Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या तर्फे दिव्यांगासाठी पाच टक्के निधीचे वितरण; 196 लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम तर; नगराध्यक्ष आनंदी चंदुकाका जगताप यांच्या हस्ते धनादेश वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगर परिषदे कडून उपक्रमांतर्गत सुमारे 22 सन २०२५-२६ मधील सासवड शहरातील दिव्यांगांचा ०५% निधी लाभार्थी दिव्यांगांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला. शारीरिक मर्यादा असल्यामुळे व असाह्य वेदनांमुळे दिव्यांगांना औषध उपचारासाठी पैशाची नेहमीच अडचण भासत असते, अशातच दिव्यांगांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी दिव्यांग हा संजय गांधी पेन्शन, ०५% निधी, निर्वाह भत्ता याची आतुरतेने वाट पाहत असतात अशातच ३१ मार्चला मिळणाऱ्या निधीसाठी ०१ महिना उशीर झाल्यामुळे नगरपालिकेचे अधिकारी आणि प्रहार संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सतत बैठक होऊन चर्चा सुरू होती. यावर्षी सासवड नगरपालिका दिव्यांगांना निधी हा पैशाच्या रकमे ऐवजी वस्तू स्वरूपात देणार होती हे समजल्यावर प्रहारचे पुरंदर तालुका संपर्क प्रमुख काशिनाथ (आण्णा) जगताप आणि विभाग प्रमुख हनुमंत (तात्या) नेटके यांनी नगरपालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता. सन २०२५-२६ वर्षांकरिता सासवड नगरपालिकेने दिव्यांगांसाठी रु.२१,२२,०४४/- इतका ०५% निधीची रक्कम बँक खात्यात जमा करण्यात आली. निधी जमा झाल्यानंतर दिव्यांगांनी जल्लोषात आनंद साजरा केला. सासवड नगरपालिकेमध्ये दिव्यांग कक्षाची लवकरात लवकर उभारण्यात यावा अशी मागणी काशिनाथ( आण्णा )जगताप यांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली. दिव्यांगांचा हक्काचा ०५% निधी जमा झाल्याबद्दल नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप तसेच नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी प्रहारचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश दादा जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोजभाई पठाण, संपर्क प्रमुख काशिनाथ (आण्णा )जगताप, विभाग प्रमुख हनुमंत( तात्या) नेटके, सासवड शहराध्यक्ष दत्ता दादा दगडे पाटील, जेजुरी शहराध्यक्ष प्रमोद थोरात, संदीप जगताप, आप्पासो सकट, चंद्रकांत कसबे, लक्ष्मण बनसोडकर, इन्नूसभाई इनामदार, हैदर नगारजी, योगिराज जगताप, सुनीता खोपडे, अलका भांडवलकर, रंजना जगताप, सुनीता दोडके, शकुंतला जांभुळकर आदी प्रहार पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment