Posts
Showing posts from April, 2026
पुरंदर तालुक्यातील आर्केस्ट्राच्या कार्यक्रमामधून सासवडच्या तरुणास बेदम मारहाण; तर सहा जणावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: तक्रारवाडी ता. पुरंदर येथील आयोजित आर्केस्ट्रा कार्यक्रमामधील झालेल्या किरकोळवादाचा राग मनात धरून, एका महाविद्यालयीन तरुणाला सासवडमधील पालखी मैदान परिसरामध्ये बेदम मारहाण करण्यात आली, याप्रकरणी बेलसर ता. पुरंदर येथील दोन जणांचं तर अन्य तीन ते चार जणांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, आदित्य सुरेश खेंगरे (वय 19) राहणार तक्रारवाडी ता. पुरंदर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम जगताप व अमर जगताप दोघे राहणार बेलसर ता. पुरंदर तसेच इतर तीन ते चार अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दि. 29 रोजी रात्री तक्रारवाडी येथे झालेल्या आर्केस्ट्रा कार्यक्रमादरम्यान, बेलसर येथील काही युवक गोंधळ घालत असल्याने, त्यांना आवर घालण्याचा प्रयत्नामध्ये किरकोळ वाद झाला होता ,त्याचा राग मनात धरून, आरोपींनी दुसऱ्या दिवशी गुरुवारी आदित्यला मारहाण केली, आदित्य हा त्याचे काका नवनाथ खेंगरे यांच्यासह सासवड येथील नाचन किराणा स्टोअर मध्ये आला होता, यावेळी एक अनोळखी युवक त्यांच्याकडे आला व मागील वादाचा जाब विचारत शिवीगाळ करू लागला, काही वेळातच वाद वाढल्यानंतर, शुभम जगताप, अमर जगताप दोघे राहणार बेलसर आणि त्याच्यासोबत असलेल्या तीन ते चार अनोळखी साथीदारांनी आदित्ययाला लाथा भुक्क्यांनी मारहाण करण्यात आली, तर त्यातील एकाने कमरेचा बेल्ट काढून, आदित्ययाच्या पाठीवर आणि मानेवर गंभीर असा प्रहार केला असे सुद्धा मारहाण केल्याचे तक्रारी मध्ये नमूद केलेले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड एसटी स्थानकामधील बस मध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने, एका महिलेच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी आणि डोरले असलेली पोत चोरून नेली, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, फिर्यादी निर्मला अशोक गाढवे (वय 48) राहणार ठाणे या गुरुवारी दि. 30 रोजी पहाटे ठाणे पंढरपूर एसटीने सासवड येथे आल्या होत्या, दुपारी अडीचच्या सुमारामध्ये सासवड मध्ये उतरून त्यांनी मिठाई खरेदी केली, त्यानंतर सासवड एसटी स्थानकावरून पुन्हा बस मध्ये चढत असताना, प्रवाशाची मोठी गर्दी होती बस मध्ये चढल्यानंतर निर्मला यांना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे आढळले, त्यांनी पर्सची तपासणी केली असता, त्यात एका पिवळ्या रंगाच्या छोट्या पर्समध्ये ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी आणि डोरले असलेली पोत गायब असल्याचे ती निदर्शनास आले एस टी मध्ये आणि स्थानक परिसरामध्ये शोध घेऊनही दागिने मिळाले नाहीत, चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सोनोरी रोड या ठिकाणी नवीन मार्गावरील सेवा रस्त्यावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सोनोरी ता. पुरंदर येथील नवीन मार्गावरील सेवा रस्त्यावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून, सोनोरी येथील सेवा रस्त्यावरील मंगळवारी दि. 28 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारामध्ये लोकांची गर्दी जमल्याची माहिती पोलीस पाटील अविनाश सोनवणे यांना मिळाली होती, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता, एका अनोळखी व्यक्ती मृताअवस्थेमध्ये आढळून आली होती, सासवड पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचून प्राथमिक तपासणी केली असता, ती व्यक्ती संबंधित व्यक्तीला मृत अशी घोषित केले.
- Get link
- X
- Other Apps
गुरोळी शाळा परिसरात उभारला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा पावसाच्या छायाछेत्रात (Rain Shadow Region) येतो. या तालुक्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान केवळ ४०० ते ५५० मिमी इतके असून, ते जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सुमारे ३५% ने कमी आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ११ तालुक्यांमधील सुमारे ४.२ लाख लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुरंदर हा सर्वाधिक प्रभावित तालुका आहे.एप्रिल २०२६ पर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ४०°C पेक्षा जास्त तापमानामुळे नागरिकांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीचा विचार करून व अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालय गुरोळी या शाळांमध्ये 28 एप्रिल रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारून पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी सायन्स क्लब व जिओ रोटी घर संस्थापक राजेश रसिकलाल शहा यांच्याकडून मदत करण्यात आली. पुरंदरच्या पूर्व भागातील शाळांमध्ये उभारलेला पहिलाच प्रकल्प आहे. गुरोळी गावामध्ये पाणीटंचाई असते तसे दिवसेंदिवस पाण्याची पातळी ही खोल जात आहे. पाणीटंचाईचे चटके डिसेंबर महिन्यात जाणवण्यास सुरुवात होते. भूगर्भात पाण्याचा उपसा हा अधिक प्रमाणात होतो परंतु त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. यासाठी या प्रकल्पाचे नियोजन माध्यमिक व जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये केले भविष्यात या प्रकल्पामुळे शाळेतील परिसरामध्ये पाणीटंचाईवर मात होईल. तसेच 4 लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार शाश्वत पर्यावरणाचा प्रयत्न आहे असे उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात असलेल्या इमारतीच्या छतावरील वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे बोरवेल मध्ये पुनर्भरण करण्यात आले. यासाठी या पाण्याला फिल्टर बसवण्यात आला. पावसाच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग या निमित्ताने होणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, लायन्स क्लब संस्थापक राजेश शहा, जिओ रोटी क्लब संस्थापक मितेश शहा, संचालक पर्जन्य रेन वॉटर हार्वेस्टिंग शशिकांत दळवी, अनिरुद्ध तोडकर, विनेत्तर सिंग, राजू तेली ग्रामपंचायत उपसरपंच जीवन खेडेकर, रामचंद्र खेडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र चांदगुडे व शिक्षक वर्ग इतर ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो : गुरोळी (ता. पुरंदर) शाळा परिसरात उभारला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यावेळी मान्यवर.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब खैरे यांची १५ वी पुण्यतिथी कोडीत येथे भावपूर्ण वातावरणात साजरी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रारंभी बापूसाहेब खैरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संतोष जगताप यांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासकामांतील योगदानाची आठवण करून दिली.यावेळी धनंजय कामठे यांनी सांगितले की, बापूसाहेब खैरे यांनी पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केली. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, धरणे, बंधारे,शिक्षण आणि शेती क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि लोकांशी असलेल्या जवळिकीमुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमाला धनंजय पांडुरंग कामठे कार्यालय प्रमुख पुणे जिल्हा दक्षिण भाजपा अमृता धनंजय कामठे भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका फुरसुंगी रोड देवाची, संतोष जगताप जिल्हा अध्यक्ष एनजीओ आघाडी भाजपा, भैय्यासाहेब खैरे,अजित खैरे, सुधाकर बढदे , मीना खैरे,जयप्रकाश सरक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्याचे माजी आमदार बापूसाहेब खैरे यांची १५ वी पुण्यतिथी कोडीत येथे भावपूर्ण वातावरणात साजरी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रारंभी बापूसाहेब खैरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संतोष जगताप यांनी त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासकामांतील योगदानाची आठवण करून दिली.यावेळी धनंजय कामठे यांनी सांगितले की, बापूसाहेब खैरे यांनी पुरंदर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण कामे केली. त्यांच्या कार्यकाळात रस्ते, पाणीपुरवठा, धरणे, बंधारे,शिक्षण आणि शेती क्षेत्रात अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या साध्या स्वभावामुळे आणि लोकांशी असलेल्या जवळिकीमुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहेत.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.या कार्यक्रमाला धनंजय पांडुरंग कामठे कार्यालय प्रमुख पुणे जिल्हा दक्षिण भाजपा अमृता धनंजय कामठे भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका फुरसुंगी रोड देवाची, संतोष जगताप जिल्हा अध्यक्ष एनजीओ आघाडी भाजपा, भैय्यासाहेब खैरे,अजित खैरे, सुधाकर बढदे , मीना खैरे,जयप्रकाश सरक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील पत्नीचे नावही सातबारा उताऱ्यावर नोंदवा पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांचे आवाहन सासवड येथील कार्यशाळेमध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : "वारसदार म्हणून असे" आपण मुलांची नाव लावतो, तर तसेच मुलीचीही नाव मूळ हक्कांमध्ये लावले पाहिजे, शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर सह हिस्सेदार म्हणून नोंदवावे असे आव्हान पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील मासूम संस्था आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी मुक्ती योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावले आहे. या निमित्ताने सासवड तालुका पुरंदर येथील आयोजित शेतकरी कार्यशाळेमध्ये तहसीलदार बोलत होते. ग्राम गौरव प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत बोरावके, यांनी शाश्वत शेतीसाठी निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मीना शेंडकर यांनी सातबारा वर नाव लागल्यामुळे, महिला खऱ्या अर्थाने शेतकरी होतील, यामुळे त्यांचे समाजातील दुय्यम स्थान संपून त्यांना सन्मान मिळेल व त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, त्यांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याची व विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासद होण्याची आव्हान करण्यात आले, यावेळी ललिता जाधव, महादेव शेंडकर, शीतल पवार यांनी आपले अनुभव कथन केले, सातबारा उताऱ्यावर नाव लागल्यामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात करता आली, तसेच शेती अवजारासाठी अर्ज करणे सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक कृषी अधिकारी मनीषा कांजळे यांनी मार्गदर्शन केले. मोनाली कुंभारकर यांनी सूत्रसंचालन तर वैशाली कुंभारकर यांनी प्रास्ताविक केले. मंगल मगर यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील 14 मे च्या कार्यक्रमाची शंभूराजेंच्या शासकीय जयंतीचा खर्च प्रशासनाने करावा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शासकीय जयंती निमित्त सोमवारी दि. 27 रोजी नियोजन बैठक पार पडली. जयंती उत्सव शिस्त पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्व कार्यक्रमांचा खर्च प्रशासनाने करावा, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. बैठकीत शासकीय अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रमुख सागर जगताप, अविनाश जाधव, सचिन शिंदे, धनराज बाठे तसेच पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे, प्रकाश शिंदे, संतोष हगवणे आदी उपस्थित होते. यावेळी किल्ले पुरंदर येथील सैन्य प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदतीची आश्वासन दिले. जयंतीच्या काळामध्ये वाहनाच्या पुगळ्या काढणे, फटाके वाजवणे, कर्कस आवाजाद्वारे त्रास देणाऱ्या वर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी शांतता व शिस्त राखून उत्सव साजरा करावा असे आव्हान पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी हिंदू संमेलन उत्सवामध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील सोनेरी रोड परिसरामध्ये हिंदू संमेलन रविवारी दि. 26 रोजी उत्सवामध्ये पार पडले. या हिंदू संमेलनास 800 ते 900 हिंदू बांधवांनी हजेरी लावली. कायॅक्रमाची सुरुवात गोमाता पूजन, भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी स्वाती गोखलेे यांनी अग्निहोत्रय योजनेचे महत्त्व विशद केले. त्यानंतर महिलांनी राम रक्षा व त्रपटन केले राजलक्ष्मी काटकर यांनी नृत्यातून देवीची स्तुती सादर केली. संमेलनात मान्यवरांच्या हस्ते' देशी वृक्षाचे रोपण' ही कार्यक्रमाची मुख्य वैशिष्ट्य ठरले. समाजात हिंदू धर्म संपवण्याचे कटकारस्थान काही समाजकंटक करत आहेत, गरीब कुटुंबांना आमीष दाखवून त्याचे धर्मांतर केले जात आहे. त्यासाठी आपण जागरूक राहिले पाहिजे, असेच मत सामाजिक कार्यकर्ते निलेश धायरकर यांनी मांडले. संजय काटकर आणि प्रणव घोडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात मोहित जोशी यांनी राष्ट्रभक्तीपर गीत सादर केले. कार्यक्रमाचे आयोजन सासवड पूर्व विभागातील सकल हिंदू समाजातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व समितीच्या सेवकांनी केले होते.
- Get link
- X
- Other Apps
पिसर्वे ते राजुरी मधील पुलावरील खड्ड्यांच्या गॅपमुळे प्रवासी हैराण,तातडीने दुरुस्तीची मागणी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे ते राजुरी रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम झाले आहे. या मुख्य रस्त्यावर असलेल्या पुलाच्या ठिकाणी मोठा खड्ड्यांचा गॅप झाल्यामुळे वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत.पुलावरून जाताना वाहनांना अचानक धक्का बसत असल्याने, संतुलन बिघडून अपघात घडले आहेत. या ठिकाणी योग्य चिन्हे किंवा इशारे नसल्यामुळे, अपघातांचा धोका अधिक वाढत आहे. अनेक वाहनचालकांना या ठिकाणी दुखापतीही झाली आहे. संतोष हरिभाऊ मुळीक उदयोगपती, रामदास( बापू) मुळीक सामाजिक कायॅकॅते (उदयोजक) यांनी संबंधित विभागाकडे खड्ड्यांचा गॅप बुजवण्याची मागणी केली आहे. पुलावरील खड्ड्यांचा गॅप तातडीने बुजवून रस्ता सुरळीत करावा, प्रवाशांच्या हाल थांबवावेत अपघात टाळावे व त्वरित काम करण्यात यावे.अपघात टाळण्यासाठी सूचना फलक व सुरक्षा उपाययोजना कराव्यात.रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा. दिलीप चोरघडे सामाजिक कायॅकॅते (शेतकरी) राजुरी.
- Get link
- X
- Other Apps
महाराष्ट्रातील क्रांतिकारांची बारडोली. - सासवडपुरंदर च्या मातीतील क्रांतिकारी इतिहास आता चित्रपट आणि पुस्तक रूपात झळकणार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आपल्या भारत देशावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी ब्रिटिश सरकारला 'सळो की पळो' करण्याचे काम देशातील अनेक क्रांतीकारकांनी आपल्या शौर्याने आणि बलिदानाने केले. १९४२ ची “ चलेजाव” चळवळ भारतातील प्रत्येक "खेडोपाडी" गांधीं चळवळ म्हणून राज्यातील घराघरातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली. स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला भडका घेऊन इंग्रजांना भारत सोडण्यास मजबूर झाली. या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड - पुरंदरच्या मातीतील क्रांतीकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे.इतिहास वाचला पाहिजे, जपला पाहिजे , त्यातील सकारात्मक गोष्टींचा अर्क पुढच्या पिढीला सुपुर्त केला पाहिजे तरच नविन तरुण पिढी चांगली घडेल आणि भारत देशाच्या सामाजिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक, एकात्मतेचा वारसा भविष्यात टिकेल . ही मनात भावना ठेवून सासवड चे सुपुत्र चित्रपट कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी एक पाऊल पुढे उचलले आहे.त्यांनी हा संपूर्ण धगधगता इतिहास चित्रपट आणि पुस्तक रूपात जगापुढे आणण्याचे ठरवले आहे.याच संदर्भात कर्हानदीकाठावरील सरदार पुरंदरे यांच्या राम बागेतील श्री राम मंदिरात नुकतीच स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या देशाविषयी कृतज्ञता असणाऱ्या मंडळींची सभा जोरदार रंगली.सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकनेते माननीय रावसाहेब आण्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ विधितज्ञ आण्णासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिने अभिनेते, लेखक - दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांच्या कलात्मक नजरतेतुन स्वतंत्र्य पुर्व काळातील सासवड - पुरंदरच्या या बारडोली मध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.सासवड - पुरंदर परीसरातील स्वातंत्र्य चळवळीची मशाल रणरागिणी प्रेमाताई कंठक , पुज्य , शंकरराव देव, आचार्य भागवत , यांच्या प्रेरणेने सासवड ला अनेक स्वातंत्र्य सैनिक दिले . त्यापैकी भिकु तात्या जगताप , आनंदमामा जगताप, निवृत्ती इनामके, चंदनलाल मुथा, तानुबाई मोजे, बबन मोजे, माणिकचंद मुथा, शांताबाई कोटेचा, ताराबाई मुथा , भाऊसाहेब तारकुंडे,अंबर मदनलाल मुथा ,दिगंबर चौधरी, लालचंद मुथा,अब्दुल आत्तार, यशवंत भोंगळे जयवंत भोंगळे ,माधवराव मेमाणे, गणेश गोळे,गुंडोपंत दिडभाई , वामनपुरी गोसावी, विठ्ठल टकले, वरून महागावकर, गहिनाजी म्हेत्रे, शंकर जगताप,गणपतराव इंदलकर, गणपतराव निरगुडे, वसंतराव निरगुडे, रघुनाथ पवार, नानासाहेब पवार, गणपतराव ताकवले,गुलाबराव ताकवले,महादेव होले,रघुनाथराव काकडे, सर्जेराव ताकवले, गोविंदराव भोसले,भगवानराव कुलकर्णी, भुजबळ सिद्धूभाऊ,बोकील रंगराव, नीलकंठ देशमुख,गोविंद जाधव, गणपत बोथरे, गोविंद कवीतकर,विष्णू जाधव,नारायण देसाई याच्यासह अनेक क्रांतिकारी महिला पुरुषांनी संपूर्ण जीवनभर योगदान दिलेचार तास चाललेल्या या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज, तुकाराम इनामके, धनंजय जगताप,परशुराम देशमुख,माजी सैनिक किरण पुरंदरे,विनोद इनामके,अमोल इनामके,शाम महाजन, मयूर इंदलकर, मोहन बागडे,संतोष काकडे,राजेंद्र भोंगळे,अरुण भोंगळे,विलास ताम्हाणे,निलेश शिंदे,संजय काटकर,देवा भालेराव,दिलीप पायगुडे,अय्युब आतार,अब्रार आतार, हारून आतार, दिलीप निरगुडे,बापू म्हेत्रे, मोहिनोद्दीन आतार, हनुमंत जगताप,संतोष आबा काकडे,धनंजय जगताप, परशुराम देशमुख , आदींनी दस्तावेज, ताम्रपत्र, त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांनी लिहून ठेवलेल्या रोजनिशी, पुरातन फोटो, पुस्तक संदर्भ, ऐकीव माहिती आधीच्या साथीने आठवणींना उजाळा दिला. आलेल्या सर्वांचे गांधीजीची आत्मकथा हे पुस्तक आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संदीप इनामके स्टुडिओ च्या संचालीका सौ.नवनी संदीप इनामके क्रिएटिव्ह दिग्दर्शक निनाद देशपांडे, संकलक करण घुले,सहाय्यक छायाचित्रकार स्वतेज गायकवाड यांनी केले होते.या नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला,आलेल्या सर्व मान्यवरांचे तुकाराम नाना इनामके आणि सहपरिवार यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
श्री केदारेश्वर विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात अभिमानास्पद कामगिरी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ (टप्पा २) मध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज काळदरी या विद्यालयाने ५ वी ते १२ वीच्या शाळा असलेल्या अ गटात पुरंदर तालुक्यात अभिमानास्पद कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला. शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानात संपूर्ण पुणे जिल्ह्यातून १६२० शाळांनी सहभाग नोंदविला होता. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय परीक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापन पद्धती, उपक्रमांची अंमलबजावणी, सहशालेय उपक्रम, शालेय परिसर, स्वच्छता व सुशोभीकरण आदी निकषांवर आधारित मुल्यांकन केले. विद्यालयाचा परीसर, बगिचा, इ-लर्निग सुविधा, भव्य आखीव रेखीव क्रिडांगण, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विद्यार्थी शिस्त, शालेय अभिलेखे इ बाबींची पाहणी करुन त्यांनी सर्वांचे कौतुक केले. प्राचार्य विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि काळदरी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून काळदरी विद्यालयाने तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून अव्वल स्थान कायम राखले. पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे आदी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राध्यापक संतोष नवले व सहशिक्षिका सुनंदा टकले यांनी या पारितोषिकाचा मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकार केला. विद्यालयाच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदी(काकी) जगताप, सचिव मा. आमदार संजय जगताप, संस्थेचे मार्गदर्शक तथा सनदी अधिकारी बापूसाहेब जगताप, संस्थापक-सचिव डॉ. एम. एस. जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी , व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे, सहव्यवस्थापक रविंद्रपंत जगताप यांनी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
- Get link
- X
- Other Apps
जागतिक हिवताप दिनानिमित्तसासवड शहरात हिवताप व किटकजन्य आजार जनजागरण अभियानास सुरवात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून सासवड नगरपरिषद] ग्रामीण रुग्णालय सासवड व तालुका आरोग्य अधिकारी पुरंदर मार्फत ज्ञानदिप कौशल्य विकास संस्था] सासवड यांच्या सहभागाने हिवताप व किटकजन्य आजार जनजागृती अभियान राबविण्यास सुरवात झाली. ज्ञानदिप कौशल्य विकास संस्था] सासवड या ठिकाणी हिवताप कार्यशाळेचे आयोजन मा.श्रीम.अपर्णा पाटील जिल्हा हिवताप अधिकारी पुणे] डॉ.विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी] डॉ.गजानन अकमार अधिक्षक ग्रामीण रुग्णालय] डॉ.कैलास चव्हाण मुख्याधिकारी न.प. यांचे मार्गदर्शनाखाली जागतिक हिवताप दिनाचे महत्व विषद करुन हिवताप व किटकजन्य आजाराची सर्वसाधारण माहीती रोगलक्षणे व उपचार याची माहीती देण्यात आली. नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून] निरुपयोगी टायर] नारळाच्या करवंटया] मोकळे डबे बादल्या इ. निरुपयोग वस्तूंची विल्हेवाट लावावी. मच्दरदाणीचा वापर करावा] आपल्या घराजवळील डासउत्पत्ती स्थाने शोधूण काढावित व गटारे वाहती करावीत. पाणी साठणाऱ्या ठिकाणी रॉकेल] जळके ऑईल यांचा वापर करावा. आपल्या घरांच्या मोठया टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत ई. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून हिवताप आजारांविषयी लढा गतिमान करण्याचे आव्हान केले. सासवड नगरपरिषदे मार्फत हिवताप] डेग्यू] चिकूनगुन्या या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावे असे आव्हान केले. तसेच यानंतर ज्ञानदिप कौशल्य विकास संस्था सासवड येथील विद्यार्थ्यांमार्फत सासवड शहरातून हिवताप व किटकजन्य आजार जनजागृती रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रमास श्रीम.कामठे मॅडम, प्रकाश चवरे,विजय सोनवणे ,अकबर नाईकवाडे, संतोष भोसले,फिरोज तांबोळी, दादासाहेब जगताप उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील पीडीसी बँकेला 23 कोटीचा नफा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुरंदर तालुक्यातील 75 टक्के कर्ज वसुली करत, 23 कोटी 63 लाख रुपयाचा नफा मिळवलेला आहे, दरम्यान चालू खरीप हंगामासाठी आत्तापर्यंत 11हजार 556 सभासदांना 116 कोटी 32 लाख रुपयांची कर्ज वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती बँकेचे संचालक संजय जगताप यांनी दिली. जिल्हा बँकेच्या पुरंदर तालुक्यातील १३ शाखा मार्फत मागील आर्थिक वर्षात 324 कोटी 71 लाख रुपयाचे कर्ज वाटप केले होते, त्यापैकी 243 कोटी 85 लाख रुपयाची वसुली झाली आहे, चालू खरीप हंगामासाठी तालुक्यातील 97 संस्थांचे पीक कर्ज मंजूर झाली असून, पाच एप्रिल पासून वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे, 31 मार्च पर्यंतची कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना प्राधान्याने कर्ज वाटप करण्याच्या सूचना जगताप यांनी सचिव व विकास अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या आहेत, सोमवार पर्यंत दि. 20 तालुक्यातील 13 शाखांमधून 116 कोटीचे वाटप झाले असून, 30 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र सभासदांना कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, या बैठकीस विभागीय अधिकारी महेश खैरे, किरण जाधव, अनिल उरवणे यांच्यासह विविध सोसायट्यांचे सचिव व अधिकारी आदी उपस्थित होते, ठेवींचे उद्दिष्ट पार, जिल्हा बँकेने पुरंदर तालुक्यातील शाखा साठी 31 मार्च 2026 अखेर 646 कोटीचे ठेवीचे उद्दिष्ट ठेवले होते, उद्दिष्टाचा हा टप्पा पार करीत पुरंदर तालुक्यातील 13 शाखा मधून 704 कोटी तेहतीस लाख 97 हजार रुपयांच्या ठेवी जमा केलेल्या आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी वृत्तपत्र वाचनालय सुरू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने महात्मा फुले चौकामध्ये वृत्तपत्र वाचनालयाची उद्घाटन करण्यात आले, यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार हेमंत ताकवले, संविधान प्रचारक श्रीकांत लक्ष्मी शंकर, नवनाथ होले यांना महात्मा फुले कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, गुलामगिरी हे पुस्तक स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते, ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदीप होले यांनी वाचनालयाच्या संकल्पनेविषयी माहिती दिली. या वाचणालयाच्या दैनंदिन खर्चाची जबाबदारी सुधाकर म्हेत्रे, दीपक टकले व राजेंद्र तिडके यांनी स्वीकारली आहे. याप्रसंगी डॉ. जयश्री होले, नगरसेवक प्रदीप राऊत, पप्पू म्हेत्रे, सुधाकर गिरमे, मोहन चव्हाण ,अनिल गद्रे आदी उपस्थित होते. कमलेश म्हेत्रे यांनी प्रास्ताविक तर ऋषिकेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले, बापू जगताप यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
मुंबई उच्च न्यायालयाने विमानतळ प्राधिकरणाला खडे बोल सुनावले; तर मुंबई उच्च न्यायालयाकडून पुरंदर विमानतळ जागा बदलाचे स्पष्ट संकेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: विमानतळाच्या जाग्या बदलाच्या तांत्रिक मुद्द्यावर सात गावातील शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून, त्याची काल 23 एप्रिल रोजी सुनावणी पार पडली, सुनावणी दरम्यान दोन वेळा जागा बदलली मात्र योग्य जागा कुठलीही याबद्दल सरकारी खात्याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे, न्यायालयाचे निरीक्षण या प्रकल्पात भूसंपादन महत्त्वाचे नसून, विमानतळाची जागा योग्य की? अयोग्य? हे महत्त्वाचे आहे, परंतु स्थगिती आदेश देण्यासाठी एमआयडीसीला प्रतिवादी करावी लागणार आहे, कारण भूसंपादनाचे अधिकार त्यांच्याकडे आहेत, विमानतळ प्रकल्पाशी संबंधित असलेल्या सर्व सरकारी खात्यांचे वकील जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची सुनावणी दरम्यान दिसून आले आहे. विमानतळ उभारणीसाठी काही पैसे खर्च करतात, आणि नंतर म्हणतात की, या ठिकाणी विमान उडू शकत नाही, त्यापेक्षा आम्ही या प्रकल्पाला स्थगिती का? देऊ नये, मुंबई उच्च न्यायालय. दोन महिन्यापासून उच्च न्यायालय शासनाला योग्य जागा कुठली? हे सिद्ध करा असा प्रश्न विचारत असून, कोणाकडेही याचे उत्तर नसल्याकारणाने, न्यायालयाने यंत्रणांना खडे बोल सुनावले आहेत, एकंदरीत कालच्या सुनावणीचा कल पाहता पुढील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाकडून पुरंदर विमानतळाला कायदेशीर स्थगिती येऊ शकते असे स्पष्ट दिसत आहे, यामुळेच दहा मार्चपासून भूसंपादन मोबदला वाटप चालू करणार आहोत, असे सांगणारे जिल्हा प्रशासन आता 24 एप्रिल आले तरी शांत असल्याचे दिसून येत आहे? स्पष्ट का होत नाही यांचे उत्तर अधिकारी याकडून नाही.
- Get link
- X
- Other Apps
एम.ई.एस. आबासाहेब गरवारे महाविद्यालय (स्वायत्त) तथा भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय शिक्षण मंडळ स्थापना दिनानिमित्त “विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 2025” या विषयावर प्रभावी व विचारप्रवर्तक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साह, शिस्त आणि नियोजनपूर्वक पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रो. (डॉ.) आर. एम. चिटणीस उपस्थित होते. त्यांनी “विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025” या विषयाचे विविध पैलू अत्यंत सुसंगत व व्यापक पद्धतीने मांडले. कोणतेही विधेयक राजपत्राच्या स्वरूपात लागू होण्याच्या प्रक्रियेत असताना केवळ शिक्षकांनीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाने त्या विधेयकाचा अभ्यास करून त्यावर रचनात्मक व सकारात्मक सूचना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्रो. चिटणीस यांनी आपल्या भाषणात भारतीयत्व जपत जागतिक स्तरावर भारताची स्वतंत्र व प्रभावी ओळख निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. बदलत्या आंतरराष्ट्रीय संदर्भात भारताला सक्षम, आत्मनिर्भर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणव्यवस्थेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारची विधेयके त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले. विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षक हा सर्वात मोठा परिवर्तनकारी घटक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांच्यामार्फत स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम काळाची गरज असल्याचे सांगितले. भारतीय शिक्षण मंडळामार्फत अशा प्रकारचे चिंतनपर व राष्ट्रहिताचे कार्यक्रम सातत्याने आयोजित व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात भारतीय शिक्षण मंडळ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांत मंत्री डॉ. गणेश चव्हाण हेही प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. विलास उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले. महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, भारतीय शिक्षण मंडळाचे सदस्य तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित सुमारे 135 हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमास उपस्थित होते.प्राचार्य प्रा. विलास उगले यांनी विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयकाचे विविध पैलू स्पष्ट करत त्याची आवश्यकता व महत्त्व अधोरेखित केले. उपप्राचार्य प्रा. अनिल खैरनार यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. त्यांनी भारतीय शिक्षण मंडळाच्या कार्याचा, उद्दिष्टांचा आणि राष्ट्रनिर्माणातील भूमिकेचा संक्षिप्त आढावा सादर केला.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सहभागींसोबत प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून शिक्षणाच्या विविध आयामांवर चर्चा झाली. प्रो. चिटणीस यांनी सर्व प्रश्नांना अत्यंत सुस्पष्ट व संतुलित उत्तरे देत उपस्थितांचे मार्गदर्शन केले. भारतीय शिक्षण मंडळ स्थापना दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी, विचारसमृद्ध आणि यशस्वी ठरला.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखेसमोरून दुचाकी स्वरांनी रोकड पळवली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील जिल्हा बँकेच्या शाखेसमोरून दुचाकी स्वरांनी एका शेतकऱ्याच्या हातातील एक लाख 44 हजार रुपयाची रोकड असलेली पिशवी जबरीने हिसकावून घेतली, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहन चंद्रकांत मेमाणे वय 50 राहणार पारगाव मेमाणे तालुका पुरंदर येथील गुरुवारी दिनांक 23 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास सासवड येथील जिल्हा बँकेतून पैसे काढून जात असताना, समोरील नोबेल सिटीस्कॅन सेंटर समोर ते आले असताना, त्यावेळी एका कापडी रंगाच्या मोटरसायकल वरून दोन अनोळखी तरुण तेथे आले त्यांनी मेमाणे यांच्या उजव्या हातातील पिवळ्या रंगाची कापडी पिशवीच्या मध्ये एकूण एक लाख 44 हजार रुपये होते ते जबरीने ओढले आणि वेगाने पसार झाली या प्रकरणी मोहन मेमाणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी रंगणार पुरंदर केसरीचा थरार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर हवेलीतील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेली पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा रविवारी दि. 26 व सोमवारी दि.27 रोजी सासवड ता. पुरंदर येथील श्री भैरवनाथ कुस्ती मैदानावर रंगणार आहे, खुल्या गटातील विजेताला चांदीचे गदा आणि पस्तीस हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे ,सहकार महर्षी स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ आणि पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, स्पर्धेत 30 किलो पासून खुल्या गटापर्यंत एकूण दहा वजन गटांचा समावेश आहे, यावेळी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा विशेष असा सन्मान होणार आहे, तसेच ज्ञानेश्वर मांगडे यांना राज्यस्तरीय आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी पुरस्कार तर शिवाजीराव ताकोले यांना मल्हार केसरी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.उत्कृष्ट आखाडा नियोजनाबद्दल पांगारे येथील निषणाई देवी यात्रा कमिटी आणि वडकी येथील श्री काळभैरवनाथ उत्सव समिती यांचाही गौरव करण्यात येईल, स्पर्धेसाठी रविवारी दि.26 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये वजने घेतले जातील, खेळाडूंनी आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आणि दोन फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे, पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या नियमानुसार या कुस्त्या होतील ,कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव रवींद्र पंत जगताप यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या तर्फे दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे वितरण; 196 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम तर; नगराध्यक्ष आनंदी चंदुकाका जगताप यांच्या हस्ते धनादेश वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदे कडून उपक्रमांतर्गत सुमारे 22 सन २०२५-२६ मधील सासवड शहरातील दिव्यांगांचा ०५% निधी लाभार्थी दिव्यांगांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. शारीरिक मर्यादा असल्यामुळे व असाह्य वेदनांमुळे दिव्यांगांना औषध उपचारासाठी पैशाची नेहमीच अडचण भासत असते, अशातच दिव्यांगांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी दिव्यांग हा संजय गांधी पेन्शन, ०५% निधी, निर्वाह भत्ता याची आतुरतेने वाट पाहत असतात अशातच ३१ मार्चला मिळणाऱ्या निधीसाठी ०१ महिना उशीर झाल्यामुळे नगरपालिकेचे अधिकारी आणि प्रहार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सतत बैठक होऊन चर्चा सुरू होती. यावर्षी सासवड नगरपालिका दिव्यांगांना निधी हा पैशाच्या रकमे ऐवजी वस्तू स्वरूपात देणार होती हे समजल्यावर प्रहारचे पुरंदर तालुका संपर्क प्रमुख काशिनाथ (आण्णा) जगताप आणि विभाग प्रमुख हनुमंत (तात्या) नेटके यांनी नगरपालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. सन २०२५-२६ वर्षांकरिता सासवड नगरपालिकेने दिव्यांगांसाठी रु.२१,२२,०४४/- इतका ०५% निधीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली. निधी जमा झाल्यानंतर दिव्यांगांनी जल्लोषात आनंद साजरा केला. सासवड नगरपालिकेमध्ये दिव्यांग कक्षाची लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी काशिनाथ( आण्णा )जगताप यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली. दिव्यांगांचा हक्काचा ०५% निधी जमा झाल्याबद्दल नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप तसेच नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रहारचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोजभाई पठाण, संपर्क प्रमुख काशिनाथ (आण्णा )जगताप, विभाग प्रमुख हनुमंत( तात्या) नेटके, सासवड शहराध्यक्ष दत्ता दादा दगडे पाटील, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात, संदीप जगताप, आप्पासो सकट, चंद्रकांत कसबे, लक्ष्मण बनसोडकर, इन्नूसभाई इनामदार, हैदर नगारजी, योगिराज जगताप, सुनीता खोपडे, अलका भांडवलकर, रंजना जगताप, सुनीता दोडके, शकुंतला जांभुळकर आदी प्रहार पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या तर्फे दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे वितरण; 196 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम तर; नगराध्यक्ष आनंदी चंदुकाका जगताप यांच्या हस्ते धनादेश वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदे कडून 2025- 26 या आर्थिक वर्षात दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवलेल्या पाच टक्के निधीचे वितरण करण्यात आले असून, एकूण 196 पात्र दिव्याग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यात आली असून, या उपक्रमांतर्गत सुमारे 22 लाख 77 हजार रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे. नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदुकाका जगताप यांच्या हस्ते नगरपरिषद कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रतिकात्मक धनादेश वाटप करण्यात आले असून, सासवड नगर परिषदेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग नागरिकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात आला होता, या निधीचा वापर पारदर्शक पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा करण्यासाठी करण्यात आला असून, त्यामुळे लाभार्थ्यांना आर्थिक मदत विविध आणि सुरक्षित रित्या मिळालेली आहे, नगर परिषदेकडे प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननी नंतर एकूण 196 पात्र दिव्यांग नागरिकांची निवड करण्यात आली असून, प्रत्येक लाभारथ्याला सुमारे 11,724 रुपयाचे आर्थिक मदत देण्यात आली आहे. या संदर्भात नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमती निर्णय घेण्यात आला असून, दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सासवड नगरपरिषद कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमातील शहरातील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने दिव्याग नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोहर जगताप ,मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, नगर परिषदेचे सदस्य, तसेच इतर मान्यवर आधी उपस्थित होते .उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग नागरिकासाठी अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित केलेले असून, या उपक्रमामुळे दिव्यांग नागरिकांना आर्थिक आधार मिळाल्याने ,त्यांनी नगरपरिषदेचे आभार व्यक्त केले .भविष्यातही अशाच योजना राबवून अधिकारी लाभार्थ्यापर्यंत मदत पोहोचवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, दिव्यांग नागरिकांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिक बळ देणे हे नगरपरिषदेचे कर्तव्य आहे अशा योजना पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. आनंदी (काकी) जगताप नगराध्यक्षा सासवड नगरपरिषद.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर मधील भारनियमन बंद करण्यासाठी स्पष्ट इशारा ;तर पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य महावितरण विरोधामध्ये बेमुदत उपोषण पुरंदरच्या पूर्व भागात रात्री चार तास भार नियमन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काही पोल्ट्री उद्योग तसेच फुल शेती करणारे शेतकरी विज चोरी करत असताना, त्यांच्यावर कडक अशी कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून महावितरणला निवेदनाच्या स्वरूपात देण्यात आली, पुरंदरच्या ग्रामीण भागातील घरगुती भार नियमन 15 दिवसात बंद न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर हे बे मुदत उपोषण करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य माऊली यादव व जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांनी दिलेला आहे, याबाबतची निवेदन कार्यकारी अभियंता भालचंद्र गवई यांना देण्यात आले आहे, भारनियमानामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे, शिवाय सध्या कडक उन्हाळा असल्याने, सर्वांना भारनियमानामुळे त्रास होत असून, परिसरामध्ये चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढलेले आहे, या त्रासातून सुटका होण्यासाठी त्वरित भार नियमन रद्द करावी अशी मागणी निवेदनामध्ये केलेली आहे, परिसरातील काही पोल्ट्री उद्योग तसेच फुलशेती करणारे शेतकरी विज चोरी करत असून, त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे, व्यावसायिकांची व स्थानिक वायरमेनचे आर्थिक हितसंबंध असल्याची, तक्रार देखील यावेळी करण्यात आली असून, अंकुश (बापू )भगत, रोहिदास कड, संदीप देवकर, महेश राणे, बळीराम सोनवणे यासह ग्रामस्थ, शेतकरी आधी उपस्थित होते. अनाधिकृत वीज जोडवर कारवाई करणार ,परिसरामधील चोरीचे प्रमाण वाढले आहे, पोल्ट्री उद्योग फुल शेती करणारे शेतकरी यांच्या अनाधिकृत वीज जोडवर देखील तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश गवळी यांनी दिलेले आहेत, कारवाई करण्याचा इशारा याबाबत कार्यकारी अभियंता यांनी सिंगल फेज विद्युत पुरवठा करत असताना, काहीजण थ्री फेज उपकरणे वापरत आहेत, परिणामी लोड मर्यादा येऊन, पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे अशा विविध चोरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे, उपकार्यकारी अभियंता गणेश चांदणे, सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे आधी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
वडीलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणी पत्रासाठी नोंदणी शुल्क माफ; तहसीलदाराबरोबरच दुय्यम निबंध कार्यालयातही आता मोफत नोंदणी मुंबई प्रतिनिधी: राज्य सरकारने वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वाटणी पत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क संपूर्ण माप केले आहे, याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने सोमवारी जाहीर केले आहे ,महाराष्ट्राचे महसूल सहित १९६६ च्या कलम 85 अंतर्गत येणाऱ्या प्रकरणासह आपसातील संमतीने थेट दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी येणाऱ्या वडीलोपारजित जमिनीच्या वाटणी पत्रालाही नोंदणी शुल्कातून पूर्णपणे माफी देण्यात आली आहे. शासनाच्या 23 जून 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार कलम 85 अन्वये एकाच कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या शेत जमिनीच्या वाटणी पत्रावर कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही अशी तरतूद करण्यात आली होती, या कलमा अंतर्गत वाटणी पत्राचे अधिकार तहसीलदारांना आहेत, परंतु अनेक नागरिक तहसीलदाराकडे न जाता थेट दुय्यम निबंधक कार्यालयात वाटणी पत्र नोंदणीसाठी सादर करत होते.अशा वेळी मूळ अधिसूचनेत स्पष्ट तरतूद नसल्याचे कारण देत दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदणी शुल्क आकारले जात असल्याचे, शासनाच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचा होणारा हा गोंधळ दूर करण्यासाठी सोमवारी महसूल विभागाने परिपत्रक जारी करून स्पष्टता आणली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी दोन गटात दगडफेक सह हाणामारी ; तर पोलिसावरही हल्ला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील जेजुरी नाका परिसरामधील फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला असून, या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, दोन्ही गटांनी एकमेकावर आणि शांतता राखण्यासाठी केलेल्या पोलिसावरही प्राणघातक दगडफेक करण्यात आली असून, याप्रकरणी सासवड पोलिसांनी दोन्ही गटातील मुख्य संशियतासह 70 ते 80 जनावर गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे दाखल केलेले आहेत, यातील दहा जणांना अटक केली असून, त्यांना गुरुवार दि. 23 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे ,सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दि. 18 रोजी रात्री अकराच्या सुमारामध्ये जेजुरी नाका येथील चौकात फलक लावण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला या वादातून दोन्ही बाजूंनी बे कायदा जमाव जमवण्यात आला, बघता बघता परिस्थिती हाताबाहेर गेली असता, दोन्ही गटांनी एकमेकावर दगडफेक सुरू केली, घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले जमावला शांत करण्याचा आणि पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता, संतप्त जमावाने पोलिसांची निर्देश दुडकावून लावले ,उलट पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे, पोलीस हवालदार विनायक अशोक हाके यांनी ही फिर्याद दिली आहे. फिर्यादी वरून अमित साबळे, तन्मय वाघमारे, रितेश साबळे, प्रसाद सकट, बाळा उर्फ संघर्ष साबळे, बंटी उर्फ सुहास रणपिसे, दिनेश साबळे ,आतिश पांडुरंग दळवी, प्रिन्स साबळे व त्यांच्या 40 ते 50 सहकार्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तसेच दुसऱ्या गटातील अजिंक्य प्रकाश भोंडे, कार्तिक काळुराम भोंडे, ओम मनोज भोंडे ,सिद्धार्थ माणिक भोंडे, निखिल दादू भोंडे ,संतोष शंकर भोंडे ,शुभम संतोष भोंडे, तेजस भोंडे, यश किसन जाधव, सोपान शंकर भोंडे व त्यांच्या 30 ते 35 सहकाऱ्यावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे ,अशोक नगर येथील समाजातील लोकांना पंकज शशिकांत धिवार यांनी भडकावून पोलीस व मातंग समाजातील लोकांवर हल्ला करण्यास प्रूर्त केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे करीत आहेत, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जल्लोष करताना ; गुलाल विरहित मिरवणुकीमध्ये अक्षय तृतीया निमित्त शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ कोडीत नाका अमृत महोत्सवी वर्षा निमित्त व अक्षय तृतीयेनिमित्त शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करुन पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणली. माजी नगराध्यक्ष स्व. राजेंद्र जगताप, शिवाजी जगताप, स्व.चंदूकाका जगताप यांनी पारंपरिक शिवजयंती सुरु केली. 75 वर्षांपूर्वी सुरू झालेली शिवजयंती आज अमृत महोत्सवाला निमित्त संपूर्ण वर्षभर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत. या शिव ज्योतीचे सासवडच्या शिवतीर्थावर नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उप नगराध्यक्ष मनोहर जगताप, सासवड नगरापालिका गटनेते अजित जगताप, माऊली(काका) जगताप, राजन (भैया) जगताप, स्मिता जगताप, सोपान रणपिसे, अर्चना जगताप, स्मिता जगताप, प्रियंका जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, मयूर चौखंडे, साकेत जगताप, दिलीप जगताप, राजेंद्र जगताप, मनोज यांनी शिवज्योतीचे सहर्ष स्वागत केले. छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळाच्या मिरवणूक सोहळाचे उदघाटन भाजपा नेते माजी आ. संजय जगताप व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना जगताप, संजय ग.जगताप, बंडू( काका) जगताप, रमेश जगताप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवित मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.या सोहळ्यात संपूर्ण सासवड मधील सर्व मंडळाचे कार्यकर्ते, सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांचा मोठ्या सहभाग होता. मिरवणूक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण पारंपरिक छबीने होते, या सगळ्यात सर्व सभासद पारंपारिक वेशभूषा घालून सहभागी झाले होते. गुलाल विरहित हा सोहळा नेत्र दीपक साजरा करण्यात आला.या सोहळ्याचे सासवड शहरातील प्रत्येक चौकात मान्यवर लोकांनी तसेच विविध मंडळच्या अध्यक्ष यांनी मिरवणुकीचे स्वागत करीत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.या सोहळ्यानिमित्त महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ यांनी सर्व शिवभक्तांना सरबत आणि थंड पिण्याचे पाणी वाटप केले.तसेच या सोहळ्यात विराट हिंदू संमेलनाचे जिल्हाध्यक्ष पोपटराव शिंदे, डॉ. दबडगांवकर, पुरदर तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक अध्यक्ष विजय जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुरंदर तालुक्यातील सर्व सभासद सहभागी होऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आकाश जगताप, तन्मय जगताप, अक्षय जगताप, अभिजित जगताप, चंद्रशेखर जगताप, तेजस शिवरकर, विजय जगताप, अजय जगताप, रमेश जगताप सुरज जगताप, नंदकुमार जगताप, अमित पवार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.फोटो : सासवड (ता. पुरंदर ) येथील शिवतिर्थ येथे शिवज्योतीचे स्वागत करित असताना आनंदीकाकी जगताप, माजी आ. संजय जगताप व नगरसेवक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.फोटो : सासवड (ता. पुरंदर ) येथे अक्षय तृतीयेनिमित्त शिवजयंती मिरवणूक प्रसंगी.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव अभियान उत्सवांमध्ये संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक मराठा 2026 प्र.क्र क्रमांक 09 समन्वय 1 दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजीचे शासन निर्णयान्वये ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावर सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, पुरंदर तालुक्यामध्ये परींचे या मंडल भागातील नागरिकांच्या सोयीसाठी मौजे परिंचे येथील काळ भैरवनाथ मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर अभियानाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ,या कार्यक्रमासाठी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, प्रणोती श्रीश्री माळ गटविकास अधिकारी पुरंदर, संदीप पाटील नायब तहसीलदार पुरंदर, अमित झेंडे सभापती पुरंदर पंचायत समिती, प्रवीण जगताप उपसभापती पंचायत समिती पुरंदर, हरिभाऊ लोळे जिल्हा परिषद सदस्य ,माणिक निंबाळकर पंचायत समिती सदस्य, सायली शिंदे पंचायत समिती सदस्य इत्यादी मान्यवर उपस्थित होते, तसेच संबंधित गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिक आधी उपस्थित होते, महसूल प्रशासनाच्या वतीने परींचे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजसव समाधान शिबिर अभियान कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या ठिकाणी उपस्थिती राहून, चांगला सहभाग नोंदवला असून ,या अभियानामध्ये एकूण 679 योजनांचा लाभ देण्यात आलेला आहे, अशी शेवटी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी माहिती दिली आहे, प्रलंबित फेरफार 45, सातबारा दुरुस्ती प्रकरणे 11, जिवंत सातबारा 24, डिजिटल सातबारा देणे 66, आठ वितरण करणे 45, तुकडे बंदी नियमतीकरण करणे झिरो, वर्ग दोन च्या जमीन वर्ग एक प्रकरणे एक, भूसंपादन कमी जास्त पत्र तयार एक, अकृषीक तरतुदीचा सुधारणाानुसार आधी मूल्य वसूल करणे झिरो, लोकसेवा हक्क कायदा एक, जात प्रमाणपत्र नऊ, दोन नॉन क्रिमीलर सात, तीन उत्पन्नाचा दाखला 18, चार रहिवास अधिवास प्रमाणपत्र 22, सामाजिक लाभाच्या योजना एक, संजय गांधी 16 ,दोन श्रावण बाळ योजना आठ, एक खिडकी योजना एक, दोन ऍग्रो स्टॅक 40, 3 पी एम किसान 12, चार तक्रार निवारण 352, एकूण 679 प्रकरणांचा निपटारा झालेला आहे, सूत्रसंचालन मंडल अधिकारी बसवंत बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तलाठी प्रमोद झुरंगें यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
“ज्ञान, संवेदनशीलता व अंमलबजावणी महत्त्वाची” — डॉ. मनोहर चासकर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालय, सासवड येथे इंग्रजी, वाणिज्य आणि रसायनशास्त्र या विषयांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. शैक्षणिक, संशोधनात्मक आणि बौद्धिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या परिषदांचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. मनोहर चासकर यांनी जागतिक स्तरावर संशोधनाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात संशोधन ही केवळ शैक्षणिक आवश्यकता नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषी विचार, कौशल्याधारित शिक्षण आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी अध्यापकांनी मार्गदर्शक, प्रेरक आणि संशोधन सुलभ करणारे घटक म्हणून कार्य केले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सेल्फ-फंडेड चर्चासत्रामागील संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अशा परिषदेमुळे महाविद्यालयीन पातळीवर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागते तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय आणि संवाद अधिक दृढ होतो. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता संशोधन आणि सर्जनशीलतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.इंग्रजी विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉ. संजय झगडे यांनी परिषद आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना, “Literature, Culture and Society: Emerging Trends in English Studies”, “Innovation and Sustainability in Commerce and Management in the Digital Era” आणि “Frontiers in Sustainable and Advanced Chemical Sciences” या विषयांमधील संशोधनाच्या नव्या दिशा अधोरेखित केल्या. त्यांनी सांगितले की, अशा आंतरराष्ट्रीय परिषदांमुळे विविध क्षेत्रांतील तज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी एकाच व्यासपीठावर येतात, ज्यामुळे ज्ञानवृद्धीबरोबरच नवीन संकल्पनांचा विकास होतो.या प्रसंगी मराठी विभागाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्र “एकविसाव्या शतकातील साहित्य अभिव्यक्ती: अभ्यास आणि संशोधन” या विषयावरील प्रोसिडिंगचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकाशनामुळे संशोधन कार्याला प्रोत्साहन मिळणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत उपलब्ध झाला आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 400 पेक्षा अधिक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. विविध तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले, ज्यातून नव्या कल्पना, दृष्टिकोन आणि संशोधनाच्या संधी उलगडून आल्या.एकूणच, या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्रात नवे क्षितिज उघडले गेले असून, संशोधन, नवोन्मेष आणि ज्ञानवृद्धीला चालना मिळाल्याचे समाधान सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले. या परिषदेचे आयोजन वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे समन्वयक डॉ. विजय पुणेकर, डॉ. किशोर लिपारे, डॉ. नरेंद्र कांबळे यांनी केले होते. या प्रसंगी IQAC चे समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, वाणिज्य विभाग समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल कलापुरे, डॉ. मदभावीकर आणि डॉ. विशाखा गणवीर यांनी प्रभावीपणे केले.. शेवटी डॉ. नरसिंग गिरी यांनी सर्व मान्यवर, सहभागी आणि आयोजन समितीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.फोटो कॅप्शन उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. मनोहर चासकर व उपस्थित मान्यवर
- Get link
- X
- Other Apps