीक असल्याचे सांगत लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी लक्षात घेऊन भक्ती विठ्ठलाची सेवा आरोग्याची या संकल्पनेतून अत्यंत नियोजन बद्ध आणि तत्पर आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याचे नमूद केले. पालखी मार्गावरील आरोग्य यंत्रणेने वेळेवर उपचार आपत्तीकालीन सेवा आणि आवश्यक रेफरल सुविधा उपलब्ध करून, वारकऱ्यांना मोठा दिलासा दिल्याचे सांगत दिवे घाट येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या वारकऱ्याला वेळेवर सीपीआर देऊन जीवदान दिल्याची घटनाही आरोग्य विभागाच्या सज्जतीचे आणि सेवाभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे, या सेवा कार्यात योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी ,रुग्णवाहिका पथके तसेच संबंधित विभागाचे त्यांनी एक प्रकारे अभिनंदन केले आहे.

Image

आळंदी ते पंढरपूर वारीत थॅलेसेमिया बाबत माहिती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सासवड मुक्कामी उपक्रम थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांची माहिती सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला होता. सासवड मध्ये लाखो वारकरी भाविक भक्त जमा झाले होते.सगळीकडे आनंदमय वातावरण व जागोजागी राहूत्या उभारल्या गेल्या होत्या. यावेळी पुण्यातील एम.व्ही.आर फाउंडेशन व थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांना थॅलेसेमिया बाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. या दरम्यान नांदेड, परभणी व अहिल्यानगर या भागातील रुग्णांचे नातेवाईक भेटले असून, त्यांनी आम्ही फक्त रक्त चढवत असल्याची व रक्त चढवल्यानंतर लोह कमी करण्याची गोळी देत नसल्याचे सांगितले. सालाबाद प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. वारीच्या माध्यमातून असेच जनसेवेचे कार्य पुढेही सुरू ठेवू, असे थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव समीर निकम यांनी सांगितले.

Image

पुरंदर तालुक्यातील माऊलींच्या पादुकांच्या दर्शना वेळी सासवड मधील सरकारी वकिलाचा 35 हजाराचा मोबाईल लंपास सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आषाढी वारीदरम्यान सासवड येथील पालखी मैदानावर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेत असताना, सरकारी वकील अमोल नवनाथ गरजे व 40 राहणार सहारा सिल्वर सोसायटी सासवड यांचा सुमारे 35 हजार रुपये किमतीचा वन प्लस 11 आर कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना रविवारी दिनांक 12 जुलै रोजी घडली, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी दिनांक 13 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल नवनाथ गरजे हे माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पालखी मैदानावर आले होते ,सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान दर्शनासाठी गर्दीत उभे असताना त्यांच्या उजव्या बाजूच्या खिशात ठेवलेला गॅरंटीक सिल्वर रंगाचा वन प्लस 11 आर मोबाईल आज्ञात चोरट्याने सहमतीशिवाय लबाडीच्या इरादेणे चोरून नेला चोरीस गेलेल्या मोबाईलची किंमत अंदाजे 35 हजार रुपये असून, त्यामध्ये जिओ कंपनीचे 9422 426001 असे आणि एअरटेल कंपनीचे 9527692752 हे सिम कार्ड होते. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत .सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून, वारीतील गर्दींचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुरावेची तपासणी सुरू केली असून, मोबाईलचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू सध्या आहेत.

Image

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतली ससून रुग्णालयामध्ये जखमींची भेट सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर न्यूज: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान सासवड जेजुरी मार्गावरील जेजुरी बेलसर परिसरामध्ये झालेल्या अपघातातील जखमी नागरिकांची सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ससून सर्वोच्चोप्रचार रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली जखमींच्या प्रकृतीची सविस्तर माहिती जाणून घेत त्यांनी ससून सर्वोच्च उपचार रुग्णालयाचे वैद्यकीय उपाध्यक्ष डॉक्टर सोमनाथ खेडकर यांच्याकडून सुरू असलेल्या उपचाराचा आढावा घेतला रुग्णाला आवश्यक असलेले सर्व उपचार औषधोपचार तपासण्या आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा वेळेत उपलब्ध करून द्यावी उपचारात कोणतीही कचराही होऊ नये तसेच प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवावे असे त्यांना सांगितले यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांनी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली नियोजनाची माहिती दिली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनवते यांनी अपघातानंतर जखमेला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मांडला. वैद्यकीय उपअधीक्षक डॉक्टर सोमनाथ खेडकर यांनी जखमींच्या प्रकृतीवर तज्ञ डॉक्टरांचे सातत्याने लक्ष असून, आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती दिली.पालखी सोहळ्या दरम्यान लाखो वारकरी मार्ग क्रमांक करत असल्याने आरोग्य महसूल पोलीस आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून अधिक सतर्कतेने काम करावे वारकऱ्यांच्या सुरक्षेतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, कोणतीही आपत्तीकालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Image

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेत वर्ध्यातील तीनशे वारकऱ्यांना वैदर्भीय पुरणपोळीचा पाहुणचार 'जन्मभूमी वर्धा... कर्मभूमी पुणे' या नात्याला मायेची ऊब माईंची २७ वर्षांची सेवा परंपरा आजही अखंड सुरू 'विठ्ठल भक्तीला माणुसकीची जोड' प्रेमळ पाहुणचारातून जपला माईंच्या संस्कारांचा वारसा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : वारी म्हणजे केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची वाटचाल नव्हे, तर माणुसकी, सेवा, समता आणि प्रेमाचा अखंड उत्सव होय. अनाथांच्या जीवनात मायेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली हीच मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने जोपासली जात आहे. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-२०२६ निमित्त आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या तब्बल ३०० वैदर्भीय वारकऱ्यांचे सासवडजवळील कुंभारवळण येथील ममता बाल सदन (बालगृह) येथे पारंपरिक वैदर्भीय पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने स्वागत करण्यात आले. माईंच्या विचारांची ही सेवा-परंपरा सलग २७ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकऱ्यांचा दोन दिवस मुक्काम होता. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, ममता सपकाळ, सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. रविवारी (१२ जुलै) वारकऱ्यांसाठी वैदर्भीय परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पातोळीची भाजी, कढी, पालक व कांदा भजी, वरण-भात, सलाड अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सोहळा रंगला. सोमवारी (१३ जुलै) सकाळी आठ वाजता “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात ही दिंडी जेजुरीमार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगांच्या गजरात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवत अनेक वारकरी भारावून गेले. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ या मूळच्या वर्धा जिल्ह्यातील, तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतरही ही सेवा खंडित होऊ न देता, त्यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपकदादा गायकवाड यांनी ती अधिक समर्पित भावनेने पुढे चालविली आहे. माईंच्या संस्कारांचा, सेवाभावाचा आणि माणुसकीच्या वारशाचा हा जिवंत अविष्कार म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते.वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक २१७ मधील जवळपास ३०० वारकरी मागील २७ वर्षांपासून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदाही श्री संत ज्ञानेश्वर माउली पायदळ वारकरी दिंडी मंडळ, वर्धा यांच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाने आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. शनिवारी (११ जुलै) दुपारी ही दिंडी ममता बाल सदनात दाखल झाली. संस्थेच्या वतीने दिंडी मालक ह.भ.प. कवडूजी महाराज कठाने यांचा सपत्नीक वस्त्र, साडी-चोळीने गौरव करण्यात आला. यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड, सौ. सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे संस्थेचे संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, पवन गायकवाड तसेच आश्रमातील मुली, कर्मचारी आणि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडीमध्ये ह.भ.प. शुभम महाराज फुलभोगे, ह.भ.प. गौरव महाराज ठाकरे, ह.भ.प. अक्षय महाराज हरणे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते, ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिजे, ह.भ.प. संजय महाराज ठाकरे, दिंडीचे विणेकरी ह.भ.प. बाबारावजी महाराज निर्मळ ह.भ.प. प्रवीण महाराज मोहिते, ह.भ.प.रामकृष्ण महाराज टेकाळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज खंडाते यांच्यासह तीनशे वारकरी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेच्या मुलींनी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.चौकट*“वारकऱ्यांची सेवा हेच माझे भाग्य”*पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९३ मध्ये पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ममता बाल सदन (बालगृह) या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील वारकरी दिंडीचा मुक्काम या संस्थेत होत असून, यंदा या सेवेला २७ वर्षे पूर्ण झाली. “वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे परमभाग्य आहे. माईंच्या हातून सुरू झालेली ही माणुसकीची परंपरा अखंड सुरू ठेवणे, हेच आमचे कर्तव्य आहे. त्यांनी दिलेला सेवा, प्रेम आणि मानवतेचा वारसा श्वासाच्या अखेरच्या क्षणापर्यंत जपत राहू. समाजानेही या सेवायज्ञात सहभागी होऊन माईंच्या विचारांची ज्योत अधिक तेजस्वी करावी, हीच आमची अपेक्षा आहे.”-- दिपकदादा गायकवाड, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र

Image

आषाढी वारीत श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टची वारकऱ्यांसाठी सेवाभावी परंपरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. १२ व १३ जुलै रोजी पाच पालख्यांचे भक्तिभावाने स्वागत, महाप्रसाद, विश्रांती, मोफत पाणी, रुग्णवाहिका व विविध सुविधांची व्यवस्थावीर,येथे दि. १३ : आषाढी पंढरपूर वारीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दि. १२ व १३ जुलै २०२६ रोजी वारीतील पाच पालख्यांचे भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून ट्रस्टने वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, विश्रांती, स्वच्छ पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करून सेवाभावी परंपरेचे दर्शन घडविले.दि. १२ जुलै रोजी श्री संत गोरोबाकाका पालखी, सद्गुरु आनंदाश्रम पालखी (बनेश्वर) आणि संत घावरेबाबा पालखी (बेलवडे) यांचे देवस्थान परिसरात आगमन झाले. त्यानंतर दि. १३ जुलै रोजी श्रीसंत मुक्ताई देवी पालखी (आळंदी) आणि श्रीसंत सोपानकाका पालखी (सासवड) यांचे आगमन झाले. दुपारी सुमारे २.३० वाजता श्रीसंत सोपानकाका पालखी देवस्थान परिसरात दाखल होताच टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक दिंडीतील वीणेकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक दिंडीला अल्पोपहारासाठी चिक्कीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था, विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.वारीसोबत असलेल्या सर्व १०० पैकी जास्त पाणीटँकरमध्ये देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत पाणी भरून देण्याची सेवा करण्यात आली. त्यामुळे वारकऱ्यांसह दिंडीतील स्वयंसेवक आणि सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. याशिवाय परिंचे ते मांडकी या मार्गावर देवस्थान ट्रस्टची रुग्णवाहिका दिंडीसोबत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी सतत कार्यरत ठेवण्यात आली होती. या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्य सुविधेलाही महत्त्व देण्यात आले.देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांच्यासमवेत सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सुनील धुमाळ, हनुमंत धुमाळ, सल्लागार मंडळाचे सदस्य, स्वयंसेवक आणि सेवेकरी यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले. आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टने जपलेली सेवाभावी परंपरा, वारकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे उपस्थित भाविक, वारकरी व ग्रामस्थांकडून ट्रस्टच्या कार्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

Image

पुरंदर तालुक्यातील जेजुरी बेलसर परिसरातील झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू अपगातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी भेट देऊन मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत ; तर जखमीवर मोफत उपचार करण्याचे निर्देश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान आज सकाळी सासवड जेजुरी मार्गावरील जेजुरी बेलसर परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला असून तर काही महिलासहित वारकरी जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन ,जखमी वारकऱ्यांची विचारपूस करण्यात आली त्यावेळी त्यांनी उपचाराधीन वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याकडून घेतली तसे जखमींना उपचार ते वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून, जखमी वारकऱ्यावर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्यात येतील तसेच आवश्यकतेनुसार आर्थिक मदतही उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी जेजुरी नगर पालिकेचे नगराध्यक्ष जयदीप दिलीप बारबाई ,उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे ,तहसीलदार विक्रम राजपूत ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ गुरु शांतिनाथ श्री भावार्थ देखणे, सभापती पुरंदर पंचायत समिती अमित झेडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आधी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, जखमी वारकऱ्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत ,शासन अपघातग्रस्त वारकरी व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे ,आषाढी वारीच्या पूर्वतयारीचा नियमित आढावा घेऊन, वारी मार्गावरील आवश्यक कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या, पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, वाहन चाल कांनी अत्यंत सावधगिरीने वाहन चालवून, वारकऱ्यांच्या सुरक्षेतेची विशेष काळजी घ्यावी असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केले आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील संत सोपानदेव महाराज पालखीचे व संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे सासवड मधून उत्साही वातावरणात असे प्रस्थान सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या पावन दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान देव महाराज यांच्या पालखीचे हजारो वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारीसाठी सासवड येथून भक्तिमय वातावरणामध्ये व उत्साहामध्ये प्रस्थान झाले टाळ मृदूगांच्या गजरात न्यानोबा तुकाराम आणि माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता, मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून, पालखी पूर्व दरवाज्यातून बाहेर पडताच भाविकांनी दर्शन घेत पालखीचे स्वागत केले, शहरातून मार्गक्रमण करताना सासवडकर आणि रस्त्याच्या तूतर्फ उभे राहून पुष्पवृष्टी व जयघोष करून पालखीचे स्वागत केले, जेजुरी नाका येथे सासवड नगरपालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत व निरोप देण्यात आल्यानंतर ,सोहळा पांगारे येथील मुक्कामासाठी रवाना झाला, प्रस्थान दिनानिमित्त पहाटे काकड आरती महापूजा व धार्मिक विधी पार पडले, सकाळी अकरा वाजता प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला मानाच्या दिड्यांची प्रमुख देऊळ वाड्यामध्ये दाखल झाल्यानंतर मानाचे अभंग सादर करण्यात आले, यावेळी मानकरी अण्णासाहेब केंजळे ,सोहळा प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी, श्रीकांत गोसावी व गौतम गोसावी यांच्या हस्ते देवघरातील सुहासिनीनी औवक्षण केलेल्या संत सोपानदेव महाराजांच्या पादुका ,विना मंडपातील पालखीत विधी व स्थापन करण्यात आल्या त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व सोपान काका बँकेच्या वतीने सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, आळंदी देवस्थानचे प्रमुख डॉक्टर भावार्थ ढेकणे, मानकरी प्रशासन आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 126 दिड्या सहभागी झाल्या असून, रथापुढे 27 तर रथामागे 99 दिंड्या मार्ग क्रमांक करणार आहेत, अंजनगाव चे अजित परकाळे यांचे मानाचे अश्व,सुरटेवाडी येथील केंजळे यांची बैल जोडी, निरा येथील कुलकर्णी यांचा नगारा गाडी, राज्य शासन दगडूशेठ गणपती ट्रस्ट व भाजप जिल्हा वैद्यकीय सीएलच्या रुग्णवाहिका तसेच सिद्धेश शिंदे, मनोज रणवरे आणि अभय जगताप यांच्या सहभागामुळे सोहळ्याची शोभा अधिक वाढली ,प्रस्थान सोहळ्यास आळंदी देवस्थानचे प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संजय जगताप ,बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संजय कदम, सोपान काका बँकेचे रमनिक कोठडीया ,ग्रामीण संस्थेच्या राजवर्धिनी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, उपविभागी पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत,सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संत सोपानदेव महाराजांच्या पालखीच्या प्रस्तानानंतर चांगावटेश्वर महाराज पालखी ही आषाढी वारीसाठी रवाना झाली. या सोहळ्यामध्ये सोहळा प्रमुख जनार्दन वाबळे, जबाबदार शशिकांत जगताप यांच्यासह हजारो वैष्णव आणि दिंडी सहभागी झाल्या होत्या.

Image

पॅन्ट्स शाईन प्रा. लि.तर्फे पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पॅन्ट्स शाईन प्रा. लि.चे भव्य अन्नदान सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पॅन्ट्स शाईन प्रा. लि. यांच्या वतीने वारकरी भक्तांसाठी सेवाभावातून अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे भव्य आयोजन करण्यात आले. हजारो वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत कंपनीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.या उपक्रमांतर्गत १०० किलो साबुदाणा, ५० किलो वरईचा भात, ४,५०० कप चहा तसेच ५,००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. पालखी मार्गावर आलेल्या वारकऱ्यांना शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.पॅन्ट्स शाईन प्रा. लि.चे मालक श्री. भुजंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. वारकरी संप्रदायाप्रती असलेली श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला.यावेळी श्री. भुजंग गायकवाड म्हणाले, "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजाचे ऋण फेडण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील. संतांच्या विचारातून सेवा, समता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य आम्ही करत राहू."या सेवाकार्यात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांना प्रेमाने सेवा दिली. वारकरी बांधवांनी पॅन्ट्स शाईन प्रा. लि. आणि श्री. भुजंग गायकवाड यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.

Image

सासवडच्या वाघीरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय विद्यार्थी दिंडीचे आयोजन करते. या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन शनिवार दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे,पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या विद्यार्थी दिंडी सोहळ्यात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग गात गात या दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर , निवृत्तिनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव, संत तुकाराम या संतांची वेशभूषाही केली होती. ही विद्यार्थी दिंडी प्रशालेतून निघाली आणि पुणे-सासवड या पालखी महामार्गावरून सासवडकडे येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला स्वागतासाठी सामोरी गेली. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अनुप्रिया पाडळकर हिने साक्षरता आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याकरता लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण इयत्ता आठवी तक्षशिला आणि नालंदा या वर्गातील अनुप्रिया पाडळकर, संस्कृती जगताप. गार्गी नाचण, कार्तिकी ठाकरे, स्वराली शिवरकर आणि जान्हवी शेंडकर या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना या विद्यार्थी दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका संगीता रिकामे आणि शिक्षक सूर्यकांत खैरनार यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थी दिंडीत सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांसोबत वारकरी नृत्य केले. विद्यार्थी दिंडीचे नियोजन विद्यालयातील शिक्षक शिवहार लहाने, हिरामण सहारे , शंकर विभाड इत्यादी शिक्षकांनी केले होते.

Image