Posts
Showing posts from August, 2026
पुरंदर तालुक्यातील 'खराखुरा इतिहास बुजवण्याचा प्रयत्न' चागावटेश्वर पालखी मानावर एक प्रकारे घेतला आक्षेप एडवोकेट त्रिगुण गोसावी महाराज यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील लक्ष्मी नारायण मंदिरामधून प्रस्थान ठेवणाऱ्या चांगावटेशवर पालखी सोहळ्याला महाराष्ट्र शासनानेकायमी दिलेला मानाचा दर्जा रद्द करावा, अशी मागणी संत सोपान देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ऍडव्होकेट गोसावी महाराज यांनी मुख्यमंत्री फडणवीस याच्याकडे पत्राद्वारे मान्यता कोणत्या आधारावर देण्यात आली याचीही तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एडवोकेट त्रिगुण महाराज गोसावी यांच्या म्हणण्यानुसार संत चांगदेव अर्थात चागावटेश्वर यांची समाधी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शेत्र पुणतांबा येथे आहे, संत नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये चांगदेवांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन असून, माग्य वैद्य त्रयोदशी शके बाराशे अठरा रोजी पुणतांबा येथे त्यांना समाधी देण्यात आल्याचे स्पष्ट होते, संत चांगदेवांची समाधी सासवड येथे नसून, पुणतांबा येथे आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे ,असे त्रिकोण महाराज गोसावी यांनी मांडले आहे. सासवडच्या लक्ष्मीनारायण मंदिरातून पूर्वी लक्ष्मीनारायण नावाने पालखी सोहळा निघत असल्याची नोंद आहे.खराखुरा इतिहास बोलवण्याचा प्रयत्न, अलीकडे मंदिराचे नामांतर चागावटेश्वर मंदिर असे करून पालखीचे नावही बदलण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. इतिहासाची मोडतोड करून मूळ इतिहास बुजवण्याचा प्रयत्न होत असल्याचे गोसावी यांनी मांडले आहे .मंदिरातील समाधी सदृश्य चौथ्यारया बाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे ,या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, आमदार विजय शिवतारे ,माजी आमदार संजय जगताप, खासदार सुप्रिया सुळे तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला ही पत्रे दिल्याचे सांगितले आहे. वै. मामासाहेब दांडेकर यांच्या वारकरी पंथाचा इतिहास या पुस्तकांमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अशी माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
- Get link
- X
- Other Apps
अक्षय नामदेव म्हेत्रे यांची शिक्षकपदी निवड; नूतन मराठी विद्यालयाच्या वतीने सत्कार अहिल्यानगर प्रतिनिधी: सुरेश म्हेत्रे नूतन मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेडगाव येथील माजी विद्यार्थी अक्षय नामदेव म्हेत्रे यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेत शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.विद्यालयात शिक्षण घेत असताना मिळालेले संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर अक्षय म्हेत्रे यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या या यशाबद्दल विद्यालय परिवाराने अभिनंदन केले. त्यांच्या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.सत्काराला उत्तर देताना अक्षय म्हेत्रे म्हणाले, “जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास तसेच कुटुंब आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे शिक्षक होण्याची जिद्द पूर्ण करता आली.” आपल्या यशात विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन व संस्कारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच देविदास सोनटक्के, सोमनाथ बोरुडे, राहुल कोऱ्हाळे, नामदेव म्हेत्रे, वैशालीताई म्हेत्रे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी अक्षय म्हेत्रे यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.अक्षय म्हेत्रे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे डीजे डॉल्बीच्या नादी लागू नका सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गणेशोत्सव नियमाच्या चौकटीत राहून उत्साहामध्ये साजरा करा, डीजे डॉल्बीच्या नादी लागू नका, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी केले आहे. जेजुरी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत जेजुरी, निरा,वाल्हे, तसेच पंचक्रोशीतील गणेश मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणूक लेदरचा वापर केल्यास संबंधित गणेश मंडळावर गुन्हा दाखल केला जाईल, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनीही गणेशोत्सव काळात नियमाचे पालन करून स्वयशिसत राखण्याचे आव्हान केले. बैठकीचे नि योजन पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, अण्णासाहेब देशमुख, भूषण कदम आदींनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील काळेवाडी झेंडेवाडी या परिसरामध्ये ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन ; तर त्यावर उपाययोजना करण्याची वन विभागाकडे मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दिवे तालुका पुरंदर येथील काळेवाडी व झेंडेवाडी दरम्यान गुरुवारी दिनांक 27 रोजी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरामध्ये तातडीने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे काळेवाडी झेंडेवाडी दरम्यानच्या ओढ्याजवळ तुषार काळे हे चार चाकीतून जात असताना, त्यांना बिबट्या अगदी जवळून दिसला ते वाहनात असल्याने, बचावले सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे आणि विजेच्या लपंडावा मुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालेला आहे, अशी निलेश झेंडे व गुलाब झेंडे यांनी सांगितले आहे .बिबट्या एका ठिकाणी स्थिर नसल्याने तो नेमका कोणतया दिशेला आहे याबाबत चिंता व्यक्त होत आहे, वन विभागाने या भागाची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना सुरक्षितेबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी राजेंद्र झेंडे व अविनाश झेंडे यांनी केलेली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथे मिनी टेम्पोची ट्रकला धडक ; तर तरुणाचा मृत्यू सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर मार्गावरील काळेवाडी तालुका पुरंदर येथील मध्यरात्री दोनच्या सुमारामध्ये छोटा टेम्पो ट्रॅक वर आदळून झालेल्या भीषण अपघातामध्ये मनोयार सराफत हुसेन (वय 28 राहणार बेलहटी पश्चिम बंगाल )या तरुणाचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काळेवाडी येथील हिमालय हॉटेल समोर भरधाव वेगातील छोटा टेम्पो क्रमांक एम एच 12 व्ही टी 6745 पुढे चाललेल्या ट्रकला क्रमांक एम एच 12 के पी 6899 पाठी मागून जोरात धडकला या धडकेत मनोयार हुसेनच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापता झाल्याने, त्याचा जागीच मृत्यू झाला .याप्रकरणी सासवड पोलिसांनी टेम्पो चालक आखे रुल मोतीलाल शेख (राहणार नांदूर जिल्हा बिरभुम पश्चिम बंगाल) विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे जानेवारीपासून या मार्गावरील अपघात, मृत्यूची ही दहावी घटना घडल्याचे या परिसरामध्ये अखेर चिंता व्यक्त सामान्य नागरिकांमध्ये केली जात आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील श्रीनाथ चौक या ठिकाणचे वरद मेडिकल मधून आठ हजार दोनशे पन्नास रुपये मेडिकल फोडून साहित्यासह व रोख रकमेसह चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील श्रीनाथ चौक सासवड येथील मेडिकल शॉप असून, 28 ऑगस्ट रोजी पहाटे 3:15 वाजता दरम्यान कॅडबरी, कॅटचा बॉक्स ,डेरी मिल्क, कॅडबरी फाइव स्टार ,कॅडबरी तर काही प्रमाणामध्ये रोख पेमेंट दुकानामधून चोरट्यांनी चोरून नेले आहे. यामध्ये प्रामुख्याने हरेश्वर मेडिकल कन्हैया चौक सासवड, प्रहर्ष मेडिकल कन्हैया चौक सासवड अशाही मेडिकल मधून चोरट्यांनी दुकानाची शटर उचकटून नुकसान करून वर्णनाच्या मालाचे रोख रकमेसहित अज्ञात चोरट्याने चोरून नेलेले आहे. तरी यासंदर्भात फिर्याद ज्ञानेश्वरी नंदकुमार कामथे वय 24 वर्ष व्यवसाय फार्मसी राहणार लांडगे आणि सासवड तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशनचे कोंबिंग ऑपरेशन ; तर सासवड पोलीस स्टेशन हद्दीमधील फरारी तसेच आरोपींचा शोध सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील 28 ऑगस्ट रोजी रात्री 11:00 वा ते 29 ऑगस्ट रोजी पहाटे पाच च्या दरम्यान सासवड शहरांमध्ये कोंबिंग ऑपरेशन तसेच फरारी आरोपींचा शोध घेण्यात आला असून, कोबिग ऑपरेशन श्रीनाथ मुख्य चौकात नाकाबंदी एकाच दिवशी गांजा विक्री करणारे, शस्त्र बाळगणारे तसेच शरीरविरुद्ध चे गुन्हे करणारे 30 पेक्षा जास्त गुन्हेगार चेक करण्यात आलेले आहेत, त्यापैकी आठ आरोपी राहत्या घरी मिळून आले आहेत, एन बी डब्ल्यू वॉरंट मधील दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत, तसेच नाकाबंदी दरम्यान दोन ट्रक अँड ड्राईव्ह एक एनडीपीएस कंजक्शन च्या केसेस करण्यात आल्या असून, 60 ते 70 लहान मोठी वाहने चेक ही करण्यात आली आहे. कोंबिंग ऑपरेशन संपूर्ण सासवड पोलीस स्टेशन हद्दीमधील करण्यात आले असून, कोंबिंग ऑपरेशन मध्ये कोडीत, सुपे, नारायणपूर, गुरोळी, भिवडी, खळद, वनपुरी ,परिंचे या गावांचा समावेश असून, कोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सासवड पोलीस स्टेशनच्या दोन वेगवेगळ्या टीम करण्यात आलेल्या आहेत ,त्यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचे सहा अधिकारी, 18 अंमलदार, एक आरसीपी टीम व चार पोलीस वाहनांच्या सहाय्याने कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले आहे, तरी सदरची कामगिरीही संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक, राजेंद्रसिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी, संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. राऊत, परमेश्वर गोडसे पोलीस उपनिरीक्षक, नारायण खंडागळे पोलीस उपनिरीक्षक तसेच सासवड पोलीस स्टेशनचे 18 अंमलदार व आरसीपी पथक यांनी ही कारवाई केली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील अवैध दारू विक्रीवर सासवड पोलिसांचा छापा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे हॉटेल महाकालच्या पाठीमागे बेकायदा विदेशी देशी दारूची विक्री करणाऱ्या एकावर सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चेतन राजेंद्र फडतरे राहणार बोपगाव असे या कारवाईत गुन्हा दाखल झालेल्या संशयाचा नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड कोंढवा रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली असताना, बुधवारी दिनांक 26 रोजी सायंकाळी साडेसातच्या सोमवारी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, यावेळी आरोपी चेतन फडतरे हा विनापरवाना दारू विक्री करताना आढळला पोलिसांनी तेच्याकडून 1,630 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याप्रकरणी पोलीस शिपाई किरण तुपे यांनी याबाबत फिर्याद दिलेली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोलवे याच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करित आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील भोंडे नगर, लाईट बोर्ड समोर जेजुरी नाका व एसटी स्टँड च्या बाजूला असणाऱ्या तीन मेडिकल दुकाने चोरट्यांनी फोडली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील जेजुरी नाका ते एसटी स्टँड परिसरामधील तीन मेडिकल दुकाने चोरट्याने फोडली असून, चोरट्याने रोख रकमेसह लॅपटॉप प्रिंटर व कॉस्मेटिक्स असा ऐवज लंबास केला असून, याशिवाय दुकानाची शटर व फर्निचरचे नुकसान केले आहे, ही घटना मंगळवारी दिनांक 25 रोजी रात्री नऊ ते बुधवार दिनांक 26 रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली आहे. याबाबत संतोष महादेव कामठे ,सागर शहाजी सस्ते , पवन जयकुमार सुतार यांची दुकाने फोडून चोरट्यांनी रोख पैसे, लॅपटॉप प्रिंटर आणि कॉस्मेटिक्स असा सुमारे 96 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे, तसेच शटर व फर्निचरचेही नुकसान केलेले आहे. याप्रकरणी संतोष महादेव कामठे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरटे दोन असल्याचेही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी गणेशोत्सव व दहीहंडीसाठी आढावा बैठक ; तर रात्री 11:55 नंतर कार्यक्रम थांबवण्याचा सासवड पोलिसांचा स्पष्ट इशारा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहर व पुरंदर तालुक्यातील उत्सवांना शिस्त सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्थेची चौकट देण्यासाठी सासवड पोलीस ठाणे व सासवड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने गणेश मंडळे, दहीहंडी आयोजक पोलीस पाटील, महिला दक्षता समिती व सामाजिक कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली असून, सासवड नगर परिषदेच्या सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत उत्सव मंडळांना विविध सूचना देण्यात आल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पोलिसांनी नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, मिरवणुकीमध्ये दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून, रात्री 11:55 नंतर कार्यक्रम थांबवला जाईल असा स्पष्ट इशारा सासवड पोलिसांनी दिला आहे. यावेळी निवासी नायब तहसीलदार संदीप पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, नगरसेवक राजन जगताप , प्रदिप राऊत भाजपचे सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप आदी उपस्थित होते. सासवड शहरांमध्ये यंदा 10 दहीहंडी उत्सव तर शहर व परिसरामध्ये 191 गणेशोत्सव मंडळे आहेत त्यापैकी सासवड शहरात 40 तर ग्रामीण भागात 133 मंडळांचा समावेश असून, 18आणि गावांमध्ये 'एक गाव एक गणपतीचा' परंपरा राबवली जात आहे. राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करावा, असे गौर यांनी सांगितले आहे. मागच्या काही काळामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान ,दोन मंडळांमध्ये वादावादी झाल्याच्या पार्श्वभूमी मध्ये यंदा पोलिसांनी विशेष खबरदारी घेतलेली आहे, मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे. मंडळाने धर्मादाय आयुकांकडे नोंदणी करणे आणि वाहतुकीला अडथळा न करणारे दहा बाय दहा फुटाचे मंडप उभारणे बंधनकारक आहेत तसेच 75 टक्के रस्ता वाहतुकीसाठी मोकळा ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून, चितावणी खोर पोस्ट किंवा व्हिडिओ आढळल्याने ते परस्पर डिलीट न करता तातडीने सासवड पोलिसांशी संपर्क साधावा सोशल मीडियावरील आक्षेपार्य मजकूर ध्वनी प्रदूषण आणि लेझर लाईटचा नियम बाहय वापर करणाऱ्या वर कारवाई केली जाईल असेही घोलवे यांनी सांगितले आहे. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळाच्या स्पीकरच्या आवाजाची तपासणी करण्यात येणार आहे, लेझर लाईटचा नियमबाह्य वापर करणाऱ्या वर दंडात्मक कारवाई केली जाईल, मिरवणुकी दरम्यान निर्माण होणारा कचरा टाळण्यासाठी प्रत्येक मंडळांनी स्वतंत्र स्वच्छता व्यवस्था करावी अशी ही आव्हान करण्यात आलेले आहे, कार्यकर्त्यांनी मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याची आणि विजेच्या तारांची उंची वाढवण्याची मागणी केलेली आहे, यावर मुख्याधिकारी चव्हाण यांनी खड्डे बुजवणे आणि संगमेश्वर वटेश्वर व सोपान काका मंदिराजवळ कृत्रिम हौद तयार करण्याचे आश्वासन दिलेले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींनी राज्यपालांना बांधली राखी लोकभवन, मुंबई येथे रक्षाबंधनाचा भावस्पर्शी सोहळा माईंच्या लेकींशी राज्यपालांचा आपुलकीचा संवाद सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रक्ताच्या नात्यापलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याला घट्ट विणणारा रक्षाबंधनाचा पवित्र सण मुंबई येथील लोकभवनात अत्यंत भावनिक आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण, ता. पुरंदर, जि. पुणे येथील माईंच्या लेकींनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा अनोखा स्नेहबंध जपला.अनाथ मुली, दिव्यांग भगिनी, महिला स्वच्छता कर्मचारी तसेच समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला भगिनींनी लोकभवन, मुंबई येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधली. या वेळी राज्यपालांनी सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. “रक्षाबंधन हा समाजातील सर्व घटकांना प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाच्या धाग्याने एकत्र आणणारा पवित्र सण आहे. समाजाच्या विविध स्तरांवर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला व मुलींसोबत यंदाचे रक्षाबंधन साजरे करण्याचा मला विशेष आनंद झाला,” अशी भावना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केली. ममता बाल सदनच्या मुलींशी संवाद साधताना राज्यपालांनी केवळ औपचारिकता न राखता अत्यंत आपुलकीने प्रत्येक मुलीचे पूर्ण नाव, ती कोणत्या वर्गात किंवा अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे, तिची आवड आणि भविष्यातील ध्येय याबाबत विचारपूस केली. राज्यपालांनी दाखविलेल्या या आपुलकीमुळे माईंच्या लेकींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. “तुम्ही सर्व मुली मन लावून, गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्या आणि भविष्यात मोठ्या पदावर जाऊन देशाची व समाजाची सेवा करा,” असा प्रेमळ सल्ला देत राज्यपालांनी सर्व मुलींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी माईंच्या लेकींनी लोकभवनातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी तसेच संपूर्ण कर्मचारीवृंदालाही राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. त्यामुळे लोकभवनातील वातावरण काही काळासाठी एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे स्नेह, माया आणि आपुलकीने भारावून गेले. माईंच्या लेकींनी तयार केलेला विदर्भाचा प्रसिद्ध गोरसपाक संस्थेचे अध्यक्ष दिपक दादांनी त्यांना भेट दिला.या प्रसंगी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, खाजगी सचिव अर्चना गायकवाड, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर, एडीसी नवदीप अग्रवाल, माईंच्या लेकी कु. मीनल सिंधुताई सपकाळ, कु. साक्षी सिंधुताई सपकाळ, कु. आकांक्षा भगत, कु. पावनी सिंधुताई सपकाळ, कु. श्रावणी कामठे, तसेच पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदन (बालगृह) संस्थेचे अध्यक्ष दिपक गायकवाड, अधीक्षिका स्मिता अरविंद पानसरे, माई बेकर्सच्या सौ. सुजाता गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी, गोपाल देशी गोशाळेचे व्यवस्थापक प्रसन्न गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.---चौकट राज्यपालांना भावले माईंच्या लेकीचे स्केच! ममता बाल सदन (बालगृह) येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा भगत हिने आपल्या कलागुणांना साकारत राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे सुंदर स्केच तयार केले होते. रक्षाबंधनानिमित्त हे स्केच फोटोफ्रेम करून तिने राज्यपालांना प्रेमपूर्वक भेट दिले. आपले स्केच पाहून राज्यपालांनी आकांक्षाचे मनापासून कौतुक केले. “बेटा, आपने बहुत सुंदर स्केच बनाया है. आपका बहुत-बहुत धन्यवाद. एक दिन आप बहुत बड़े आर्टिस्ट बनोगे,” अशा प्रेमळ शब्दांत त्यांनी आकांक्षाच्या कलागुणांना दाद देत तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी केलेले हे कौतुक आकांक्षासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरले आहे. “मी मनापासून तयार केलेले स्केच राज्यपालांना आवडले आणि त्यांनी माझ्या कलेचे कौतुक केले, ही माझ्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी बाब आहे,” अशी भावना आकांक्षाने व्यक्त केली. सध्या कु. आकांक्षा भगत ही पुणे येथील अभिनव आर्ट कॉलेजमध्ये कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेत असून, भविष्यात एक मोठी आणि नामांकित कलाकार होण्याचे तिचे स्वप्न आहे. राज्यपालांच्या शुभेच्छांमुळे तिच्या या स्वप्नाला जणू नव्या उंच भरारीची प्रेरणाच मिळाली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमधील सात मेडिकल दुकानातून चोरी ; तर औषध विक्रेत्यामध्ये भीती चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मेडिकल असोसिएशनची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमधील विविध अशा मेडिकल मधून वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याच्या कारणामुळे औषध विक्रीत्यामध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शहरातील सात मेडिकल दुकानांमधून चोरी झाल्याचा दावा सासवड मेडिकल असोसिएशनने केला असून, या घटनेचे गांभीर्याने दखल घेऊन चोरट्याचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. शहरातील प्रहर्ष ,श्री सेवा, श्री, श्रीया, लक्ष्मी, सागर, डॉक्टर धायगुडे या मेडिकल मधून आणि स्वामी सुपर मार्केट मध्यरात्रीतून ते सव्वा तीन च्या सुमारास चोऱ्या झाल्या असून, चोरट्यांनी रोख रक्कम आणि सौंदर्यप्रसाधने चोरली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे, या घटनेच्या निषेधार्थ पुरंदर मेडिकल असोसिएशनने पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसा मध्ये चोरट्यांचा छडा न लागल्यास मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा इशारा असोसिएशनने बाळासाहेब भिंताडे यांनी दिलेला आहे. दरम्यान पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले असून, व्यावसायिकांनाही सुरक्षा उपाययोजना कराव्यात असे आव्हान घोळवे यांनी केले आहे. यावेळी ललिता जगताप, संतोष ढमाळ, जितेंद्र गांधी ,मनोहर क्षीरसागर, अरुण खेनट, सोमनाथ मायदेव, दिनेश पवार, संतोष कुंभार, हनुमंत निंबाळकर आदी उपस्थित होते. या चोरीच्या संदर्भात रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर.तालुक्यामध्ये भिवडी येथे सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती सोहळा ; त्यासाठी प्रशासकीय बैठक पुरंदर तालुक्यातील प्रशासकीय इमारती मते संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी तालुका पुरंदर येथील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्म गावी भिवडी येथे सात सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत जयंती सोहळ्याच्या नियोजनाबाबत विविध विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली. बैठकीमधील प्रमुख विषय प्रामुख्याने स्मारकाला रंग रंगोटी करणे, स्मारक परिसराची स्वच्छता व साफसफाई करणे, भाविक व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पार्किंगची व्यवस्था करणे विद्युत व लाईट व्यवस्था करणे, स्मारकाची आकर्षक सजावट करणे, नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक अशा उपायोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी प्रामुख्याने वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत धिकारी ,विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन, रुपेश भगत गोपनीय अधिकारी ,अविनाश थोरात सहाय्यक गट विकास अधिकारी पुरंदर ,अमित झेंडे पुरंदर पंचायत समिती सभापती, चंद्रकांत भाऊ खोमणे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज, हरिभाऊ लोळे वीर भिवडी जिल्हा परिषद सदस्य, रूपाली झेंडे दिवे गराडे जिल्हा परिषद सदस्य, माणिक निंबाळकर बेलसर पंचायत समिती गटाचे सदस्य, प्राजक्ता दुर्गाडे जिल्हा परिषद सदस्य नीरा कोळविहीरे ,सायली मनोज शिंदे भिवडी गटाच्या पंचायत समिती सदस्य, माऊली यादव माळशिरस गटाचे पंचायत समिती सदस्य, मोनिका कांबळे पंचायत समिती सदस्या ,स्मिता निगडे पंचायत समिती सदस्या, सुतार भाऊसो ग्रामसेवक, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गंगाराम जाधव सर ,गणपत अण्णा शितकल, बिट्टू तात्या भांडवलकर, लालासो भांडवलकर, अशोक (काका) चव्हाण, सिताराम चव्हाण, विकास शेठ( बल्ली) भांडवलकर, ओमकार चव्हाण, लखन चव्हाण, योगेश गोफणे, किसन महाराज चव्हाण, सुनील गोफणे, भाऊसो चव्हाण, स्वप्निल चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि समाज बांधव हा मोठ्या संख्येने उपस्थित होते, पत्रकार खंडू जाधव, पत्रकार बापू मुळीक आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,611दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.26 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,611 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,611 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 4,000 तर सरासरी 4,305 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 6,500 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,00 बॉक्स 60 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 6,500 कमाल दर 6,300रुपये तर साधारण6,400रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 4,000,4,611,4,305. बाजरी 2,700,3,300,3,000. गहू 2,800,3,300,3,050. तांदूळ ----4,700,5,500,5,100.हरभरा 5,200, 5,700,5,450.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड नगरपालिका कामगार को.ऑप. के. सोसायटीच्या चेअरमनपदी प्रमोद भोंडे व व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र बोरावके यांची निवड सासवड प्रतिनिधी: बाप्पू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड नगरपालिकेच्या कामगार को.ऑप.के. सोसायटीच्या निवडणूक 24 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारामध्ये सहाय्यक निबंधक श्रीमती यशवंति मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. चेअरमन पदासाठी प्रमोद भोंडे व न्यानेश्वर जगताप असे दोन अर्ज दाखल झाले होते. निवडणूक प्रक्रियांच्या माघारीच्या वेळेमध्ये कोणीही माघार न घेतल्याने चेअरमन पदासाठी प्रमोद भोंडे व ज्ञानेश्वर जगताप यांचे अर्ज वैद राहिल्याने दोघांमध्ये सरळ लढत झाली. मतदान प्रक्रिया ही चिट्ट्याद्वारे करण्यात आली त्यामध्ये प्रमोद भोंडे यांना 13 मते व ज्ञानेश्वर जगताप यांना एक मत मिळाले त्यामुळे सहाय्यक निबंधक तथा अध्यासी सासवड नगरपालिका कामगार को ऑफ क्रे सोसायटीच्या चेअरमन पदी प्रमोद भोंडे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर सासवड नगरपालिका कामगार को.ऑप.के. सोसायटीच्या व्हाई चेअरमन पदासाठी राजेंद्र बोरावके यांची सर्वानुमते नाव सुचविण्यात आले त्यामुळे सहाय्यक निबंधक तथा अध्यायशी श्रीमती यशवंती मेश्राम यांनी सासवड नगरपालिका कामगार को.ऑप. क्रे. सोसायटीच्या व्हाई चेअरमनपदी राजेंद्र बोरावके यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. कामगार सोसायटीचा कारभार हा पारदर्शक व सर्व संचालकांच्या सहकाऱ्यांने चालवण्यात येईल, कामगार सोसायटीच्या सभासदासाठी आवश्यक ती सर्व मदत व अडचणी प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचित चेअरमन प्रमोद भोंडे, व्हाईसचेअरमन राजेंद्र बोरावके यांनी आपले मत व्यक्त केले. पुरंदर सासवड माजी आमदार सासवड जगताप ,सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदुकाका जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी सासवड नगरपालिका कामगार सोसायटीचे संचालक सोपान जगताप, मोहन चव्हाण, विकास राठोड, काळूराम भोंडे, राजेंद्र निरगुडे, सुमित साबळे, जितेंद्र रणपिसे, धनराज जाधव, सविता जगताप, संगीता जाधव, आशा रणपिसे व सासवड नगरपालिका कामगार सोसायटीचे सचिव तुकाराम जगताप व निलेश भोंडे आदी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
वाघिरे महाविद्यालयात पीएच.डी. कोर्सवर्कचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथील रसायनशास्त्र विभाग व संशोधन केंद्राच्या वतीने पीएच.डी. कोर्सवर्क-२०२६ या अभ्यासक्रमाचा समारोप समारंभ सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला. ८ जून २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या कोर्सवर्कमध्ये ३८ संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन पद्धती, प्रगत विश्लेषणात्मक तंत्रे, संशोधन नैतिकता, साहित्य समीक्षा, वैज्ञानिक लेखन, संशोधनातील आधुनिक साधने आणि विविध अत्याधुनिक विश्लेषणात्मक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बी. एल. शिंदे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पीएच.डी. कोर्सवर्कच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या मूलभूत संकल्पनांपासून अत्याधुनिक संशोधन पद्धतींपर्यंत विविध विषयांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. रावसाहेब लटपटे, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाच्या पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधनामध्ये नावीन्य, सातत्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अचूकता, संशोधन नैतिकता आणि गुणवत्तेला* विशेष महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. संशोधकांनी केवळ पदवी मिळविण्याच्या उद्देशाने नव्हे, तर समाज आणि राष्ट्राच्या विकासाला हातभार लावणारे गुणवत्तापूर्ण व उपयुक्त संशोधन करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील अद्ययावत घडामोडींचा सतत अभ्यास करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयामध्ये संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी रसायनशास्त्र विभाग व संशोधन केंद्र सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कोर्सवर्कदरम्यान प्राप्त केलेले ज्ञान आपल्या संशोधनामध्ये प्रभावीपणे वापरून दर्जेदार संशोधन प्रकाशित करावे आणि महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले. ८ जून ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या कोर्सवर्कमध्ये विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने, मार्गदर्शनपर सत्रे, संशोधनविषयक चर्चा, सादरीकरणे आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले. संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, डॉ. एस. एच. झगडे यांचे मार्गदर्शनाखाली सदर कोर्सवर्क यशस्वीपणे राबविला गेला. सदर समारोप कार्यक्रमासाठी डॉ. एस. एच. झगडे, डॉ. एन.एस. गिरी, डॉ. एन. आर. कांबळे, प्राध्यापक व विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप राठोड यांनी, प्रा. जी. एम. अहिवळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार प्रदर्शन डॉ. शितल कल्हापूरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सेवकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- Get link
- X
- Other Apps
'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानास सासवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संवादातून युवकांना व्यसनमुक्त भारताचा संदेश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मेरा युवा भारत (MY Bharat), युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने 'नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत' अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी संवाद कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता गुरुकुल अकॅडमी, सासवड, पुणे येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थी, युवक-युवती, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यसनमुक्त भारत घडविण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आभासी माध्यमातून ऐकले. पंतप्रधानांनी युवकांनी व्यसनापासून दूर राहून निरोगी, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन केले. यावेळी केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्री डॉ. मानसुख मांडविया यांच्या प्रेरणादायी संदेशाचेही प्रसारण करण्यात आले. त्यांनी युवकांना समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्याचे आणि प्रत्येक गाव, शहर व शैक्षणिक संस्थेत व्यसनमुक्त भारताचा संदेश पोहोचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी, युवक आणि मान्यवरांनी 'नशा मुक्त भारत' प्रतिज्ञा घेऊन व्यसनमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अँड .अक्षयदादा मारणे, अध्यक्ष, सासवड शहर मराठा महासंघ, श्री श्रीकांत बबन जगताप, अध्यक्ष, सरस्वती ज्ञान संस्था, सासवड, तसेच स्वप्नील शिंदे, मेरा युवा भारत पुणे व शिवाजी नॉलेज सिटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज साबळे यांनी सूत्रसंचालन केले तसेच उपस्थित मान्यवरांनी युवकांना व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी आयोजन शिवाजी नॉलेज सिटी संस्थेने केले. आणि आभार अनिता शिंदे, समन्वयक, गुरुकुल अकॅडमी, सासवड यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन मेरा युवा भारत (MY Bharat), पुणे यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासह विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
- Get link
- X
- Other Apps
शहरी व ग्रामीण भागातील १५ वर्षापुढील निरक्षर विद्यार्थी व नागरिकांना शिक्षणाची संधी- कृष्णकुमार पाटील महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारचा उपक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री भुलेश्वर मंदिर परिसरात NILP नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत साक्षरता जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी कृष्णकुमार पाटील.संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, शशिकांत म्हेत्रे. सहसंचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, सतीश चौधरी. सहाय्यक संचालक, शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, रोहित यादव, प्रोग्राम कॉर्डिनेटर शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. या प्रसंगी भुलेश्वर विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळशिरस, सन ब्राईट इंग्रजी मिडीयम शाळा या शाळांच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढून, पथनाट्य आणि साक्षरता गीते सादर केली.तसेच असाक्षर नोंदणी केली. या प्रसंगी कृष्णकुमार पाटील यांनी सर्वांना साक्षरतेची शपथ दिली आणि योजना विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा, NMMS, इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा, इतर शिष्यवृत्ती अशा विद्यार्थी लाभाच्या योजनांची तसेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमप्रसंगी पुरंदर तालुका पंचायत समितीचे सदस्य तथा माळशिरस गावचे माजी सरपंच माऊली यादव, पुरंदर तालुक्याचे गटविकास अधिकारी अविनाश थोरात, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे,केंद्रप्रमुख उमेश नेवसे, भुलेश्वर मंदिर ट्रस्टचे संचालक मंडळ तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- Get link
- X
- Other Apps
सासवड परिसरातील टी.बी. च्या रुग्णांना खाण्यायोग्य वस्तूंचे वाटप सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ग्रामीण रुग्णालय सासवड येथे २४ ऑगस्ट २०२६ रोजी जनसेवा संकल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाचे आयोजक जनसेवा संकल्प फाउंडेशन सदस्य राहुल खेडेकर यांच्या मार्फत सामाजिक बांधिलकी जपत सासवड परिसरातील टी.बी. च्या रुग्णांना मोफत दैनंदिन जीवना मध्ये खाण्यास वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड डॉ.गजानन अकमार ,जनसेवा संकल्प फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सरोज मॅडम,डॉ.पाटील सर,डॉ.सूर्यवंशी मॅडम,अकबर, फिरोज, इभाड, विजय सोनवणे,विजयकुमार शिंदे, घोडेकर,भोसले,तांबोळी,शेख मॅडम, सुवर्णा जाधव मॅडम, श्रीम.कदम,श्रीम.राऊत, पराग जाधव, संदीप एरंडकर,दीपक गोंधळी, गुंजे ,दिनेश इनामकेआणि ग्रामीण रुग्णालय सासवड मधील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. अशा संस्थानी पुढे येऊन सामाजिक कार्यात सक्रीय राहून अशी सामाजिक कामे करत राहायला हवे असे वैद्यकीय अधीक्षक यांनी सर्व स्थानिक संस्थांना आव्हान केले.
- Get link
- X
- Other Apps
श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे काळूबाई मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा उत्साहात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : वीर, ता. पुरंदर येथील पश्चिम महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे काळूबाई मंदिराचा कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होत आहे. सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली असून, संपूर्ण वीर नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली आहे.सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी दुपारी ३ वाजता काळूबाई मंदिराच्या कलशाची भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. गावाच्या कमानीपासून सुरू झालेली ही मिरवणूक माळवाडी नगारखाना, मंदिरासमोरून गावातील प्रमुख मार्गाने पुढे जात पूर्णगंगा नदीच्या मार्गाने मंदिराच्या दक्षिण दरवाजातून मंदिर परिसरात दाखल झाली. यावेळी कलशाचे विधिवत धान्याधिवास करण्यात आले.पारंपरिक ढोल-ताशे, संबळ व सनईच्या गजरात निघालेल्या या भव्य मिरवणुकीत मानकरी, सालकरी, दागिनदार, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाजत-गाजत निघालेल्या या मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.आज सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसरात होम-हवन, यज्ञ, कलशपूजन व कलशारोहणाच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई तसेच भव्य मंडप उभारण्यात आला होता. तसेच यासाठी मान्ध्र्देव संस्थानचे मुख्य पुजारी सोमनाथ गुरव या सोहळ्याला उपस्थित होते. कलशपूजनाचा मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, इंदूर या ऐतिहासिक घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांच्या हस्ते, तसेच मानकरी, सालकरी, दागिनदार, भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. धार्मिक विधींमध्ये देवस्थानचे विश्वस्त, सल्लागार मंडळ, वाघ परिवार,सर्व पालखीचे सहकारी तसेच प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.या सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन समस्त वाघ परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. वाघ परिवाराने याकामी मोलाचे योगदान केल्याचे देवस्थानचे चेअरमन मोहनराव धुमाळ यांनी सांगितले. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोहनराव रावसाहेब धुमाळ, सहकारी विश्वस्त सुनील धुमाळ, विराज धुमाळ, काशिनाथ धुमाळ, बाळासाहेब समगीर, अमोल धो. धुमाळ, प्रसाद धुमाळ, अमोल आ. धुमाळ, प्रमिला देशमुख, जयवंत सोनावणे, तसेच सल्लागार मंडळाचे रामभाऊ धुमाळ, तानाजी धुमाळ, बाळासाहेब धुमाळ यांच्यासह मानकरी, सालकरी, दागिनदार, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.काळूबाई मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर पार पडलेल्या या कलशारोहण सोहळ्यामुळे वीर गावाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, ‘श्रीनाथ म्हस्कोबा महाराज की जय’ आणि ‘काळूबाई माता की जय’ अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडत असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता किसाबाई बोरकर सासवड प्रतिनिधी: नारायणपूर ( ता. पुरंदर) येथील किसाबाई अनंतराव बोरकर ( वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर सुनील बोरकर व प्रगतशील शेतकरी राजेंद्र बोरकर यांच्या त्या मातोश्री होत.
- Get link
- X
- Other Apps
म. ए. सो. वाघिरे विद्यालय: १९८८ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न! स्थळ खेळ गट, लाजाळू वर्ग, म. ए. सो. वाघिरे विद्यालय परिसर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : म. ए. सो. वाघिरे विद्यालयाच्या १९८८ च्या माजी विद्यार्थी वर्गाकडून दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यालयाच्या खेळ गटातील 'लाजाळू वर्ग' येथे २०२६ च्या इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी एका विशेष गुणगौरव सोहळा व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार सोहळ्यात १९८८ बॅचचे तब्बल ५० माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी झाले होते. प्रमुख मान्यवरांची उपस्थितीया सोहळ्याची शान विद्यालयातील आदर्श मार्गदर्शक आणि शिक्षकांच्या उपस्थितीने वाढवली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी भूषवले. तसेच, उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे बालविकासचे मुख्याध्यापक भाऊसो बडधे आणि बालवाडीच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व माजी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. विशेष सहभाग व समन्वयया संपूर्ण कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे, १९८८ च्या याच माजी विद्यार्थी सुषमा न्हालवे या सध्या याच विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांनी या मेळाव्यासाठी बॅचच्या समन्वयक (Coordinator) म्हणून अत्यंत यशस्वीरीत्या आपली जबाबदारी पार पाडली. आपल्याच शाळेत शिक्षिकेच्या रूपात परतलेल्या सहकारी मैत्रिणीचा हा प्रवास उपस्थितांसाठी अभिमानास्पद ठरला. भारदस्त व प्रेरणादायी सूत्रसंचालनकार्यक्रमाचे अत्यंत ओघवते, भारदस्त आणि उपस्थितांमध्ये नवा जोश भरणारे सूत्रसंचालन दिपाली राऊत-भुजबळ (DySP, नाशिक जिल्हा) यांनी केले. त्यांच्या प्रभावी निवेदनाने संपूर्ण कार्यक्रमात एक चैतन्यमय वातावरण निर्माण केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व पर्यावरण संवर्धनाचा संदेश २०२६ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांचा ट्रॉफी, रोख रक्कम आणि एक रोप देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच निसर्गाची जोपासना करण्याचा आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी रोपे भेट देण्याचा हा स्तुत्य उपक्रम विशेष उल्लेखनीय ठरला.> "जुनी शाळा, आदरणीय गुरुजन, बालपणीच्या आठवणी आणि मित्रांची झालेली पुनर्भेट," या सुखद अनुभवांनी भारलेला हा सोहळा सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या कायम स्मरणात राहणारा ठरणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड: सन १९८१ एस.एस.सी. बॅचचा ४५ वर्षांनंतरचा ऐतिहासिक 'स्नेहमेळावा' संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील म.ए.सो. वाघिरे विद्यालयाच्या सन १९८१ च्या एस.एस.सी. बॅचचा अत्यंत भावूक, उत्साही आणि स्मरणीय असा ४५ वर्षांनंतरचा 'स्नेहमेळावा' रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. ४५ वर्षांनंतर जुन्या शाळेत एकत्र जमून बालपणीच्या आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्याचा हा सोहळा उपस्थितांसाठी अत्यंत आनंददायी ठरला.या स्नेहमेळाव्यासाठी सदर बॅचमधील एकूण १८१ पैकी जवळपास ९१ माजी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. विशेष म्हणजे, या बॅचचे अनेक विद्यार्थी आज उच्चपदस्थ अधिकारी, व्यावसायिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित पदांवर कार्यरत असूनही आपल्या शाळेबद्दलच्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी झाले होते.मान्यवरांची व शिक्षकांची विशेष उपस्थितीकार्यक्रमाची सुरुवात अतिशय पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने झाली; अगदी वेळेप्रमाणे शाळा भरल्याचा भास यावेळी निर्माण झाला. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे , उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे , बालविकास प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसो बडधे , तसेच या बॅचचे समन्वयक (कॉर्डिनेटर) शिक्षक ऋपाद तुंगार सर उपस्थित होते. तसेच प्रशालेचे माजी मुख्याध्यापक मासाळ सर, आणि माजी शिक्षक देशपांडे सर, बोराडे सर व झेंडे सर यांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व विद्यार्थ्यांना आपले मोलाचे मार्गदर्शन लाभले. व ज्येष्ठ शिक्षक विभाड सर यांचे देखील या कार्यक्रमासाठी बहुमोल मार्गदर्शन लाभले.मनोगते व कृतज्ञता सोहळाकार्यक्रमाचे अत्यंत आकर्षक सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संजय पवार यांनी केले. विद्यार्थी मनोगता मध्ये पुणे येथे स्थायिक असलेले प्रसिद्ध पत्रकार व सिने दिग्दर्शक श्रीकृष्ण देशपांडे आणि सासवडच्या माजी नगरसेविका पुष्पाताई नंदकुमार जगताप यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. म.ए.सो. वाघीरे विद्यालयाने दिलेले संस्कार व शिक्षण त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण ठरले आणि त्यांचे आयुष्य कसे समृद्ध करून गेले, याचे भावूक मनोगत त्यांनी व्यक्त केले.यावेळी भाऊसो बडधे , राजेंद्र कांबळे आणि शंतनु सुरवसे यांनी शाळे पुढील विविध आव्हाने, त्यांना तोंड देत सुरू असलेली वाटचाल, तसेच माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य आणि शाळेच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल सविस्तर विचार मांडले. ४५ वर्षानंतरही माजी विद्यार्थ्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे आणि एकजुटीने हा मेळावा आयोजित केला, त्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले.कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये:उपस्थिती: सन १९८१ एस.एस.सी. बॅचचे जवळपास ९१ माजी विद्यार्थी उपस्थित.मान्यवर सहभाग: विविध क्षेत्रातील अधिकारी, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.आठवणींना उजाळा: सर्व माजी शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांकडून जुन्या गोष्टी, प्रसंग आणि शालेय जीवनातील घटनांना उजाळा.संस्थेचे कौतुक: संस्थेच्या व प्रशालेच्या विविध उपक्रमांची विद्यार्थ्यांनी मुक्तकंठानं प्रशंसा केली.स्नेहभोजन: अत्यंत दिमाखदार स्नेहभोजनाचा कार्यक्रम, ज्यामध्ये सर्वांनी मनमोकळा संवाद साधला.आयोजन आणि सहकार्यहा मेळावा यशस्वी व्हावा यासाठी माजी विद्यार्थी बंडुकाका जगताप,संजय पवार, संतोष आबा काकडे, मोहन टिळेकर, विठ्ठलराव कोंडे, सुनील काकडे तसेच बॅचचे कॉर्डिनेटर ऋपाद तुंगार आणि इतर सहकाऱ्यांनी अत्यंत परिश्रमाने नियोजन केले होते. उपस्थित सर्वांनी या आयोजकांच्या आणि मार्गदर्शकां च्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.कार्यक्रमानंतर आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या दिमाखदार कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत छान चर्चा व संवाद साधला. हा आनंदाचा आणि आठवणींचा क्षण प्रत्येकाच्या कायम स्मरणात राहणारा ठरला असून, "ही शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा" या उक्तीचा प्रत्यय आणून देणारा हा सोहळा अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. अहवाल संकलन तुंगार सर (सहा शिक्षक) म.ए.सो. वाघिरे विद्यालय, सासवड (१९८१ एस.एस.सी. बॅच स्नेहमेळावा)
- Get link
- X
- Other Apps
संत सोपान काका सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहा मध्ये तर नऊ टक्के लाभांश जाहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत सोपान काका सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली असून, सभेचे अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडीया होते. यावेळी बँकेचे संस्थापक अध्यक्ष संजय चंदूकाका जगताप, नगराध्यक्ष श्रीमती आनंदी (काकी) चंदूकाका जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मधुकर साबणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत बँकेच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला असून, बँकेचे भाग भांडवल 30.76 कोटी झाले असून, सभासद संख्या 22, 998 इतकी झाली आहे. ठेवी 831.64 कोटी झाल्या असून, सहा टक्के वाढ झाली आहे. कर्ज व्यवहार 457.33 कोटी वरून 476.77 कोटीवर गेला आहे. बँकेने 9 टक्के लाभांश जाहीर केला असून, बँकेला अ दर्जा मिळाला आहे. सध्या 20 शाखा असून, आणखी तीन शाखांना मंजुरी मिळाली आहे. या सभेत संचालक मंडळातील धनंजय मानसिंगराव काकडे, शरद चंद्र सदाशिव जगताप, मनोहर रामभाऊ पवार6£", प्रकाश नारायण जगदाळे, दिलीप चंद्रकांत बडधे, पल्लवी शैलेंद्र बाजारे, युवराज दत्तात्रेय वारघडे, धनसिंग रामचंद्र भापकर तज्ञ संचालक, शिवाजीराव नीलकंठराव ढमढेरे उपाध्यक्ष, हेमंत जयवंतराव भोंगळे, राजेंद्र रामदास बडधे, सविता राजेंद्र ताकवले, राजवर्धिनी संजय जगताप, संजय दामोदर आंबेकर, शेखर गिरिधर निकुडे, विजय संपतराव थेऊरकर, मार्तंड लक्ष्मण भोंडे तज्ञ संचालक उपस्थित होते. व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रकाश रामभाऊ पवार, राजवर्धिनी संजय जगताप, प्रकाश नारायण जगदाळे, युवराज दत्तात्रय वारघडे, मार्तंड लक्ष्मण भोंडे, सदस्य अरविंद दयाराम नाईक, पृथ्वीराज अनिलराव पाटील, रवींद्र साधू जोशी तज्ञ संचालक रोहित अमृतलाल शहा ग्रुप जनरल मॅनेजर्स चंद्रशेखर जनार्दन जगताप ग्रुप गणेश धोंडीबा मोहोळ ग्रुप बी पुरंदर नागरी चे सर्व व्यवस्थापक अनिल उरवणे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष संजय चंदूकाका जगताप म्हणाले की संत सोपान काका बँक ही पुरंदरच्या मातीतून उभी राहिलेली आमच्या शेतकऱ्यांची बँक आहे .आज या बँकेने 800 कोटीचा टप्पा ओलांडला ही अभिमानाची बाब आहे. माझी अपेक्षा आहे की बँकेच्या सर्व शाखा स्वतःच्या जागेत असाव्यात आणि मुख्य कार्यालय सासवड मध्येच राहावे लोकांच्या हातात पैसा येतोय त्याचा योग्य वापर कसा करावा यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, असे माजी आमदार व संत सोपान काका सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या दिवे तालुका पुरंदर येथील स्मारकाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. ग्रामविकास विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, यामुळे स्मारकाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार पुणे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, स्मारकासाठी जागा निवडणे, आराखडा तयार करणे, अंदाजपत्रक तयार करणे आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे. समितीत पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व विभाग आणि नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यासह सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश आहे. यामध्ये दौलत शितोळे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज चंद्रकांत खोमणे, अंकुशराव जाधव, गणपत शितकल, आणि सुधीर नाईक यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा नियोजन अधिकारी हे समितीचे सचिव म्हणून काम पाहतील, रामोशी बेडर समाजाच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देत सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानण्यात आले आहेत. हे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास राज्याचे उपसचिव प्रशांत पाटील यांच्या कार्यालयाने व्यक्त केला आहे.
- Get link
- X
- Other Apps
सासवड हद्दवाढीत नागरी सुविधांचा बोजवारा: संतप्त महिलांचा नगरपरिषदेत ठिय्या सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहराच्या हद्दवाढ भागात गेल्या आठवडाभरापासून कचरा संकलन ठप्प झाल्याने, तसेच अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्यांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी थेट सासवड नगरपरिषदेत धडक मारत ठिय्या आंदोलन केले. रस्ते, ड्रेनेज आणि कचऱ्याच्या समस्येवरून प्रशासनाच्या गलथान कारभाराचा यावेळी तीव्र निषेध नोंदवण्यात आला.हद्दवाढ भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सद्यस्थितीत खालील समस्यांमुळे नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत: • कचऱ्याचे ढीग: गेल्या ७-८ दिवसांपासून या भागात घंटागाडी फिरकली नसल्याने, सर्वत्र कचरा साचला असून, परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. • २० वर्षांचे खड्डेमय रस्ते: गेली दोन दशके या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून, अद्याप रस्ते दुरुस्तीचे काम झालेले नाही. • ड्रेनेजची दुर्दशा: भूमिगत गटार योजनेचा अभाव असल्याने पावसाळ्यात आणि एरवीही रस्त्यांवर सांडपाणी आणि चिखल साचत आहे, ज्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संयमाचा बांध फुटलेल्या महिलांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत खालील मागण्या मांडल्या:• दररोज नियमितपणे घंटागाडी सुरू करून साचलेल्या कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावावी.• गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा.• आरोग्याचा धोका टाळण्यासाठी परिसरात योग्य ड्रेनेज व्यवस्था त्वरित उभी करावी.• नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही न केल्यास, यापुढे अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा संतप्त महिलांनी दिला आहे.या आंदोलनात नगरसेविका हेमलता इनामके, नगरसेविका दिपाली जगताप, सुरेखा जगताप, जयश्री जगताप, संगीता भिंताडे, भाग्यश्री जगताप, दीपाली खेनट, सविता फडतरे, सुनिता महामुनी, योगिता काकडे, सुनिता यादव, अपेक्षा जगताप, अर्चना जगताप, अंकिता जगताप यांच्यासह बोरकर आजी, भुजबळ मावशी व इतर महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.महिलांचा वाढता रोष पाहता, नगरपरिषदेचे कर्मचारी ओंकार शिंदे आणि नगरसेवक राजन जगताप यांनी प्रशासनाच्या वतीने पुढील सात दिवसांत ही कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्याने कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, वाळुंज, बेलसरच्या नागरिकांची गैरसोय दूरदैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा; बससेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खानवडी : कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, वाळुंज आणि बेलसर परिसरातील नागरिकांसाठी पीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्याने गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेली सार्वजनिक वाहतुकीची गैरसोय आता मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार, शेतकरी तसेच दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या परिसरातील नागरिकांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शेतीविषयक कामे, बाजारपेठ, दवाखाने, बँका तसेच विविध शासकीय व खासगी कार्यालयीन कामांसाठी नियमितपणे शहराकडे ये-जा करावी लागते. मात्र यापूर्वी पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्याने नागरिकांना खासगी वाहने किंवा उपलब्ध असलेल्या इतर प्रवासाच्या साधनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढण्याबरोबरच वेळेचीही मोठी गैरसोय होत होती.विशेषतः शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बससेवेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांना दुचाकी, खासगी वाहन किंवा इतर वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. पीएमपीएमएलची बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना सुरक्षित, नियमित आणि तुलनेने कमी खर्चात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठीही ही बससेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बाजारपेठ, दवाखाना, बँक, शासकीय कार्यालये तसेच इतर आवश्यक कामांसाठी शहरात जाणाऱ्या नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.बससेवेमुळे कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, वाळुंज आणि बेलसर या गावांचा शहराशी संपर्क अधिक सुलभ होणार असून, या भागातील आर्थिक व सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनाही बाजारपेठेत जाण्यासाठी तसेच शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी या वाहतूक सुविधेचा फायदा होणार आहे.दरम्यान, पीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्याचे नागरिकांनी स्वागत केले असून, ही सेवा केवळ काही दिवस किंवा प्रायोगिक स्वरूपात न ठेवता नियमित आणि कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन भविष्यात बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, योग्य वेळापत्रक निश्चित करावे तसेच सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.तसेच या मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढल्यास पीएमपीएमएल प्रशासनाने त्याचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आणखी बस उपलब्ध करून द्याव्यात. ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अनेक वर्षांची गैरसोय दूर होण्यास सुरुवातपीएमपीएमएल बससेवा सुरू झाल्याने कुंभारवळण, एखतपूर, खानवडी, वाळुंज आणि बेलसर परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची सार्वजनिक वाहतुकीची गैरसोय दूर होण्यास सुरुवात झाली आहे. आता ही सेवा नियमित, वेळेवर आणि कायमस्वरूपी उपलब्ध राहावी, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्याचा एकच उत्पादित ब्रँड डेव्हलप केल्यास मार्केटिंग करणे सोपे होईल : रूपाली झेंडे सासवड येथे प्रभागातील प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना सर्टिफिकेट वाटप क-हामाई महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : महिलांनी मसाले, लोणचे पापड, पारंपारिक व्यवसाय करण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यवसाय करण्यावर भर देण्यात यावा. तसेच महिलांनी एकत्र मिळून व्यवसाय केला तर खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल, त्याचप्रमाणे प्रभागाचे किंवा तालुक्याचे एकच उत्पादन असेल तर त्याचा ब्रँड डेव्हलप करून, मार्केटिंगसाठी सोपे होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रूपाली झेंडे यांनी केले. सासवड येथील जयदीप मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत क-हामाई महिला प्रभागसंघाची (दिवे गराडे जिल्हा परिषद गट) वार्षिक सर्वसाधारण सभा सासवड या ठिकाणी पार पडली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपाली झेंडे, पंचायत समिती सभापती सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, गटविकास अधिकारी अविनाश थोरात, संचालक पुणे संजय मांढरे, मंगेश माने, बँक ऑफ इंडिया बँक शाखा व्यवस्थापक सासवड सचिन दोलताडे, वैशाली काळे आदी उपस्थित होते. प्रभागसंघ अध्यक्ष अलका बडदे, सचिव हेमलता खेडेकर, कोषाध्यक्ष वंदना गायकवाड, लिपिका दिपाली भोराडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सपना करकंडे, तालुका व्यवस्थापक नंदा कुरडे, तालुका व्यवस्थापक गणेश किकले, महंतवीर घाडगे, समन्वयक रमेश भंडलकर, सागर ढाकणे, महमंद शेतसंदी, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी दिवे गावातील महिलांना दोन कोटीचे बँक कर्ज वाटप करण्यात आले. सर्व ग्राम संघाचे सर्व ग्राम सखींचे त्याच प्रमाणे उद्योजक महिलांचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संजीवनी गायकवाड आंबळे तसेच शुभांगी काळे सोनोरी यांनी बचत गटाच्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते.चौकट : तालुक्यातील प्रभागातील एकल विधवा, परितक्ता, जात प्रवर्गानुसार वंचित घटकांमधील महिलांचे गट बांधणी करावी. जिल्हा अभियान सहसंचालक श्रीकांत खरात.
- Get link
- X
- Other Apps
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाचे अनावरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारत-पाकिस्तान बॉर्डरवर भारतीय सैन्याच्या मदतीने आपले आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प उभारण्यात आले. प्रदेशाध्यक्ष गणेश(काका) जगताप यांच्या पुढाकाराने व भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभाग,महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने 12 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाचे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मत्सल सेक्टर येथे साडेबारा हजार फूट उंचीवरती भारतीय सेना ५६ आर आर (राष्ट्रीय रायफल्स) यांच्या सहकार्याने हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण गणेश काका जगताप याच्या हस्ते करण्यातआले. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यामधील माचील सेक्टर या भागामध्ये असणाऱ्या नियंत्रण रेषे नजीक 56 RR या युनिटमध्ये लाईन ऑफ कंट्रोल वरती असणाऱ्या पोस्ट वरती झेंडावंदन करण्याचा सन्मान जगताप यांना मिळाला तसेच हिंदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. आपल्या वीर जवानांच्या रक्तामधील जोश असेच महाराजांवरील असणारे प्रेम महाराजांकडे बघून दिसत होते या कार्यक्रमासाठी 53 ब्रिगेडचे ब्रिगेडियर तसेच 56 RR चे कमांडिंग ऑफिसर उपस्थित होते युनिट मधील सर्व वातावरण भगवामय झाले फोटो खरंच असे जगताप म्हणाले की आज मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा ठिकाणी जाऊन झेंडावंदन व महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा सन्मान मला मिळाला त्याबद्दल भारतीय सेनेचे मनापासून आभार. या कार्यक्रमासाठी 53 ब्रिगेडचे ब्रिगेडियर तसेच 56 आर आर चे कमांडर धीरजकुमार आणि सीओ डोनी जोस तसेच सुभेदार मेजर पाटील साहेब,जिल्हा परिषद सदस्य करमाळा रश्मीताई कोलते, निनादजी पटवर्धन,प्रवर्तन फाउंडेशन चे सदस्य योगेशजी जोशी,रमेशजी जगदाळे, अनिल (बापू )वाडकर, प्रकाश (काका) जगताप, मयूर गंभीरे,आपले जवान उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील भिवडी या ठिकाणी मद्य सेवन करून एक्टिवा गाडी चालवल्याने सासवड पोलिसांची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी तालुका पुरंदर येथील 21 ऑगस्ट रोजी रात्री 1: 30 वाजताच्या सुमारामध्ये सासवड कोंढवा रोड भिवडी येथे चालक मोहम्मद याकुब शेख वय 25 वर्ष राहणार भवानी पेठ स्वामी समर्थ मंदिर पुणे हा त्यांच्या ताब्यातील एक्टिवा गाडी नंबर mh.12 yj 4392 हे मदय सेवन करून गाडी चालवीत असताना मिळून आल्यामुळे फिर्याद राहुल सुरेश चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन येथील यांनी चालक मोहम्मद याकूब शेख वय 25 वर्ष राहणार भवानी पेठ स्वामी समर्थ मंदिर पुणे यांच्याविरुद्ध मोका कलम 185 प्रमाणे कायदेशीर पद्धतीने फिर्याद सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अभिजीत कांबळे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील हॉटेल कसोल कॅफे या हॉटेलमध्ये अवैध रित्या धुम्रपानासाठी हुक्का बार चालवताना सासवड पोलीसाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आस्करवाडी तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील हॉटेल कसोल कॅफे या हॉटेल मधून 21 ऑगस्ट रोजी रात्री 2:50 वाजताच्या सुमारामध्ये रोहित विष्णू बनसोडे वय 26 वर्ष राहणार अप्पर पवार नगर हनुमान मंदिर पुणे अंकित कुशवाह व 19 वर्षे राहणार आस्करवाडी कसोल कॅफे हॉटेल पुरंदर ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हक्का करून त्या ठिकाणी हुक्का बार चालविताना आढळून आले त्यांच्याकडून एकूण 33, 950 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. म्हणून फिर्याद सचिन सुरेश किवळे पोलीस कॉन्स्टेबल सासवड त्यांनी त्याच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम चार अ 21 अन्वये अन्वये कायदेशीर फिर्याद सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल झाली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता सिताराम पांगारे सासवड प्रतिनिधी: वेळू (ता. भोर) येथील जुन्या पिढीतील सिताराम (बाप्पू) विठ्ठल पांगारे ( वय ८८ ) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. ते टेल्को कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी होते. त्यांनी आदर्श महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे वेळू गावचे अध्यक्ष पद ९ वर्ष भूषवले.त्यांच्या काळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुवर्णपदक मिळवण्यास सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे वेळू गावात शोक कळा पसरली. त्यांचे पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा,सून, जावई ,नात, नातवंडे असा परिवार आहे. शेतीव्यावसायिक दीपक पांगारे , गृहिणी सरस्वती सुदामराव सावंत, सुशीला विश्वनाथ कामथे , अंगणवाडी सेविका शोभा अशोक जगदाळे यांचे ते वडील होत.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता ज्ञानेश्वर ढोणे सासवड प्रतिनिधी: गराडे (ता. पुरंदर) गावाजवळील ढोणेवाडी येथील नामांकित पैलवान, उद्योजक ज्ञानेश्वर उर्फ दादा नारायण ढोणे( वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा ,तीन मुली , नातवंडे असा परिवार आहे. महावितरणचे वायरमन गणेश ढोणे, गृहिणी पल्लवी फडतरे ,पायल रावडे , अनिता ढोणे यांचे ते वडील होत. उद्योजक ओंकार दत्तात्रय ढोणे यांचे ते चुलते होत. तर उद्योजक तानाजी बबन ढोणे, पै.प्रदीप शिवाजी ढोणे, संदीप शिवाजी ढोणे यांचे ते चुलत बंधू होत.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता दत्तात्रय कटके सासवड प्रतिनिधी: भिवरी (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय विठ्ठल कटके (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ईलिका कंपनीचे कर्मचारी धनंजय कटके ,गृहिणी रोहिणी इंगळे , वाळुंज गावच्या माजी सरपंच योगिता इंगळे यांचे ते वडील होत. तर पुरंदर शिवसेना उपतालुका प्रमुख व भिवरी गावचे माजी सरपंच संजय दिनकर कटके यांचे ते चुलत बंधू होत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथाच्या साक्षीने संकल्प करून ग्राम सुधार संघटनेच्या माध्यमातून गावची स्वच्छतेचा अभियान दर रविवारचा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वीर ता. पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या पावित्र क्षेत्रांमधील 27 मार्च 2026 पासून श्रीनाथाच्या साक्षीने संकल्प करून ग्राम सुधार संघटनेच्या माध्यमातून गावच्या एक जुटीने ,स्वच्छता अभियान हे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष आपापल्या परीने सर्वांचे योगदान ठरून साहित्य ,अल्पोपहार,वाहन, मार्गदर्शन, चांगला अभिप्राय वगैरे याद्वारे पहिले स्वच्छता अभियान 5 एप्रिल2026 श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर परिसरात सुरू केले असून, दर रविवारी सकाळी सात वाजता नित्यनियमाने हा सलग चौदावा रविवार असून, गावातील विविध भागांमधील अविरत चालू ठेवलेले आहे ,तरी पाच जुलै रविवारपासून वृक्षारोपण साठी खड्डे घेण्याची सुरुवात केली असून, पावसाने सुद्धा कृपादृष्टी दाखवली आहे, दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वड पिंपळ, कडुलिंब, आंबा, जांभूळ, पेरू तसेच विविध फुलझाडे शोभेची झाडे लावलेली आहेत, त्यासाठी गावातील तसेच गावाबाहेरील अगदी परदेशात नोकरीसाठी असणाऱ्यांनी सुद्धा हातभार लावलेला आहे ,आषाढी एकादशीच्या शुभ दिनी वृक्षारोपण हे 25 जुलै रोजी सकाळी आठ वाजता वृक्षपूजन करून वृक्षारोपण सलग दोन दिवस केले असता, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्था तसेच सर्व गणेश मंडळे, सर्वपक्षीय प्रतिनिधी समस्त ग्रामस्थ ,यांच्या सहभागाने ग्राम सुधार संघटना समाज उपयोगी काम करत आहे. पुढील संकल्प शैक्षणिक मदत व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि अभ्यासिका निर्मीता हा आहे .यासाठी श्रीनाथ म्हस्कोबाच्या मंदिराच्या पावित्र्य भूमीतूनच हा संकल्प पुढे नेण्याचा मानस हा वीरकर गावांचा आहे .
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 6,000दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.19 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 6,000 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 6,500 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 4,000 तर सरासरी 5,000 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 5,150 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,15 बॉक्स 63 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 5,050 कमाल दर 5,150रुपये तर साधारण5,100रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 4,000,6,000,5,000. बाजरी 2,700,3,300,3,000. गहू 2,800,3,300,3,050. तांदूळ ----4,700,5,500,5,100.हरभरा 5,200, 5,700,5,450.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावांमध्ये अवैध स्फोटक साठा जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून, अवैध स्पोटक साठा आणि तीन वाहने असा एकूण 30 लाख 67 हजार 430 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हा साठा केल्याप्रकरणी दोन जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्रकुमार रामदायाल बाहेती राहणार तावरे कॉलनी पुणे आणि सागर हिम्मत मंडल वय 30 राहणार चरोली अशी गुन्हा दाखल झालेले यांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन किवळे यांनी याप्रकरणी फिर्यादी दिली आहे. सोनोरी येथील गट क्रमांक 260 मध्ये ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोनच्या सुमारामध्ये संशयास्पद वाहनांची झडती घेतली असता आयशर ट्रॅक क्रमांक आर जे झिरो सहा जीबी 9830 आणि बोलेरो पिकप क्रमांक 4510 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिलेटिन कांड्या व डेक्कन पावरची बॉक्स आढळले यामध्ये तेरा लाख 19 हजार रुपयांचा आयशर ट्रॅक व स्फोटके सात लाख दहा हजार रुपयाची बोलेरो पिकप आणि दहा लाख 37 हजार रुपयाचा अन्य एक ट्रॅक असा एकूण 30 लाख 67 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष घोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुढील तपास सुरू आहे.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता विलास कटके सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवरी (ता. पुरंदर) येथील रहिवाशी व पुणे मार्केट यार्ड येथील कटके ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर विलास बबन कटके (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुले, दोन बंधू असा परिवार आहे. कटके ट्रेडिंग कंपनीचे डायरेक्टर अथर्व कटके व प्रज्वल कटके यांचे ते वडील होत. शेती व्यवसायिक नामदेव कटके व वसंत कटके यांचे ते बंधू होत. तर भिवरी ग्रामपंचायत माजी उपसरपंच भिकाजी कटके यांचे ते पुतणे होत.
- Get link
- X
- Other Apps
गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: समाजसुधारक श्री शिवाजी मराठा स्कूलचे संस्थापक आणि पुण्याचे माजी महापौर गुरुवर्य कै. बाबुराव गणपतराव जगताप यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तहसील कार्यालय, वनराज मंडळ येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुरुवर्य बाबुराव जगताप यांनी बहुजन समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. १९१८ मध्ये त्यांनी श्री शिवाजी मराठा स्कूलची स्थापना करून वंचित व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. पुढे श्री शिवाजी मराठा सोसायटीसह विविध शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी त्यांनी ‘शिक्षक’ मासिक सुरू केले. कोल्हापूर संस्थानचे शिक्षणाधिकारी तसेच श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलचे पहिले भारतीय प्राचार्य म्हणूनही त्यांनी काम केले. १९६२ मध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. साधी राहणी, तत्त्वनिष्ठ सार्वजनिक जीवन आणि समाजसेवेची तळमळ ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय आबा पाटील, राष्ट्रीय संघटक सचिव डॉ. वैभव शिळीमकर, प्रा. दीपक सुरवसे, नगरसेविका स्नेहा ताई माळवदे, समाजसेवक नामदेवराव माळवदे, विश्रामबाग क्षेत्रीय अधिकारी गुरम साहेब, श्री शिवाजी मराठा संस्थेचे विश्वस्त मा. विकासराव गोगावले, मा. जगदीशराव जेधे, मा. सत्येंद्र कांचन, मा. ॲड. एन. डी. पाटील, मा. आबा जगताप, प्रा. प्रतिभाताई परदेशी, मा. संदेश दिवेकर यांच्यासह विद्यार्थी, प्राध्यापक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुण्यतिथीपर्यंत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांमध्ये गुरुवर्य बाबुराव जगताप यांच्या प्रतिमा भेट देऊन लावण्यात येतील, अशी माहिती अजयआबा पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे संयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय दादा पासलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील आस्करवाडीतील हुक्का पार्लरवर सासवड पोलीस स्टेशनची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आस्करवाडी तालुका पुरंदर येथील हॉटेल विलियंस वर पोलिसांनी छापा टाकून अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या दोघांवर कारवाई केली आहे. अमर मुरलीधर वाडकर आणि संजय वाघ दोघे राहणार आस्करवाडी अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी तुषार लोंढे यांच्या फियॅदीवरून सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल विलियंस मध्ये ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या हक्का पुरवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी दुपारी चार च्या सुमारामध्ये पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता, या छाप्यामध्ये पोलिसांनी काचेचा हुक्का पोट, विविध प्लेवरचे तंबाखूजन्य डबे, मातीची चिलीम, फिल्टर पाईप आणि हुक्का ओढण्याचे रबरी पाईप असा एकूण 11,560 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत सविस्तर माहिती सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर भोर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्रसिह प्रभूसिंह गौर यांना दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. एकाच अधिकाऱ्याला दोन वेळा हा सन्मान मिळणे दुर्मिळ आहे. याचीच प्रचिती म्हणून 2018 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना पहिल्यांदा हा सन्मान मिळाला होता, 2026 मध्ये पुन्हा त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. दोन वेळा हा सन्मान मिळवणारे गौर हे मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये गणले जात आहेत, बाविसाव्या वर्षी त्यांनी पोलीस अधिकारी म्हणून सेवेत प्रवेश केला होता, नाशिक येथे ट्रेनिंग दरम्यान त्यांना सर्वोत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरवण्यात आले होते, अक्कलकोट, चाकण, आणि सध्या पुरंदर भोर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत, रनिंग, पर्यावरण आणि जंगल सफारीत रमणाऱ्या गौर यांच्यावर सन्मानाचा वर्षाव होत आहे. प्रामुख्याने पुरंदरकर वाशिया कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे .सवॅसामान्य नागरीक , शेतकरी संघटना, प्रतिष्ठान,प्रतिनिधी, पत्रकार यानी अभिनंदन केले आहे
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागासह सासवड येथील 15 ऑगस्ट दिनानिमित्त ८० वा वर्धापन दिन उत्साहात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जीवनवर्धिनी मतिमंद विद्यालय दिवे येथील शशीकुमार कामठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एसजडी ग्रुप कडून इमारत निधीसाठी सात हजार रुपयाची देणगी देण्यात आली. व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. रिसेिपिसे माध्यमिक विद्यालय येथील ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. रोहिदास रघुनाथ इंगळे यांना आदर्श शिक्षक "जीवन गौरव पुरस्कार" देऊन सत्कार करण्यात आला. दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचाही सत्कार करण्यात आला मुळीक वैष्णवी कांतीलाल, कामठे श्रेयशी प्रमोद, यादव अभिनय अमोल, गायकवाड केतन सुरेश यांचा सत्कार करण्यात आला. सासवड नगर परिषदेचे ध्वजारोहण विद्यमान नगराध्यक्षा आनंदी (काकी) चंद्रकांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन प्रशासकीय इमारत सासवड पुरंदर येथील ध्वजारोहण वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर ,श्रीमती सोनाली वाघ नायब तहसीलदार महसूल, महादेव जाधव नायब तहसीलदार( संगायो), श्रीमती शुभांगी गोंजारी नायब तहसीलदार निवडणूक, गोपाळ ठाकरे निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग, संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार पुरंदर ,मंडल अधिकारी, तलाठी, तहसील ऑफिसचे कर्मचारी व स्टाफ तसेच प्रांत कार्यालयातील कर्मचारी व स्टाफ व सासवड मधील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते. नंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला. जुनी कचेरी मैदान सासवड पुरंदर येथील ध्वजारोहण वर्षा लांडगे उपविभागीय अधिकारी पुरंदर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम राष्ट्रीय गीत गायन व सलामी राष्ट्रगीत जनगणमन राज्य गीत झाल्यानंतर पोलीस परेड व शालेय मुलांचे संचालन झाले यावेळी प्रामुख्याने विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर, संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन, डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड नगरपरिषद, संचलनामध्ये प्रामुख्याने सासवड पोलीस स्टेशन पोलीस, होमगार्ड, पुरंदर हायस्कूल, वाघिरे कॉलेज, वाघिरे हायस्कूल, कन्या प्रशाला, शिवाजी इंग्लिश मीडियम, गुरुकुल अशा आदी विविध शाळेच्या वतीने सुद्धा संचलन करण्यात आले. यासाठी पुरंदर तालुक्यातील सासवड येथील प्रतिष्ठित नागरिक, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बांधव व युवक पिढी यांनी बहुसंख्येने या ठिकाणी 80 वा वर्धापन दिनाच्या निमित्त तसेच पत्रकार महोदय यांनी सुद्धा आपली उपस्थिती दाखवली.
- Get link
- X
- Other Apps
भिवरी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शेखर कटके तर उपाध्यक्षपदी रविंद्र कटके सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवरी ( ता. पुरंदर) येथील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शेखर रामदास कटके तर उपाध्यक्षपदी रविंद्र रघुनाथ कटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष दत्तात्रय सुरेश कटके व माजी उपाध्यक्ष कैलास दत्तात्रय कटके यांना नेमून दिलेला दोन वर्षाचा कालावधी संपल्यामुळे त्यांच्या जागी या निवडी करण्यात आल्या. भिवरी ( ता.पुरंदर ) येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडप्रसंगी पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय काळे, सरपंच मोनाली कटके, उपसरपंच मारुती कटके , विशाल नागरी सहकारी पतसंस्था संचालक सखाराम कटके, पुरंदर भाजपा अध्यक्ष संदीप कटके, माजी सरपंच दिलीप कटके, संजय कटके, विशाल कटके, भैरवनाथ सेवा मंडळ अध्यक्ष उत्तम कटके, गोसावी बुवा तरुण मंडळ अध्यक्ष नवनाथ भिसे, वीर नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष चांगदेव घिसरे, चतुर्मुख भैरवनाथ दिंडी सोहळा अध्यक्ष संभाजी नाटकर, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळ संचालक गुलाब घिसरे, अजित नागरी सहकारी पतसंस्था संचालक माऊली घारे, माजी उपसरपंच तुकाराम कटके, तानाजी कटके,लालासाहेब कटके, उद्योजक म्हस्कु दळवी, मोहन गायकवाड , सुनील गोफणे, किरण कटके , अक्षय गायकवाड ,हरिदास गायकवाड, भाऊसाहेब कटके, संतोष घिसरे, राहुल कटके, रामदास सावंत, शिवाजी कोंडे, उत्तम गायकवाड, कोंडीबा घिसरे,पोलीस पाटील सचिन दळवी ग्रामविकास अधिकारी रोहित अभंग , तलाठी बाबासाहेब भागवत आदींसह भिवरीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांमध्ये सामंजस्य, एकी ठेवत गावातील तंटे सोडविण्यासाठी सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन ते गावपातळीवर सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे शेखर कटके व रविंद्र कटके यांनी सांगितले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले असून, पुरंदरचे नायब तहसीलदार संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे अधिकारी व माळशिरस ग्रामस्थ यांची श्रावणी यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली. पंचायत समितीचे सदस्य माऊली यादव यांनी येथील समस्या सांगितल्या, या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली, मंदिराकडे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहने वन विभागाच्या कमानी बाहेर अडवण्यात येणार आहेत, वन विभाग ते भुलेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. श्रावणी यात्रा 13 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत असल्याने, लाखो भाविक भुलेश्वर दर्शनासाठी येत असल्याने, त्यांची सोय आणि सुरक्षितेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. माळशिरस ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने महिनाभर आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने येथील खाऊची दुकाने व प्रसादाच्या पेढ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने वाढीव बंदोबस्त देण्यात येणार आहे, यावेळी गट विकास अधिकारी अविनाश थोरात, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे, सासवड आगार व्यवस्थापक वृषाली तांबे ,जीवन ठोंबरे, विस्तार अधिकारी सागर कांबळे, मालशिरसच्या सरपंच आरती यादव, उपसरपंच छाया यादव, पोलीस पाटील पूजा यादव, प्रियांका साळुंखे, एस एस निंबाळकर आधी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील आषाढ अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानात भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा; हजारो भाविकांनी घेतले श्रीनाथ म्हस्कोबांचे दर्शनवीर, ता. पुरंदर, जि. पुणे | बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६आषाढ अमावास्येनिमित्त पश्चिम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान फअसलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, वीर येथे आज पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने श्रीनाथ म्हस्कोबांचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा देवाला विधिवत अभिषेक करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने दहिभाताची पूजा संपन्न झाली. दुपारी १२ वाजता धूपारती झाल्यानंतर धार्मिक विधींसाठी मुख्य गाभारा सुमारे सव्वा तास दर्शनासाठी बंद ठेवण्यात आला. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता पुन्हा भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. दिवसभर महिला व पुरुष भाविकांनी शिस्तबद्ध रांगेतून दर्शन घेतले. काही भाविकांनी मधील गाभाऱ्यातूनही दर्शन घेतले.महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभआजचा महाप्रसाद रामदादा धुमाळ, विठ्ठलशेठ धुमाळ, व सुशीलकुमार जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी सुविधाभाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, वापरासाठी पाण्याची व्यवस्था, जनरेटर सुविधा, स्वच्छतागृह, दर्शनबारीचे नियोजन तसेच स्वयंसेवक व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दर्शन सुरळीत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांचेसमवेत संपूर्ण विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, सेवेकरी, सहकारी व स्वयंसेवक दिवसभर भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत होते.
- Get link
- X
- Other Apps
सासवडच्या वाघीरे विद्यालयाचे सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दि. २६एप्रिल २०२६रोजी इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा राज्यात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा दि. २५जुलै २०२६रोजी जाहीर झाला असून इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील विद्यालयातील एकूण २५ विद्यार्थी पात्र झाले असून ६ विद्यार्थ्यांना २००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गुणवत्ता यादीत ४ विद्यार्थी झळकले आहेत. शेट्टी सिद्धी(मिळालेले गुण२४४), हिप्परकर कार्तिक (२३४), कुंजीर वेदांत (२२६), निरगुडे तनिष्क (२२४) व तोडकर शुभंकर (२१०) जांभळे ओम (२०६)हे सहा विद्यार्थी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून एकूण चार विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे विद्यालयाचे शिक्षिका घोलप यांनी सांगितले. चाचण्यांचे नियमित आयोजन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि यशाचा आलेख उंचावत असल्याचेही त्यांनी सांगितले. शाळेत राबविण्यात येणारे विशेष मार्गदर्शन आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळेच हे यश मिळाल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल शाला समिती अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. या विद्यार्थांना इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यालयातील शिक्षिका घोलप, सहारे, सावंत, केंगले, जगताप यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,500दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.12 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,500 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,500 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 3,750 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 4,900 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 2,06 बॉक्स 41 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,700 कमाल दर 4,900रुपये तर साधारण4,800रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी. ज्वारी 3,000,4,500,3,750. बाजरी 2,700,3,100,[ 2,900. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ ---------------------------------- हरभरा 4,500, 5,600,5,050.
- Get link
- X
- Other Apps
पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण आवश्यक विजय कोलते सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जेन-झी पिढीला पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू कॉलेज, पर्वती पायथा येथे आयोजित इयत्ता दहावी विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षणासोबतच नृत्य, वक्तृत्व, चित्रकला व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोलते यांनी केले. पुरस्काराला उत्तर देताना अनिल मेहेर यांनी ग्रामीण भागातील ठ विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली. यावेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आप्पासाहेब बालवडकर, प्रदीप वळसे-पाटील, प्रमिला गायकवाड, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, वीरसिंह रणसिंग , शिवाजी खांडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. संग्राम कोंडे देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सचिन धनवट यांनी केले, तर आभार महेश ढमढेरे यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील सासवड - सोनोरी रस्त्यावरील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सावता महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात अखंड हरिनाम सप्ताह व सावता महाराज चरित्र पारायण तसेच दिंडी सांगता समारंभ व श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 8 ऑगस्ट रोजी श्री संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मूर्तीना अभिषेक झाल्यानंतर ग्रंथ पूजन, कलश पूजन, विना पूजन याचे पूजन श्री संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सखाराम लांडगे व उपाध्यक्ष संदीप टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ह भ प श्री गणेश महाराज राऊत यांनी या व्यासपीठाचे नेतृत्व केले. दररोज पहाटे काकड आरती सकाळी श्री सावता महाराज चरित्र पारायण त्यानंतर गाथा वाचन व भजन, दुपारी हरिपाठ, सायंकाळी प्रवचन, रात्री कीर्तन त्यानंतर हरी जागर असे कार्यक्रम झाले. ह भ प दीपक महाराज भोसले, ह भ प नितीन महाराज हरणूळ, ह भ प विजय महाराज अधिकारी यांची प्रवचने झाली. तर ह भ प म्हस्के महाराज कामठे चांबळी, ह भ प गणेश महाराज राऊत सासवड, ह भ प संपदा महाराज बोरकर आंबोडी यांची कीर्तने झाली. तसेच श्री संत सावता महाराज भजनी मंडळ सासवड, श्री हनुमान भजनी मंडळ सासवड यांचा हरी जागर झाला. आज मंगळवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी ह भ प स्वप्नील महाराज काळाने आंबोडी यांचे काल्याचे किर्तन होऊन दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी अड. भगवान होले, संदीप टिळेकर, गुलाब लांडगे, अशोक भोंगळे, नाना लांडगे, अर्जुन लांडगे, देवराम लांडगे, सेवा लांडगे, चोपदार गेनबा बोरकर व यमाजी होले आदी उपस्थित होते. " निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम जयघोषित दिंडीची मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी दिंडीवर फुलांची करण्यात आली. यावेळी महिलांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग घेत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.सोहळ्याचे आयोजन श्री संत सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प सखाराम लांडगे, उपाध्यक्ष संदीप चंद्रकांत टिळेकर, खजिनदार गुलाब सखाराम लांडगे यांनी केले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी "ड्रग अँड ड्राईव्ह" विरोधामध्ये सासवड पोलिसांची विशेष अशी मोहीम ; तर श्रीनाथ चौकामध्ये वाहन चालकांची कसून चौकशी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील जेजुरी नाका जवळ आरोपी एक जयंत लच्छू खडके वय 23 वर्ष सध्या राहणार हॉटेल सातबारा काळेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मूळ राहणार गोटाली पोस्ट कुलगाना तालुका चिखलदरा जिल्हा अमरावती त्याच्या गाडीची तपासणी केली असता, अंधारात आपले तो अस्तित्व लपवून ठेवले कारणाने त्या ठिकाणी कोणतेही कारण तो पोलिसांना देऊ शकला नाही, त्यामुळे त्याच्या त्या उद्देशामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली .आरोपी नंबर दोन कमलाक्ष हनुमान शिंदे वय 39 वर्ष राहणार सोपानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे जेजुरी रोड वरील श्रीनाथ चौक येथे त्याच्या ताब्यातील हुंडाई कंपनीची ग्रँड आय 10 तिचा नंबर एम एच बारा टी एस 07 59 हे वाहन ते दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवीत असताना मिळून आल्यामुळे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. तीन आरोपी राहुल मोहनराव गायकवाड वय 47 वर्ष राहणार कोडीत नाका सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी6 कंपनीची स्वीच कार तिचा नंबर एम एच 12 एच झेड 2190 हे वाहन दारूच्या सेवन करून धोकादायक रित्या चालवीत असताना मिळून आल्यामुळे त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. चार आरोपी ओंकार संभाजी मारणे वय 27 वर्ष राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची एच एफ मोटरसायकल नंबर एम एच बारा एन एम 1888 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली.आरोपी पाच ऋषिकेश रामचंद्र निंबाळकर वय 28 वर्षे राहणार शिंदेवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा यांची सुद्धा ताब्यातील हिरो कंपनीची सीडी डीलक्स मोटरसायकल वाहन नंबर एम एच ४२ ए क्यू 9452 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायकरीत्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपी सहा सुदेश सुभाष शिंदे वय 38 वर्ष राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची एक्टिवा मोटरसायकल वाहन नंबर एम एच बारा वायचे 9388 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायकरीत्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली. सात आकाश तानाजी महाडिक वय 35 वर्ष राहणार शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील सुजूकी कंपनीची स्विफ्ट डिझायर कार नंबर एम एच बारा क्यू जी 9039 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायकरीत्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. आरोपी आठ गौरव संदीप सुतार वय 22 वर्ष राहणार खानवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची स्कार्पियो नंबर एम एच बारा झेड एस 0234 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली. आरोपी नव बाळू बजरंग पवार वय 60 वर्ष राहणार सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल नंबर इमेज 14 ए बी 19 93 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली. दहा आरोपी विनय मलिकार्जुन धनाले वय 55 वर्षे धंदा ड्राइवर सध्या राहणार शेवाळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मूळ राहणार सदाशिवनगर बेळगाव तालुका बेळगाव जिल्हा ही बेळगाव राज्य कर्नाटक यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील एमजी कंपनीची विंडसर गाडी नंबर एम एच बारा वाय एम 3940 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करण्यात आली. अकरा आरोपी सुरज नारायण चौडकर वय 22 वर्ष राहणार नायगाव तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सुद्धा त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची ब्रिजा गाडी नंबर एम एच बारा झेड यु 17 83 हे वाहन दारूचे सेवन करून धोकादायक रित्या चालवल्या कारणामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक अशोक हाके, पोलीस शिपाई तुषार बाळू लोंढे, पोलीस शिपाई अक्षय शंकर चिल्ले, पोलीस शिपाई राहुल सुरेश चव्हाण, पोलीस शिपाई किरण हनुमंत तुपे, पोलीस शिपाई सचिन सुरेश किवळे, पोलीस शिपाई प्रवीण श्रीमंत शेंडे, पोलीस शिपाई नवनाथ रामदास नानवर डृक अँड ड्राईव्हच्या विशेष अशा मोहिमेमध्ये एकत्रितपणामुळे सासवड पोलिसांनी योग्य अशी प्रकारची कारवाई केली. या संदर्भातील सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अविनाश होळकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करून घेतला. तर सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सय्यद जब्बार, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे, पोलीस हवालदार संतोष शिंदे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये भिंगो जुगारावर सासवड पोलीस यांची कारवाई तर दोघावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील11 ऑगस्ट रोजी19:10 वाजता सुमारास सासवड हद्दीमधील खंडोबा नगर या ठिकाणच्या झोपडपट्टीत पत्र्याच्याच शेडमध्ये सोपान आनंदा उबाळे वय 31 वर्ष राहणार हिवरकर मळा सासवड तालुका पुरंदर दोन किरण प्रकाश सोळंकी राहणार खंडोबा नगर झोपडपट्टी तालुका पुरंदर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्याकडील1,2,3,4,5,6,7,8,9,9असे अंक असलेल्या चित्रावर पैसे लावून बिंगो नावाचा जुगार खेळत असताना मिळून आले म्हणून, त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12 अप्रमाने सरकार तर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. मिळकतीच्या मालामध्ये एक 4,820 रोख रक्कम त्यामुळे पाचशे रुपयांच्या सहा नोटा, शंभर रुपयांच्या तीन नोटा, 50 रुपयांच्या 11 नोटा, २० रुपयांच्या झिरो आठ नोटा, 10 रुपयाच्या एक नोटा .दोन) दहा हजार रुपये किमतीचा एक काळे रंगाचा 32 इंची hyundat कंपनीचा टीव्ही जु.वा. कि.अं नंबर तीन) 30:00 एक ठीक ठिकाणी लाल व पांढरे रंग असलेला प्लॅस्टिकचा बोर्ड त्यावर 1,2,3,4,5,6,7,8,9,9 असे अंक मिळून आल्यामुळे फिर्याद प्रवीण श्रीमंत शेंडे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन यांनी सरकारतर्फे त्या दोघाविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार भिवराज शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड मध्ये मतदारांना अर्ज करण्याचे पुन्हा एकदा आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सासवड शहरांमध्ये मतदार यादींची विशेष सखोल पुनारीक्षण सुरू आहे. ज्या मतदारांची नावे अनुपस्थित स्थलांतरित किंवा मृत गटात आहेत, त्यांनी 17 ऑगस्टपर्यंत संबंधित बीएलओकडे अर्ज सादर करण्याची आव्हान मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी केले आहे. नगरपरिषदेत हद्दीतील बीएलओ मार्फत घरोघरी भेट देऊन डिजिटल प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत तयार झालेल्या विशेष वर्गवारीतील याद्या सासवड नगर परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर भागनिहाय उपलब्ध आहेत ज्या नागरिकांची नवीन नावे या याद्या मध्ये आहेत त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संपर्क साधावा शहरातील सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत बीएलोकडे यांना सहकार्य करावे आणि नागरिकाकडून जास्तीत जास्त अर्ज भरून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी आव्हान सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps
कोळविहिरे चौकातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अपघातांचा धोका; पुलाखालील वाहनांवरही कारवाईची मागणी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरीतील कोळविहिरे चौक परिसरात रस्त्याच्या कडेला तसेच पुलाखाली चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.चौक परिसरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला किंवा पुलाखाली वाहने उभी राहिल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी चिंता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.मागील शुक्रवारी याच परिसरात झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कोळविहिरे चौकातील वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.रस्त्यावर किंवा पुलाखाली वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांची संबंधित वाहतूक पोलिसांनी पाहणी करून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
- Get link
- X
- Other Apps
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मागणी;; पोलिसांकडून तक्रारीची दखल सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी येथील श्री खंडोबा गडावर जाणाऱ्या आपत्कालीन रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित ठेवून भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाशी संबंधित वाहने वगळता इतर चारचाकी वाहनांना या मार्गावर प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची जेजुरी पोलिसांनी दखल घेतली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर चारचाकी वाहनांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून, जेजुरीकर नागरिक, भाविक तसेच रस्त्याच्या कामात कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अनावश्यक वाहनांची ये-जा टाळल्यास कामही सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल.पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, वाहनांना प्रवेश दिल्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील व कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. याबाबत श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनालाही लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.सुरक्षित रस्ता सुरक्षित भाविक सुरक्षित जेजुरी.
- Get link
- X
- Other Apps