Skip to main content
पुरंदर तालुक्यातील कानिफनाथ घाटामध्ये तरुण-तरुणींना लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना फक्त बारा तासाच्या आत मध्ये बेड्या घातल्या फुरसुंगी पोलिसांची उत्तम कामगिरी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज कानिफनाथ गडा मधील घाटाच्या सिटी व्ह्यू पॉईंट परिसरामध्ये तरुण-तरुणी वर लाठ्या काठ्या आणि दगडाने हल्ला करून ,त्यांना लुटणाऱ्या तीन आरोपींच्या मुस्क्या फक्त फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या बारा तासाच्या आत आवळल्या प्रतीक दिलीप फडतरे वय 22 धंदा रसवंती गृह राहणार बोपगाव तालुका पुरंदर ,ओंकार सुनील फडतरे वय 27 धंदा शेती राहणार बोपगाव तालुका पुरंदर ,गणेश नवनाथ कामठे वय 27 धंदा शेती राहणार चांबळी चिलवाडी वस्ती तालुका पुरंदर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, आरोपीकडून पोलिसांनी स्प्लेंडर मोटरसायकल आणि लुटलेले मोबाईल असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मंगळवारी दि.11 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुण हा त्याचे मित्र आकाश, अथर्व आणि एक मैत्रीण यांच्यासमोर दोन ऍक्टिवा दुचाकी वरून, कानिफनाथ मंदिराच्या हद्दीतील सिटी व्ह्यू पॉईंट जवळ निसर्ग पाहण्यासाठी आले होते ,यावेळी तरुण-तरुणींना रस्त्यात आडवून वरील आरोपींनी हुज्जत घालत लाथा बुक्क्यांनी आणि रस्त्यावरील दगडाने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली, आरोपींनी फिर्यादी आणि त्याचा मित्र आकाश यांच्याकडून 15,000 रुपये किमतीचे दोन महागडे मोबाईल हँडसेट आणि ऑनलाईन जबरदस्तीने घेतले 13,300 रुपयाची रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल धाक दाखवून लुटला आणि अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते, या घटनेची फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन ,पोलीस पथकाला शोध घेण्याच्या सूचना दिल्या, दरम्यान त्यानुसार पोलीस अंमलदार हेमंत कामथे आणि सागर वनवे यांच्या गोपनीय बातमीदारांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच हवालदार जाधव यांनी आरोपींच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता हे तिघेही कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी बोपगाव येथे लपून बसल्याचे निष्पन्न झाले.वरिष्ठांच्या आदेशाच्या नुसार फुरसुंगी पोलिसांच्या पथकाने कानिफनाथ पायथा बोपगाव परिसरात वेळा दिला आणि संशयतांना ताब्यात घेतले पोलिस खाक्या दाखवतातच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, सदरची कामगिरी फुरसुंगी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बापूसो खंदारे सहाय्यक पोलीस फौजदार कदम ,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वनवे हेमंत कामथे,योगेश गायकवाड आणि गणेश शिंदे यांनी केली आहे. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment