Posts

Showing posts from June, 2026

पुरंदर विमानतळ प्रकल्प: जमीन संपादनासाठी विशेष मोहीम; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आढावा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर प्रकल्पासाठीची जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यात आली असून, बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रक्रियेचा आढावा घेतला असून, जमीन संपादनाचे काम पारदर्शकपणे आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विमानतळ प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना अनेक तांत्रिक प्रश्न उद्भवत आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडून दर सोमवारी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे, ज्याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेमुळे आतापर्यंत सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे मोबदले वाटप करण्यात आले असून, १५ जुलैपर्यंत जमिनीच्या मोबदल्याचे ५० टक्के वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निश्चित केले आहे.प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, जमिनीच्या मूळ मूल्यावर १० टक्के मोबदला कपातीचे नियम स्पष्ट असले तरी, प्रत्यक्ष जमिनीच्या विकासामुळे बाधित शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी 'शेवटपर्यंत काहीही देऊ नका, शेवटी जास्त पैसे मिळतील' अशा अफवा पसरवल्या जात आहेत, परंतु कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे कोठात अडकून न पडता, ते थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यावर प्रशासनाचा भर आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले आहे की, जमिनीचे मूल्यमापन करताना सर्व नियमांचे पालन केले जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच, अफवांकडे दुर्लक्ष करून शेतकऱ्यांनी प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Image

शेतकऱ्याने प्राकृतिक शेतीचा स्वीकार करूनच या चळवळीचा भाग बनावे असे आव्हान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 'समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज' या त्रिसूत्रीवर आधारित विकसित भारताची उभारणी शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने प्राकृतिक शेतीचा स्वीकार करून या चळवळीचा भाग बनावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, पुणे (दक्षिण) यांच्या वतीने रविवारी (दि. २८) नीरा येथील लक्ष्मीनारायण कार्यालयात मंगल "प्राकृतिक शेती कार्यशाळेत" आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "मन की बात" कार्यक्रमाचेकीप्राकृतिक शेती काभारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुण्समृद्ध शेतकरी, सुदृढ शेती आणि निरोगी समाज' त्रिसूत्रीवर आधारित विकसित भारताची उभारणी शक्य.सामूहिक श्रवण करण्यात आले. शेकडो कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी उपस्थित राहून पंतप्रधानांचे मार्गदर्शन ऐकले. या प्रसंगी पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यांतील आदर्श शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास माजी आमदार अशोक टेकवडेनीरा येथे भाजप किसान मोर्चाच्या वतीने 'प्राकृतिक शेती कार्यशाळेत' मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ. तानाजीराव थोरात, अविनाश मोठे, सचिन लंबाते, जिल्हाध्यक्ष शेखर वडणे, प्रदेश सचिव मनोज कासवा, सरचिटणीस बाळासाहेब गरुड, पुणे जिल्हा दक्षिण किसान मोर्चाचे अध्यक्ष दिग्विजय काकडे, सरचिटणीस वैभव आटोळे, उपाध्यक्ष महादेव शेंडकर, पुरंदर मंडलाध्यक्ष संजयनिगडे, महेश जी जाधव जिल्हा उपाध्यक्ष,योगेंद्र माने, अमोल यादव, माणिकराव चोरमले यांच्यासह भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक आयोजक जिल्हा अध्यक्ष श्री दिग्विजय काकडे यांनी केले. सूत्रसंचालन महादेव शेंडकर यांनी केले, तर दीनानाथ मारणे जिल्हा सरचिटणीस किसान मोर्चा यांनी आभार मानले.

Image

पुरंदर तालुक्यामध्ये भिवरी आस्करवाडी येथील मध्यरात्री हुक्का पार्लर वर छापा टाकून सासवड पोलिसांकडून 26 हजाराचा मुद्देमाल जप्त ; तर दोघांविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवरी ता.पुरंदर येथील आस्करवाडी या ठिकाणी 27 जून रोजी 00:01वाजताच्या सुमारामध्ये हॉटेल कसोल कॅफे या हॉटेलमध्ये 1)अभिजीत गणेश कामठे वय 23 वर्ष राहणार चांबळी ता. पुरंदर जिल्हा पुणे 2) प्रजयोत अशोक चोरगे वय 26 वर्ष राहणार सोरतापवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे हे ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरवून त्या ठिकाणी हुक्का बार चालविताना आढळून आले असताना त्यांच्याकडून एकूण 26.370 रुपयाचा मुद्देमाल जप्त हा करण्यात आला आहे .म्हणून फिर्यादी तुषार बाळू लोंढे पोलीस कॉन्स्टेबल सासवड पोलीस स्टेशन त्यांनी त्यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधार अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 अ अन्वये कायदेशीर पद्धतीने फिर्याद सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे .पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड भिवरी मार्गावरील चांभळी या ठिकाणी श्रीनाथवाडी जवळील भीषण अपघातामध्ये भर धावकांच्या धडकेने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू ; तर चालका विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: चांबळी ता. पुरंदर येथील श्रीनाथवाडी जवळील 26 जून रोजी रात्री 10:45 वाजता सासवड भिवरी रोडवर पुणे बाजू कडून सासवड बाजूकडे येणारी टोयोटो हायरायडर निळ्या कलरची कार गाडी नंबर एम एच 40 सीक्यू 4040 ही वरील चालक गणेश यशवंत चौलकर वय 38 राहणार पेन कोळीवाडा तालुका पेन जिल्हा रायगड यांनी त्याच्या ताब्यातील वरील गाडी हाईगाईने, भरधाव वेगाने भेदराकपणे गाडी चालवून समोरून सासवड बाजूकडून येणारी मोटरसायकल नंबर एम एस बारा एन एन 7091 हीस धडक देऊन तिच्यावरील चालक विशाल शाम मोहरकर यांच्या लहान मोठ्या दुखापती व मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या टोयोटो हायरायडर निळ्या कलरची कार गाडी नंबर एम एच 40 सी क्यू 4040 कोटी मोटरसायकल नंबर एम एच बारा एन एन 7091 व बलोनो गाडी नंबर एम एच बारा वाय डी ५५०३ यांचे नुकसानीस कारणीभूत झाले असून सदर टोयोटो निळ्या कलरची कार गाडी यांच्यावर तील असणारे चालक गणेश यशवंत चौलकर त्यांच्या विरुद्ध फिर्याद कृष्णा शाम मोहरकर वय 35 वर्ष धंदा नोकरी सध्या राहणार 1077 शुक्रवार पेठ पुणे झिरो दोन हिराबाग मूळ राहणार जेजुरी तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ,पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार संतोष शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील विमानतळ बाधित भूसंपादन सहमतीच्या दाव्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संभ्रम अवस्था ; तर शेतकऱ्यांचा सवाल शासनाकडे 70 टक्के भूसंपादन हे झालेच नाही ? सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 70% जमिनीच्या भूसंपादनाबाबत सहमती मिळाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला असला तरी या आकडेवारीनुसार विमानतळ विरोधी शेतकऱ्यांचा एक गंभीर प्रश्न असा उपस्थित केला जात आहे, शासनाने आत्तापर्यंत 2100 एकर जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाल्याचे सांगितले असताना, सुद्धा प्रत्यक्षात केवळ एक हजार कोटी रुपयाचेच वितरण झाले असल्याचे निदर्शनास आणून देत हा आकडा खरा की खोटा असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून ,स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप असा आहे की ,ज्या संमितीची आकडेवारी मांडत आहेत त्या मूळ शेतकऱ्यापेक्षा बाहेरील गुंतवणूकदारांची संख्या ही जास्त आहे ,अनेक गुंतवणूकदारांनी पूर्वी खरेदी केलेल्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून ती विक्री केल्यामुळे त्या तुकड्यांच्या मालकाकडून सहमती मिळाली असली तरी स्थानिक शेतकऱ्याकडे मोठ्या क्षेत्रफळाच्या जमिनी अजून बाकी आहेत ,त्यामुळे भूसंपादनात संमती दिलेली नाही त्यामुळे संमतीदारांची संख्या जास्त असली तरी प्रत्यक्ष क्षेत्रफळाचे चित्र हे वेगळे असल्याचे दावा एक प्रकारे करण्यात येत आहे, शासनाने 70% संमती मिळाल्याचा दावा केला असला तरी विमानतळ संदर्भातील निविदा अद्याप का काढण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे यापूर्वीही 50% भूसंपादन झाल्यावर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही प्रशासन सांगितले होते, तर 70 टक्के संमती मिळालेली असताना 50% भूसंपादन करून निविदा का? काढण्यात आली नाही असा संतप्त सवाल स्थानिक शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संमती दिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याच दिवशी मोबदला जमा करण्यात येईल अशी ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती ,परंतु त्याबाबत पुढे काय झाले याबाबतचे स्पष्टीकरण प्रशासन दिलेले नाही ,अशी ही मागणी करण्यात आलेली आहे काही शेतकऱ्यांच्या तर खात्यामध्ये मोबदल्याची रक्कम जमा झाल्यानंतर ती खाती होल्ड करण्यात आल्याचाही आरोप सामान्य शेतकऱ्याकडून करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी डुडी 29 जून रोजी सासवड मध्ये पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या महसुली ,न्यायिक व अर्धन्यायिक प्रकरणांच्या निफ्टार्‍यासाठी 29 जून रोजी सकाळी अकरा वाजता सासवड येथील प्रांत कार्यालयात असे विशेष अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करण्यात आला असून ,जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीमध्ये हा कॅम्प होणार आहे .प्रकल्पासाठी आत्तापर्यंत सुमारे 75% च्या पेक्षा शेतकऱ्यांनी संमतीपत्रे दिली असून, सुमारे एक हजार कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितली आहे.याचिका क्रमांक डब्ल्यू पी नंबर 7548/ 2026 दत्तात्रय कोंडे विरुद्ध महाराष्ट्र शासन कुंभारवळण गावाच्या आधी ग्रहणास सरपंचांनी जी हरकत घेतली होती ,त्या हरकतीला तहसीलदार यांनी कायदेशीर अधिकग्रहण प्रक्रियेस अडथळा निर्माण केला , तर कायदेशीर कारवाई करू अशा प्रकारच्या पद्धतीचे पत्र दिले असून, त्या संदर्भात कोर्टाने सांगितले आहे की ,कुंभारवळण गावच्या लोकांनी हरकत घेतली , तर त्यांच्यावर पोलीस कारवाईची धमकी कशा पद्धतीने देता येईल, या विषयावरती कोर्टाने जिल्हाधिकारी यांना उत्तर दाखल करण्यास सूचना केलेली असून, कोणत्याही प्रकारचे जमिनीचे अधिकग्रहण हे जबरदस्तीने करता येणार नाही, याबद्दल वाचयता केली जाईल व त्यावर दाखल केलेल्या याचिकेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याचा अवधी देऊन याचिका ही चार जुलै तारखेला सुनावणीसाठी घेतली आहे, त्यावर जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणचे त्यावर कुंभारवळण यांच्या याचिकेवर उत्तर द्यावे लागणार आहे ,यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे, नक्की या ठिकाणी कोर्ट कोणत्या पद्धतीचा निर्णय देईल यावर साशंकता निर्माण झालेली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे गुटखा साठ्यावर छापा 21 लाख 70 हजाराचा माल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाण्याच्या पथकामधील पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे मोठी कारवाई करण्यात राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा तब्बल 21 लाख 70 हजार 960 रुपयाचा साठा हा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका संशयताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .गुरुवारी दि.25 रोजी दुपारी 1:25 वाजण्याच्या सुमारामध्ये पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना गोपनीय बातमीदारामारामार्फत माहिती मिळाली की, बोपगाव ता. पुरंदर येथील कानिफनाथ गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका गोडाऊन मध्ये गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे, माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष अशा पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला, गोडाऊनची झडती घेतली असता, तेथे विविध ब्रँडचा मोठ्या प्रमाणामध्ये साठा आढळून आला ,या कारवाई मध्ये पोलिसांनी 21 लाख 70 हजार 960 रुपयाचा माल जप्त केला असून, याप्रकरणी पोलीस जवान प्रणया राजेंद्र मखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिराज शेख राहणार शितल पेट्रोल पंपा शेजारी कोंढवा खुर्द पुणे यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती, राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस हवालदार विशाल जाधव, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे, पोलीस शिपाई प्रणय मखरे, पोलीस शिपाई सचिन किवळे, पोलीस शिपाई अक्षय चिल्ले, पोलीस शिपाई पल्लवी काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटा मधील पाठलाग करून मारहाण करून त्या ठिकाणी लाखोचा ऐवज असा गायब करून पाच ते सहा अज्ञातावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 21 जून रोजी रात्री 8: 30 वाजताच्या सुमारामध्ये कसेलो हॉटेल बोपदेव घाट येथे गाडीला गाडी आडवी मारली असताना, त्यांची ग्रीटिंग गाडी तिचा आरटीओ क्रमांक एम एच बारा वाहन 0742 ही गाडी थांबून, मामा गाडीतून उतरले असताना ,दरम्यान गाडी वरील केस वाढलेला इसम हा त्या ठिकाणी ओव्हरटेक कसे काय केले असता, या कारणावरून त्या ठिकाणी मारहाण करू लागला, त्या ठिकाणी मामा यांनी त्या ठिकाणी अडवले असताना, सोबतच्या दुसऱ्याही इस्मानी त्या ठिकाणी मामाला शिवीगाळ करून, मारहाण करण्यास सुरुवात केली, त्या ठिकाणी गाडीतून खाली उतरला असता, त्यांनी बर्गम्यान हा गाडीवरील इसमानी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली व जमलेल्या लोकांनी त्या ठिकाणी भांडणे मिटवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्या ठिकाणी कोंढवेच्या दिशेने तो निघून गेला, सदर इसम हे त्या ठिकाणी पाठलाग करत होते, व त्या ठिकाणी मामाला सीएनजी पंप येवलेवाडी चौकाजवळ सोडले त्या ठिकाणी गाडी मधून सीएनजी भरून पुन्हा पुढे निघाले असता शितल पेट्रोल पंपाजवळील सदर बर्गमॅन गाडीवरील इसमाने त्या ठिकाणी गाडी पुन्हा गाडी आडवी मारून त्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, गाडी न थांबविता ज्योती हॉटेल चौकापर्यंत गेले असताना त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन-तीन गाडीवरील पाच ते सहा इसमानी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, बोपदेव घाटामध्ये गाडी थांबणाऱ्या इसमाने पुन्हा ज्योती हॉटेल चौकामध्ये हिरडीगार गाडीला त्यांची गाडी आडवी लावून थांबवली व आजूबाजूला घेऊन दरवाज्या उघडण्याचा प्रयत्न करू लागला दरवाजा न उघडल्यामुळे त्यांनी केस वाढलेल्या इसमाने हाताने गाडीची ड्रायव्हर विंडोची काच फोडली व त्या ठिकाणी मारहाण करण्यास सुरुवात केली व चावी काढून घेतली, हाताला सायकलच्या लोकांनी चेंज सारखी कोणतीतरी वस्तू असताना त्यांनी जोरजोरात मारहाण करण्यास सुरुवात केली, गाडीतून त्यांना बोलवण्यासाठी खाली उतरले असता, पाच ते सहा इसमापैकी दोन इसमांनी लाथा भुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली व तिथून त्या ठिकाणी एक पोलीस भांडण सोडवण्यासाठी आले असता ते अज्ञात इसम त्या ठिकाणावरून पळून गेले त्यानंतर गाडी पार करून कोंढवा पोलीस स्टेशन येथे उपचार कामी ससून हॉस्पिटल येथे गेले असता, त्या ठिकाणी गाडी मधील पत्नीचे 22 ग्रॅमची सोन्याचे मंगळसूत्र व मामाने दिलेले दोन लाख 80 हजार रुपये व त्या ठिकाणी बारा हजार रुपये रोख असे एकूण दोन लाख 92 000 एवढा मुद्देमाल गाडीमध्ये मिळून आला नसून, त्या ठिकाणी पैसे व दागिने कोणी घेतले याबाबत माहिती नसताना सदरचे पाच ते सहा अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार ही फिर्यादी जयदीप नवीन कुमार शहा वय 26 वर्ष काम ड्रायव्हर राहणार फ्रेंड 102 यम विंग काची एन क्रेव सोसायटी चक्रे वार रोड चाकण पुणे त्यांनी फिर्याद कोंढवा पोलीस स्टेशन वरून वर्ग होऊन सासवड पोलीस स्टेशन येथे दाखल झाला आहे पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील बँक ऑफ बडोदा एटीएम फोडण्याचा प्रयत्न होताच ; सायरन वाजल्याने चोरट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवरी ता. पुरंदर येथील दि. 23 जून रोजी रात्री 12:56 वाजण्याच्या सुमारामध्ये बँक ऑफ बडोदा शाखा भिवरी एटीएम मध्ये सकाळी 9:20 वाजता बँक ऑफ बडोदा ची सुरक्षा एजन्सी कडून फोन आला असता, त्या ठिकाणी भिवरी ता. पुरंदर येथील शाखेच्या एटीएम मधून अज्ञात इसमाने डोक्यास माकड टोपी व हातात हँड ग्लोज घालून, लोखंडी गजाचे कटावणी सारखे हाताने एटीएम मध्ये प्रवेश करून एटीएम चे पैसे ठेवलेल्या कप्प्याचे दरवाजा कटवणीच्या साह्याने उचकटला असून ,काही मिनिटांमध्ये बँकेच्या सुरक्षा यंत्रणेचा सायरन वाजू लागल्याने, त्या ठिकाणाहून पळून गेल्याची घटना त्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेने तात्काळ सासवड पोलीस स्टेशनला कळविले असताना, पोलिसांनी लगेच शेजारील हॉटेल व्यवसायिक यांना सदर एटीएम ठिकाणी जाण्यासाठी कळवले व त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी आले असता, सदर इसमाला आजूबाजूला शोध घेतला असता, सदर हा इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता, त्या ठिकाणी पोलिसांनी सदर एटीएम चे शटर खाली ओढून, त्या ठिकाणी बंद केले, तर त्या बँकेत स्टाफ सह गेलं असता एटीएमची पाहणी केली असता, त्यावेळी एटीएम चे शटर चे पैशाचा कप्पा उचकटलेला दिसून आला, त्या ठिकाणी एजन्सीने सदरची एटीएम मधील कॅश दुपारी 15 वाजता मोजली ती बरोबर असल्याचे त्या ठिकाणी कळून आले, या प्रकाराबाबत सदर प्रकाराबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवले असता, एटीएम चे जे काही नुकसान केले म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अज्ञात विरोधामध्ये कायदेशीर तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सागर तात्यासो भोजने वय 38 वर्ष धंदा मॅनेजर, बँक ऑफ बडोदा भिवरी शाखा तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यात मोक्यासह 15 गंभीर गुन्ह्यात दाखल असलेला तर तीन गुन्ह्यासह फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर जेरबद्ध पुणे ग्रामीण एटीएसची कारवाई सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे ग्रामीण भागातील दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस सोमवार दि.22 जून रोजी सासवड येथून जबरी चोरी खंडणी खुणाचा प्रयत्न याप्रमाणे दाखल असलेल्या शिरूर ,सासवड, जेजुरी या तीन पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दिगंबर ऊफॅ दिगया दशरथ शेडकर वय 28 वर्ष राहणार चांबळी ता. पुरंदर यास जेरबद्ध केलेले आहे, तीन आक्टोंबर 2025 रोजी फिर्यादी सुरज अनिल जाधव राहणार बेलसर तालुका पुरंदर यांनी ट्रांसफार्मर बंद केला नाही, म्हणून त्यांना आरोपी दिगंबर शेंडकर व त्याची तीन साथीदार यांनी लोखंडी रोड व कोयत्याने मारहाण करून, गंभीर अशी दुखापत केली होती, त्यानंतर तो फरार झालेला होता, त्यानंतर दि. नऊ मार्च 2026 रोजी सोनोरी येथील हॉटेल व्यावसायिक राहुल सुभाष काळे राहणार सोनोरी ता. पुरंदर यांची सोनोरी येथील हॉटेलवर आरोपी दिगंबर शेंडकर व त्याचे साथीदार यांनी मालक व कामगार यांना दमदाटी शिवीगाळ व लाकडी दांडक्याने मारहाण करून, हॉटेलच्या काउंटर मधील बत्तीस हजार रुपये जबरदस्तीने नेले होते, तसेच सदर हॉटेल व्यावसायिक यासहित यापूर्वी धमकावून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये खंडणी पोटी घेतले होते ,त्यानंतर दिनांक 19 मार्च 2026 रोजी मांडवगण पराठा तालुका शिरूर येथे क्रिकेट ग्राउंडवर बॅनर वरील फोटो लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये फिर्यादी अमोल आनंदा चौगुले राहणार मांडवगण फराटा यांच्यावर आरोपी दिगंबर शेंडकर व त्याचे सहा साथीदार यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने पिस्तूल मधून फायरिंग करून पळून गेले होते, या घटनाबाबत आरोपी दिगंबर शेंडकर यांच्यावर जेजुरी पोलीस स्टेशनला गंभीर अशी गुन्हे सासवड पोलीस स्टेशनला जबरी चोरी खंडणी व शिरूर पोलीस स्टेशनला खुणाचा प्रयत्न याप्रमाणे गंभीर असे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते, सदर गुन्ह्यांमध्ये तो फरार असल्याने, पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके त्याच्या मार्गावर होती परंतु ,तो वेशांतर करून राहण्याची ठिकाणे बदलून राहत असल्याने, पोलिसांना घोंगारा देत होता दिगंबर उर्फ दिग्या शेडकर हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी राजगड, जेजुरी, सासवड व शिरूर पोलीस स्टेशनला खून करण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी खंडणी, आर्म ॲक्ट व मोका यासारखे एकूण 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, दिगंबर शेंडकर हा अवैध अग्निशस्त्र विक्री करणारे गुन्हेगार यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुणे ग्रामीण एटीएस पथकासह मिळाली होती, सदर माहितीप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी त्याचा शोध घेण्यासाठी एटीएस पथकाची नेमणूक केलेली होती, त्याप्रमाणे सदर पथकाने त्याची माहिती काढून त्यांच्यावर पाळत ठेवून वेशांतर करून त्यास सासवड तालुका पुरंदर येथून त्याला ताब्यात घेतलेले आहे, सदर आरोपी यास फरार राहण्याकरिता कोणी कोणी मदत केली? त्याच्या संपर्कात कोण होते ,याबाबत पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे, सदर कामगिरी ही पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार व बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड ,निलेश कदम, विशाल गव्हाणे व पोलीस अंमलदार मोहसीन शेख, ओंकार शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे.

Image

वीर गावचे सुपुत्र इंडियॅन मिलेटरी अकॅडर्मी) मध्ये लेफ्टनंट श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, वीर यांचेवातीने मंदिरामध्ये वीर गावचे सुपुत्र चि. पार्थ मीनाक्षी अमोल समगीर यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे. चि. पार्थ समगीर यांनी UPSC CDS (संयुक्त (संयुक्त सेवा परीक्षा) मधून IMA (इंडियॅन मिलेटरी अकॅडर्मी) मध्ये लेफ्टनंट पदी निवड झालेली आहे ही बाब अभिमानाची व कौतुकाची असल्याने आज श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान वीर येथे संपूर्ण कुटुंबाचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त व सर्व विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व भाविक ग्रामस्थ उपस्थित होते. देवस्थानच्या वतीने विराज धुमाळ, अमोल आ.धुमाळ, प्रसाद धुमाळ, सुनील धुमाळ, काशिनाथ धुमाळ, प्रमिला देशमुख, छाया समगीर,अमोल धों. धुमाळ, बाळासाहेब समगीर, उपस्थित होते.

Image

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील एम. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल, सासवड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व योग दिनाच्या महत्त्वाविषयी माहिती देऊन करण्यात आली.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला. योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन करण्यात आले.शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांनी योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले तर ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब येळे यांनी योगसाधना व त्याचा इतिहास सांगितला.सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून योग दिनाचा आनंद घेतला.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा शिक्षक नितीन ठोंबरे व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील हॉटेल मोहिनी समोरील व भोंगळे वाईन समोरील भर रस्त्यामध्ये वाहने लावून रहदारीस अडथळा निर्माण केल्यामुळे ; सासवड पोलिसांची दोन जनावर धडक कारवाई व गुन्हे दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील 20 जून रोजी दुपारी 14:00 वाजता सुमारास सासवड गावच्या हद्दीतील कोंढवा ते सासवड रोडवरील हॉटेल मोहिनी समोरील चार चाकी वाहन नंबर एम एच बारा यु एम 5439 या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व पायी चालणाऱ्या सामान्य नागरिकांना धोका असा उत्पन्न होईल, अशा परिस्थितीमध्ये धोकादायक करीत या वाहन उभे करून, थांबवल्यामुळे आरोपी मयूर सदाम कुंभारकर वय 30 वर्ष राहणार उदाचीवाडी तालुका पुरंदर त्यांच्यावर फिर्यादी संतोष गोरक्ष शिंदे पोलीस हवालदार यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे ,तर सासवड गावच्या हद्दीमधील मधील सासवड ते बोपदेव घाट रोडवरील भोंगळे वाईन समोरील 20 जुन रोजी 17:00 वाजता चार चाकी ग्लाजा कान नंबर एम एच बारा यु एफ 4572 हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना पायी चालणाऱ्या लोकांना धोका उत्पन्न होईल, अशा परिस्थितीमध्ये रोडवरील धोकादायकरीत्या गाडी उभी करून, थांबवल्याच्या कारणामुळे आरोपी जयदीप बाळकृष्ण निगडे वय 34 वर्ष राहणार हनुमान चौक जेजुरी तालुका पुरंदर यांच्यावर फिर्यादी संतोष गोरख शिंदे पोलीस हवालदार यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अभिजीत कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.

आरटीआय नियम २०२६ विरोधात पुरंदरमधील माहिती अधिकार कार्यकर्तेआक्रमक; नियम रद्द करण्याची मागणी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासनाने १२ जून २०२६ पासून लागू केलेल्या महाराष्ट्र माहिती अधिकार (आरटीआय) नियम २०२६ विरोधात पुरंदर तालुक्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पुरंदर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पुरंदर तहसील कार्यालयात एकत्र जमून नव्या नियमांना तात्काळ स्थगिती देण्याची अथवा ते रद्द करण्याची मागणी करण्याचे निवेदन मुख्यमंत्री, मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयोग यांना मेल करून निवेदन पाठवण्यात आले. तसेच तालुका स्थरावर आमदार, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याच वेळी मुबई येथील आजाद मैदानावर होणाऱ्या एकदिवशीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाण्याचे नियोजन हीं करण्यात आले. त्यात सर्व कार्येकर्ते जाणार असल्याचेही ठरवण्यात आले. या वेळी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन, पुरंदर तालुक्यातील एस. डी भोसले, कुंडलिक भोसले, नंदकिशोर कामठे, बाळासाहेब लेंडे, अविनाश जाधव, नवनाथ फडतरे, योगेश पवार, ए. टी. माने, उदय गायकवाड व इतर जेष्ठ नागरिक यानी निवेदन दिले.

Image

बाल विकास मंदिर शाळेत योग दिन उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील म. ए. सो. बाल विकास मंदिर, येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शाळेच्या आचार्य अत्रे सभागृहात विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे सर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापकांनी योगाचे महत्त्व विशद केले. योगामुळे शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.तसेच नरेद्र महाजन,स्वाती बोरावके,अमृता जगताप आणि क्रीडा शिक्षक नितीन ठोंबरे यांनी विविध योगासने व प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडून करून घेतली.या कार्यक्रमात इयत्ता तिसरी व चौथीच्या एकूण 335 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, पद्मासन यांसारख्या योगासनांसह सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक शेंडकर यांनी केले. योग दिनाचे महत्त्व व इतिहास याविषयीची माहिती दीपक कांदळकर यांनी विद्यार्थ्यांना दिली. आभार सुरेखा ओव्हाळ यांनी मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. योग दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व आरोग्यवर्धक ठरला.

Image

एमएसबीटीई उन्हाळी २०२६ परीक्षेत साबळे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी (पॉलिटेक्निक व डिग्री), सासवड येथील विद्यार्थ्यांनी एमएसबीटीई उन्हाळी २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत द्वितीय वर्ष डी.फार्मचा निकाल शंभर टक्के लागला असून, विद्यार्थ्यांनी गुणवत्तायादीतही आपला ठसा उमटविला आहे.प्रथम वर्ष डी.फार्म (डिग्री) विभागामध्ये सलोनी हनुमंत निंबाळकर हिने ८४.५० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. प्रीती त्र्यंबक जप्ताप हिने ८१.१० टक्के गुणांसह द्वितीय, तर संजना देवदास साबळे हिने ७९.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.द्वितीय वर्ष डी.फार्म (डिग्री) विभागातून वंदना बाळासाहेब गरुड हिने ८७.३६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. दिशा विजय कुंभारकर हिने ८५.२७ टक्के गुणांसह द्वितीय, तर ईशा विजय कुंभारकर हिने ८४.८२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला.महाविद्यालयाच्या पॉलिटेक्निक विभागातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. प्रथम वर्ष डी.फार्ममध्ये श्रेया संतोष पोमण (८५.१०%), वैष्णवी वैभव कुंभार (८२.५०%) आणि श्रुतिका सोमनाथ वाचकल (८१.५०%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय वर्ष डी.फार्ममध्ये प्रांजल शेखर कांबळे (८५.३६%), मानसी नंदकुमार कुंजीर (८५.००%) आणि मानसी बाबू धुमाळ (८४.१८%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर हे यश संपादन केल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे हे यश प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Image

योग दिनानिमित्त साबळे कॉलेज ऑफ फार्मसीत जनजागृती कार्यक्रम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलिटेक्निक, सासवड येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात विशेष योग व आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना "Yoga for One Earth, One Health" ही असून त्यानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि तणावमुक्त जीवनासाठी योगाची उपयुक्तता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे फॅसिलिटेटर श्री. हृषीकेश शाह हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी योग, प्राणायाम, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणी यांचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना विविध योगासने व श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी निरोगी व संतुलित जीवनासाठी नियमित योगाभ्यासाचा अंगीकार करावा, असे आवाहन केले. तर उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार यांनी योगामुळे मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता आणि सकारात्मकता वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण, पॉलिटेक्निक विभागाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड, उपप्राचार्या डॉ. स्मिता पवार, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प करून निरोगी जीवनाचा संदेश दिला.

Image

कर्तव्यदक्ष पोलीस उपायुक्त अतुल झेंडे व त्यांच्या सहकार्याच्या कार्याची कल्याण डोंबिवली महापालिकेकडून (KDMC) दखल (सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमुखाने मंजूर केला अभिनंदनाचा ठराव) अतुलनीय व दबंग कामगिरीबद्दल पुरंदर वाशियांकडून कौतुकाचा वर्षाव सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: कल्याण डोंबिवली शहरातील अंमली पदार्थांविरोधातील धडक कारवाईमुळे चर्चेत कल्याण डोंबिवलीचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल आता थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिका महासभेत घेण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महासभेत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन देत हा ठराव एकमुखाने मंजूर केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने केलेल्या गौरवाबद्दल पुरंदर वाशियाकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत असून सोशल मीडियाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पोलीस प्रशासनाने शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कविरोधात मागील काही महिन्यांपासून विशेष मोहीम उघडली आहे. या मोहिमेत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध भागांत धाडसत्र राबवत अनेक आरोपींना मकोका कायद्याअंतर्गत अटक केली असून, कोट्यावधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील व्यसनमुक्ती मोहिमेला बळ मिळाले असून, तरुण पिढीला व्यसनाच्या गर्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन गंभीरपणे काम करत असल्याचे दिसून येत आहे.शहरातील अनेक भागांत अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन वाढत असल्याबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. विशेषतः तरुणांमध्ये वाढणारे व्यसन हे पालकांसाठी चिंतेचे कारण बनले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केवळ कारवाईच नाही, तर माहिती संकलन, गुप्त तपास आणि स्थानिक पातळीवर समन्वय साधत अंमली पदार्थांविरोधात मोठी मोहीम उभारली. या मोहिमेत पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक संशयितांचे जाळे उघडकीस आणले. परिणामी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवरही मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे बोलले जात आहे.महासभेत या विषयावर चर्चा होत असताना अनेक नगरसेवकांनी पोलीस प्रशासनाच्या सामूहिक कामगिरीचे कौतुक केले. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस विभाग करत असलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सदस्यांनी नमूद केले. अंमली पदार्थांविरोधातील कठोर कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही सभागृहात सांगण्यात आले.पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पोलीस प्रशासनाने विविध गुन्हेगारी कारवायांविरोधात सातत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई, संशयितांवर लक्ष आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी घेतलेले निर्णय यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या यशामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक पोलीस कर्मचारी आणि तपास पथकातील सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.महापालिकेच्या महासभेत मंजूर झालेला अभिनंदनाचा ठराव हा केवळ एका अधिकाऱ्याच्या कार्याचा गौरव नसून, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी शहराला व्यसनमुक्त व सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांची अधिकृत दखल मानली जात आहे. या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलाचे मनोबल उंचावले असून, भविष्यातही अंमली पदार्थांविरोधातील मोहिम अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत असून, शहरात अशाच धडक कारवाया सातत्याने सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Image

फडणवीस सरकारचा मोठा निर्णयसरकारी जागेची परस्पर मालकीनोंदवणाऱ्यांना दणकाभाडेपट्टा नोंदीवर आता‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार !भाडेपट्टाधारकांची नावे 'इतर हक्कात' नोंदविणारतीन महिन्यात नोंदी अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेशमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई, दि. 20 राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या भाडेतत्वावरील शासकीय जमिनीवर स्वतःचीच मालकी सांगणाऱ्या संस्था, कंपन्या, प्राधिकरणे तसेच व्यक्तींना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दणका दिला आहे. आता अशा सर्व भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या अधिकार अभिलेखात 'कब्जेदार' म्हणून केवळ 'महाराष्ट्र शासन' हीच नोंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जारी केले असून, संपूर्ण राज्यात पुढील तीन महिने विशेष मोहीम अशा नोंदी तपासून त्या कब्जेदार म्हणून महाराष्ट्र शासनाच्या नावावर करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. शासनाकडून अनेक व्यक्ती किंवा संस्थांना ३०, ९९ किंवा ९९९ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी जमिनी भाडेकरारावर दिल्या जातात. मात्र, या जमिनींच्या कब्जेदार रकान्यात (सदरी ) रमहाराष्ट्र शासनाच्या नावाऐवजी शासनाच्या परवानगीशिवाय भाडेपट्टा धारकांचीच नावे लागल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रीतसर नोंदी न घेतल्याने, अनेक भाडेपट्टाधारक या सरकारी जमिनी स्वतःच्याच मालकीच्या (खासगी) असल्याचे गृहीत धरत आहेत, ज्यातून अनेक न्यायालयीन प्रकरणे उद्भवत आहेत. हा 'खासगी' मालकीचा खेळ मोडून काढण्यासाठी आता सरकारने थेट कारवाईचा बडगा उगारला असून, भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनींच्या अधिकार अभिलेखातील कब्जेदार सदरी आता केवळ महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद असणे बंधनकारक करण्यात आले आहे. *भाडेपट्टाधारक आता 'इतर अधिकारात'* भाडेपट्टाधारकाचे नाव, भाडेपट्टयाचा कालावधी आणि ज्या अटींवर जमीन दिली आहे, त्याची नोंद आता 'इतर अधिकार' या सदरी घेण्यात येईल.*३ महिन्यांचा अल्टीमेटम* सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ विशेष मोहीम हाती घेऊन, रितसर कार्यपद्धती अवलंबून अवघ्या तीन महिन्यांत या सर्व अद्ययावत नोंदी घ्याव्यात. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंमलात येण्यापूर्वी कोणत्याही कायद्याखाली कायमस्वरुपी अथवा नूतनीकरणाचा पर्याय देऊन ५० वर्षांच्या मुदतीसाठी दिलेल्या भाडेपट्ट्यांना संहितेच्या कलम २९ (३) क नुसार 'भोगवटादार वर्ग-२' च्या तरतुदी लागू होतील. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा भाडेपट्टा सदरी ३० दिवसांच्या आत 'भोगवटादार वर्ग-२' अशी नोंद घेऊन शासनाला अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत. *• मुंबईतही आवळल्या नाड्या* मुंबई शहरासाठी लागू असलेल्या नियमांनुसार, अस्तित्वात असलेल्या सर्व पट्ट्यांच्या हस्तांतरणाच्या निर्बंधांबाबतच्या नोंदीदेखील मुंबई शहरातील शासकीय जमिनीच्या अधिकार अभिलेखात तात्काळ घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी जमिनींवर मालकी हक्क सांगणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. *कोट*"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, अचूक आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला जात आहे. शासकीय भाडेपट्टा जमिनींच्या नोंदींबाबत राज्यभर एकसमान आणि स्पष्ट प्रणाली निर्माण करण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. यामुळे शासनाच्या मालकीच्या जमिनींबाबतची माहिती अधिक अचूक होईल, अनावश्यक वाद कमी होतील आणि महसूल व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.•चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री—-

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारामध्ये हुक्का बारवर पोलिसांचा छापा ; तर दोगाविरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल 25 हजारापेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ऑस्करवाडी तालुका पुरंदर येथील द वॉटर पाईप या हॉटेलमध्ये दि.20 जून रोजी 00: 35 वाजताच्या सुमारांमध्ये 1) शुभम महेश ढमे वय 29 वर्षे सध्या राहणार कदम प्लाझा भारतीय विद्यापीठ कात्रज पुणे मूळ राहणार सुतार नेट कसबा बारामती तालुका बारामती 2)मिनहजुल जाहीदुल इस्लाम वय 24 वर्ष सध्या राहणार द वॉटर पाईप हॉटेल आस्करवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे राहणार साउथ 24 परगाना पश्चिम बंगाल हे ग्राहकांना धूम्रपणासाठी अवैधरित्या हक्का पुरवून त्या ठिकाणी हुक्का बार चालवताना आढळून आले, त्यांच्याकडून 3000 रुपये रोख रक्कम, 22 हजार 800 रुपये चा मुद्देमाल असा एकूण 25 हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. म्हणून फिर्यादी सचिन सुरेश किवळे सासवड पोलीस कॉन्स्टेबल यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 चे कलम 4 अ 21 अ अन्वय कायदेशीर फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दिलेली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनायक हाके हे पुढील तपास करीत आहेत.

Image

सिद्धेश्वर तलाव परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८ जणांवर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलिसांनी सिद्धेश्वर तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३ लाख ८१ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २७२/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल किरण हनुमंत तुपे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने जुना कोडीत रोड, सिद्धेश्वर मंदिर रोड परिसरातील शेतामध्ये छापा टाकला. यावेळी आठ जण तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले.कारवाईदरम्यान १ लाख ४८ हजार ४१० रुपये रोख रक्कम, २ लाख ३३ हजार रुपयांचे सहा मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे पत्त्यांचे आठ कॅट जप्त करण्यात आले.या प्रकरणी भरत बबन मोडक, मंगेश रमेश खपर्डे, पुरुषोत्तम गणपत जाधव, चंद्रकांत शंकर भिंताडे, रतन आप्पा बडधे, दत्तात्रय साहेबराव वायकर, निलेश बाळासाहेब जगताप आणि निरंजन संभाजी गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोसई अर्चना पाटील, पोहवा जाधवर, पोहवा खेंगरे, पोहवा किर्वे तसेच सासवड पोलीस स्टेशनच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोसई अर्चना पाटील करीत आहेत.

Image

​भिवरी येथे खरीप पूर्व नियोजन ,'एल निनो आणि खेत बचाव मोहीम' शेतकरी बैठक उत्साहात संपन्न तर​बीबीएफ तंत्रज्ञान, आधुनिक फळबाग व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : भिवरी (ता. पुरंदर) ​प्रस्तावना / पार्श्वभूमी:​ भिवरी येथील प्रसिद्ध श्रीनाथ गोसावी बुवा मंदिर या ठिकाणी आगामी खरीप हंगामाचा आढावा व पूर्व नियोजनासाठी विशेष शेतकरी सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषी अधिकारी (पुरंदर) व मंडळ कृषी अधिकारी (सासवड) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत 'एल निनो व खेत बचाव मोहीम अभियान' अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रमाणावर तांत्रिक व व्यावहारिक जनजागृती करण्यात आली. ​या कार्यक्रमाला कृषी विभागातील विविध तज्ज्ञ अधिकारी व कृषी मार्गदर्शक प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी खरीप हंगामाच्या दृष्टीने निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आणि मोलाचे तांत्रिक मार्गदर्शन केले. ​तज्ज्ञांचे मार्गदर्शन व महत्त्वाचे मुद्देः​ एल निनो, सरीवरंबा व बीबीएफ (BBF) तंत्रज्ञान​मार्गदर्शक: गणेश जगताप (उपकृषी अधिकारी - सासवड) ​प्रमुख मुद्दे:​'एल निनो' प्रभावाचा शेतीवर व पावसाच्या प्रमाणावर होणारा परिणाम त्यांनी सविस्तर समजावून सांगितला. एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहणे किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. ​अशा प्रतिकूल परिस्थितीत कमी पाण्यात व कोरड्या हवामानात पिकांचा बचाव कसा करावा आणि शेतामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी, तसेच जास्त पाऊस झाल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धति व बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पेरणी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. ​कमी पाऊस झाल्यास सरीमध्ये पाणी साठून गादीवाफ्यावर ओलावा टिकून राहण्यास मदत होते, गादीवाफ्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, पिकांची एकरी रोपांची संख्या मर्यादित ठेवता येते आणि बियाण्याच्या खर्चात बचत होते. ​या पद्धतीमुळे एकंदरीत उत्पादनात २५% पर्यंत वाढ होते, असे सांगून बैठकीत शेतकऱ्यांना सरीवरंबा आणि बीबीएफ पेरणीचे थेट प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आले. ​यासोबतच पाऊस उशिरा झाल्यास कमी कालावधीची पिके घेण्याबाबत आणि उन्हाळी हंगामातील सीताफळ बागेमध्ये पाचट आच्छादन करणे, ठिबक सिंचनाचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे तसेच सेंद्रिय व गांडूळ खतांच्या वापरातून जमिनीचे सेंद्रिय कर्ब वाढवून जमीन सुपीक व उत्पादक करण्याविषयी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ​जैविक कीटकनाशके व बीजप्रक्रिया​मार्गदर्शक: अतुल हिंगणे (मार्गदर्शक, पाणी फाऊंडेशन) ​प्रमुख मुद्दे:1​शेतकऱ्यांना घरच्या घरी अत्यंत कमी खर्चात दशपर्णी अर्क कसा बनवावा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले व त्याचे पिकांवरील विविध फायदे समजावून सांगितले. ​यासोबतच त्यांनी बियाणांची बीजप्रक्रिया व बीज उगवण क्षमता तपासण्याच्या सोप्या पद्धतींविषयी देखील सविस्तर माहिती दिली. फळबाग व्यवस्थापन व हुमणी नियंत्रण​मार्गदर्शक: कोंडीबा जरांडे (सहायक कृषी अधिकारी) ​प्रमुख मुद्दे: तीन दुणै​टंचाई व दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा कशा प्रकारे जगवाव्यात आणि त्यांचे पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसे करावे, यावर मोलाचा सल्ला दिला. ​तसेच खरीप हंगामातील मुख्य शत्रू असलेल्या हुमणी अळीचे प्रभावी नियंत्रण कसे करावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. ​शासकीय कृषी योजना व बीज क्षमता​मार्गदर्शक: विजय जाधव (सहाय्यक कृषी अधिकारी) ​प्रमुख मुद्दे:चार​कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध शासकीय व अनुदानित योजनांची माहिती दिली. ​खरीप हंगामात बियाणांची होणारी संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी बाजारातून आणलेल्या बियाणांची बीज प्रक्रिया व बीज उगवण क्षमता घरच्या घरी तपासणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. ​५. कीड व पीक संरक्षण​मार्गदर्शक: कुमारी शुभांगी रासकर (सहाय्यक कृषी अधिकारी) ​प्रमुख मुद्दे:पाच​रासायनिक कीटकनाशकांचा अवाजवी वापर टाळून पिकांवरील रसशोषक किडींच्या प्रभावी व नैसर्गिक नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा (Sticky Traps) वापर कसा करावा, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ​नियोजन व ग्रामस्थांची उपस्थितीः​कार्यक्रम आयोजन: या अत्यंत महत्त्वपूर्ण व अभ्यासपूर्ण कार्यक्रमाचे नेटके आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी (भिवरी) कुमारी ऐश्वर्या मिंड यांनी केले होते. ​प्रमुख उपस्थिती: या प्रसंगी 'आत्मा' च्या (तंत्र व्यवस्थापक) श्रीमती स्मिता वरपे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. ​उपस्थित मान्यवर व ग्रामस्थ: या बैठकीला भिवरी गावाचे माजी सरपंच श्री. संजय कटके, कृषी मित्र, कृषी सेवा केंद्राचे प्रतिनिधी, श्रीनाथ शेतकरी बचत गटाचे सर्व सदस्य, तसेच भिवरी व परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ​शेतकऱ्यांची प्रतिक्रिया: आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत दिशादर्शक, माहितीपूर्ण आणि फायदेशीर ठरली, अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Image

निधन वार्ता भुजंगबापू जगताप सासवड ता. १९ : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवा निवृत्त सचिव सूर्यकांत बाबुराव तथा भुजंगबापू जगताप (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.ग्रंथपाल माधवी माणिकराव शिळीमकर व माध्यमिक शिक्षिका वैजयंती राजेंद्र पायगुडे यांचे ते वडील तर सासवड येथील माणिकराव शिळीमकर, राजेंद्र पायगुडे यांचे ते सासरे होते. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांचे ते चुलते होत.

Image

अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे येथे १५ जून २०२६ रोजी शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गोपीचंद आल्हाट समाज कल्याण निरीक्षक सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण पुणेसदर गोपीचंद आल्हाट , गृहप्रमुख पद्मा सुतार, गृहपाल रमेश कोरे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळा प्रवेश उत्सव अंतर्गत प्रवेशद्वारापासून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून वाजत गाजत शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना स्वागत म्हणून वेलकम किट व गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच सेल्फी पॉईंट मध्ये सदर विद्यार्थ्यांचे फोटो काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाळेतील नाविन्यपूर्ण STEM FUTURISTIC LAB चे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित प्रमुख पाहुणे व पालक यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण घेण्यात आले.तसेच सहाय्यक शिक्षक प्रशांत धेंडे यांनी नवप्रवेशित विद्यार्थी व पालक यांना शाळेविषयीची व समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. पद्मा सुतार यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व मुख्याध्यापिका विमल खाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षक यांच्या सहकार्याने आपण निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना घडवू असे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका अंजली बासुतकर यांनी केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय जनता पार्टीचे सासवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते बाळासाहेब इटकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बाळासाहेब इटकर सध्या वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळलेली आहे. भटके विमुक्त समाजाबद्दल त्यांच्याकडे सखोल अभ्यास आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना ही जबाबदारी पुन्हा एकदा दिलेली आहे. भटक्या विमुक्त समाजातील लोकांकरता तांडा सुधार प्रकल्पांतर्गत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा व प्रत्येक भटक्या समाजातील लोकांना ओळखपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे , भाजप नेते,बाबाराजे जाधवराव जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीशआप्पा जगताप, जेजुरी देवसंस्थान समितीचे अध्यक्ष अॅड. विश्वास पानसे, सासवड मंडल अध्यक्ष आनंद भैय्या जगताप, सरचिटणीस उदयनराज जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनकाका भैरवकर, वीरेश दहिवले भगवान पवार आदी मान्यवरांनी बाळासाहेब इटकर यांचीभाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,600दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                      पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.17 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,600 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,600 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,500 तर सरासरी 4,550 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300तर दोन नंबरच्या गहू ला किमान 3,000 तर सरासरी 3,150 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, बाबा पवार ऋषिकेश  ट्रेडिंग, शैलेश विरकर, गुळाला 4,500 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,46 बॉक्स  1,09क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,000 कमाल दर 4,500रुपये तर साधारण4,250 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 3,500,5,600,4,550. बाजरी 2,700,3,200, 2,950. गहू 3,000,3,300,3,150. तांदूळ ---------------------------------- हरभरा 5,500, 5,700,5,600.

Image

पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ घाटामध्ये तरुण-तरुणींना लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना फक्त बारा तासाच्या आत मध्ये बेड्या घातल्या फुरसुंगी पोलिसांची उत्तम कामगिरी                                                  सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज                                         कानिफनाथ गडा मधील घाटाच्या सिटी व्ह्यू पॉईंट परिसरामध्ये तरुण-तरुणी वर लाठ्या काठ्या आणि दगडाने हल्ला करून ,त्यांना लुटणाऱ्या तीन आरोपींच्या मुस्क्या फक्त फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत आवळल्या प्रतीक दिलीप फडतरे वय 22 धंदा रसवंती गृह राहणार बोपगाव तालुका पुरंदर ,ओंकार सुनील फडतरे वय 27 धंदा शेती राहणार बोपगाव तालुका पुरंदर ,गणेश नवनाथ कामठे वय 27 धंदा शेती राहणार चांबळी चिलवाडी वस्ती तालुका पुरंदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, आरोपीकडून पोलिसांनी स्प्लेंडर मोटरसायकल आणि लुटलेले मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मंगळवारी दि.11 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण हा त्याचे मित्र आकाश, अथर्व आणि एक मैत्रीण यांच्यासमोर दोन ऍक्टिवा दुचाकी वरून, कानिफनाथ मंदिराच्या हद्दीतील सिटी व्ह्यू पॉईंट जवळ निसर्ग पाहण्यासाठी आले होते ,यावेळी तरुण-तरुणींना रस्त्यात आडवून वरील आरोपींनी हुज्जत घालत लाथा बुक्क्यांनी आणि रस्त्यावरील दगडाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, आरोपींनी फिर्यादी आणि त्याचा मित्र आकाश यांच्याकडून 15,000 रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल हँडसेट आणि ऑनलाईन जबरदस्तीने घेतले 13,300 रुपयाची रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल धाक दाखवून लुटला आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते, या घटनेची फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी तात्काळ  गांभीर्य लक्षात घेऊन ,पोलीस पथकाला शोध घेण्याच्या सूचना दिल्या, दरम्यान त्यानुसार पोलीस अंमलदार हेमंत कामथे आणि सागर वनवे यांच्या गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच हवालदार जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता हे तिघेही कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी बोपगाव येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले.वरिष्ठांच्या आदेशाच्या नुसार फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने कानिफनाथ पायथा बोपगाव परिसरात वेळा दिला आणि संशयतांना ताब्यात घेतले पोलिस खाक्या दाखवतातच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, सदरची कामगिरी फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बापूसो खंदारे सहाय्यक पोलीस फौजदार कदम ,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वनवे हेमंत  कामथे,योगेश गायकवाड आणि गणेश शिंदे यांनी केली आहे. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे पुढील तपास करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशनची जुगार अड्ड्यावरील मोठी कारवाई                                 सासवड प्रतिनिधी :   बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                              16 जून रोजी दुपारी 16: 30 वाजता सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली असता, मोजे वनपुरी ता. पुरंदर येथील गावच्या हद्दीमध्ये शंभुराजे चौक येथील हॉटेल कुंभारकर फार्मचे पाठ्या मागील बाजूमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये काहीसं जुगार खेळत असताना अशी बातमी मिळताच पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून ,त्यांना कारवाईचे आदेश दिले असता, सदर ठिकाणी छापा टाकला असता ,इसम नामे एक गणेश बबन कुंभारकर वय 38 वर्ष जुगार अड्डा चालक राहणार वनपुरी ता. पुरंदर सचिन शिवाजी कामठे वय 35 वर्ष राहणार कुंभारवळण तालुका पुरंदर, दत्तात्रय तुकाराम कुंभारकर वय 61 वर्ष राहणार वनपुरी ता. पुरंदर ,राजेंद्र सुदाम हगवणे वय 45 राहणार वनपुरी ता. पुरंदर, राजाराम रघुनाथ गायकवाड वय 51 वर्ष राहणार भिवडी ता. पुरंदर ,महेश दशरथ मोरे वय 43 वर्ष राहणार कुंभारवळण ता. पुरंदर हे जुगार खेळत असताना मिळून आले सदर कारवाई मध्ये एकूण 21 हजार 870 रुपये रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सदर आरोपीवर सासवड पोलीस स्टेशन गु.र.ना रजिस्टर नंबर 267/ 2026 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमनुसार कलम 4,5,6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस हवालदार सुहास लाटणे हे करीत आहेत,तर कारवाई दुसऱ्या ठिकाणी झेंडेवाडी ता. पुरंदर या ठिकाणी गावच्या हद्दीमधील हॉटेल्स ते एन्जॉय मध्ये काही इसम जुगार खेळत असताना माहिती पोलीस निरीक्षक यांना मिळाली असता, त्यावर सुद्धा कायदेशीर पद्धतीने पोलीस उपनिरीक्षक श्रीराम  पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून ,त्यांनी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, सदर पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने हॉटेलवर जाऊन रेड केली असता,1) विक्रांत अरुण कदम वय 38 वर्ष राहणार कवडे पाट लोणी काळभोर तालुका हवेली ,2)सचिन रामचंद्र भापकर वय 42 वर्ष राहणार उंड्री पिसोळी तालुका हवेली ,3) पवन दीपक खांबेकर वय 38 वर्ष राहणार लोणी काळभोर तालुका हवेली ,4) श्रीकांत धर्मराज बंधाले वय 38 वर्ष राहणार काळे कॉलनी हडपसर पुणे, 5) नितीन दत्तात्रय गाढवे वय 40 वर्ष राहणार थेऊर फाटा तालुका हवेली ,6) गौरव संजय शिंदे वय 46 वर्ष राहणार मगरपट्टा पुणे ,7) राहुल तुकाराम राजहेश वय 34 वर्ष राहणार कात्रज पुणे, 8)देवेंद्र रमेश कांबळे वय 45 वर्ष राहणार हडपसर पुणे, 9) रवींद्र नामदेव गायकवाड वय 51 वर्ष राहणार काळे पडळ हडपसर पुणे, 10 )अमर लक्ष्मण घाडगे वय 36 वर्ष राहणार कवडे पाठ माळवाडी तालुका हवेली, 11 )राजेंद्र  पोपट टिळेकर वय 42 वर्ष राहणार उरुळी कांचन तालुका हवेली, 12) सुनील प्रेम थारू जुगार अड्डा चालक वय 22 वर्ष राहणार झेंडेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे हे जुगार खेळत असताना मिळून आले आहेत ,सदर छाप्या मधील कारवाई मधील एकूण चार लाख 63 हजार 380 रुपये रोख रक्कम व मुद्देमालासह जप्त करण्यात आली असून, सदर आरोपीवर सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्यातील रजिस्टर नंबर 268/ 226 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम  4,5,6अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास अधिक हा पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे सासवड पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई ही संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती ,राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग मंडळ सासवड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष घोळवे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे , पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, पोलीस हवालदार जब्बार सय्यद ,पोलीस शिपाई सचिन किवळे, पोलीस शिपाई तुषार लोंढे ,पोलीस शिपाई अक्षय चिल्लर, पोलीस शिपाई यश अगस्ती ,महिला पोलीस शिपाई तेजस्विनी कोळी यांच्या पथकाने केली आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील पीएमटी स्टॉप जवळील भाजी मंडई येथून सोमवारी या दिवशी भाजीला गेलेल्या धनाजी नागणे यांच्या खिशातून मोबाईल अज्ञात चोरट्याने गायब केला सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील सोमवार या दिवशी सायंकाळी सात वाजताच्या सुमारांमध्ये पीएमटी स्टॉप जवळील सासवड भाजी मंडई येथे धनाजी अण्णासाहेब नागणे भाजी घेण्यासाठी गेले असता, त्यांच्या खिशात असणारा मोबाईल काही वेळाने त्यांनी त्यांच्या खिशात चेक केला असता, तो त्यांना मिळाला नाही, त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या लबाडीच्या इराद्यांमध्ये आर्थिक फायद्यासाठी फोनची चोरी केलेली आहे. त्यावेळी नागणे यांनी त्यांची पत्नी वृषाली हिच्या मोबाईलवरून त्यांच्या मोबाईलवर कॉल केला असता, तो बंद लागला त्यामुळे त्या संदर्भातून सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी धनाजी अण्णासाहेब नागणे वय 58 वर्षे व्यवसाय नोकरी (प्राचार्य) राहणार वृंदावन हाऊसिंग सोसायटी जयदीप मंगल कार्यालयाजवळ यांनी मोबाईल चोरीस गेल्या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. मोबाईलचे वर्णन पुढील प्रमाणे 50,000 हजार आयफोन 15 प्रो एप्पल कंपनीचा मोबाईल त्याचा आय एम ई आय नंबर 35 8197545483697 आय एम इ एम इ आय डी नंबर 35819754 4022330 असा असून, त्यांनी त्या संदर्भात सासवड पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जब्बार सय्यद हे पुढील तपास करीत आहेत.

बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बाल विकास मंदिर शाळा पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले. शासन नियमानुसार पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच गोड खाऊ दिला. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, मंजुषा चोरामले, शारदा यादव, पहिलीच्या वर्गशिक्षिका साधना राऊत , शितल चौधरी, अश्विनी कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यामधील भेसळयुक्त असा आमरस जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : राज्यांमधील भेसळखोरांचे प्रमाण दिवसोदिवस वाढत असल्याकारणाने, भेसळयुक्त पनीर, खवा, खाद्यतेल आणि बनावट औषधानंतर आता आंबा पल्प आमरस आणि पेढे मधूनही नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे, उघडकीस आलेले आहे, अन्न व औषध प्रशासनाच्या एफडीए कारवाईत पुणे जिल्ह्यात भेसळुक्त अंबा पल आणि आमरसाचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. वडगावशेरी परिसरामधील पेढे खाल्ल्यानंतर नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना सुद्धा गंभीर घडलेली असून, याप्रकरणी एफडीए संबंधित विक्रेत्याचा परवाना निलंबित_ केलेला आहे ,एएफडी ए प्रशासनाने पुरंदर तालुक्यातील सोनोरी येथील एम. एस .नेचर सिप फूड्स आंबा प्रक्रिया उद्योगावर छापा टाकत तपासणी केली असता ,त्यामध्ये पाच हजार 700 किलो सढलेले आणि कमी प्रतीचे आंबे आढळून आले ,या एफडीएने हा साठा नष्ट करण्यात आला असून, संशयित भेसळयुक्त 2431 किलो आंबा पल्प ही जप्त करण्यात आला आहे. तपासणीत गंभीर अशा त्रुटी आढळून आल्याने, एफडीएने संबंधित उत्पादकांचा परवाना निलंबित केला आहे. तसेच बोपगाव येथील आणखी एका आस्थापनामध्ये तपासणी दरम्यान 728 किलो पॅक बंद आणि सुटा हापूस आमरस जप्त करण्यात आला आहे. याबरोबरच वडगाव शेरी परिसरामधील पेढे खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर, एफडीएने संबंधित मिठाई विक्रेतेच्या दुकानाची तपासणी केली, पेढ्यांचे नमुने तपासणी साठी घेण्यात आले आहेत, या प्रकरणी 'मे गुरूनानक डेअरी अँड स्वीट्स' चा परवाना निलंबित केला असून, उत्पादकाला व्यवसाय बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत.अशी माहिती प्रतिनिधीला मिळाली आहे.

सरस्वती ज्ञान संस्था, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलला 'आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल पुरस्कार २०२६' प्रदानपुण्यातील सारथी सभागृह येथे आयोजित समारंभात सन्मान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : नेटवर्कशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सरस्वती ज्ञान संस्था, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-स्कूल विभागाला 'आदर्श प्री-स्कूल पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. पुण्यातील सारथी सभागृह येथे आयोजित विशेष समारंभात हा सन्मान देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भौयर, राज्यसभा खासदार प्राचार्य मेघाताई कुलकर्णी, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच शिक्षक आघाडी, पुणे शहरचे अध्यक्ष प्रा. सुनील मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते.हा पुरस्कार सरस्वती ज्ञान संस्था, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्री-स्कूल विभागाला प्रदान करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या प्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारला.सासवड व परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलने उल्लेखनीय योगदान दिले आहे. 'आरोग्य, संस्कार आणि शिक्षण' या त्रिसूत्रीवर आधारित शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यालयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय संस्कृती, परंपरा आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाते.विविध सण-उत्सवांचे आयोजन, पालकांसाठी व्याख्याने व चर्चासत्रे तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. या यशामध्ये सरस्वती ज्ञान संस्थापक श्रीकांत जगताप व किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल प्रिन्सिपल मनीषा जगताप आणि शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगत विद्यालय व्यवस्थापनाने सर्वांचे आभार मानले.पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रासह विविध स्तरांतून किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे. सरस्वती ज्ञान संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत जगताप व किलबिल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा श्रीकांत.

Image

‘आत्मवत् सर्वभूतेषु’च्या भावनेतूनच समरस समाजाची निर्मिती होईल : मेधा ताई कुलकर्णी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय शिक्षण मंडळाच्या युवा गतिविधी विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘अनुभूती शिबिर 4.0’ चा समारोप सोहळा अत्यंत दिमाखदार, प्रेरणादायी आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. देशभरातील २४ प्रांतांतून सहभागी झालेल्या युवक-युवतींच्या उपस्थितीत झालेल्या या समारोप सोहळ्याने राष्ट्रभावना, सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रेरक संदेश दिला.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या मंचारोहणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन आणि ध्येयश्लोकाच्या माध्यमातून समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. ध्येयवाक्याच्या सामूहिक उच्चारामुळे उपस्थित शिबिरार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ झाली.समारोप सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार आदरणीय मेधा ताई कुलकर्णी उपस्थित होत्या. स्वागत व परिचय सत्रात मंचावरील मान्यवरांचा परिचय करून देण्यात आला.यावेळी शिबिराधिकारी प्रा. अजय कुमार सिंह यांनी अनुभूती शिबिराच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेत प्रमुख उपक्रम, उद्दिष्टे आणि शिबिरातील उल्लेखनीय घडामोडींचा प्रभावी परिचय करून दिला. शिबिरामुळे सहभागींच्या व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, चिंतनशीलता आणि राष्ट्रनिष्ठ दृष्टिकोनाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाज आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी शिबिरार्थ्यांना केले.या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नवीन तसेच श्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशांचे वाचन करण्यात आले.यानंतर विविध शिबिरार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी सांगितले की, अनुभूती शिबिर हे केवळ प्रशिक्षण शिबिर नसून जीवनाला नवी दिशा देणारे परिवर्तनकारी अनुभवस्थान ठरले आहे. या शिबिरामुळे त्यांच्यात आत्मविश्वास, नेतृत्वक्षमता, सामाजिक संवेदनशीलता आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ. रवी चिटणीस यांनी आभार प्रदर्शन करताना शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे सर्व मान्यवर, आयोजक, कार्यकर्ते आणि शिबिरार्थी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.त्यानंतर श्री सचिनजी यांनी सादर केलेल्या एकल गीताने संपूर्ण वातावरण भावस्पर्शी आणि प्रेरणादायी झाले.समारोप सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्यसभा खासदार मेधा ताई कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर भाषण होय. त्यांनी युवकांच्या राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेवर, चारित्र्यनिर्मितीच्या महत्त्वावर आणि सामाजिक उत्तरदायित्वावर सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या, "'आत्मवत् सर्वभूतेषु' या भावनेतूनच समरस आणि सुसंवादी समाजाची निर्मिती होऊ शकते. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवाशक्ती ही सर्वात मोठी ताकद असून, युवकांनी आपले ज्ञान, कौशल्य आणि ऊर्जा समाजहित व राष्ट्रहितासाठी समर्पित करावी. सकारात्मक परिवर्तनाचे वाहक बनणे ही आजच्या पिढीची ऐतिहासिक जबाबदारी आहे."समारोप सत्राचे प्रमुख वक्ते माननीय बी. आर. शंकरानंदजी यांनी आपल्या प्रेरणादायी उद्बोधनात शिबिरार्थ्यांना जीवनात सतत गतिशील राहण्याचे आणि ध्येयपूर्तीसाठी पूर्ण समर्पणाने कार्य करण्याचे आवाहन केले. सामूहिकतेतच यश आणि शक्ती दडलेली असून सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अनुभूतीचा खरा उद्देश केवळ शिबिरापुरता मर्यादित न राहता, त्यातील मूल्ये जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आचरणात उतरविणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाचा समारोप सामूहिक कल्याण मंत्राने झाला. यावेळी सर्व शिबिरार्थ्यांनी राष्ट्र आणि समाजाप्रती आपली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला.देशभरातील २४ प्रांतांतून आलेल्या १११ शिबिरार्थ्यांनी या राष्ट्रीय शिबिरात सहभाग नोंदविला. त्यामध्ये ६५ युवक आणि ४६ युवतींचा समावेश होता.अनुभूती शिबिर 4.0’ च्या या समारोप सोहळ्याने सहभागींच्या मनात नवचैतन्य, सकारात्मक जीवनदृष्टी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागवली. अशा प्रकारे या दहा दिवसीय शिबिराच्या यशस्वी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय प्रवासाचा भावपूर्ण समारोप झाला.

Image

सोमवती अमास्येनिमित्त श्रीक्षेत्र वीर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्रीक्षेत्र वीर येथे आज सोमवार रोजी सोमवती अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे ४.३० वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळपासून देवस्थान ट्रस्ट व भाविकांतर्फे देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी १० वाजता देवाला भाविकांच्या दहीभाताच्या पूजा बांधण्यात आल्या. देऊळवाड्यात दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपारिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरु होता. सकाळी ११.३० वाजता धुपारती होऊन श्रीनाथांची पालखी छत्री, अब्दागिरी, ढोल, चवरी सोबत सर्व दागीनदार, सालकरी, भाविक भक्त, ग्रामस्थ यांच्या लवाजम्याजाहीत श्री क्षेत्र घोडेउड्डाण येथे नीरा स्नानासाठी गेली. पालखी मार्गावर देवस्थान मार्फत पिण्याचे पाणी, रस्त्यावर पाणी मारून उनाची दाहकता कमी करणेकामी पाणी टॅंकर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दुपारी विधिवत नीरास्नान होऊन श्रीनाथांची पालखी नेमहीप्रमाणे सायंकाळी देऊळवाड्यात झाली. महाप्रसादाचे आयोजन प्रभाकर मोरे , तात्या बुरुंगले, राउत, वाघमोडे, सुनील धुमाळ, संकेत जगताप यांचे मार्फत करण्यात आले होते. देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, लाईट व जनरेटर, दर्शनबारी, वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, जादा कर्मचारी, स्वयंसेवक, ट्रॅफिक पोलिस, इ. चे आयोजन करण्यात आल्याचे ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहन रावसो धुमाळ यांनी सांगितले. यावेळी विश्वस्तमंडळ, सहकारी, सल्लागार मंडळ मंदिरात उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई मोका व गंभीर गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी अटकेत सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलिसांची मोठी कारवाई मोका व गंभीर गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी अटके मध्ये गुन्ह्यातील तीन महिने गुंगारा देऊन सराईत असणारा फरार आरोपी हा अटकेत सदरील गुन्ह्यामध्ये अक्षय उर्फ गोटया संभाजी खेनट वय 27 वर्ष राहणार पिंपळे ता. पुरंदर जिल्हा पुणे हा आरोपी असून, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून, तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला होता, त्या संदर्भातील अल्पवयीन मुलीचे वडिलांनी सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती, सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील तीन महिन्यापासून फरार होता, तो वारंवार आपले लोकेशन बदलून वेगवेगळ्या ठिकाणी रहात असे, त्यामुळे त्याला पकडणे अवघड जात होते, तो फरार असतानाच त्याने सासवड पोलीस स्टेशन हद्दीमधील अशाच प्रकारचे गुन्हे केलेले होते, सासवड पोलीस स्टेशन गु.र. नं. 164/ 2026 भा.न्या.स कलम 110, 118 (1), 352, 351 (2) (3),3 (5) 2)सासवड पोलीस स्टेशन गु.र. नं. 260/ 2026भा.न्या.स. कलम 118 (1), 115(1), 126, 352, 351,( 2 )(3),3 (5) अशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले होते, त्यामुळे तो फरार होता त्या संदर्भात तांत्रिक माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदार यांच्या माहितीच्या आधारावर सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन त्याचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला पकडण्यात यश सासवड पोलीस स्टेशनला आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. 16 जून पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे. या आरोपीवर येरवडा पोलीस स्टेशन मध्ये, राजगड पोलीस स्टेशन, जेजुरी पोलीस स्टेशन दोन वेळा, सासवड पोलीस स्टेशन तीन वेळा विविध गुन्ह्यानुसार त्याच्यावर मोका व इतर गंभीर गुन्ह्यातील सराईत फरार आरोपी म्हणून गुन्हे दाखल आहेत, तर आज सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर 92/ 2026 भारतीय न्याय संहिता कलम 137( 2), 64, 64 (2)(एम) सह पोक्सो कलम 4,6,8,12 प्रमाणे विविध प्रकारे गुन्हे दाखल आहेत, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे, ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील, पोलीस शिपाई सचिन किवळे, पोलीस शिपाई तुषार लोंढे ,पोलीस शिपाई प्रवीण शेंडे यांनी सदरील कामगिरी करून त्या आरोपीस अटक केलेली आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे हे करीत आहेत.

Image

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे हॉर्न वाजवल्याने तरुणाला प्रचंड मारहाण ; तर तिघांवर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक.पुरंदर प्राईम न्यूज: हॉर्न वाजवल्याच्या किरकोळ कारणांमधून मोटरसायकल आडवी मारून, एका तरुणाला लाथा बुक्क्याने आणि दगडाने डोक्यात मारून ,जखमी करण्यात आलेची घटना बोपगाव ता. पुरंदर येथे घडली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तीन जणाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. गोटया उर्फ अक्षय संभाजी खेनट रा. पिंपळे ता. पुरंदर गणेश नवनाथ कामठे आणि प्रसाद मारुती कामठे दोघे रा. चांबळी ता. पुरंदर असे गुन्हा दाखल केलेले यांची नावे आहेत तर लक्ष्मण शिवाजी बालगुडे रा. मुरटी ता. बारामती यांनी या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पुढील तपासा सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार अविनाश होळकर हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील जमिनी खरेदी विक्री मधील व्यवहारातून 43 लाखाची फसवणूक यामध्ये ; तर वकिलाचीच फसवणूक ; तर सासवड पोलीस ठाण्यामध्ये पाच जनावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील जमीन व्यवहारांमध्ये भागीदारीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तब्बल 43 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणा विरोधामध्ये सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .मनीष दिलीप भागणे राहणार बुधवार पेठ पुणे, सागर नामदेवराव गरुड राहणार वारजे माळवाडी पुणे, अरुण हरिभाऊ मांजरे राहणार खेड शिवापुर तालुका भोर ,अमोल शिंदे राहणार पुणे आणि निलेश ज्ञानेश्वर गांगर्डे राहणार पिंपळे गुरव पुणे अशी गुन्हा दाखल झालेली यांची नावे आहेत ,तर एडवोकेट ज्ञानेश्वर सिताराम कराळे वय 59 राहणार देहुगाव तालुका हवेली यांनी याप्रकरणी फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराळे यांनी मेहुणे सागर गरुड यांच्या मध्यस्थीने मनीष भागणे यांच्यासोबत गजराज हे डेव्हलपर्स नावाने भागीदारी संस्था सुरू केली होती .भिवडी तालुका पुरंदर येथील गट क्रमांक 388 मधील जमीन खरेदीसाठी कराळे यांनी 43 लाख रुपये दिले होते . ही जमीन विसार पावतीने ताब्यात घेण्यात आली होती, मात्र मुख्य आरोपी मनीष भागणे (€याने कराळे यांची कोणतीही सहमती न घेता इतर आरोपींच्या नावे परस्पर कुलमुखतयारपत्र करून दिले या आधारे आरोपींनी जमिनीतील 42 आरक्षेत्र इतरांना विकून रक्कम आपापसात वाटून घेतली, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पैशाची मागणी केली असता आरोपींनी साडेतीन वर्षांपूर्वीच बंद झालेल्या बँकेच्या खात्याचा 35 लाख रुपयाचा बोगस धनादेश देऊन पुन्हा विश्वासघात केला असे फिर्यादीमध्ये म्हटलेले आहे ,पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी मटका व जुगारावर पोलिसांचा छापा ; तर दोघावर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरांमधील श्रीनाथ बारच्या पाठीमागील बाजू मधील बोळीत सुरू असलेल्या कथित कल्याण स्टार मटका जुगार अड्ड्यावर सासवड पोलीसांनी छापा टाकून कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाई मध्ये रोख रक्कम व जुगार साहित्य अशा एकूण चार हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सागर शामराव जगताप राहणार कोडीत नाका सासवड आणि ज्ञानेश्वर दत्तात्रय भांडवलकर राहणार खंडोबा नगर सासवड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची दोघांची नावे आहेत. जगताप व भांडवलकर हे दोघेही भागीदारीतून मटका जुगार चालवत असून, त्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ,त्यानुसार शनिवारी दि. 13 रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे. कारवाई दरम्यान दोघेही मटक्याची आकडे स्वीकारून पैशाची देवान घेऊन करत असल्याची आढळून आले, पोलिसांनी घटनास्थळावरून 4800 रुपये रोख, आकडे लिहिलेल्या दोन वह्या, बेल असा मुद्देमाल जप्त केलेला आहे, तर त्या संदर्भात सासवड पोलीस स्टेशनचे शिपाई सचिन किवळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिलेली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड हडपसर रोडवरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे एक प्रकारे आवाहन सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड हडपसर रोडवरील अपघाता मधील मयताचीओळख पटवण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे सासवड हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक स्ट्रीम मोटारसायकल वरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला या अपघातामध्ये मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून, तेच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे, नागरिकांनी मयताची ओळख पटवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. मयताचे वर्णन वय अंदाजे 26 ते 28 वर्ष रंग गोरा ,उंची पाच फूट पाच इंच, केस काळे व लांब दाढी वाढलेली ,ओळख पटवणारी वैशिष्ट्ये उजव्या हाताच्या पोटरीवर संतोष असे गोंदलेले डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंधलेले डाव्या हाताच्या पंजावर एस असे गुणलेले , हाताच्या पोटरीवर संतोष लिहिलेले आहे ,पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण, अंगावरील कपडे काळया व पिवळ्या रंगाच्या लायनिंग सिम चा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट ,सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्याच्या नातेवाईकाबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्यातील तात्काळ संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात आले आहे ही बातमी सोशल मीडिया व व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे 9970612511 पोलीस हवालदार भिवराज शिंदे 9552825273

Image

पुरंदर तालुक्यातील संत सोपानदेव पालखीचे 12 जुलै रोजी प्रस्थान ; तर संत सोपान देवस्थानच्या वतीने जयंत अशी तयारी सुरू एडवोकेट trygun गोसावी यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पंढरपूर शेत्रातील आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असून, आणि सर्व संतांच्या पालखी सोहळ्याच्या तारखा जाहीर झाल्या असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू श्री संत सोपानदेव महाराज यांची पालखी सासवड येथून रविवारी दि.12 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मंदिरातून प्रस्थान करणार आहे, संत सोपानदेव देवस्थानच्या वतीने जयंत तयारी सुरू असल्याची माहिती पालखी प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी यांनी दिली आहे .पालखी प्रस्थान सोहळा रविवारी दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संत सोपानदेव मंदिराच्या वाड्यातून टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हजारो भाविक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ केला जाईल, दुपारचा विसावा पिंपळे येथे पांगारे येथे रात्रीचा मुक्काम होईल, सोमवारी दिनांक 13 जुलै रोजी पांगारे येथून प्रस्थान सुरू झाल्यानंतर यादव वाडी येथे सकाळचा विसावा होईल व परिंचे ते दुपारचा नैवेद्य होईल तर मांडकी भैरवनाथ मंदिर येथे रात्रीचा मुक्काम मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी मांडकी ओलाढून सकाळचा विसावा जेऊर पिंपळे खुर्द येथून निरा येथे दुपारचा नैवेद्य होईल तर नींबूत येथे मुक्काम बुधवार १५ जुलै रोजी निंबूत येथून प्रस्थान सुरू होऊन ,नींबूत छपरी वागळवाडी मार्गे सोमेश्वर नगर तालुका बारामती येथे पहिले गोल रिंगण होईल व मुक्काम होईल गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सोमेश्वर नगर करंजे पूल येथे सकाळचा विसावा होईल दहा फाटा येथे दुपारचा नैवेद्य वडगाव निंबाळकर येथे दुपारचा विसावा होईल व कोऱ्हाळे बुद्रुक येथे रात्रीचा मुक्काम होईल शुक्रवारी दिनांक 17 जुलै रोजी कोराळे बुद्रुक येथून कोकाटे पूल येथे सकाळचा विसावा होईल पणदरे येथे दुपारचा नैवेद्य तर विसावा माळेगाव बुद्रुक कोकाटे महाराज वस्ती आणि सायंकाळचा मुक्काम बारामती शारदा प्रांगण येथे होईल, शनिवारी दिनांक 18 जुलै रोजी बारामती येथून प्रस्थान होईल सकाळचा विसावा मोतीबाग आणि दुपारचा नैवेद्य पिंपळी येथे आणि बकरी रिंगण, दुपारचा विसावा भवानी नगर.सणसर बेलवाडी फाटा येथे व लासुरने येथे मुक्काम होईल रविवारी 19 जुलै रोजी लासुरने येथून लाल पुरी येथे सकाळचा विसावा कळंब येथे दुपारचा नैवेद्य तर निमसाखर येथे दुपारचा विसावा होईल आणि रात्री निर्वांगी येथे पालखी तळावर मुक्काम सोमवार दिनांक 20 रोजी निर्वांगी तरंगे वस्ती येथून रेडणी येथे सकाळचा विसावा दुपारचा नैवेद्य लाखेवाडी येथे तर (नीर निमगाव चौक येथे दुपारचा विसावा आणि अकलूज राम मंदिर येथे रात्री मुक्काम मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी अकलूज येथून बाबीर पूल महाळुंगे येथे सकाळचा विसावा असेल श्रीपुर येथे दुपारचा नैवेद्य तर माळ खांबी येथे दुपारचा विसावा होईल आणि बोंडले येथे रात्रीचा मुक्काम होईल. बुधवार 22 जुलै रोजी बोडले येथे दुपारचा नैवेद्य होऊन बोंडले टप्पा येथे श्री संत सोपान देव महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट सोहळा होईल तर भंडी शेगाव येथील पालखी तळावर मुक्काम गुरुवारी 23 जुलै रोजी भंडी शेगाव येथे प्रस्थान होईल दुपारी वाखरी येथे उभे रिंगण पालख्यांच्या भेटींचा सोहळा असेल तसेच रात्रीचा पालखी मुक्काम शुक्रवारी दिनांक २४ जुलै रोजी सर्व पालख्यांची वाखरी जवळ उभे रिंगण पंढरपूर येथे आगमन होईल ,24 जुलै 2026 ते बुधवार 29 जुलै दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत सोपानदेव महाराज पालखी मंडप तांबडा मारुती मंदिरा नजीक येथे राहील. शनिवारी 25 जुलै एकादशी सकाळी सहा वाजता नगर प्रदक्षिणा व श्रीचे चंद्रभागा स्नान होईल, बुधवारी 29 जुलै सकाळी.साडेपाच वाजता गोपाळपूर येथे काला व विठ्ठल रुक्मिणी भेट आणि परतीचा प्रवास सुरू होईल ,अशी सर्व माहिती संत सोपानदेव देवस्थानचे प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी महाराज यांनीही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड येथील हिवरकर मळा येथून (बोलेरो) गाडीची चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड मधील हिवरकर मळा या परिसरात घराशेजारील पार्किंग मधील पार केलेली चार चाकी (बोलेरो) गाडी चोरून नेण्याची घटना घडलेली आहे. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कल्याण एकनाथ काकडे राहणार हिवरकर मळा सासवड यांनी आपली महिंद्रा कंपनीची लाल रंगाची चारचाकी (बोलेरो) गाडी एम एच बारा इ एच 9900 नेहमी प्रमाणे घराची शेजारील पार्किंग मध्ये लावली होती. शुक्रवारी दि. रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारामध्ये अज्ञात चोरट्याने ही गाडी चोरून नेली .चोरी गेलेल्या वाहनाची अंदाजे किंमत एक लाख 50 हजार रुपये असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संशयित हालचाली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसाकडून तपासाची चक्र वेगाने फिरवली जात आहेत. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विक्रम चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड ते बांदलवाडी रस्त्यावरून दुचाकी चोरीस सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ते बांदलवाडी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चंद्रकांत शंकर डिंबळे राहणार गराडे ता. पुरंदर यांची सोमवारी दि. ८ जून रोजी दुपारी तीन च्या सुमारास बांदलवाडी येथील क्रांती पेंट कंपनीकडून जात होते सासवड ते बादलवाडी रस्त्यावर ते लघुशंकेसाठी थांबले असता त्यांनी आपली हिरो होंडा कंपनीची सीडी डीलक्स गाडी एम एच बारा जीबी 8022 रस्त्याच्या कडेला लावली होती, या दरम्यान काही वेळा मध्ये अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली त्यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन येथे दुचाकी गाडी चोरून नेल्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार विनोद हाके हे पुढील तपास करीत आहेत.

लमपी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर राबवावी पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांच्या अधिसूचना ; पहिल्या टप्प्यामध्ये 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : राज्यातील गाय वर्ग पशुधनाला लमपी चर्म रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सन 2026 /27 या वर्षासाठी आवश्यक असलेल्या गोटपॅक्स लस मात्रांच्या उत्पादनात सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यांमध्ये एकूण 37 लाख 52 हजार लस मात्रांची जिल्हा न्याय वाटप सुरू करण्यात आले असून, राज्यातील पशुधनाची संरक्षण करण्यासाठी लमपी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्ध पातळीवर आणि तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या आहेत, येथील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेत लस मात्राचे उत्पादन करण्यात आलेले असून, लसीची शीत साखळीस अबाधित ठेवून, त्यावेळेस क्षेत्रीय स्तरावर पोचविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्याबरोबरच लसीकरणाचा दैनंदिन अहवाल नियमित सादर करण्याची निर्देशही देण्यात आलेले आहेत, गतवर्षीच्या तालुक्यांमध्ये लमपी चर्म रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून आला होता, त्या हॉटस्पॉट्स भागामध्ये प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, या मोहिमेसाठी सहकारी दूध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैदक आणि सेवा दाते यांच्या सक्रिय सहभागाचे आव्हान पशुसंवर्धन विभागाने केलेले आहे. लमपी चमॅरोगासारख्या संसर्गजन्य आजारापासून आपल्या राज्यातील गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, पशुधन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि आपल्या शेतकरी बांधवांचा मुख्य कणा असून ,त्यामुळे त्याचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोट फॉक्स लसीकरण हाच एकमेव आणि सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे सध्या स्थितीत हा उपाय क्षेत्रीय स्तरावर आम्ही मोहीम स्वरूपामध्ये राबिवत असून, सर्व पशु पालक शेतकऱ्यांनीही विभागास सहकार्य करण्याची आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केलेले आहे.

Image

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद शेतकऱ्यांना मिळणार 2102 कोटीची कर्जमाफी ; एकूण तीन लाख 15 हजार 569 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अपेक्षित जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांची माहिती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील एकूण तीन लाख 15 हजार 569 शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची अपेक्षा असून ,तर कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांना सुमारे दोन हजार 102 कोटी 91 लाख रुपयांची रक्कम मिळेल अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. या योजनेनुसार रुपये दोन लाखापर्यंत थकीत पीक कर्जामध्ये 83 हजार 376 शेतकऱ्यांना 749. 14 कोटी रुपये दोन लाखा पुढील थकीत पीक कर्ज योजनेमध्ये एक वेळ समझोता योजना ओटीएस 21 हजार 299 शेतकऱ्यांना 425.98 कोटी रुपये प्रोत्साहन पर लाभ योजनेत दोन लाख दहा हजार 894 शेतकऱ्यांना 927.79 कोटी रुपये मिळून एकूण 2102 कोटी 91 लाख मिळण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर शासनाद्वारे अपात्रतेचे निकष लावले जाणार आहेत, त्यानंतरच पात्र सभासद यादी तयार होणार असल्याने, बँकेने दिलेल्या माहिती मधील पात्र लाभार्थी संख्या व लाभाची रक्कम कमी होणार आहे किंवा बदलणार असल्याचेही प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले आहे. बँकेच्या लेखनिकांच्या 356 पद भरतीसाठी मुलाखती सुरू बँकेने एमकेसीएल मार्फत राबविलेल्या लेखनिकांच्या भरती प्रक्रियेत मुलाखतीस 1071 उमेदवार पात्र ठरलेले असून, त्यातून 356 लेखनिकांची पदभरती होणार आहे. त्यांच्या मुलाखती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा येथे 12 व 13 जून आणि 15 जून रोजी होत असल्याचेही प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले आहे.

पुरंदर तालुक्यातील पुरंदर उपसा योजनेच्या मुख्य वितेरिकेची दुरुस्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : माळशिरस येथील मुख्य व्यतिरेका फुटल्यामुळे गेल्या काही दिवसापासून बंद असलेली पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवारी दि. 12 रोजी रात्रीपासून पुन्हा कार्यान्वित होणार आहे, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे उन्हाळी पिकासाठी पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, पाऊस लांबल्याने पुरंदर उपसा योजनेचे पाणी पिके जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, मात्र माळशिरस गावाजवळील ओढडयात मध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्याने ही योजना बंद होती,ओड्यामध्ये पाणी असल्याने, दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे येत होते, त्यामुळे हे काम लांबणीवर पडलेले होते, अखेर शुक्रवारी दि. 12 रोजी हे काम पूर्ण झाले आहे. शुक्रवारी रात्रीपासून योजनेचे पाणी पुरववत सुरू होईल अशी माहिती उपविभागीय अभियंता भाग्यश्री चवणे यांनी दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेच्या मोबाईल ॲपचे अनावरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड नगरपरिषद येथील नागरिकांच्या विविध समस्या अधिक प्रभावीपणे जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने सोडवण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या संपर्क कनेक्ट या विशेष मोबाईल ॲपचे अनावरण भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे, राजेश पांडे, सासवड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आनंदी (काकी )जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, उपनगराध्यक्ष मनोहर (तात्या )जगताप, गटनेते अजित जगताप व नगरसेवक, नगरसेविका आधी उपस्थित होते. लोकाभिमुख प्रशासनाच्या दिशेने नगर परिषदेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वाचे व डिजिटल पाऊल असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या ॲपमुळे सासवडमधील नागरिकांना आपल्या तक्रारी सूचना आणि समस्या थेट प्रशासनापर्यंत घरबसल्या पोहोचवता येतील ,त्यामुळे कामात गतिमानता येणार असल्याचेही माजी आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यात भक्त भाविकांची नारायण पुर येथे दुचाकी चोरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नारायणपूर ता. पुरंदर येथील देवदर्शनासाठी आलेल्या एका भक्त भाविकांची दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी दि. 11 रोजी दुपारी तीन वाजता घडली असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, समाधान महादेव ननवरे रा. उरुळी कांचन ता. हवेली हे आईसोबत नारायणपूर येथे देवदर्शनासाठी आले असताना त्यांनी कालया रंगाची मोटारसायकल एम एच बारा क्यू युपी 9459 सासवड केतकावळे रस्त्यालगद दत्त मंदिरासमोर उभी केली होती, दुपारी बारा पंचेचाळीस ते चार चार सुमारामध्ये ते देवदर्शनासाठी गेले असता, चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली, दर्शन करून परत आल्यानंतर दुचाकी जागेवर न दिसल्याने, ननवरे यांनी या परिसरामध्ये व बाकी सर्व परिसरामध्ये शोध घेतला असता, त्यांना मात्र ती गाडी मिळाली नाही, असे तक्रारी मध्ये नमूद केलेले आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार जाधव एस.एल हे करीत आहेत.

माईंच्या लेकी-जावयांचा सन्मान’ सोहळ्यात उसळला भावनांचा महापूर दिपकदादा यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त ममता सिंधुताई सपकाळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेल्या विशाल कुटुंबातील मायेचा, संस्कारांचा आणि नात्यांच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “अधिक मासाचे वाण - माईंच्या लेकजावयांचा सन्मान” या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात भावनांचा अक्षरशा: महापूर उसळला.यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ, कीर्ती, ज्योती, मंजुषा आणि गौरी यांनी अतिशय भावनाविवश होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “माईंचे पहिले मानसपुत्र दीपकदादा गायकवाड हेच आमच्या सर्व लेकींसाठी खरे माहेर आहेत. दादा आजही कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीने भूमिका पार पाडत आहेत. ते आम्हाला कधीच विसरत नाहीत, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या लेकरांना त्यांच्या रूपाने प्रेमळ, कर्तृत्ववान आणि निरागस मनाचा मामा लाभला आहे. प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारा असा भाऊ आजच्या युगात दुर्मिळ आहे,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, तर भव्य मंडपातील अनेकांचे डोळेही पाणावले.पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९२ साली स्थापन केलेल्या ममता बाल सदन संस्थेत आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून दिली आहेत. या सर्व लेकी आज आपल्या संसारात सुखाने नांदत असून माईंच्या कुटुंबात आज २२० लेक-जावयांचा मोठा परिवार निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेनुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेचे जतन करत माईंच्या संस्थेने “अधिक मासाचे वाण – माईंच्या लेकजावयांचा सन्मान” हा उपक्रम राबविला. या सोहळ्यासाठी लेकी व त्यांच्या जावयांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे (बिचवे), तामणदीप, निरंजन, ३३ अनारसे आणि तुळशीचे रोप अशा पारंपरिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या प्रेमाने आणि आदराने प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला घरी बोलावून तिचा सन्मान करतात, त्याच संस्कृतीचे पालन करत ‘बापमाणूस’ म्हणून दीपकदादा गायकवाड यांनी माईंची परंपरा जिवंत ठेवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन (बालगृह)चे अध्यक्ष दीपक गायकवाड होते. यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, लामा फेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, शर्मिष्ठा जाधव, अनुश्री रिसवाडकर, शास्वती रिसवाडकर, बजरंग वाघ, चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. संजय रावळ, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. वांढेकर, डॉ. शेट्टी, अनिकेत खरे, पूजा खरे आणि शीतल सिनगारे, विनय सपकाळ, मनीष बोपटे, देविदास अरबट,पत्रकार बापू मुळीक सासवडच्या नगराध्यक्षा आनंदी (काकी )जगताप,राजवर्धिनी जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इगले,न्यायालयाचे संजय खामकर, प्रविण जगताप पंचायत समिती पुरंदर उपसभापती आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. माईंच्या विचारांची, संस्कारांची आणि ममतेची परंपरा आजही तितक्याच ताकदीने पुढे चालत असल्याचे हे भावस्पर्शी चित्र पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भारावून गेले.चौकट कृतज्ञता आणि अश्रूंच्या साक्षीने भारावला परिसर...* काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट असतात. काही घरे विटा-मातीची नसतात, ती मायेने उभी राहतात. आणि काही माहेरं आई गेल्यानंतरही संपत नाहीत. ती एखाद्या माणसाच्या रूपाने कायम जिवंत राहतात. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे आज असेच एक भावविश्व उभे राहिले आणि संपूर्ण परिसर मायेच्या, कृतज्ञतेच्या आणि अश्रूंच्या साक्षीने भारावून गेला. माईंच्या जाण्यानंतरही त्यांचे कुटुंब विखुरले नाही; उलट मायेच्या धाग्यांनी आणखी घट्ट विणले गेले आहे. आणि त्या धाग्यांना जपणारे नाव म्हणजे दिपकदादा असे भाव, यावेळी उमटल्याचे दिसून आले. चौकट अनेक लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटी... अधिक मास सोहळ्यात रश्मी कोलते, हरिभाऊ लोळे, शशिकला विजय कोलते, जितेंद्र कांबळे, पांडुरंग भोसले, उद्योजक अजित गोळे, यांच्यासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट देऊन लोकजावयांना आशीर्वाद दिले. एवढंच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ठाणे येथील ८० वर्षीय रंजना गायकवाड यांनी सुद्धा सोहळ्यात उपस्थित राहून आशीर्वाद दिले.

Image

पुरंदर तालुक्यामध्ये प्रामुख्याने जुगार, मटका, दारू, ताडी विक्री आणि खाजगी सावकारकीचा विळखा कायम ; तर पुरंदरची अवैध व्यवसायापासून कधी सुटका मिळणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरातील व ग्रामीण भागामधील अनेक असणाऱ्या अवैध व्यवसाय हा जोमामध्ये सुरू असून, सामान्य नागरिकांना नहाकतेचा त्रास सहन करावा लागत असल्याकारणाने, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव हा प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. त्यासाठी पोलीस यंत्रणे सह, महसूल विभागाच्या कारभारावरही संशय व्यक्त केला जात आहे. याबद्दल सामान्य नागरिक व शेतकरी पूर्णपणे नाराज आहेत, सध्या तरी अनेक हॉटेल व ढाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री होत आहे, विविध गावांमध्ये जुगार मटक्याचे क्लब सुरू असून, त्यातील ताडीच्या नावाखाली रसायन मिश्रित ताडी विकली जाते, हुक्का पार्लर या प्रकारांनाही तोंड वर काढले जात आहे, यातून तालुक्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढत चाललण्याचे दिसत आहे, असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे, ग्रामीण भागामध्ये तर अवैध सावकारांच्या पाळीमुळे घट्टच अशी मिठी मारलेली दिसून येत आहे, सावकारांनी नागरिकांचे जगणे अक्षरशा मुश्किल केलेले आहे, कुंभारवळण येथील एक अनुचित प्रकार असा सावकार कडून पैसे असे घेतले असताना त्याची मुद्दल प्लस व्याज घेऊन सुद्धा त्या ठिकाणी सामान्य शेतकऱ्याची असणारी फोर व्हीलर गाडी त्या ठिकाणी हस्तगत करून स्वतः त्या ठिकाणी सासवड या ठिकाणी ठेवलेली आहे, त्यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशन येथे दोन महिन्यापूर्वी अर्ज देऊन सुद्धा गुन्हा नोंदवून सुद्धा त्या ठिकाणी त्यावर कुठल्याही प्रकारचा तपास केला जात नाही, तर त्यासाठी सामान्य शेतकऱ्याचे म्हणणे असे आहे की, विमानतळाच्या संदर्भातून या ठिकाणी आमची शेती जात असून, त्या ठिकाणी त्याची फोरविलर गाडी त्या सावकारांनी घेतलेली त्या शेतकऱ्याला परत मिळणार का? हा अनुतृत्व प्रश्न उभा राहिलेला आहे, या सावकारकीच्या विळख्यामध्ये शेतकऱ्याचं अनेक लघुउद्योजक आणि गरजू नागरिक सुद्धा फसत चाललेले आहेत, याबाबत तक्रार करूनही अनेकदा ठोस अशी कारवाई होत नसल्याचा आरोप सामान्य नागरिक व शेतकरी करीत आहेत. यासोबतच चोऱ्या, हाणामाऱ्या, दहशत अशा निर्माण करणाऱ्या टोळ्या, गुन्हेगारी, कोयतेच्या वापरामधून दहशत निर्माण केलेली जात आहे, अशा वेगवेगळ्या घटना घडवून येत आहेत, यामुळे एकंदरीतच तालुक्यामधून कायदा व सुव्यवस्थेमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, याबाबतीमध्ये सासवड पोलीस ठाण्यामध्ये नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यावर कारवाई करणार का ? यासाठी पोलीस निरीक्षकासमोर मोठे आव्हान उभे ठाकलेले आहे .त्यामुळे पोलीस प्रशासनाने नागरिकांशी एक प्रकारे संवाद वाढवून, त्यांचा विश्वास संपादन करणे हे महत्त्वाचे आहे, तक्रारीवर तात्काळ कारवाई करणे कायद्याचा धाक दाखवून त्या ठिकाणी न्याय देणे महत्त्वाचे आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशा प्रकारचे अवैध व्यवसायांना एक प्रकारे आळा बसेल अशी अपेक्षा तालुक्यामधून सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यातून व्यक्त केली जात आहे, सासवड पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अवैध व्यवसायांना खपवून घेतले जाणार नाही ,असे त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी हमी दिलेली आहे. सामान्य नागरिक व शेतकरी यांनी कोणालाही न घाबरता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी किंवा त्यांनी स्वत: मला जरी सांगितले की, किवा स्वतः माझ्याशी संपर्क करावा, अवैध खाजगी सावकारा विरोधामध्ये सामान्य नागरिक व शेतकरी यांनी तक्रार दाखल करावी त्यांच्या विरोधामध्ये कडक अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन.

पुरंदर तालुक्यातील पुरंदर विमानतळसाठी जमीन अधिग्रहणासाठी 30 जून पर्यंत मुदत वाढ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: प्रस्तावित अशा छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणासाठी आणि मोबदला स्वीकारण्याची मुदत शेतकरी व सरपंचाच्या मागणीनुसार 30 जून पर्यंत वाढवण्यात आली आहे ,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, विमानतळासाठी आवश्यक असलेल्या 1,216 हेक्टर क्षेत्र पैकी नक्की किती जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, पूर्ण माहिती व करारनामे जमा झाले आहेत हे सांगता येत नाहीत, तर त्यासाठी आत्तापर्यंत किती रुपयाची वाटप झाले असून हे सुद्धा नक्की सांगता येणार नाही, पुढच्या आठवड्यामध्ये काही ठिकाणचे प्राप्त होतील ,तर उर्वरित जमीन संपदाची प्रक्रिया सुरू आहे असे सांगितले जात आहे.छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमीन संपादन करताना काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे मूल्यांकन ,न्यायालयीन दावे, महसूल विभागातील प्रकरणे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी हक्क सोडपत्र आणि इतर महसुली प्रक्रिया प्रलंबित आहेत, या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असले ,तरी त्यास काहीशा प्रमाणामध्ये कालावधी लागत आहे.त्या संदर्भातील काही शेतकऱ्यांचे फॉर्म भरून सुद्धा त्या ठिकाणी पेमेंट जमा होत नाही, अशा तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात आहे ,तसेच मधल्या काळामध्ये एजंट (दलाल )हे नो एन्ट्री असणाऱ्या ठिकाणी सुद्धा कागदपत्रे चेक करण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत, त्यावर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी काय कारवाई करणार ? याकडे अजून काहीच पूर्ण झालेले नाही, अशा एजंटांना कागदपत्रे चेक करण्यासाठी कुणी परवानगी दिली आहे, या संदर्भातील जिल्हाधिकारी यांनी आत्तापर्यंत कोणत्या प्रकारची कारवाई केली एजंट( दलाल )यांच्यावर स्पष्ट करावेत अशी शेतकरी याची मागणी आहे .या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदत वाढ देण्याची मागणी केलेली आहे ,संबंधित सर्व बाबींचा विचार करूनच जमीन अधिग्रहणासाठी संमती व मोबदला स्वीकारण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे अशी ही डुडी यांनी स्पष्ट केली आहे.या मुदत वाढीमुळे प्रलंबित कागदपत्रे आणि महसुली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त वेळ मिळणार असून ,उर्वरित जमीन संपादनाची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल असा विश्वास एक प्रकारे जिल्हा प्रशासनाने व्यक्त केलेला आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील सिद्धिविनायक हॉटेल येथे नाष्टा करत असताना 600 रुपये उसनवार मागितलेच्या कारणावरून तुंबळ हाणामारी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: केतकावळे ता. पुरंदर येथील दि. 10 जून रोजी दुपारी 4:30 वा महेश बाळू पवार नाष्टा करत असताना गणेश दत्तात्रेय जगदाळे हा राहणार केतकावळे येथील रहिवाशी असून, तो सुद्धा हॉटेलमध्ये आला असताना, गणेश जगदाळे यांनी महेश पवार यांना 600 रुपये उसनवारी मागितले त्यावेळी महेश पवार यांनी सांगितले माझ्याकडे पेमेंट नाही, त्यावेळी त्यांच्याशी वाद घालून, शिवीगाळ करू लागल्याने, हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून, महेश पवार यांची आई, लहान भाऊ तसेच भांडणे सोडवण्यासाठी आले असताना, गणेश जगदाळे यांनी आईचे गचोंडे धरले व त्यावेळी आजूबाजूला त्या ठिकाणी खाली पाडून दगड महेश पवार यांच्या डोक्यात मारला, त्यावेळी रक्त येऊ लागल्या कारणाने तो तेथून निघून गेला, त्यावेळी महेश पवार यांना त्यांच्या आईने व भावाने सासवड पोलीस स्टेशनला आल्या नंतर पोलिसांनी त्यांना सासवड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी पाठवले. त्या नंतर गणेश दत्तात्रेय जगदाळे यांच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात फिर्याद महेश बाळू पवार वय 26 वर्ष व्यवसाय मजुरी राहणार केतकावळे ता. पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला आरोपी गणेश दत्तात्रेय जगदाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे, सासवड पोलीस स्टेशन गु.र .नंबर 252/ 2026 भारतीय दंड संहिता कलम 118( 1), 115( 2), 352, 351( 2) ( 3) नुसार गुन्हा दाखल झालेला आहे ,याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार समर बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर 12 जून रोजी आरक्षणाची सोडत ; तर प्रचंड राजकीय हालचालींना वेग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून ,पुरंदर तालुक्यातील 76 ग्रामपंचायतीच्या वार्डस, रचना आणि आरक्षण सोडतीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे ,तो कार्यक्रम 12 जून 2026 रोजी सर्व गावांमध्ये एकाच दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तहसीलदार विक्रम राजपूत यांनी हे परिपत्रक जारी केले असून, आरक्षण निश्चितीसाठीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे, प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे, आठ जून पर्यंत सर्व ग्रामपंचायतमध्ये दवंडी, नोटीस बोर्डावर सूचना आणि जनजागृतीची कार्यवाही पूर्ण करून अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. १२ जून रोजी सकाळी 11 वाजता पहिल्या सत्रामध्ये दिवे, परींचे, बोपगाव, बेलसर,पिंपरे खुर्द,मांढर, खानवडी यासह 38 गावांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे ,तर दुपारी तीन वाजता दुसऱ्या सत्रात चांबळी, कुंभारवळण, खळद, पिसुर्डी, गराडे, सोनोरी, घेरा पुरंदर,दौडज, यास उर्वरित 38 गावांमध्ये सोडत प्रक्रिया पार पडेल ही संपूर्ण प्रक्रिया संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे, लहान मुलांच्या हस्ते चिटटया काढून आरक्षण निश्चित केले जाणार असल्याने ,या प्रक्रियेला विशेष असे पारदर्शकता देण्यात आलेली आहे. आरक्षण निश्चिती नंतर अनुसूचित जाती ,जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि महिलासाठी जागा निश्चित होणार असून, त्यानुसारच उमेदवारांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार विक्रम राजपूत यांनी ही सर्व सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणच्या वाघ डोंगर परिसरामध्ये बिबट्याचा वावर तर सासवड मधील सामान्य नागरिकामध्ये भीतीचे असे वातावरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड शहरालगतच्याच वाघ डोंगर परिसरामध्ये सोमवारी दि.8 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारांमध्ये बिबट्याचे प्रत्यक्ष असे दर्शन झाल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे सामान्य नागरिक शेतकरी तसेच सकाळ - सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये एक प्रकारची चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने यासंदर्भात तातडीने आवश्यक अशा उपायोजना करण्यासाठी सामान्य नागरिकाकडून मागणी होत आहे .हा बिबट्या चांबळी, बोपगाव, दिवे घाट या परिसरामध्ये फिरत असून, त्यामुळे नागरिकांना विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन एक प्रकारे वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केलेले आहे. वन प्राण्यांचे दर्शन झाल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास ,वन विभागाशी संपर्क साधावा असे ढोले यांनी सुद्धा सांगितलेले आहे. वन विभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन ढोले यांनी केलेले आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 5,500दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर  सासवड प्रतिनिधी:  बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                     पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.10 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 5,500 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 5,500 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 4,250 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, बाबा पवार ऋषिकेश  ट्रेडिंग, शैलेश विरकर, गुळाला 4,400 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,06 बॉक्स  1,01क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,000 कमाल दर 4,400रुपये तर साधारण4,200 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 3,000,5,500,4,250. बाजरी 2,600,3,200, 2,900. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ ---------------------------------- हरभरा 5,200, 5,825,5,512.

Image

“अनुभवांचे जीवनात रूपांतर झाले तरच खरी अनुभूती” – बी. आर. शंकरानंद ण सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय शिक्षण मंडळाच्या युवा गतिविधी विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय ‘अनुभूती शिबिर ४.०’ चे उद्घाटन राणी लक्ष्मीबाई सैनिक स्कूल, पिरंगुट (पुणे) येथे उत्साहात संपन्न झाले. ३ ते १३ जून या कालावधीत आयोजित या शिबिराची संकल्पना “आत्मवत् सर्वभूतेषु” अशी असून, देशभरातील १११ युवक-युवती, संशोधक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते या शिबिरात सहभागी झाले आहेत. यामध्ये ६५ युवक आणि ४६ युवतींचा समावेश आहे.उद्घाटन सत्रात मार्गदर्शन करताना भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री बी. आर. शंकरानंद म्हणाले की, केवळ अनुभव प्राप्त करणे पुरेसे नसून त्या अनुभवांचे आत्ममंथन करून त्यांना जीवनात उतरविणे हीच खरी अनुभूती आहे. अनुभवांतून शिकत स्वतःचे सातत्याने परिष्करण करणे हीच जीवनाची खरी साधना असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ माहिती आणि ज्ञान प्रदान करणे नसून व्यक्तीमधील सुप्त गुण, क्षमता आणि शक्यता यांचे जागरण करणे हे आहे. व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्यनिर्माण आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करणे हे शिक्षणाचे खरे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “राष्ट्रनिर्माणाचा पाया व्यक्तिनिर्माणात आहे,” असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रदीप रावत यांनी युवकांना राष्ट्रनिर्माणात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. भारताची युवा शक्ती ही देशाची सर्वांत मोठी संपत्ती असून तिचा सकारात्मक उपयोग राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, असे ते म्हणाले.युवा गतिविधी प्रमुख अमित रावत यांनी शिबिराची प्रस्तावना मांडली, तर पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष डॉ. रवि चिटणीस यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदांत कुलकर्णी यांनी केले, तर विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.उद्घाटन सत्रातून सहभागी युवकांसमोर आत्मबोध, राष्ट्रबोध आणि व्यक्तिमत्त्व विकासाची वैचारिक दिशा स्पष्ट झाली असून, आगामी शिबिरासाठी एक सशक्त आणि प्रेरणादायी पायाभरणी करण्यात आली.

Image

पोलीस पाटलांच्या सहकार्याने महिनाभराचा तपास एका दिवसात पूर्ण होऊ शकतो : माजी आमदार अशोक टेकवडेपुरंदर तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटील हा अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, पोलीस पाटलांनी पोलिसांना तपासकामात प्रभावी सहकार्य केल्यास महिनाभर चालणारा तपासदेखील एका दिवसात पूर्ण होऊ शकतो, असे प्रतिपादन पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी केले.पुरंदर तालुका पोलीस पाटील संघाच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम शुक्रवारी सासवड येथे उत्साहात पार पडला. यावेळी राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी नव्या कार्यकारिणीला मान्यता देत पदाधिकाऱ्यांना सनद प्रदान केली.यावेळी बोलताना अशोक टेकवडे म्हणाले की, पोलीस पाटील हा गावपातळीवरील शासनाचा डोळा आणि कान आहे. गावातील प्रत्येक घडामोडींची माहिती त्यांच्याकडे असते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला त्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.कार्यक्रमात संघाच्या अध्यक्षपदी आमोल लोळे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच राहुल शिंदे पाटील व तानाजी काकडे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष मोहन इंगळे पाटील यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनाही सनद प्रदान करण्यात आली.यावेळी माजी आमदार संजय जगताप यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पोलीस पाटलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पुरंदर तालुक्यातील पोलीस पाटील गावपातळीवर उल्लेखनीय काम करत असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पोलीस पाटील हा पोलीस, महसूल आणि शासनाच्या विविध विभागांमधील समन्वयक म्हणून काम करतो. गावातील सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, चुकीच्या व्यक्तीला चुकीचे म्हणण्याचे धाडस ठेवा आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नका, असा सल्ला त्यांनी पोलीस पाटलांना दिला.नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :अध्यक्ष – आमोल लोळे पाटील,उपाध्यक्ष – राहुल शिंदे पाटील, तानाजी काकडे पाटील,कार्याध्यक्ष – मनोहर पायगुडे पाटील, रूपाली बोरकर पाटील,सचिव – विजय पोमण पाटील,कार्यकारी अध्यक्ष – पूजा यादव पाटील, सचिन होले पाटील,खजिनदार – दीपक जाधव पाटील, सारिका खवले पाटील,संघटक – रूपाली कुंभारकर पाटील, गोपीनाथ मुळीक पाटील, रूपाली सोनवणे पाटील.या कार्यक्रमास माजी आमदार संजय जगताप, साहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे, जि. प. सदस्य हरिभाऊ लोळे, अजय इंगळे, सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, स्मिता निगडे, नायब तहसीलदार संदीप पाटील पोलीस पाटील संघटनेचे दादा काळभोर पाटील,गोरखनाथ नवले पाटील, रोहिणी ताई हांडे पाटील, विनायकराव गायकवाड पाटील, विजयराव कुंजीर पाटील, उमेश तळेकर पाटील,कैलास जाधव पाटील, सारिका झेंडे पाटील यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते.

Image

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजप सासवड शहराच्या वतीने पालखी मैदान येथे वृक्षारोपण संपन्न!सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने सासवड येथील पालखी मैदान येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढते प्रदूषण आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वसुंधरा हिरवीगार करण्याचा संकल्प करत भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने एकत्र येत वृक्षांची लागवड केली.या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अजिंक्यभैय्या टेकवडे, भाजपा सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, एनजीओ आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जगताप, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब इटकर, सासवड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहरतात्या जगताप, नगरसेवक अजित जगताप, नगरसेवक बंडूशेठ राऊत, नगरसेवक ज्ञानेश्वर गिरमे, सरचिटणीस जयेंद्र निकम, उपाध्यक्ष उदयराज जगताप, सचिव ओंकार महागावकर, मोहन चव्हाण, ओंकार जगताप, श्रेयस जगताप, प्रतिक म्हेत्रे, लोकेश जगताप, रणजीत शिर्के, निरंजन फडतरे, राज शिंदे, इ. कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

Image

आई गेली... पण लेक-जावयांसाठी आजही उघडेच आहेत मायेचे माहेर!• पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी रुजविलेली अधिक मासाची परंपरा• ममता बाल सदनात 7 जूनला "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान"भावनिक सोहळा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्वतःच्याच आयुष्यात पेक्षा, भूक आणि संघर्षाचे असंख्य चटके सोसलेल्या एका आईने हजारो अनाथ मुलांच्या आयुष्यात मायेचा दिवा पेटवला. जिच्या पदरात दुःखच दुःख आले, त्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी मात्र आपल्या मुलींच्या वाट्याला आनंद, सन्मान आणि माहेरची ऊब यावी यासाठी आयुष्य वेचले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांच्या मायेचा ओलावा अजूनही जिवंत आहे. याच मायेचे दर्शन पुन्हा एकदा रविवार, दि. ७ जून रोजी "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" भावनिक सोहळ्यात होणार आहे. ममता बाल सदन, कुंभारवळण (सासवड, ता. पुरंदर) येथे होणार आहे.१९९२ साली माईंनी स्थापन केलेल्या या संस्थेत आजही अनाथ, निराधार, निराश्रित आणि गरजू मुलींचे संगोपन, शिक्षण आणि पुनर्वसनाचे कार्य सुरू आहे. सध्या ८० मुली येथे शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून त्यांना संसारात स्थिर करण्यात आले आहे. त्यामुळे आज माईंच्या कुटुंबात २२० लेक-जावई आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात माहेरवाशिणींना सन्मानाने बोलावून वाण देण्याची परंपरा आहे. मात्र आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना माहेर कुठले? हा प्रश्न माईंना कायम अस्वस्थ करायचा. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेतून संसारात गेलेल्या मुलींना अधिक मासात सन्मानाने बोलावून त्यांना माहेरची माया देण्याची अनोखी परंपरा सुरू केली.यावर्षीही "अधिक मासाचे वाण – लेकजावयांचा सन्मान" या संकल्पनेतून लेकी व जावयांना संस्थेत निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे, तामणदीप, निरंजन,३३ अनारसे आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे उपस्थित असलेली प्रत्येक मुलगी स्वतःला अनाथ समजत नाही. कारण माईंनी त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर आई-वडिलांचे प्रेम दिले. त्यांच्या विवाहानंतरही हे नाते तुटले नाही. उलट प्रत्येक अधिक मासात हे माहेर पुन्हा उघडते आणि लेकी-जावयांच्या स्वागताने संस्था आनंदाने फुलून जाते. "आपल्याला आई-वडील नाहीत, आपल्याला विचारणारे कोणी नाही, असा विचार या मुलींच्या मनात कधीच येऊ नये, हीच माईंची शिकवण आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे आहोत," असे पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र व ममता बाल सदनचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी सांगितले."प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला सन्मानाने माहेरी बोलावतो. आम्हीही माईंच्या प्रत्येक लेकीला तितक्याच प्रेमाने बोलावतो. समाजातील दानशूर व्यक्ती, मान्यवर आणि संवेदनशील नागरिकांनी या मुलींचे पालक म्हणून उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद द्यावेत," असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या धावपळीच्या आणि नातेसंबंध दुरावत चाललेल्या काळात, आई गेल्यानंतरही तिच्या मायेची परंपरा जिवंत ठेवणारे हे चित्र विरळच म्हणावे लागेल. माईंच्या स्मृती, त्यांच्या संस्कारांचा वारसा आणि शेकडो लेकींच्या डोळ्यात दाटलेले माहेरपण यांचा संगम असलेला हा अधिक मास सोहळा अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरणार आहे.बॉक्सलेक-जावयांसाठी विदर्भाच्या पुरणपोळीची खास मेजवानीअधिक मास सोहळ्यानिमित्त सुमारे 800 जणांसाठी विदर्भाच्या पारंपरिक पुरणपोळीच्या भोजनाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. पुरणपोळीसोबत दूध, आमटी-भात, कुरडई, पापड आदी पारंपरिक पदार्थांची रेलचेल असणार आहे. माईंच्या प्रत्येक लेक-जावयाचा मानपानाने सत्कार व्हावा यासाठी संस्थेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. माहेरच्या प्रेमाची ऊब आणि आदरातिथ्याची परंपरा जपत आहे.

Image

खरीप हंगामावर 'एल निनो'चे सावट; कृषी विभागाकडून 'संतुलित खत वापर व एल निनो जागृती मोहीम सुरु सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आगामी खरीप हंगामावर 'एल निनो' (El Niño) चे मोठे संकट असून, यंदा सरासरीपेक्षा कमी व खंडित पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा व कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांचे संयुक्त विद्यमाने "संतुलित खतांचा वापर व एल-निनो जनजागृती मोहीम" युद्धपातळीवर राबवली जात आहे . सदर कार्यक्रम मौजे सिंगापूर (विठ्ठल रुक्मिणी मंदिर, ग्रामपंचायत शेजारी) येथे मा. तालुका कृषि अधिकारी, पुरंदर श्री. श्रीधर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक-०५/०६/२०२६ रोजी पार पडला. *सदर कार्यक्रमास मार्गदर्शन करनेसाठी कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथील शास्त्रज्ञ श्री.संतोष करंजे यांनी संतुलित खतांचा वापर करताना प्रथम माती परीक्षण करूनच शिफारशीनुसार योग्य प्रमाणात रासायनिक खते द्यावीत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM): रासायनिक खतांसोबत शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत आणि जैविक खतांचा (Biofertilizers) वापर वाढवा, ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहील व El Nino च्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजनामध्ये पीक नियोजन, कमी पाण्याच्या वाणांची निवड: भात किंवा ऊस यांसारखी जास्त पाणी लागणारी पिके टाळून कमी कालावधीत येणाऱ्या सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी आणि कापूस या पिकांना प्राधान्य द्यावे. आंतरपीक पद्धती (Intercropping) एकाच पिकावर अवलंबून न राहता मिश्र किंवा आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून एक पीक धोक्यात आले तरी दुसरे पीक आधार देईल. पेरणीची घाई न करता किमान १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय खरीपाची पेरणी करू नये असे अहवान करण्यात आले. सुनिल नाळे अंजीर सिताफळ संशोधन केंद्र, जाधववाडी यांनी सिताफळ व अंजीर लागवड व बहार व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले श्रीम.दिपाली कदम सहायक कृषी अधिकारी यांनी शासकीय विभागाच्या योजनेची सविस्तर माहिती दिली, सचिन जगताप उप कृषी अधिकारी, पिसर्वे १ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सदर प्रशिक्षण कार्यक्रमास मयुर कचरे, मंडळ कृषि अधिकारी, पिसर्वे, श्रीम.स्मिता वर्पे, बीटीएम पुरंदर, श्रीम.अर्चना लवांडे सरपंच, विक्रांत पवार उपसरपंच, दशरथ लवांडे माजी सरपंच,रामभाऊ उरसळ माजी सरपंच रामचंद्र खेडेकर सीताफळ महासंघाचे उपाध्यक्ष , वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकरी समिल इंगळे, महिला व पुरुष शेतकरी बचत गटातील शेतकरी, कृषी व पशु सखी,शेतकरी उत्पादक कंपनी सदस्य प्रशिक्षणास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Image

आषाढी वारी साठी नियोजन विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडून पालखी महामार्गाची थेट अशी पहाणी सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुविधा आणि सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे जिल्ह्यातील आळंदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे आणि निरा येथील पालखी मार्गाची पाहणी करून, त्यांनी व्यवस्थेचा सविस्तर असा आढावा घेतला, सासवड येथील पालखीतळाची पाहणी करून त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा वेळेत पूर्ण करण्याची निर्देश दिले आहेत .पुणे जिल्ह्यातील पाहणी दौरा आटोपून विभागीय आयुक्त पुढील आढाव्यासाठी सातारा आणि सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाल्या आहेत, प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट वरती सासवडमध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती विभागीय आयुक्तांनी सासवड येथील पालखीतळाला भेट देऊन, तेथील तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत आणि पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर, सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, नगराध्यक्ष आनंदी काकी जगताप तसेच महावितरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि अन्य शासकीय यंत्रणेचे अधिकारी आधी उपस्थित होते. वीज पाणी आणि रस्ते व्यवस्थेवर विशेष असा भर द्यावा सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप ,गटनेते अजित जगताप यांनी विभागीय आयुक्तांचे स्वागत करून नगरसेवक राजन भैया जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, अस्मिता उमेश जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे आणि अजय कैलास इंगळे या स्थानिक नेत्यांनी वारी दरम्यान उद्भवणाऱ्या स्थानिक समस्या विषयी प्रशासनाचे लक्ष वेधले, सासवड पालखीतळाची पाहणी करताना आयुक्तांची चंदन टेकडी ते पालखी तळापर्यंत पुरेशी व सुरक्षित प्रकाश योजना उभारण्याच्या सूचना सासवड नगर परिषदेला देण्यात आलेल्या आहेत, महावितरण ला विद्युत सुरक्षेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, विद्युत अपघात होणार नाही याची दक्षता घेण्यास सुद्धा सांगितलेले आहे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण फुरसुंगी ते दिवे घाट रस्त्याची प्रलंबित काम युद्ध पातळी पूर्ण करण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत ,दिवेघाट परिसरातील खोदकामामुळे पावसाळ्यात दगड किंवा माती रस्त्यावर येऊन वारकऱ्यांच्या सुरक्षेतेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक बारीक व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, पालखीतळ आणि विसावा स्थळावर पाणी साचणाऱ्या भागांमध्ये मुरूम टाकून आवश्यक अशा दुरुस्ती करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत ,वारकऱ्यासाठी पाणीपुरवठा आणि आरोग्य सुविधांची तयारी पालखी मुक्काम वीसावा असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप उपलब्ध ठेवणे टँकर संख्या वाढवणे आणि पर्यायी यंत्रणा सज्ज ठेवणे यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे. मार्गावरील आवश्यक ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत, उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही परिस्थितीचा विचार करून बोरावके मळा खळद आणि शिवरी येथे आरोग्य मदत केंद्र उभारण्याबरोबरच पुरेशी वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्याची निर्देश देण्यात आलेली आहेत, झेंडेवाडी ते वाल्हे पर्यंत पाहणी आयुक्तांनी झेंडेवाडी विसावा तळापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली त्यानंतर सासवड जेजुरी आणि वाल्हे येथील पालखी मुक्काम तळाची तसेच बोरावके मळा ,यमाई शिवरी ,साकुर्डे दौंडज शिव आणि पिंपरी खुर्द येथील विसावा तळाची प्रत्यक्ष पाहणी करून सुविधा आणि तयारीचा आढावा घेतला.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी सुरक्षा यंत्रणाची रंगीत अशी तालीम ; तर सोपानदेव मंदिर परिसरामध्ये मॉक ड्रिल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी सासवड येथील श्री सोपानदेव मंदिर परिसरात सासवड पोलीस स्टेशन, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) पुणे ग्रामीण तसेच इतर आपत्कालीन यंत्रणांच्या संयुक्त विद्यमाने मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले.या सरावादरम्यान मंदिर परिसरात तीन संशयित आरोपींनी स्फोटक सदृश्य वस्तू ठेवल्याची माहिती प्राप्त झाल्याचे गृहीत धरून कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशनने दहशतवाद विरोधी पथकाला पाचारण केले. त्यानंतर कमांडो पथक, रायफलधारी पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांनी मंदिर परिसरात प्रवेश करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.तसेच स्फोटक सदृश्य वस्तू असलेली बॅग सुरक्षित ठिकाणी हलवून बॉम्ब शोधक व नाशक पथकाने ती निष्क्रिय करण्याची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित किंवा अघटीत घटना घडू नये तसेच विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय राखून तात्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता.या मॉक ड्रिलमध्ये सासवड पोलीस स्टेशन, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल युनिट (बीडीडीएस),पुणे ग्रामीण सासवड नागरिषदेकडील अग्निशमन दल, ॲम्बुलन्स सेवा आणि इतर संबंधित यंत्रणांनी सहभाग नोंदविला.सरावावेळी सासवड पोलीस ठाणे कडील सपोनि वैभव सोनवणे, पोसई भिसे,एटीएस पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार व त्यांचे पथक , बीडीडीएसचे सपोनि साळुंखे व त्याचे पथक सासवड पोलीस ठाण्याकडील २ अधिकारी १५ पोलीस अंमलदार, मुख्यालय येथील क्यू आर टी पथक सामील झाले होते. सदरचे मॉकड्रील चे आयोजन भोर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर व सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

Image

पुरंदर तालुक्यामध्ये डेंगू , चिकून गुनिया विरोधात जनजागृती मोहीम ; तर हिवताप प्रतिरोध महिना सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हिवताप प्रतिरोध महिना जुन २०२६पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये तसेच सासवड व जेजुरी शहरामध्ये किटकजन्य आजार नियंत्रणासाठी सालाबाद प्रमाणे हिवताप प्रतिरोध महिना २०२६ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये किटकजन्य आजार नियंत्रणासाठी किटकशास्त्रीय सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचा सहभाग, महिला बचत गट सभा, प्रभात फेरी, शालेय विद्यार्थ्यांची कार्यशाळा, जनजागृतीसाठी महिलांचा सहभाग वाढविणे, विविध प्रसिध्दी माध्यमांव्दारे जनजागृती, इ. कार्यक्रमाये आयोजन करण्यात येणार असल्याचे डॉ. विक्रम काळे तालुका आरोग्य अधिकारी व डॉ.गजानन अकमार वैद्यकीय अधिक्षक ग्रा.रु.सासवड यांनी सांगीतले .पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये व सासवड तसेच जेजुरी शहरामध्ये किटकजन्य आजाराचे सर्वेक्षण करण्यात येणार असून हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया सारख्या किटकजन्य आजारांची लक्षणे व नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंटया, मोकळे डबे, बाटल्या इ. निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावावी. मच्दरदाणीचा वापर करावा, आपल्या घराजवळील डासउत्पत्ती स्थाने शोधून नष्ट करावीत व गटारे वाहती करावीत. पाणी साठणाऱ्या ठिकाणी रॉकेल, जळके ऑईल यांचा वापर करावा. आपल्या घरांच्या मोठया टाक्यांमध्ये गप्पी मासे सोडावेत ई. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेबाबत मा. डॉ.रामचंद्र हंकारे जिल्हा आरोग्य अधिकारी, व मा.डॉ.अपर्णा पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी पुणे यांनी मार्गदर्शनपर सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सासवड नगरपरिषदे मार्फत हिवताप, डेग्यू, चिकूनगुन्या या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवून साचलेल्या पाण्याचा निचरा करणे, डासांची उत्पत्ती रोखणेसाठी जनतेने सहकार्य करावे असे मा.आनंदिकाकी जगताप नगराध्यक्ष, मा.राजनभैया जगताप सभापती (आरोग्य) तसेच इतर सर्व मा.सभापती / मा.नगरसेवक व मा.डॉ.कैलास चव्हाण मुख्याधिकारी सासवड न.प. यांनी आवाहन केले.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणची वारंवार वीज खंडित झाल्यामुळे सासवडमधील सामान्य नागरिक पूर्णपणे संतप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पाऊस किंवा वाराही नसताना, सासवड मधील शहराच्या ठिकाणी गेल्या तीन ते चार दिवसापासून वारंवार वीज पुरवठा हा खंडित होत आहे, ऐन उन्हाळ्यामध्ये सलग दोन ते तीन तास वीज गायब होत असल्याकारणामुळे, महावितरण विरोधामध्ये नागरिकांमध्ये प्रचंड तीव्र असा संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे ,शहराला जेजुरी कडून येणाऱ्या ३३ केवी उच्च दाब वाहिनी द्वारे वीजपुरवठा होतो, या वाहिनीमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असून ,त्या नित्याच्याच बाबी झालेल्या आहेत, विशेष म्हणजे दर गुरुवारी देखभालीसाठी पाच ते सहा तास लाईट त्या बंद ठेवली जाते, तरीही इतर दिवशी वीज का जाते ,असा संतप्त सवाल व्यापारी आणि सामान्य नागरिक विचारत आहेत, असे प्रकार वारंवार घडत असल्याकारणामुळे, नागरिकांमध्ये नाराजी आहे, वीज जाण्याची वेळ ठराविक नाही त्यामुळे कोणत्याही वेळेमध्ये नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो, रात्रीच्या वेळी पूर्व सूचने शिवाय वीज जात असल्याने, लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचे प्रचंड हाल होत असून ,तसेच स्थानिक व्यावसायिक आणि घरून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची मोठे नुकसान होत आहे, महावितरण ने केवळ सोशल मीडियावर संदेश न देता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी सामान्य नागरिकांची म्हणजे सासवड करांची मागणी आहे सासवड मध्ये सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे, विदयमान आमदारांच्या काळामध्ये सुद्धा हे प्रकार होत आहेत, तर त्या ठिकाणी विद्युत पुरवठा ही त्या ठिकाणी अधिकारी सारखीच विद्युत पुरवठा खंडित होत आहे, यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड असा मनस्ताप होत आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड मधील एसबीआय बँकेच्या एटीएम मधून अज्ञात इसमाने 34 हजार 500 रुपये काढले सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील एसबीआय बँकेच्या एटीएममधून दि. 2 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारामध्ये योगेश सणस हा नाईक सुभेदार म्हणून आर्मीमध्ये होता, 1985 साली आर्मी मधून निवृत्त झाला असून, पेन्शन एसबीआय बँकेच्या खाते क्रमांक 1165 593439 8 या खात्यावर जमा होत असून, त्या ठिकाणी मिळणारे पेन्शनवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत, त्यासाठी साडेनऊ वाजण्याच्या सुमारामध्ये सासवड येथील या एटीएम मधून रोख रक्कम किती शिल्लक आहे हे पाहण्याकरता गेले असता, त्या ठिकाणी उभा असणार एक अनोळखी इसम वय अंदाजे 30 ते 35 वर्षीय फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट पायात फिकट निळ्या रंगाची जीन पॅन्ट पायात पांढरा बूट तोंडाला मास घातलेला असून, त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतो असे म्हणून त्या अनोळखी इसमाने एटीएम कार्ड देऊन, पिन नंबर सांगून बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे हे सांगा असे सांगितले असता, एटीएम कार्ड वापरून शिल्लक रक्कम त्या ठिकाणी मिनी स्टेटमेंट ची स्लिप दिली व एटीएम कार्ड देऊन एटीएम मधून निघून गेला, त्यानंतर त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया चे पासबुक भरून घेतले असता, असे समजून आले आहे की, त्या ठिकाणी पासबुक भरून घेतले असता बँक खात्यामध्ये फक्त 65 रुपये 80 पैसे एवढीच रक्कम शिल्लक असल्याची खात्री झाली असून, त्या ठिकाणी एटीएम द्वारे एकूण 34,500 रुपये खात्यामधून काढून त्या ठिकाणी रत्ना राम जाट असे नाव असून, त्याचा नंबर 45915604 36 762371 असा आहे त्यामुळे अज्ञात इसमाविरुद्ध फिर्याद ज्ञानदेव निवृत्ती सनस वय 77 वर्ष धंदा सेवा निवृत्त राहणार आतकरवाडी पोस्ट माहूर तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस येथे त्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सुनील चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी घरामधून मोबाईल व रोख रक्कम चोरी सासवड प्रतिनिधी बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सोपानदेव मंदिराच्या पाठीमागील बाजू मध्ये असलेल्या एका घरामधून चोरट्याने तीन मोबाईल आणि सहा हजार रुपयाची रोकड रक्कम असा एकूण 17000 रुपयाचा ऐवज लांब पास केला याबाबत उदयभान गेंदाराम चव्हाण राहणार सासवड यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिलेली आहे चव्हाण आणि त्याचे मित्र येथील एका खोलीत भाड्याने राहतात एक जून रोजी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारामध्ये फिर्यादी व त्याचे मित्र खोलीत आणि खोलीच्या बाहेर झोपलेले असताना चोरट्याने खोलीत प्रवेश केला चोरट्याने चव्हाण यांचा 5000 रुपये किमतीचा मोबाईल पिंटू चव्हाण यांचा 3000 रुपये किमतीचा मोबाईल जयसिंग चव्हाण यांचा 3000 रुपये किमतीचा मोबाईल आणि राजेश चव्हाण यांच्या पॅन्ट मधील.सहा हजार रुपयाची रोकड असा एकूण 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे पुढील तापा सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार बापू गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत

पुरंदर तालुक्यामध्ये वाटाणा पिकाच्या तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बोपगाव ता. पुरंदर येथील आयोजित केलेल्या वाटाणा पीक प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञाची माहिती देण्यात आली असून, आगामी खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी बदलत्या हवामानाचा शेतीवरील परिणाम एल निनोची स्थिती खरिपाची नियोजन तसेच खते व बियाणांच्या उपलब्धतेचे बाबत माहिती देण्यात आली, यावेळी पुरंदर तालुक्यामधील आवश्यक खते व बियाण्याच्या मुबलक साठा उपलब्ध असल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून, महाडीबीटी पोर्टल वरील विविध प्रशासकीय योजनांचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आव्हान करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी अंकुश बरडे, सहाय्यक कृषी अधिकारी विजय जाधव यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन केले .या सहाय्यक कृषी अधिकारी अतुल हिंगणे, कोंडीबा जरांडे, ऐश्वर्या मिंड, पाणी फाउंडेशनचे मयूर साळुंखे, राखी ढगारे ग्रामपंचायत पदाधिकारी ,महिला बचत गट सदस्य, लोकप्रतिनिधी शेतकरी आधी उपस्थित होते.

Image

गावाची जमीन गेली, तर तरुणांनी नोकरीसाठी शहरातच भिक मागायची का? पीएमआरडीएच्या निर्णयावर पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांचा संतप्त सवाल!उद्योजकता आणि कौशल्याचे स्वप्न धुळीस; अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची ८ तालुक्यांतील तरुणांच्या हक्कासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे धाव••सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : "आम्ही ग्रामीण भागात डिजिटल लायब्ररी, कौशल्य विकास केंद्र आणि तरुणांसाठी लघुउद्योग उभे करण्याचे स्वप्न पाहत आहोत. मात्र, जर गावातील हक्काची जमीनच पीएमआरडीए लाटणार असेल, तर आमच्या ग्रामीण तरुणांनी रोजगारासाठी पुन्हा शहरांकडेच चकरा मारायच्या का?" असा आक्रमक आणि थेट सवाल आता पुणे जिल्हा परिषदेने उपस्थित केला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ७ मे २०२६ च्या आदेशानुसार, ८ तालुक्यांमधील २०९४.३९ हेक्टर गायरान आणि शासकीय जमीन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) वर्ग केली जात आहे. या निर्णयामुळे ग्रामीण तरुणांच्या भविष्यातील रोजगाराची दारे बंद होणार असल्याचे सांगत, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.नगर विकास विभागाच्या २ मे २०२६ च्या शासन निर्णयाचा (जीआर) दाखला देत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी (आदेश क्र. सुकशी/जमिन/सीआर/०२/२०२६) हवेली, मुळशी, दौंड, भोर, मावळ, पुरंदर, शिरूर आणि खेड या तालुक्यांमधील शासकीय जमिनी पीएमआरडीऐकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.यावर आक्षेप घेताना अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी स्पष्ट केले की, महसूल व वन विभागाच्या १२ जुलै २०११ च्या कायद्यानुसार गावचे गायरान क्षेत्र एकूण शेतीक्षेत्राच्या ५ टक्क्यांपेक्षा कमी करता येत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि १९८४ चे धोरण स्पष्ट असतानाही, ग्रामसभांचा कोणताही ठराव किंवा जिल्हा परिषदेची शिफारस न घेता हा निर्णय लादण्यात आला आहे.जर जिल्ह्यातील या विस्तीर्ण जमिनी पीएमआरडीऐकडे गेल्या, तर ८ तालुक्यांतील शेकडो गावांमध्ये तरुणांसाठीच्या पुढील महत्त्वाकांक्षी योजनांना कायमची खीळ बसेल:• कौशल्य व स्टार्ट-अप केंद्र: गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी डिजिटल अभ्यासिका, वाचनालये आणि छोटे बिझनेस इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी जागाच उरणार नाही.•• क्रीडा विकास ठप्प: ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणारी क्रीडांगणे आणि व्यायामशाळांच्या विस्ताराला ब्रेक लागेल.• कृषी-पूरक उद्योग धोक्यात: स्थानिक महिला बचत गट आणि तरुणांच्या शेतीपूरक लघुउद्योगांसाठी (उदा. दूध संकलन केंद्र, शीतगृहे) शासकीय जागा शिल्लक राहणार नाही.🔲 प्रशासकीय फाईल: कायद्याचे ३ मोठे उल्लंघन• लोकाधिकार नाकारला: स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि ग्रामसभांना दुय्यम वागणूक देत २०९४ हेक्टर जमिनीची थेट पळवापळवी.•• सर्वोच्च न्यायालयाचा अवमान: गायरान जमिनी केवळ ग्रामीण गरजा आणि सार्वजनिक हितासाठीच वापरता येतील या न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष.• असमतोलाचा धोका: शहराच्या चकचकीत विकासासाठी ग्रामीण पुण्याचा पायाच उखडण्याचा प्रयत्न.••जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ५ प्रमुख मागण्या:१. तात्काळ स्थगिती: पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ७ मे २०२६ च्या भू-हस्तांतरण आदेशाचा तातडीने पुनर्विचार करून त्याला स्थगिती द्यावी.२. स्वायत्तता सुरक्षित ठेवा: ग्रामपंचायतींच्या ताब्यातील सर्व गायरान जमिनी पीएमआरडीऐकडे न देता जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासनाकडेच सुरक्षित ठेवाव्यात.३. यादीतून वगळणे: हस्तांतरण यादीतून गायरान व सार्वजनिक वापराच्या जमिनी पूर्णपणे वगळण्यात याव्यात.४. समतुल्य पर्यायी जमीन: अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत विकासकामांसाठी जमीन द्यावीच लागल्यास, त्या बदल्यात संबंधित ग्रामपंचायतीला समतुल्य पर्यायी शासकीय जमीन उपलब्ध करून द्यावी.५. पूर्वसहमी बंधनकारक: कोणत्याही हस्तांतरणापूर्वी संबंधित ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांची रीतसर लेखी सहमती घेण्याची तरतूद करावी.थेट प्रतिक्रिया••"आम्ही ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखू इच्छितो. त्यासाठी गावातच पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्माण करणे गरजेचे आहे. पण जर आमच्या जमिनीच हिरावून घेतल्या, तर गावे ओसाड पडतील. राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार या स्वतः तरुणांच्या आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांची सखोल जाण असणाऱ्या नेत्या आहेत. प्रशासनाच्या या धोरणामुळे ग्रामीण पिढीचे होणारे नुकसान त्या नक्कीच ओळखून या आदेशाला तातडीने स्थगिती देतील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे."— श्री. वीरधवल जगदाळे, अध्यक्ष - जिल्हा परिषद, पुणेपुढील दिशा: पुण्यात युवा शक्ती आक्रमक होणार!जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी मांडलेल्या या युवा पिढीच्या प्रश्नांमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ८ तालुक्यांमधील तरुण आणि लोकप्रतिनिधींनी आता जिल्हा परिषदेच्या सोबतीने या लढ्यात उडी घेण्याची तयारी दर्शवली आहे. आता चेंडू थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दरबारात गेल्याने, शासन या वादग्रस्त आदेशाला स्थगिती देऊन ग्रामीण पुण्याच्या तरुण पिढीला दिलासा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,700दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर  सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज:                                                    पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि. 3 ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4, 700 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे,  दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,700 तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 3,800 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,600 तर सरासरी 2,900 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे,  शरयू वाबळे,  भाऊसो गुलदगड, पंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख, लिपिक विकास  कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, राजेंद्र जालिंद्रे, अविनाश महाजन, नंदकुमार महाजन, सत्यवान पवार, जितेंद्र महाजन, बाबा पवार ऋषिकेश  ट्रेडिंग, शैलेश विरकर, गुळाला 4,500रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 338 बॉक्स  68 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,500रुपये तर साधारण4,450 रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये किमान, कमाल, सरासरी.  ज्वारी 3,000,4,700,3,800. बाजरी 2,500,3,100, 2,800. गहू 2,600,3,200,2,900. तांदूळ 4,800,5,500,5,150हरभरा 5,000, 5,600,5,300.

Image

एजंट (दलाल )इन्वेस्टर बहिणीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदर मध्ये उभारणीसाठी अधिकारी पुढारी यांच्या संगणमताने तयारी ; परंतु दस्तर खुद्द शेतकरी सात गावातील जमीन न देण्याचा निर्धार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात प्रामुख्याने प्रशासकीय इमारतीमध्ये अक्षरशा :एजंट (दलाल )यांचा सुळसुळाट झालेला आहे ,पुरंदर तालुक्यात विमानतळ संदर्भात या एजंट (दलाल)यांनी अधिकारी यांच्या नावाखाली काही ठिकाणी शेतकऱ्याला ,महिलांना एजंट दलाल यांनी पूर्णपणे वेठीस धरलेले आहे ,अधिकारी यांच्या नावाखाली काही गुंठे जमीन एजंट (दलाल) मागत आहेत अधिकारी यांचे नाव सांगून निकाल करुन घेत असताना दोन लाख रुपयांपर्यंत अधिकारी याच्यानुसार शेतकऱ्याकडून करत आहेत, विमानतळ साठी संमती शेतकरी आणतो असे सांगून तर सर्वसामान्य शेतकरी यांना वेटीस धरत आहे, काही विमानतळ भागात झाडे, झुडपे शेड वगैरे नोंदी खोट्या असलेल्या अधिकारी वर्गाकडून लावून घेतलेल्या आहेत, विमानतळ संदर्भात 15 ते 20 एजंट (दलाल)आहेत अधिकारी वर्गापाशी अक्षरशा:असून तासनतास आत मध्ये गप्पा टप्पा चाललेल्या असतात या एजंट (दलाल) वर फौजदारी गुन्हे दाखल करावेत सर्वसामान्य शेतकऱ्याला अधिकारी यांच्या पाशी पाच मिनिट सुद्धा वेळ मिळत नाही , एजंट (दलाल) मुळे सर्व सामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत, तर एजंट (दलाल) यांची कामे होतात अधिकारी वर्ग लोकसेवक आहेत, तर एजंट( दलाल) यांना का ? वेळ दिला जातो सर्वसामान्य शेतकरी यांना कमीत कमी पाच मिनिट वेळ तरी लोकसेवक अधिकारी वर्गाने द्यावा, म्हणजेच सर्वसामान्यांची कामे होतील व एजंट (दलाल )वकील यांना एक प्रकारे चांगलाच लगाम लागेल मोचके पुरंदर मधील वकील सुद्धा त्यामध्ये सामील आहेत, अधिकारी वर्गापाशी तासूनतास आत मध्ये गप्पा मारत असतात तर सर्वसामान्य शेतकरी यांचे काम होत नाही ,विमानतळ संदर्भात तालुक्यातून कामासाठी हेलपाटे मारत असतात ,लिफ्ट कित्येक दिवस बंद आहे ,त्यावर निर्णय होत नाही ,जेष्ठ नागरिक ,महिला दिव्यांग यांचे हाल होत आहेत, एखादा जिन्यावरून जाताना चक्कर येऊन पडल्यावरच का ? प्रशासन लक्ष देणार का? प्रामुख्याने अधिकारी वर्गाने पुरंदर मधील विमानतळ एजंट (दलाल) बहिणींच्या इन्वेस्टर यांच्या जोरावर विमानतळ चा जो काही घाट घातलेला आहे तो मनसुबा पूर्ण होणार नाही, उदाचीवाडी येथे एका शेतकऱ्याला अधिकारी सांगतो दोन ड्रेस घेतो ,मुलाला मुलीला कामाला लावतो, हा प्रकार अधिकारी वर्गाकडून होत आहे तर एजंट (दलाल )सर्वसामान्य शेतकरी महिला यांना अक्षरशा: काही गुंठे जमीन माझ्या नावावर करा ,बाकी तुम्हाला विमानतळाचे पेमेंट मिळवून देतो, अधिकारी वर्गाचे नाव पुढे करून एजंट (दलाल )हे प्रकार करत आहेत यावर अधिकारी बदनाम होत आहेत त्यासाठी अधिकारी वर्गाने प्रामुख्याने हे जर प्रकार होत असतील तर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी यांची कामे होत नाहीत ,त्यामुळे एजंट (दलाल )यांना खुद्द अधिकारी वर्गाने आवरावे वेळ देऊ नये ,तासूनतास एजंट (दलाल) काही वकील यांना वेळ दिला जातो तर लोकसेवक म्हणून अधिकारी वर्गाने पुरंदर मधील सर्वसामान्य शेतकरी तालुक्यातून येतो ,विमानतळ संदर्भात बाकीच्या कामात कमीत कमी पाच मिनिट तरी त्या सर्वसामान्य शेतकऱ्याला वेळ द्यावा व त्याचे काम पूर्ण होईल त्याला पूर्णपणे समाधान मिळेल, सर्वांना एकच न्याय द्यावा ,एजंट (दलाल )काही वकील यांना जास्त वेळ दिल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी विमानतळ संदर्भात भेटायला आलेल्या तालुका पुरंदर तालुक्यातील वेळेत त्यांची कामे सर्वसामान्य लोकांची होतील तर एजंट (दलाल )बहिणीच्या, इन्वेस्टर पुढारी यांच्या जोरावरच फक्त पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवडी ,एखतपुर, मुंजवडी ,वनपुरी ,उदाचीवाडी कुंभारवळण येथे विमानतळ उभारणार का ? तर सर्वसामान्य कट्टर शेतकरी यांच्या निर्णय निर्धार असा आहे की, विमानतळाला जमीन मोजणीला शासनाला परवानगी दिली, तर भूसंपादन विमानतळाला संमती न देण्याचा निर्धार पक्का मोजक्या शेतकरी वर्गाने घेतलेला आहे ,सक्तीने जमीन शेतकऱ्यांची घेता येत नाही ,कुठे आंबेडकर वृत्तांत मध्ये असे लिहिले आहे का ? शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करा, असा अहवाल कुठेच नाही, हुकूमशाही ,दंडूकशाही ,लाठीमार शेतकऱ्यावर करता येत नाही, बागायत क्षेत्र विमानतळाला घेता येत नाही ,एजंट (दलाल) यांचा जो काही प्रकार चाललेला आहे त्यावर पहिले अधिकारी वर्गाने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, म्हणजे सर्वसामान्यांची पुरंदर मधील कामे सुरळीत चालू होतील ,अशी पुरंदर मधील सर्वसामान्य जनतेची व नागरिकांची मागणी असून, त्या ठिकाणी त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Image

पुरंदर तालुक्यातील नाझरे कप येथील कर्मचारी संदीप नाझीरकर यांनी मनमानी पद्धतीने शेतकऱ्याचा रस्ता अडवला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: नाझरे कप ता. पुरंदर येथील ग्रामपंचायत कर्मचारी संदीप रामचंद्र नाझीरकर यांनी मनमानी पद्धतीने आणि अरेरावीची भाषा करून शेतकऱ्याची अडवणूक करून रस्त्याची केलेली आहे. शेतकऱ्यांना येजा करण्यासाठी जो काही रस्ता वापरत असताना, त्यावर दगड, माती, काटे राडारोडा टाकून गेली एक वर्ष झाली तो रस्ता बंद केला आहे. यासंदर्भात संदरील ग्रामपंचायत तसेच ग्रामसेवक ,सरपंच यांच्याशी संपर्क साधला असता, सदरील ग्रामपंचायत तिकडून कुठल्याही प्रकारचे सहकार्य या शेतकऱ्यांना मिळत नाही, उलट अधिकारी सांगत आहे की, नाझीरकर यांना रस्ता खुला करून शेतकऱ्यांनी द्यावा, असे सांगतात हा कसला प्रकार म्हणायचा? तरी हा कर्मचारी कुणाचे ऐकत नाही, रस्ता शेतकऱ्यांना खुला करून देत नाही, उलट शेतकऱ्यांना दमदाटी शिवीगाळ महिलांना अर्वाच्य भाषा वापरून धमकी देणे गावातून हाकलून काढेल, माझी कोणी वाकडे करू शकत नाही ,अशा धमक्या तो कर्मचारी शेतकऱ्यांना करत आहे ,या संदर्भात पंचायत समिती पुरंदर तथकालीन गटविकास अधिकारी पंकज शेळके यांना त्यावेळी निवेदन दिले होते, त्यावेळी त्यांनी ग्रामसेवकांना आदेश देऊन सहकार्य करण्यासाठी मदत केली होती, परंतु ग्रामसेवक यांनी कुठलीही मदत केलेली नाही ,पुरंदर पंचायत समिती ग्रामसेवक व कर्मचारी यांना पाठीशी घालत आहेत, ग्रामसेवक व कर्मचारी यांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांना रस्ता अडवत आहेत, आताच्या घटविकास अधिकारी प्रणोती श्री श्रीमाळ या वर काय निर्णय घेणार ? हा प्रमुख प्रश्न आहे ,तरी महादेव गणपत बारभाई, अमोल महादेव बारभाई, अमर महादेव बारभाई यांनी गट विकास अधिकारी पुरंदर, पोलीस निरीक्षक जेजुरी, ग्राम पंचायत नाझरे क प तहसीलदार येथे निवेदन दिलेले आहे, त्यावर सामान्य या शेतकऱ्याला पुरंदर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ या काय न्याय देणार का ? असे सविस्तर वृत्त माहिती महादेव बारभाई यांनी सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

पुरंदर तालुक्यातील एमपीएसससी परीक्षेमध्ये कॉफी ; तर उमेदवारावर सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल ; सासवड मधील परीक्षा केंद्रावरील घटना सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राइम न्यूज: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी दि. 31 रोजी आयोजित महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ व ब संयुक्त पूर्व परीक्षेत दरम्यान सासवड येथील केंद्रावर नियमांचे उल्लंघन करून ब्लूटूथ वापरल्याप्रकरणी एका उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाबासाहेब दिलीप कोळेकर वय 35 मूळ राहणार बहाद्दरपूर जिल्हा बीड सध्या राहणार धायरी गाव पुणे असे या उमेदवाराचे नाव आहे. सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मधील परीक्षा केंद्रावर रविवारी दि. 31 रोजी सकाळी 10:00 वाजता परीक्षा सुरू झाली 10:11 ) दरम्यान सुमारास समावेशक पूजा क्षीरसागर यांना उमेदवार बाबासाहेब कोळेकर यांच्या गळ्यात ब्लूटूथ हेडफोन असल्याची आढळले या प्रकाराची माहिती मिळताच उपकेंद्र प्रमुख रेणुका सिंह मर्चंट व अन्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला वरिष्ठांच्या आदेशानुसार कोळेकर यांचा पेपर काढून घेण्यात आला त्यांच्या बॅगची तपासणी केली असता तीन पुस्तके आणि बंद मोबाईल मिळून आला पर्यवेक्षकांनी पंचनामा करून साहित्य जप्त केले एमपीएसससी च्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजा क्षीरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी कोळेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार सुनिल चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी महावितरण ची वीज वाहक तार चोरीला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीमधील महावितरण कंपनीच्या खांबावरून अज्ञात चोरट्याने 57 हजार रुपये किमतीचा वीज वाहक अल्युमिनियम तार कट करून चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ गणेश पांडुरंग आवाळे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. खळद येथील बाबदेव मळा भागातील शेतात महावितरणची वीज वाहिनी आहे 14 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने महावितरण कंपनीची अंदाजे सातशे मीटर लांबीची ॲल्युमिनियमची तार खांबावरून कट करून चोरून नेली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार दत्ता शेगर हे पुढील तपास करीत आहेत.