Posts
Showing posts from September, 2026
पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट असे आधार कार्ड पॅन कार्ड वापरा मधून दोन दस्त : तर एक कोटी 79 लाखांचा व्यवहार, सहा जणांना अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी तालुका पुरंदर येथील एक कोटी 79 लाख रुपयाच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमीन मालक असलेल्या महिलेच्या नावानेच कथित असे बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड तयार करून, त्या व्यक्तीच्या ऐवजी तोतया महिला उभी करून, दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून, तब्बल अशा एक कोटी 79 लाख रुपयाचा व्यवहार केला असून, विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 45 राहणार कोंढवा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासा अंती बाबू उर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तीन जणांना अटक केली आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित संजय पवार, संतोष किसन मेमाणे तसेच प्रियाली परदेशी या नावाने दस्तावर सही करणाऱ्या अनोळखी महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. व्यवहाराचा केलेला आरोप असताना फिर्यादी जमीन खरेदी विक्रीचे एजंट असून ,पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील गट क्रमांक २५२ मधील ७५ गुंठे आणि गट क्रमांक २५८ मधील 14 एकर पन्नास गुंठे जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगण्यात आले असताना, या जमिनी ची मालकी प्रियाली राकेश परदेशी यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड दस्त नोंदणी कार्यालयामध्ये संबंधित जमिनीचे दोन दस्त करण्यात आले आहेत .गट क्रमांक २५२ मधील व्यवहारासाठी दस्त क्रमांक 1788/ 2025 तर गट क्रमांक 228 साठी दस्त क्रमांक 1789/ 2025 असा करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये चेक द्वारे 20 लाख रुपये आणि दस्तावर चार लाख रुपये असे घेण्यात आल्याचे, तसेच रोख स्वरूपामध्ये एक कोटी 55 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे. बोगस महिलेचा वापर प्रामुख्याने ऍडव्होकेट विद्या संदीप कामथे दस्त नोंदणी वेळी मूळ जमीन मालक प्रियाली परदेशी यांच्या नावाने दुसऱ्या महिलेला उभी करून तिची ओळख पटवून, देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे यांनीच प्रियाली परदेशी असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सातबारा उतारा तपासल्यानंतर मूळ मालकांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला आहे. त्यानंतरच सासवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळेच कथित बनावट ओळखपत्रे जमीन मालकीची पडताळणी दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशाच्या देवाण-घेवाणीची साखळी ही पूर्णपणे तपासाचा महत्त्वाचा एक प्रकारे भाग ठरणार आहे, दस्त नोंदणीच्या वेळी सादर करण्यात आलेली ओळखपत्रे छायाचित्रे अथवा नोंदणीशी संबंधित असणाऱ्या माहितीची दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या व्यवहाराचे देवाण-घेवानिशी काय संबंध आहे, त्याचीही पुरावे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेने प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली.तसेच जमीन फसवणुकीतील बोगस महिलाही अटकेत न्यायालयाकडून दोन दिवसाची पोलीस कोठडी प्रस्तावित विमानतळ प्रकल्पाच्या वनपुरी येथील जमीन व्यवहारात बनावट महिला उभी करून, बोगस खरेदीखत केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघांना अटक केली असून, अर्चना मिरकुटे ,संकेत कोकरे आणि गणेश टिळेकर अशी आरोपींची नावे आहेत, यापूर्वीही बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक झाली होती सर्व सहा आरोपींना सासवड न्यायालयाने आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून, वन पुरीतील गट क्रमांक २५२ आणि २५८ मधील जमीन प्रियाली राकेश परदेशी यांच्या मालकीचीच असताना, त्यांच्या जागी बोगस महिला उभी करून बनावट दस्त तयार केल्याचा आरोप आहे ,या व्यवहारातून एकूण एक कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित पवार आणि संतोष मेमाणे अद्यापही फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.अशी सविस्तर माहिती मिळाली.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,951 दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.30 सप्टेंबर ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,951 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,951तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,811 तर सरासरी 4,381हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,851 तर सरासरी 3,075 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, uपंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 4,900रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,66बॉक्स 113क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,400 कमाल दर 4,900रुपये तर साधारण4,700रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी ज्वारी 3,811,4,951,4,381. बाजरी 2,800,3,200,3,000. गहू 2,851,3,300,3,075. तांदूळ ---------------------.हरभरा 5,600, 6,000,5,800.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट असे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरा मधून दोन दस्त : तर एक कोटी 79 लाखांचा व्यवहार, तीन जणांना अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी तालुका पुरंदर येथील एक कोटी 79 लाख रुपयाच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमीन मालक असलेल्या महिलेच्या नावानेच कथित असे बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड तयार करून, त्या व्यक्तीच्या ऐवजी तोतया महिला उभी करून, दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून, तब्बल अशा एक कोटी 79 लाख रुपयाचा व्यवहार केला असून, विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 45 राहणार कोंढवा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासा अंती बाबू उर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तीन जणांना अटक केली आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित संजय पवार, संतोष किसन मेमाणे तसेच प्रियाली परदेशी या नावाने दस्तावर सही करणाऱ्या अनोळखी महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. व्यवहाराचा केलेला आरोप असताना फिर्यादी जमीन खरेदी विक्रीचे एजंट असून ,पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील गट क्रमांक २५२ मधील ७५ गुंठे आणि गट क्रमांक २५८ मधील 14 एकर पन्नास गुंठे जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगण्यात आले असताना, या जमिनी ची मालकी प्रियाली राकेश परदेशी यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड दस्त नोंदणी कार्यालयामध्ये संबंधित जमिनीचे दोन दस्त करण्यात आले आहेत .गट क्रमांक २५२ मधील व्यवहारासाठी दस्त क्रमांक 1788/ 2025 तर गट क्रमांक 228 साठी दस्त क्रमांक 1789/ 2025 असा करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये चेक द्वारे 20 लाख रुपये आणि दस्तावर चार लाख रुपये असे घेण्यात आल्याचे, तसेच रोख स्वरूपामध्ये एक कोटी 55 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे. बोगस महिलेचा वापर प्रामुख्याने ऍडव्होकेट विद्या संदीप कामथे दस्त नोंदणी वेळी मूळ जमीन मालक प्रियाली परदेशी यांच्या नावाने दुसऱ्या महिलेला उभी करून तिची ओळख पटवून, देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे यांनीच प्रियाली परदेशी असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सातबारा उतारा तपासल्यानंतर मूळ मालकांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला आहे. त्यानंतरच सासवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळेच कथित बनावट ओळखपत्रे जमीन मालकीची पडताळणी दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशाच्या देवाण-घेवाणीची साखळी ही पूर्णपणे तपासाचा महत्त्वाचा एक प्रकारे भाग ठरणार आहे, दस्त नोंदणीच्या वेळी सादर करण्यात आलेली ओळखपत्रे छायाचित्रे अथवा नोंदणीशी संबंधित असणाऱ्या माहितीची दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या व्यवहाराचे देवाण-घेवानिशी काय संबंध आहे, त्याचीही पुरावे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेने प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली.
- Get link
- X
- Other Apps
आरोग्य व ध्यान सत्राचे आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज फॉर वुमेन, पुणे येथे प्रथम वर्ष बी.बी.ए. व बी.सी.ए.च्या विद्यार्थिनींसाठी ‘आरोग्य व ध्यान’ (Health & Meditation) या विषयावर विशेष मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र Induction Programme 2026–27 अंतर्गत आयोजित करण्यात आले होते.या सत्रासाठी एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे येथील डॉ. ललिता भगत यांना मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थिनींना आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, तणावमुक्त जीवन, ध्यानाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात आरोग्यपूर्ण सवयींचा अंगीकार याविषयी मार्गदर्शन केले.संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. ध्यान व मनःशांतीच्या माध्यमातून एकाग्रता, सकारात्मक विचारसरणी आणि मानसिक संतुलन कसे साधता येते, याचेही मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमाबद्दल एस.एन.डी.टी. आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या बीसीए/बीबीए विभागाचे समन्वयक डॉ. रवींद्र हांडे आणि प्राचार्य डॉ. भरत विहंगकाटे यांनी डॉ. ललिता भगत यांचे आभार मानले. विद्यार्थिनींसाठी हे सत्र आरोग्य, ध्यान आणि सकारात्मक जीवनशैलीच्या दृष्टीने उपयुक्त व प्रेरणादायी ठरले.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता मुक्ताबाई पवार यांचे निधन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील दिवे पंचक्रोशीतील पवारवाडी गावच्या राहिवाशी व आदर्श शेतकरी मुक्ताबाई सोपाना पवार (वय वर्षे 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार असून संत सोपानकाका सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक विलास सोपान पवार व सासवड बार असोसियनचे माजी अध्यक्ष ॲड. मनोहर सोपान पवार यांच्या त्या आई होत.
- Get link
- X
- Other Apps
निधन वार्ता दिनकर खेडेकर यांचे निधन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी गावचे राहिवाशी व प्रगतशीर शेतकरी दिनकर एकनाथ खेडेकर (वय वर्षे 81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार असून सासवड येथील रेनबो कॉम्प्युटर एज्युकेशचे मालक दत्तात्रय दिनकर खेडेकर यांचे तें वडील होत.
- Get link
- X
- Other Apps
वाघिरे महाविद्यालयात ‘फिल्म कॅम्पस क्लब’ची स्थापना‘गिरणी’ लघुपटाच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक व सर्जनशील विचारांना चालना सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षण, कला आणि सामाजिक वास्तव यांची सांगड घालता यावी, या उद्देशाने ‘फिल्म कॅम्पस क्लब’ची स्थापना करण्यात आली. क्लबच्या उद्घाटनानिमित्त प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘गिरणी’ या लघुपटाचे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले.‘गिरणी’ या लघुपटाला २००४ साली तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. घरामध्ये पिठाची गिरणी आल्यानंतर त्या घरातील एका लहान मुलाच्या मानसिकतेत आणि वर्तनात हळूहळू होत जाणाऱ्या बदलाचे संवेदनशील व कलात्मक चित्रण या लघुपटातून करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील एका साध्या घटनेच्या माध्यमातून मानवी मन, कौटुंबिक संबंध, बदलते सामाजिक वास्तव आणि बालमानसशास्त्र यांचा वेध घेण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.लघुपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांशी साधक-बाधक चर्चा आयोजित करण्यात आली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांनी चित्रपटातील आशय, व्यक्तिरेखांचे मानसशास्त्र, दिग्दर्शकीय मांडणी, प्रतीकात्मकता, सामाजिक संदर्भ तसेच आजच्या बदलत्या जीवनशैलीशी चित्रपटाचा असलेला संबंध यावर आपली मते व्यक्त केली.प्राध्यापकांनीही चित्रपटाच्या विविध पैलूंचे विश्लेषण करताना चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक वास्तव समजून घेण्याचे आणि विचारप्रक्रियेला चालना देण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे स्पष्ट केले. चित्रपटातील दृश्यभाषा, ध्वनी, अभिनय, कॅमेरा आणि कथानकाच्या माध्यमातून आशय अधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो, यावरही चर्चा झाली.फिल्म कॅम्पस क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सार्थक, दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपट व लघुपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासोबतच चित्रपट प्रदर्शनानंतर चर्चा, समीक्षण, संवाद आणि विश्लेषणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाच्या दृक्-श्राव्य पद्धतीची ओळख करून देणे, कलाकृतींकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याची सवय निर्माण करणे आणि कलेविषयी अभिरुची विकसित करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि चिकित्सक विचारक्षमतेला चालना देण्याचा प्रयत्न या क्लबच्या माध्यमातून केला जाणार आहे.तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि मानसशास्त्रीय विषयांवरील चित्रपटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजाकडे अधिक संवेदनशील आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळणार आहे.चित्रपट पाहताना केवळ कथानक समजून न घेता त्यामागील दिग्दर्शकीय दृष्टिकोन, कलात्मक भाषा, सामाजिक आशय आणि मानवी मूल्ये समजून घेण्यावर क्लबच्या उपक्रमांमध्ये भर दिला जाणार आहे.महाविद्यालयातील विविध शाखांतील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेत बहुविषयक अध्ययनाला चालना देण्याचा मानस असल्याचे आयोजकांनी सांगितले.विद्यार्थ्यांनीही ‘गिरणी’ या लघुपटाच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदविला. चित्रपटाच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक व मानसशास्त्रीय विषयाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा फिल्म कॅम्पस क्लब दर शनिवारी नियमितपणे कार्यरत राहणार आहे. आगामी काळात विविध आशयघन चित्रपटांचे प्रदर्शन, चित्रपट समीक्षण, दिग्दर्शक व तज्ज्ञांशी संवाद, कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांच्या लघुपट निर्मितीस प्रोत्साहन देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. नरसिंग गिरी, फिल्म कॅम्पस क्लबचे समन्वयक प्रा. सुनील शिंदे, प्रा. डॉली पटेल, प्रा. महेश देवकर, प्रा. पूर्वराणी जगताप, प्रा. राजेश सोनवणे, प्रा. सविता पिंगळे, प्रा. निकिता कुंभार आणि प्रा. दिव्या पिलाने यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.फिल्म कॅम्पस क्लबच्या स्थापनेमुळे वाघिरे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात चित्रपट, कला, सामाजिक जाणीव आणि चिकित्सक विचार यांचा अभिनव संगम घडून येणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध गुणवत्ता व रुग्णसुरक्षेबाबत मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक, सासवड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त विशेष जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीच्या कार्यक्रमात “औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता सुनिश्चित करण्यात अन्न व औषध प्रशासन आणि फार्मासिस्टची भूमिका” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक मा. रझिया शेख या प्रमुख अतिथी व व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी सासवड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धैर्यशील शिंदे तसेच पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी जगताप यांनी फार्मासिस्ट प्रतिनिधी म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण यांनी फार्मसी व्यवसायातील बदलत्या जबाबदाऱ्या अधोरेखित करताना रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.मार्गदर्शनपर व्याख्यानात मा. रझिया शेख यांनी औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता, योग्य साठवणूक, वितरण व्यवस्था, नियामक नियमांचे पालन, औषधांची तपासणी तसेच रुग्णांना योग्य औषधविषयक मार्गदर्शन या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.तसेच त्यांनी अन्न व औषध प्रशासनाची कार्यपद्धती, औषध निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, औषधांच्या गुणवत्तेची तपासणी, निकृष्ट दर्जाच्या औषधांपासून होणारे संभाव्य धोके, औषधांच्या सुरक्षित वापरासाठी आवश्यक खबरदारी तसेच फार्मासिस्टच्या व्यावसायिक व नैतिक जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबरोबरच औषधांची गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि रुग्णहिताचे संरक्षण यामध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेण्यास मदत झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “फार्मासिस्ट हा केवळ औषधांचे वितरण करणारा व्यावसायिक नसून औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि रुग्णहित यांचा महत्त्वपूर्ण संरक्षक आहे,” हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण, उपप्राचार्य डॉ. एस. जे. पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या विभागप्रमुख सौ. व्ही. एस. गायकवाड, श्री. एस. व्ही. भिसे, कु. पी. के. म्हस्के आणि सौ. पी. ओ. पाटसकर यांनी समन्वय साधला.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुका दुष्काळग्रस्त अखेर जाहीरच ; तर माजी आमदार संजय जगताप यांच्या पाठपुराव्याला यश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खरीप हंगाम 2026 मध्ये पावसाने अखेर खूप मोठी ओढ दिल्याच्या कारणामुळे संकटात सापडलेल्या पुरंदर तालुक्याला अखेर शासनाकडून दिलासा मिळालेला आहे, मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी शासन निर्णय क्रमांक समिती 2026 प्र.क 82 जाहीर करत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे, या यादीत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे .कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात पुरंदरसह अनेक तालुक्यांमध्ये सरासरी पेक्षा खूपच कमी पर्जन्य झाल्याचे स्पष्ट झाले होते दुष्काळ व्यवस्थापन सहितेनुसार ही कारवाई करण्यात आली असून, सहसचिव संजय इंगळे यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ,जगताप यांच्या पाठपुराव्याला यश हा निर्णय जाहीर होताच, पुरंदर हवेलीचे माजी आमदार आणि भाजपा नेते संजय चंदुकाका जगताप यांनी शासनाचे आभार मानलेले आहेत, गेल्या अनेक दिवसापासून ते पुरंदर तालुका दुष्काळग्रस्त यादी समाविष्ट करावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते सासवड ,जेजुरी, वाल्हे, परिंचे, पांगारे, सोनोरी ,रिसेपिसे, राजुरी,मालशिरस ,सुपा पानवडी, कालदरी,वीर, माहूर या भागात त्यांनी स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी केली होती ,सोयाबीन, मका, बाजरी, कांदा या पिकाची झालेली नुकसान आणि पाणीटंचाईची विदारक परिस्थिती त्यांनी शासन दरबारी मांडली होती, त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तातडीने अंमलबजावणी करा : संजय जगताप.संजय जगताप मनाले की शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन पुरंदरचा समावेश दुष्काळी यादीत केला त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद देत आहेत ,मात्र केवळ घोषणा करून थांबू नये, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या 12 सवलतीची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे जेणेकरून बळीराजाला प्रत्यक्ष लाभ मिळेल, पुरंदरच्या शेतकऱ्यांना या 12 सवलती मिळणार शासन निर्णयानुसार पुरंदर तालुक्यातील पुढील सवलती लागू होणार आहेत, एक जमीन महसुलात सूट, दोन पीक कर्जाचे पुनर्गठण, तीन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती ,चार कृषी पंपाच्या चालू वीज बिलाच सूट 7.5 अश्व शक्तीच्या पऱ्यांच्या वीज पंपांचे बिल अगोदरच माप आहे त्यावरील क्षमतेच्या पंपांनाही सूट लागू असेल, पाच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, सहा रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, सात आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर चा वापर, आठ टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे , नऊ शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी आणि मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही याची व्यवस्था करणे, दहा जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देणे ,अकरा जलसंधारणाची कामे सुरू करणे, बारा अगोदर निर्गमित केलेल्या शासन निर्देशाप्रमाणे त्याचे पाणी आणि जनावरांसाठी पाण्याची नियोजन करणे .या दरम्यान पुरंदर तालुक्यात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले असून, पिकाच्या नुकसानीची मदत स्वतंत्र आदेशाने जाहीर होणार आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील गणपती विसर्जनाच्या दिवशीच निलेश मेडिकल मध्ये पाच युवकांची एका युवकाला बेदम मारहाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील होले बिल्डिंग मेन रोड येथील निलेश मेडिकल मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशीच रात्री 11:45 वाजताच्या सुमारामध्ये गावच्या हद्दीतील होले बिल्डिंग मेन रोड येथील निलेश मेडिकल मधील एक आशिष राऊत, दोन अनुज राऊत यांनी शर्टची कॉलर पकडून लाथा बुक्क्याने मारहाण केली त्यावेळी तीन शैलेश राऊत, चार महेश राऊत, पाच ओंकार विजय राऊत यांनी मेडिकल मध्ये येऊन लाकडी काठ्याने मेडिकल मधील सामानाची तोडफोड करून साधारण 1,50,000 रुपयाचे नुकसान केलेले आहे, त्याचे हातातील काठीने तसेच भाऊ प्रसाद होले यांना सुद्धा मारहाण केली व आत्या व दोन बहिणींना शिवीगाळ करून, दमदाटी केली म्हणून पाच जणांविरोधामध्ये तक्रार ही फिर्यादी प्रतीक सुहास होले वय 24 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार होले बिल्डिंग मेन रोड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे ,सासवड पोलीस स्टेशन गु रजिस्टर नंबर 475/ 2026 भारतीय न्याय सविता कलम 189(2 ),190,, 191(2), 118( 1), 115(2), 352, 351(2 )(3),324 (5 )नुसार सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलिस हवालदार बापू गायकवाड हे करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन हद्दी मधील रेकॉर्ड वरील आरोपींना पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण यांच्या आदेशनावये आगामी काळातील गणेशोत्सव दरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे रोजी 24:00 वाजताच्या कलम 163( 2)( () प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून 19 जानेवारी 2026 रोजी वाजता ते दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी 24:00 वाजेपर्यंत सासवड पोलीस स्टेशन हद्दीतून खालील इसमांना हद्दपार करण्यात आलेले असून, खालील इसम सासवड पोलीस स्टेशन हद्दीत अथवा कोणत्याही सार्वजनिक गणपती मंडळाचे मिरवणुकी दरम्यान, मिळून आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, हद्दपार करण्यात आलेले आरोपी 1) अमित सुरेश गायकवाड राहणार भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 2)अभिजीत विष्णू कांबळे राहणार हिवरकर मळा तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 3) आदित्य शांताराम जाधव राहणार कोडित तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 4) आदित्य तानाजी चौधरी राहणार नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 5) जयवंत गुलाब यादव राहणार यादव वाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 6) गौरव उर्फ मायाभाई बाळासाहेब कामठे राहणार खळद तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,7) सुरज उर्फ भैया प्रकाश आहेर राहणार खंडोबा नगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे,8) सनी लालजी सोळंकी राहणार आंबोडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 9) सचिन विश्वास जाधव राहणार इंदिरानगर सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 10) नंदकिशोर सनी पांडुरंग माने राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 11) सुरज उर्फ बिट्टू माने राहणार कैकाडी आळी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 12) महेंद्र गोपीचंद जगताप राहणार ताठेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 13) शुभम संजय पांडे राहणार भिवडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे, 14) प्रथमेश सचिन जगताप राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,सदरची कामगिरी ही संदीप सिंह गिल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिराजदार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, राजेंद्र सिंह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर पुरंदर विभाग सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष घोळवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शन दरम्यान, करण्यात ही कारवाई आली आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील पुरंदर नागरी च्या प्रगतीसाठी विश्वासाची शिदोरी महत्त्वाची त्यासाठी स्वभांडवलाच्या बळावर उभी ठाकलेली ही पतसंस्था आता बँकेकडे वाटचाल माजी आमदार संजय जगताप यांचे प्रतिपादन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्वभांडवलावर व सर्व शाखा स्वत मालकीच्या जागेत आणि संगणकृत असणारी ही संस्था सभासदांनी संस्थापक स्वर्गवासी चंदुकाका जगताप आणि अध्यक्ष यांच्यावर विश्वास ठेवून वाढवली आहे. सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी शून्यातून उभ्या केलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेने स्वबळावर यशाचे नवे शिखर घाटले आहे. स्थापनेपासून आस्थागायत एक रुपयाही बाहेरील कर्ज न घेता केवळ सभासदांच्या अटळ विश्वासावर ही संस्था उभी आहे. सर्व तेरा शाखा संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत असून आधुनिक संगणक यंत्रणेद्वारे त्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच आज या संस्थेचा विस्तार झालेला आहे. या विश्वासाच्या बळावरच संस्थेची वाटचाल आता ही पुढे बँकेकडे सुरू असून, यासाठी पुढेही असाच लोभ ठेवावा असे आव्हान संस्थेचे मार्गदर्शक आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी केले आहे. सासवड तालुका पुरंदर येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे 38 वि वार्षिक सर्वसाधारण सभा आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार संजय जगताप, हरिभाऊ लोळे, रमणीकलाल कोठडीया , प्राध्यापक डॉक्टर एम एस जाधव, संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये संस्थापक स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमाची पूजन करून पार पडली. संचालक अनिल कामठे यांनी स्वागत व डॉक्टर विनायक खाडे यांनी प्रास्ताविक तर सर व्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवाल वाचन केले. अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी संचालक अंकुश जगताप, राजेश इंदलकर, युगंधरा कोंढरे, बाबासाहेब चौंडकर, चंद्रकांत बोरकर ,परशुराम तांबे ,सूर्यकांत कांबळे ,अमोल सातभाई, अडवोकेट किशोर मस्के, पोपटराव सोनवणे, भारती देशमुख, व्यवस्थापक सतीश शिंदे, हरिभाऊ शिंदे, आदी उपस्थित होते. सहकार विभागाचे अधिकारी एस.बी वाटाणे यांनी यावेळी सभासदांना सहकार कायद्याबाबत प्रशिक्षण दिले. वार्षिक सभेत सभासदांनी विविध विषयावर मुक्तपणे आपले विचार मांडले रवींद्रनाथ ताकवले, नंदकुमार जगताप, मार्तंड भोंडे, माणिक चोरमले, संदीप फडतरे, शहाजी सस्ते, आनंद भोसले, विठ्ठल मोकाशी, दिलीप गिरमे, गौतम बेंगाळे ,बाबासो जगताप, दामोदर कदम, शिवाजीराव ढमढेरे ,प्रदीप पोमण संजय रूढ आदी सभासदांनी चर्चेत सक्रिय असा सहभाग घेतला. संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगताना माजी आमदार संजय जगताप मनाली की 31 मार्च अखेर संस्थेच्या 13 शाखा कार्यरत असून, 15,436 सभासद आहेत, संस्थेकडे 390 कोटी 40 लाख रुपयाच्या ठेवी जमा असून, वसूल भाग भांडवल सात कोटी सदतीस लाख रुपये आहे, इतर निधी 14 कोटी 20 लाख रुपये असून 109 कोटी एक लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 294 कोटी 60 लाख रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले असून, संस्थेला एक कोटी 26 लाख हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सलग 'अ' वर्गाचे लेखापरीक्षण मिळवण्याची परंपरा यंदाही कायम राहिली असून, सभासदांना 10% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. सभेत सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त होणारे शाखा व्यवस्थापक संजय बडदे यांचा विशेष असा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन नंदकुमार सागर यांनी केले तर आभार आनंदराव घोरपडे यांनी मानले.
- Get link
- X
- Other Apps
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमधील जनकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (JDBIMSR) येथे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. “शिक्षण, संस्कृती आणि शाश्वत विकास” या विषयावर आधारित या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद व विचारांची देवाणघेवाण झाली.या कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटीवी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ .हेमलता बागला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव प्रा.विलास नांदवडेकर यांच्या सहकार्याने करण्यात आले. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास डॉ. गणेश चव्हाण, पुणे कॅम्पस समन्वयक व प्राचार्य, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, तसेच डॉ. रचना शिखरे, संचालक, JDBIMSR पुणे कॅम्पस, सर्वास स या संस्थेच्या देसाई व डॉ. रुपाली मेनने आणि विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.MBA आणि MCA अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी उत्स्फूर्त संवाद साधला. इटली ,फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, तैवान, थायलंड, दक्षिण कोरिया या संवादातून शिक्षण, संस्कृती, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय अनुभव, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्यपूर्ण शिक्षण यांसारख्या विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.डान्स अकॅडमी मार्फत गणेश वंदना या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर सर यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विशेष उपक्रमांची माहिती दिली. पुणे आवर प्रमुख प्राचार्य डॉ.गणेश चव्हाण सर यांनी विद्यापीठातील सांस्कृतिक शैक्षणिक आणि शाश्वत विकासाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीमुळे,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रमुख पाहुण्यांना भारताची संस्कृती, शिक्षणपद्धती आणि दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.विद्यार्थिनींना जागतिक दृष्टिकोन, सांस्कृतिक जाणीव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्याचा आत्मविश्वास विकसित होण्यास या उपक्रमाची मदत झाली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये संवाद व विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 'संप्रेषण आणि माध्यम अभ्यास विभाग' (Department of Communication and Media Studies) द्वारे निर्मित, महर्षी कर्वेष यांच्या कार्याचा वारसा दर्शवणारी ७ मिनिटांची दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची संस्कार शाळा— डॉ. गणेश भामे सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्रा. डॉ. गणेश भामे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि राष्ट्रनिर्मितीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास सुमारे १५० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय झगडे आणि वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी उपस्थित होते.मार्गदर्शन करताना डॉ. गणेश भामे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन, रक्तदान, आरोग्य जनजागृती, ग्रामविकास, सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती, आपत्ती व्यवस्थापन आदी उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.“राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची संस्कारशाळा आहे. सेवाभाव, नेतृत्व, शिस्त, संघभावना आणि सामाजिक संवेदनशीलता या मूल्यांचा विकास तिच्या माध्यमातून होतो. या मूल्यांचा विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात अंगीकार करावा,” असे डॉ. भामे यांनी सांगितले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांच्या कार्याचे कौतुक केले. “आपल्याला सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जाणीव ठेवून मनापासून आभार मानणे म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकीची जाणीव ठेवणे होय. सहकार्य करणाऱ्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून त्यांना धन्यवाद देणे, हाच राष्ट्रीय सेवा योजना दिनाचा खरा संदेश आहे. आजच्या दिनाचे औचित्य साधून आपण सर्व पन्नास व्यक्तींना धन्यवाद म्हणून आजचा दिवस साजरा करूयात ,” असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शुभम ठोंबरे यांनी केले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. शीतल कल्हापुरे, प्रा. शुभम ठोंबरे, डॉ. किरण गाढवे आणि प्रा. पूनम काळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, सहकारी प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्रा. पूनम काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शीतल कल्हापुरे यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
सोनोरीत २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सोनोरी येथील कै. चंद्रकांत अनंता काळे यांच्या स्मरणार्थ सोनोरी गावचे माजी सरपंच बाळासाहेब नाना मार्तंड काळे मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा प्राथमिक शाळा सोनोरी, अंबऋषी प्राथमिक शाळा तसेच गावातील इतर अंगणवाड्यांमधील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय उपयोगी साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या उपक्रमांतर्गत तब्बल २०० विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी माजी सरपंच बाळासाहेब नाना काळे, आरपीआय पुरंदरचे अध्यक्ष बळीराम सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण आण्णा पवार, सुभाष काळे, सुनील शिंदे, कृष्णा कामठे, दत्तू अण्णा बोरकर, पै. कुमार काळे, पै. किरण काळे, नंदकुमार काळे, परसराम आढाळगे, संपत काळे, आबा शिंदे, दीपक काळे, सागर खेडेकर, सागर काळे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा सुरवसे, शिक्षक अभिजीत गायकवाड, शुभांगी जगताप, रीमा अद्विक, अंगद मेमाणे, कोमल शिंदे तसेच ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी शाळांच्या विकासासाठी ग्रामस्थ, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी तसेच शाळांना आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन केले.
- Get link
- X
- Other Apps
वाघीरे महाविद्यालयात' आविष्कार' संशोधन स्पर्धेत १५७ संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या निर्देशानुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. २३) महाविद्यालयीन स्तरावरील 'आविष्कार २०२६' संशोधन स्पर्धा उत्साहात पार पडली. शैक्षणिक संशोधन समिती (ARC) यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत विविध शाखांतील ३१४ विद्यार्थ्यांनी १५७ संशोधन प्रकल्प व पोस्टर्स सादर करून संशोधनातील नावीन्यपूर्ण कल्पना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावीपणे मांडला. या स्पर्धेचे उद्घाटन एम. एस. काकडे महाविद्यालयाचे प्राचार्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी एस. पी. महाविद्यालय, पुणे येथील प्रोफेसर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे डॉ. धोंडीराम पवार यांनी विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासून नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी संशोधन करावे, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून समस्यांवर उपाय शोधावेत, असे आवाहन केले. .आविष्कार’ संशोधन स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धेच्या दृष्टीने प्रकल्प तयार न करता समाजातील विविध समस्या, गरजा आणि बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना विकसित कराव्यात, असे विचार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आविष्कार संशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे यांनी केले.यावर्षी स्पर्धेत मानव्यविद्या, भाषा व ललित कला विभागातील ४०, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी विभागातील ३२, शुद्ध विज्ञान विभागातील ४०, कृषी व पशुसंवर्धन विभागातील ८ तसेच अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागातील ३७ अशा एकूण १५७ संशोधन प्रकल्पांची नोंदणी झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून त्यांची संशोधनवृत्ती, जिज्ञासा आणि सर्जनशील विचारसरणी अधोरेखित झाली.स्पर्धेचे परीक्षण डॉ. प्रकाश हुंबड, डॉ. दीपली हिरोळीकर, डॉ. संजू जाधव, डॉ. जयश्री जगताप आणि डॉ. गणेश निगडे या बहिस्थ परीक्षकांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन करून त्यांना विधायक सूचना व शैक्षणिक मार्गदर्शन केले.यावेळी उपप्राचार्य डॉ. संजय झगडे व डॉ. बाबन माने, ए.आर.सी समन्वयक डॉ. संदीप राठोड, आयक्यूएसी समन्वयक डॉ. बजरंग शिंदे, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. सचिनकुमार शहा, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. एन. एस. गिरी यांच्यासह प्राध्यापक, परीक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एस. बी. राठोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी. एस. मदभावीकर यांनी केले, तर डॉ. किशोर लिपारे यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
भिवरी येथील गट नं. ७६७/७६८ प्रकरणी चौकशीची मागणी; पंधरा दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मौजे भिवरी येथील गट नं. ७६७/७६८ मधील वडिलोपार्जित सामायिक जमिनीतील कथित मुरूम उत्खनन, प्लॉटिंग तसेच सातबारा उताऱ्यावरील बोजाबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज प्रांताधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय पुरंदर, भूमी अभिलेख कार्यालय सासवड तसेच सासवड पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.या निवेदनामध्ये सदर जमिनीच्या प्रकरणाची महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग व पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. मुरूम उत्खनन, प्लॉटिंग अथवा सातबारा उताऱ्यावरील बोजाबाबत नियमबाह्य प्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तींबरोबरच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी करून त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात, या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मूळ शेतकरी व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, निवेदन दिल्यापासून पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत प्रशासनाकडून ठोस कारवाई झाली नाही, तर भिवरी येथील मूळ शेतकरी व पीडित कुटुंब तसेच अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी निवेदन देताना अठरा पगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर, प्रदेशाध्यक्ष राहुल भोंडे, मार्गदर्शक दिलीप गुरव, महाराष्ट्र राज्य सदस्य बाळासाहेब जरांडे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शामराव जगताप, पुणे जिल्हा सल्लागार आकाश पवार, जेजुरी शहराध्यक्ष सचिन कुंभार तसेच मूळ शेतकरी अशोक महादेव गोफणे, सपना अशोक गोफणे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व महाराष्ट्र राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.“सदर प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि दोषी आढळणाऱ्या व्यक्ती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील भैरवनाथ मंदिराच्या दानपेटीतून कुलूप तोडून 9850 रुपयाची रोकड घेऊन पळणाऱ्या आरोपींची सासवड पोलिसाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बहिरवाडी ता. पुरंदर येथील भैरवनाथ मंदिरातील 23 सप्टेंबर रोजी 10:30 वाजता च्या सुमारामध्ये मंदिरातील सभा मंडपातील इसमनामे सचिन आनंदा नवघणे वय 35 वर्ष राहणार थिटेगर तालुका भोर जिल्हा पुणे यांनी सभा मंडपातील दानपेटीचे कुलूप तोडून त 9,850 रोख रक्कम त्याची मोटरसायकल नंबर एम एच बारा डब्ल्यू व्ही 87 41 वरून पळून जात असताना तो मिळून आला म्हणून मंगेश बालु भगत वय 37 वर्ष व्यावसाय शेती राहणार बहिरवाडी सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी त्या आरोपी विरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार संदिप पवार हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील हिवरकर मळा या ठिकाणी पीडित मुलगी ही अल्पवयीन व दिव्यांग असल्याच्या कारणावरून तिच्यावर अत्याचार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील हिवरकर मळा या ठिकाणी 22 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारामध्ये ते 23 सप्टेंबर रोजी सकाळी सहा पर्यंत पीडित मुलगी ही अल्पवयीन व दिव्यांग असल्याच्या माहिती असताना सुद्धा तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून आलोक कुंभारकर पूर्ण नाव पत्ता माहित नाही, सनी पांडुरंग पवार यांनी मुलगी व आलोक कुंभारकर सोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केल्याच्या कारणावरून अलोक कुंभारकर पूर्ण नाव पत्ता माहित नसून, सनी पांडुरंग पवार राहणार सासवड ता. पुरंदर जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध तक्रार फिर्याद मजुरी काम करणारे हिंदू भराडी समाजाचे असलेले व त्यांची मुलगी अपंग असलेली त्या ठिकाणी सासवड पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे यांनी तपास अंती दोन्ही आरोपींना अटक केली आहे अशी सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोलवे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,500दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.23 सप्टेंबर ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,500 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,300 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,400तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 3,000 तर सरासरी 3,750 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,300 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,050 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, uपंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 5,150 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 5,59बॉक्स 111क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 4,600 कमाल दर 5,150रुपये तर साधारण5,000रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी ज्वारी 3,000,4,500,3,750. बाजरी 2,700,3,200,2,950. गहू 2,800,3,300,3,050. तांदूळ ---------------------.हरभरा 4,700, 6,800,5,750.
- Get link
- X
- Other Apps
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त वाघीरे महाविद्यालयात प्रतिमापूजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजय झगडे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले कार्य तसेच ‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव निर्माण केली. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.डॉ. संजय झगडे यांनी कर्मवीरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबनाची भावना जोपासावी, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण गाढवे यांनी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमातून कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रसंगी डॉ.संजय झगडे उपप्राचार्य, डॉ. एन. एस. गिरी वाणिज्य विभाग समन्वयक, प्रा. सचिन कुमार शहा विज्ञान विभाग समन्वयक तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
- Get link
- X
- Other Apps
हिंदीचे ज्ञान रोजगाराची नवी दारे उघडणारे प्रभावी माध्यम : डॉ. शाकिर शेख सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालयात हिंदी सप्ताह उत्साहात; ‘हिंदी में रोजगार के सुअवसर’ विषयावर मार्गदर्शनसासवड : हिंदी ही केवळ संवादाची भाषा नसून शिक्षण, प्रशासन, पत्रकारिता, प्रसारमाध्यमे, अनुवाद, जाहिरात, प्रकाशन, पर्यटन तसेच डिजिटल माध्यमांसह विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी महत्त्वाची भाषा आहे. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे ज्ञान आत्मसात करण्याबरोबरच भाषिक व डिजिटल कौशल्ये विकसित करून बदलत्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पूना कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. शाकिर शेख यांनी केले.वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथील हिंदी विभागाच्या वतीने आयोजित हिंदी सप्ताहांतर्गत ‘हिंदी में रोजगार के सुअवसर’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. शाकिर शेख प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रो.संजय झगडे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रो. संजय झगडे यांनी हिंदी भाषेची उपयुक्तता आणि महत्त्व स्पष्ट केले. हिंदी ही भारतातील व्यापक जनसमुदायाशी जोडणारी प्रभावी संपर्कभाषा असून शिक्षण, व्यवसाय, प्रशासन आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात तिचे महत्त्व सातत्याने वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेकडे केवळ एक विषय म्हणून न पाहता तिच्याकडे ज्ञान, संवाद आणि रोजगाराच्या दृष्टीने पाहावे. भाषेवरील प्रभुत्वासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य विकसित केल्यास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.प्रमुख वक्ते डॉ. शाकिर शेख यांनी हिंदी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या विविध क्षेत्रांची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पत्रकारिता, अनुवाद, अध्यापन, जाहिरात, वृत्तमाध्यमे, रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, प्रकाशन, पर्यटन, शासकीय व निमशासकीय कार्यालये, विविध कंपन्या तसेच सोशल मीडिया आणि डिजिटल कंटेंट निर्मिती या क्षेत्रांमध्ये हिंदी भाषेच्या ज्ञानाला मोठी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हिंदी भाषेचा वापर डिजिटल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असून विद्यार्थ्यांनी या संधी ओळखून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्ये विकसित करावीत, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. सुभाष नप्ते यांनी केले. त्यांनी हिंदी सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आस्था निर्माण करणे, भाषिक कौशल्यांचा विकास करणे आणि हिंदीच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक संधींची माहिती करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी विद्यार्थी श्रीनाथ लकडे व कु. सुचेता यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनिशा भिंताडे व अश्विनी गिरमे यांनी प्रभावीपणे केले, तर कु. मानसी थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. नरसिंह गिरी, विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा. सचिनकुमार शाहा, डॉ. अनिल झोळ, प्रा. हुमेरा पानसरे, डॉ. नितिन लगड, डॉ. तुषार घोरपडे, डॉ. सुवर्णा खोडदे, डॉ. विजय पुणेकर, डॉ. दिपक उजागरे, डॉ. किरण गाढवे, डॉ. फटांगडे, प्रा. मेघा शिंदे, श्री. संतोष लोणकर, श्री.गणेश खोडके, श्री.धनु काका व तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे बदलत्या काळातील महत्त्व, तिची उपयुक्तता आणि हिंदीच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या विविध संधींबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी मार्गदर्शन केले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये पिसे गावामध्ये वीज पडून सहा बकरी व शेळ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू ; तर दोन जखमी अवस्थेत मेंढपाळ मुलाचा जीव थोडक्यात बचावला सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पिसे ता.पुरंदर येथे 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:15 च्या वाजायच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील पिसे गावात बकरी शेळी चारत असताना अचानक जोरदार कडकडाटासह वीज कोसळली ती वीज मोहन दादा मुळीक यांच्या शेतात म्हातारो सोनबा ठोंबरे यांच्या पशुधनाची मोठे नुकसान झाले असून, पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे .याची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष सुरेश मुळीक यांनी पिसे सप्ताह ग्रुपला ही माहिती फोटो सहित टाकल्यानंतर गावचे पत्रकार महोदय यांनी पुरंदरच्या आमदार ,उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार ,मंडल अधिकारी ,तलाठी ,इतर अधिकारी वर्ग व पुरंदरच्या युट्युब पत्रकार व दैनिक पेपरच्या पत्रकार यांना माहिती टाकली असता, पशुपालक म्हातारो सोनबा ठोंबरे यांनी सांगितले की ,सहा बकरी , शेळ्या असून, त्यांच्या पोटात कोकरी व शेळीचे करडू असल्याकारणामुळे साधारण दोन लाख रुपयेचे नुकसान झालेले आहे .दोन बकरी जखमी अवस्थेत आहेत ,तर मेंढपाळ मुलाचा जीव थोडक्यात बचावला आहे ,बाधित पशुपालकांची मोठे आर्थिक नुकसान झाल्या कारणामुळे महसूल आणि पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटना स्थळी भेट देऊन पंचनामा करावा म्हणून गावचे पत्रकार यांनी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना फोन केला असता ,त्यांनी रिसीव फोन केला नव्हता ,मिटींग चालू होती व्हाट्सअपला मेसेज केले होते ,तहसीलदार यांनी पत्रकार महोदय यांना मेसेज द्वारे सांगितले की ,तलाठी यांना सकाळी पंचनामा करण्यास सांगण्यात आले आहे, त्यावर आमदार यांचा गैरसमज होऊन त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना फोन केला असता ,उपविभागीय अधिकारी यांनी मेसेज पाहिला नव्हता ,पंचनामा करते असे सांगितले होते, तहसीलदार यांनी सुद्धा पंचनामा करतो असे सांगितले ,परंतु गैरसमज झाल्यामुळे उपविभागीय अधिकारी व पत्रकार यावर आमदार यांनी गैरसमजुतीतून संभाषण झाले ,विनाकारण उपविभागीय अधिकारी, पत्रकार यांना गैरसमजुतीतून बोलणे ऐकावे लागले ,परंतु त्यावर तहसीलदार यांनी आमदार यांना सांगितले की ,मेसेज द्वारे पत्रकार यांना पंचनामा तलाठी करणार आहेत असे सांगितले आहे. विनाकारण गैरसमजुतीतून उपविभागीय अधिकारी व पत्रकार यांना आमदारांचे बोलणे ऐकावे लागले ,यात फक्त एकच धोरण आहे की, लवकरात लवकर शासकीय भरपाई मिळावी अशी ही पिसे ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. व मेंढपाळ पिसे येथील ठोबरे याना न्याय मिळावा सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व ग्रामस्थ मंडळी याची मागणी आहेच.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणमॉडिफाइड बुलेट सायलेन्सर व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर सासवड पोलिसांची कारवाई सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस स्टेशन हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर विशेष कारवाई करण्यात आली.या कारवाईमध्ये एकूण 47 बुलेट वाहनांवर कारवाई करून ₹4,70,000/- इतका दंड वसूल करण्यात आला.तसेच ट्रिपल सीट, विना हेल्मेट व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध एकूण 326 केसेस करण्यात आल्या असून, त्यामध्ये ₹2,74,600/- इतका दंड करण्यात आला आहे.याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 16 वाहनचालकांविरुद्ध प्रकरणे दाखल करण्यात आली असून, सदर प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत (कोर्ट पेंडिंग) आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये पोलीस हवालदार संतोष शिंदे, पोलीस हवालदार अभिजीत कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल चव्हाण यांनी सहभाग घेतला.वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेटचा वापर करावा तसेच वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनीप्रदूषण करू नये, असे आवाहन सासवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवड – १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ या स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने पुरंदर हायस्कूल, सासवड येथे करण्यात आले.श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सासवड – शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), सासवड येथील १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द आणि आत्मविश्वासाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या संघातील खेळाडू:कार्तिकी जगताप, शाल्वी नलावडे, संस्कृती पवार, सुदिक्षा जगताप, समृद्धी ईनामके, मयुरी जगताप, गाथा गिरमे, दूर्वा गिरमे आणि ईश्वरी सावंत.या उत्कृष्ट कामगिरीमुळे १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाला क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक उदय बोरावके सर यांचे मार्गदर्शन लाभले. हार्दिक अभिनंदन!अध्यक्ष, सचिव, सहसचिव, समन्वयक तसेच शाळेच्या व्यवस्थापनाने संपूर्ण संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक उदय बोरावके सर यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
- Get link
- X
- Other Apps
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त पथनाट्याद्वारे सासवडमध्ये आरोग्य जनजागृती सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त “निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण” (Empowering Pharmacists for a Healthier Future) या संकल्पनेवर आधारित पथनाट्य स्पर्धा व जनजागृती अभियानाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलीटेक्निक, सासवड यांच्या वतीने करण्यात आले.फार्मासिस्टची सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जनजागृती तसेच समाजाच्या आरोग्य संवर्धनातील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरासह सासवड शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय परिसर (कचेरी), पीएमटी बस स्थानक, सासवड नगरपरिषद, भाजी मार्केट तसेच शहरातील विविध प्रमुख सार्वजनिक ठिकाणी प्रभावी सादरीकरण करून नागरिकांचे प्रबोधन केले.विद्यार्थ्यांनी औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, स्व-औषधोपचार टाळण्याचे महत्त्व, लसीकरणाचे महत्त्व, औषधांचा दुरुपयोग, प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (Antimicrobial Resistance), औषधोपचारातील फार्मासिस्टची भूमिका आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. मनोरंजनासोबतच सामाजिक व आरोग्यविषयक संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.“फार्मासिस्ट हा समाजाच्या आरोग्याचा विश्वासू भागीदार आहे” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी फार्मसी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.पथनाट्य स्पर्धेसाठी डॉ. जयश्री जगताप व सृष्टी जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सागर भिसे, पायल पाटसकर व कु. पद्मजा मस्के यांनी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.या उपक्रमास पदवी अभ्यासक्रमाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती लाभली.“जागरूक समाज – निरोगी भविष्य; फार्मासिस्ट नेहमी तुमच्या सोबत!” या संदेशातून विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी फार्मासिस्टची भूमिका अधोरेखित केली.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे दुहेरी यश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पुरंदर तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन गटांत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.* तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या गटातही विद्यालयाच्या संघाने दमदार कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या दोन्ही संघांची पुढील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी सांघिक भावना, उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत टकले सर, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम, क्रीडा शिक्षक संतोष गलांडे सर, तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आणि आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
- Get link
- X
- Other Apps
रोखे बाजाराच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना गुंतवणुकीचे धडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘रोखे बाजार’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी शेअर बाजाराची संकल्पना, अर्थव्यवस्थेतील त्याचे महत्त्व आणि गुंतवणुकीची आवश्यकता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणातील आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनामुळे फक्त कला शाखेतील अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थीच नव्हे तर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनाही रोखे बाजारासारख्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली,असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सचिनकुमार शहा यांनी रोखे बाजाराची मूलभूत माहिती देत सेन्सेक्स, निफ्टी, ट्रेडिंग तसेच गुंतवणुकीची प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या व रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष बाजारातील उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी शेअर बाजारातील व्यवहार समजावून सांगितले.अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद सारंगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजाता निकम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सिद्धार्थ घोंगडे, प्रा. जाधवर दयानंद व प्रा. सुनीता कोलते यांनी सहकार्य केले.
- Get link
- X
- Other Apps
वाघिरे महाविद्यालयात NCC रँक प्रदान सोहळा, पालक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे राष्ट्रीय छात्रसेनेच्या (NCC) वतीने रँक प्रदान सोहळा, पालक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट गजेंद्र म. अहिवळे यांनी केले. यावेळी त्यांनी 36 महाराष्ट्र बटालियन NCC आणि महाविद्यालयातील NCC प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. सब लेफ्टनंट सुनील शिंदे यांनी 3 महाराष्ट्र नेव्हल युनिटमधील प्रशिक्षणाची माहिती दिली. तसेच प्रा. मयुरी जगताप यांनी 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधील छात्र सैनिकांनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेत मुलींसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे तसेच संबंधित NCC अधिकाऱ्यांच्या हस्ते पात्र कॅडेट्सना विविध रँक प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 36 महाराष्ट्र बटालियन आणि 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या आर्मी विंगमधील सिनियर अंडर ऑफिसर, ज्युनियर अंडर ऑफिसर, कंपनी सार्जंट मेजर आणि कंपनी क्वार्टर मास्टर सार्जंट, तसेच नेव्हल विंगमधील कॅडेट कॅप्टन आणि पेटी ऑफिसर कॅडेट या रँकचा समावेश होता.NCC मधील रँक ही केवळ गणवेशावरील ओळख नसून नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारी आणि संघभावनेचे प्रतीक आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले की, महाविद्यालयात सन 1975 पासून NCC उपक्रम सुरू असून, संस्थेने NCC क्षेत्रातील 50 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. कॅडेट्सना शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक सेवा आणि नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयात रायफल ड्रिल, सेरेमोनियल ड्रिल, सेरेमोनियल स्वॉर्ड ड्रिल आणि मार्चपास्ट यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे स्वतः 36 महाराष्ट्र बटालियनमार्फत NCC चे A, B आणि C प्रमाणपत्र प्राप्त कॅडेट राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि कारकिर्दीत NCC चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी NCC प्रशिक्षण, कॅडेट्सची शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, सहभाग आणि NCC मधील विविध संधी याबाबत पालकांशी संवाद साधण्यात आला. कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात महाविद्यालयातील तिन्ही NCC युनिट्सच्या कॅडेट्सनी विविध भारतीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून भारताची सांस्कृतिक विविधता आणि ‘विविधतेत एकता’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. संजय गिरी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष जगताप, पालक आणि छात्र सैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CPL तनिष्का प्रजापती, कॅडेट अक्षरा आणि कॅडेट तुषार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली NCC अधिकारी, कॅडेट्स, धायगुडे, दगडे आणि संतोष लोणकर यांनी नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
- Get link
- X
- Other Apps
‘सृजनरंग’मध्ये वाघीरेच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित ‘सृजनरंग’ सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेची महाविद्यालयीन फेरी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांतून आपल्या सर्जनशीलतेचा प्रभावी आविष्कार सादर केला.स्पर्धेचा प्रारंभ ‘वृक्ष संजीवनी’ उपक्रमाने करण्यात आला. त्यानंतर एन.एस.एस. गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. काव्यवाचन, निबंध लेखन, वक्तृत्व, भित्तीचित्र (पोस्टर मेकिंग), पोवाडा गायन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सामाजिक जाणीव, राष्ट्रनिर्माण, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्यिक व कलात्मक अभिव्यक्तीतून प्रभावी भाष्य केले. स्पर्धेतील गुणवत्तेच्या आधारे निवड झालेले विद्यार्थी आगामी जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय ‘सृजनरंग’ स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “राष्ट्रीय सेवा योजना ही समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची आणि विचारांना सकारात्मक दिशा देण्याची संधी आहे. सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो,” असे सांगितले.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारीपदी नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. शीतल कल्हापुरे यांचा प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. बबन माने, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जगताप यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.डॉ. शीतल कल्हापुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पूनम काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. संग्राम निगडे यांनी आभार मानले.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील ऑस्करवाडी येथील माऊंटन मिस्ट या हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का बार चालवताना तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आस्करवाडी तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील असलेले माउंटन मिस्ट या हॉटेलमध्ये 21 सप्टेंबर रोजी दोन वाजताच्या सुमारास हॉटेल माउंटन मिस्ट या हॉटेलमध्ये अवैध रित्या हुक्का बार चालू असल्याचे त्या ठिकाणी हुक्का सबंधाने वस्तू व पदार्थ जप्त करण्यात आले असून, एक विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 49 वर्ष सध्या राहणारा राजस सोसायटी कात्रज तालुका हवेली जिल्हा पुणे 48, दोन आमीन कंगाल चौधरी वय 19 वर्ष सध्या राहणार आस्करवाडी माउंटन मिस्ट तालुका पुरंदर जिल्हा पुणे राहणार शहरी वाडा नंबर 9 तालुका धनगाडी जिल्हा कैलाली देश नेपाळ, तीन निषराज गणेश राज डेपगोटा वय 24 वर्ष सध्या राहणार माउंटन मिस्ट हॉटेल तालुका पुरंदर जिल्हा पुणे मूळ राहणार जगतपूर जानकी वाडा नंबर सात तालुका धनगाडी जिल्हा कैलाली देश नेपाळ हे ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरून त्या ठिकाणी हुक्का बार चालविताना आढळून आले असल्याने, काचेचे बनवलेले नऊ फुका पोट ,अफझल कंपनीचे तंबाखूजन्य पदार्थांचे फ्लेवरने भरलेले चौकोनी व गोलाकार दहा डबे, वेगवेगळ्या रंगाच्या मातीचे बनवलेले एक चिलीम, हुक्का ओढण्याचे सहा रबरी पाईप प्रत्येकी मिळून आलेला एकूण 61, 950 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, म्हणून सचिन सुरेश किवळे पोलीस कॉन्स्टेबल( शिपाई) सासवड यांनी सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 2018 ची कलम चार 21 अन्वये अन्वये कायदेशीर फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दिलेली आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस हवालदार अविनाश होळकर हे करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील जिजामाता उदयानाच्या शेजारी भाजी विक्रेते का कडून रोख रक्कम व सोन्याचे गंठण ओढून भाजी विक्रेते ला मारहाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील जिजामाता उदायाणाच्या शेजारी 20 सप्टेंबर रोजी 18: 10 वाजताच्या सुमारामध्ये भाजी विक्री करत असताना, निकिता सागर टिळेकर, प्रथमेश संजय होले, पूजा अतुल भांडवलकर सर्व राहणार सासवड तालुका पुरंदर अंकिता सागर बोरावकेे राहणार उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे हे त्या ठिकाणी काही न विचारता ,अंकिता सागर बोरावके हिने भाजी विक्रेतेच्या हातातील छप्पन हजार रुपये, गळ्यातील सोन्याचे गंठण ओढून घेतले व सर्वांच्या समोर हाताने मारहाण करून ,शिवीगाळ करू लागल्या कारणाने त्या ठिकाणी मारहाण केली असता, काल तू पण होती ना ? आईला मारायला असे म्हणून निकिता टिळेकर हिने त्या ठिकाणी डाव्या डोळ्याच्या बाजूला सुरीने वार केला, अंकिता बोरावके हिने लोखंडी वजनाच्या मापाने डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारले, प्रथमेश संजय होले, पूजा अतुल भांडवलकर यांनी त्या ठिकाणी काठीने मारहाण केली, भाजीपाल्याच्या पाट्या रस्त्यावर फेकून भाजीपाल्याचे नुकसान केलेले आहे. म्हणून त्या ठिकाणी निकिता सागर टिळेकर, प्रथमेश संजय होले, पूजा अतुल भांडवलकर तिघे राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे ,चार अंकिता सागर बोरावके राहणार ऊरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे यांच्या विरोधामध्ये सुनिता प्रमोद होले वय 42 वर्षे व्यवसाय भाजीपाला विक्री राहणार लांडगे आळी सासवड तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास पोलीस हवालदार बापू गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील बाल विकास मंदिरच्या विद्यार्थ्यांचे अथर्वशीर्ष पठण; १६ वर्षांची अखंड परंपरा कायम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर ,शाळेच्या तसेच इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सासवड येथील अजय मित्र मंडळात ११ वेळा अथर्वशीर्ष पठण करून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन केले. गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दोन्ही शाळांतील सुमारे ४५० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक अथर्वशीर्ष पठणामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने एकत्र येत अथर्वशीर्षाचे अकरा आवर्तन पूर्ण केले. विद्यार्थ्यांच्या सामूहिक पठणातून धार्मिक संस्कारांसोबतच एकता, शिस्त, सामूहिक सहभाग आणि भारतीय संस्कृतीविषयीची आस्था जोपासण्याचा संदेश देण्यात आला. बाल विकास मंदिर शाळेच्या वतीने मागील १६ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारमूल्ये रुजावीत, भारतीय धार्मिक व सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी तसेच सामूहिक उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित केला जातो.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे तसेच इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अथर्वशीर्ष पठणात सहभाग घेतला. कार्यक्रमास अजय मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पवार ,उपाध्यक्ष संजय उबाळे यांच्यासह शिक्षक माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, दीपक कांदळकर, भाऊसाहेब येळे, नितीन ठोंबरे, विकास जगताप , दत्ता कारकूड तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.अथर्वशीर्षाच्या सामूहिक पठणामुळे कार्यक्रमस्थळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पठण पूर्ण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गेल्या १६ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आणि १६ वर्षांची अखंड परंपरा यामुळे बाल विकास मंदिर शाळेचा हा उपक्रम सासवड परिसरातील गणेशोत्सवातील एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरला आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील बसाळे हॉस्पिटल समोर ऐन गणपती मध्ये रस्त्याच्या मधोमध गाडी लावून मुख्य तीन आरोपी सहित आठ ते दहा अनोळखी इसमांची हुलढबाजी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड तालुका पुरंदर येथील गावच्या हद्दीमधील बसाळे हॉस्पिटल समोर सोपान नगर हडको रोडवर 20 सप्टेंबर रोजी एक वाजता च्या सुमारामध्ये प्रांजली व प्रतीक बसाळे हॉस्पिटलला जाण्यासाठी निघाले असताना, एक किया कंपनीची पांढऱ्या रंगाची सेल्स कार नंबर एम एच बारा वाय एक्स 74 74 1)प्रथमेश ज्ञानेश्वर काळे राहणार काळेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी रस्त्याच्या मधोमध गाडी लावून जाण्याचा रस्ता अडवला असल्याकारणामुळे, तुम्ही तुमची कार रस्त्याच्या मधोमध आडवी का ? लावली असे विचारले त्या कारणावरून एक प्रथमेश ज्ञानेश्वर काळे, दोन समीर उत्तम काळे, हरीश जगदाळे तिन्ही राहणार काळेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी त्या दोघांच्या अंगावर येऊन शिवीगाळ करू लागले व मनास लज्जास्पद असे उत्पन्न होईल, अशा प्रकारचे अश्लील हातवारे, इशारे करून त्यांनी शरीराला हात लावून मन्यास लज्जास्पद उत्पन्न होईल असा विनयभंग केलेला आहे ,तर डॉक्टर बसाळे व प्रतीक यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून, इतर आठ ते दहा अनोळखी इस्मानी सुद्धा बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. म्हणून त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर फिर्याद म्हणून प्रांजली प्रतीक बसाळे वय 29 वर्ष व्यवसाय नोकरी राहणार बसाळे हॉस्पिटल सासवड तालुका पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केला आहे. गुना रजिस्टर नंबर 460/ 2026 का कलम 189 (1),18 9 (2), 190,126 (2),74, 79, 115 (2), 352, 351 (2),( 3 )नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पुढील तपास परी पोसई अशोक जाधव हे पुढील तपास करित आहेत.
- Get link
- X
- Other Apps
शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची भव्य विसर्जन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे यावर्षी ‘अन्नसुरक्षा व निरोगी जीवन’ या संकल्पनेतून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या विसर्जनानिमित्त विद्यालयाच्या वतीने लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल ते संगमेश्वर मंदिर अशी भव्य विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली. या मिरवणुकीत विद्यालयाच्या ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक आणि ध्वज पथकाने उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली . ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे तालबद्ध सादरीकरण आणि आकर्षक ध्वज प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून अन्नसुरक्षा, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह व शिस्त विशेष कौतुकास्पद ठरली.मिरवणुकीची सांगता संगमेश्वर मंदिर येथे झाली. यावेळी गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत टकले, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम तसेच संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, कर्मचारी आणि पालक यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदी डॉक्टर करण दशरथ चव्हाण यांची नियुक्ती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी तालुका पुरंदर येथील जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉक्टर करण दशरथ चव्हाण यांचा सत्कार समारंभ जेजुरी येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठीचे आयोजन श्री मार्तंड देवस्थान जेजुरी चे प्रमुख विश्वस्त विद्यमान पोपटराव खोमणे तसेच आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी काका खोमणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी डॉक्टर करण चव्हाण यांचे आई-वडील दशरथ चव्हाण, भारती दशरथ चव्हाण तसेच शिवाजी चव्हाण सरचिटणीस युथ फाऊंडेशन, माऊली भाऊ खोमणे उपाध्यक्ष युथ फाऊंडेशन, सुंदर तात्या खोमणे माजी नगरसेवक जेजुरी नगरपरिषद यशवंत दोडके अध्यक्ष दादा फाउंडेशन जेजुरी, राजेंद्र खोमणे, सागर खोमणे ,सोमनाथ मदने, प्रतीक खोमणे, मल्हारी चव्हाण, अजय खोमणे, महेश चव्हाण सदस्य युथ फाऊंडेशन, सुरेश खोमणे अध्यक्ष युथ फाउंडेशन जेजुरी शहर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते आधी उपस्थित होते. यावेळी श्री मार्तंड देवस्थान जेजुरी व आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने डॉक्टर करण चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. जेजुरी सारख्या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळणे हे निश्चितच भाग्याचे आहे ,डॉक्टर करण चव्हाण हे आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला .तर डॉक्टर करण चव्हाण यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी जेजुरी येथे आपली नियुक्ती झाल्याबद्दल येणारया कालावधीत जेजुरी सवॅ भाविकांची भक्ताची सेवा उपचार हे देण्यात येतील कोणाचीही कुंचंबणा होणार नाही त्या ठिकाणी सक्षमपणे मार्तंड देवस्थानच्या माध्यमातून व जेजुरी करांच्या सर्वधर्मसमभाव या भावनेतून सर्वांची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार स्वत: डॉक्टर करण चव्हाण यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
- Get link
- X
- Other Apps
लघुपटातून हवामान बदल आणि पुराच्या संकटाची विद्यार्थ्यांना जाणीववाघीरे महाविद्यालयात भूगोल विभाग व फिल्म क्लबतर्फे विशेष लघुपट व चर्चासत्र सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वाघीरे महाविद्यालय, सासवड येथील भूगोल विभाग व ‘फिल्म क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचे दूरगामी परिणाम याविषयी विशेष लघुपट प्रदर्शन व चर्चासत्राचे आयोजन शनिवार, दि. १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यावेळी हिमनदीमुळे नदीचा प्रवाह अडवला गेल्याने नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आधारित माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. तुषार घोरपडे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “चित्रपटांच्या माध्यमातून भौगोलिक घडामोडी आणि नैसर्गिक आपत्ती समजून घेणे अधिक प्रभावी ठरते. पूर या समस्येकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून न पाहता, त्यामागील मानवी हस्तक्षेप, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापन समजून घेणे गरजेचे आहे.” दाखविण्यात आलेल्या माहितीपटातून अतिवृष्टी, ढगफुटी, नद्यांवरील अतिक्रमणे, अनियोजित शहरीकरण आणि अयोग्य शहर नियोजन यांसारख्या पुराच्या विविध कारणांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्कालीन मदतकार्य, सुरक्षित स्थलांतर आणि पुनर्वसन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले.लघुपटाच्या प्रदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी विशेष चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी पूरस्थितीचे पर्यावरण, मानवी जीवन आणि सामाजिक व्यवस्थेवर होणारे परिणाम याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तींची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली, नियोजनबद्ध विकास आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापनाची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.या उपक्रमास भूगोल विभागातील प्रा. स्वाती भोसले, प्रा. सागर भोसले, प्रा. मनोज बोदरे, प्रा. रूपाली साठे, प्रा. कपिल कांबळे, प्रा. करिश्मा बरकडे यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
खेळातून शिक्षण, आनंदातून मूल्यसंस्कार सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सासवड नगरपालिका शिक्षण विभाग संचलीत पीएमश्री संत नामदेव महाराज विद्यालय, शाळा क्रमांक ५, सासवड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदाचा शनिवार’ हा अभिनव उपक्रम उत्साहात घेण्यात आला.नेहमीच्या शालेय वातावरणापेक्षा वेगळा अनुभव देण्यासाठी विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी वही पुस्तक न आणता खेळ, मनोरंजन आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिकण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त, मूल्यशिक्षण तसेच वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.उपक्रमात बोबडी वळाली, संगीत खुर्ची, गमतीशीर ओळख आणि कप टॉवर यांसारखे विविध खेळ घेण्यात आले. बोबडी वळाली च्या माध्यमातून उच्चारक्षमता, एकाग्रता व वाणी-मेंदू समन्वय विकसित, संगीत खुर्चीमधून चपळता, तत्परता व एकाग्रता, तर कप टॉवर या सांघिक खेळातून संघभावना, समन्वय, नेतृत्व आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात आला.रासेयो स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. खेळ आणि आनंदाच्या वातावरणातून विद्यार्थ्यांना शिस्त, स्वच्छता, सहकार्य आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व समजावून देण्यात आले.या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना आनंददायी व अनुभवाधारित शिक्षणाचा अनुभव मिळाला, तर रासेयो स्वयंसेवकांना विविध वयोगटातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे, उपक्रमांचे नियोजन व व्यवस्थापन करणे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळाली.वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने आणि सासवड नगरपरिषदेच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामधे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बबन माने व समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी रासेयो विभागातून प्रा. शुभम ठोंबरे तसेच संत नामदेव महाराज विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नवगिरे व त्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाला स्वयंसेवकांमधून प्रणव भगत व निकिता इंगळे यांनी परिश्रम घेतले व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड चंदन टेकडी बाह्यवळण मार्गावरील अपघात प्रवण ठिकाणी उड्डाणपूलाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा स्पष्ट इशारा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आळंदी पंढरपूर महामार्गावरील क्रमांक 965 वरील सासवड चंदन जगाशीवातावरणात बाह्य वळणाच्या मार्गावरील उड्डाणपूल उभारण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 28 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेतला याची माहिती पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे यांनी दिली आहे. सासवड चंदन टेकडी बाहयवळण हे ठिकाण सध्या अपघाताचे केंद्र बनलेले असून, येथे आत्तापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागलेले आहेत, भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी या ठिकाणी तातडीने उड्डाणपूल होणे गरजेचे असे असून, त्या ठिकाणी या निवेदनात नमूद केलेले आहे. या मागणीसाठी सोनवणे व उबाळे आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याचे माहिती मिळाली आहे. या मागणी संदर्भात आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, सासवड पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेली आहेत, अशी माहिती पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे व कार्याध्यक्ष कालिदास उबाळे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
- Get link
- X
- Other Apps
पुणे उरुळी कांचन सोलापूर हायवे रोड वरती बेशिस्त वाहतुकीने घेतला सहाय्यक फौजदाराचा बळी ; तर ससून मधील कर्तव्य उरकून परतताना काळाचा घाला ग्रामीण दलामध्ये शोककळा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे सोलापूर हायवे मार्गावर उरुळी कांचन परिसरातील दिवसे दिवस भोपावलेल्या आणि निष्काळजी बेफाम वाहतुकीने अक्षरशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचाच बळी घेतला असून, ससून रुग्णालयातील मयताचा बंदोबस्त करून पूर्ण पणे उरुळी कांचनला परतल्यानंतर जेवणासाठी रस्ता ओलांडणाऱ्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश रतन दाभाडे वय 49 मूळ राहणार मेथी तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे सध्या राहणार सासवड तालुका पुरंदर यांचा भरदार अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिनांक 18 मध्यरात्रीच्या सुमारामध्ये उरुळी कांचन हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर महामार्गावर हा अपघात झाला असून, याबाबत पोलीस शिपाई अशी संजय उल्हाळकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरुळी कांचन येथील पांढरस्थळ परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्यात वाहत आलेले अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शिवविचेधन करण्यासाठी पोलीस शिपाई आशिष उल्हाळकर बरोबर पुण्यातील ससून रुग्णालयात गेले होते, मृतदेहाची ओळख पटली नसल्याने, रुग्णालयाच्या सेवागृहात ठेवण्यात आला त्यानंतर दोघे रात्री उशिरा सरकारी दुचाकीवरून उरुळी कांचन कडे परतले उरुळी कांचन जवळ आल्यानंतर दाभाडे यांनी जेवण केले नसल्याचे सांगितले व ते पुणे सोलापूर महामार्गावर श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ उतरले, त्यानंतर रस्ता ओलांडून ते जेवणासाठी एकटेच निघाले होते, यावेळी श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना पुणे सोलापूर महामार्गावर दाभाडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने, त्यांची प्रकृती अत्यावस्त झाली होती अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी दाव घेतली दाभाडे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तातडीने उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू असून ,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, धुळे जिल्ह्यातील मेथी गावी होणारच आत्य संस्कार गणेश दाभाडे अत्यंत शांत शिस्तप्रिय कार्य तत्पर आणि सहकाऱ्यांना सदैव मार्गदर्शन करणारे अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित होते, त्यांनी पौड,भोर, सासवड, जेजुरी आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावली होती त्यांच्या अचानक जाण्याने ऊरुळीकांचन पोलीस ठाण्यास संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर शोक कळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या मूळ गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे त्यांच्यावर शासकीय इस्तमात अत्यसंस्कार केले जाणार आहेत महामार्गावरील यमदूत कधी रोखणार उरुळी कांचन शहरातून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावरील वाहनांच्या वेग मर्यादेपेक्षा जास्त असतो रात्रीच्या वेळी तर अवजड वाहने आणि बेफाम चालक पादचाऱ्यांनी बळी घेत असतात एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यालाच अशा प्रकारचा रस्त्यावर प्राण गमवावे लागल्याने, पुणे सोलापूर महामार्गावरील ही बेफाम आणि बेसिस्त वाहतूक अजून किती जणांचा बली घेणार असा संतप्त सवाल आता नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे ,पोलिसांनी सीसीटीव्ही फुटीच्या मदतीने त्या पळून गेलेल्या नराधम चालकाला तात्काळ बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरत आहे.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुका नाभिक महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशील गायकवाड सचिवपदी स्वप्नील शिंदे शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्याची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दिनांक 19 पुरंदर तालुका नाभिक महामंडळ कार्यकारिणीची नुकतीच बैठक संपन्न होवून तालुका अध्यक्षपदी नीरा येथील सुशील गायकवाड तर सचिवपदी सासवड येथील स्वप्नील उर्फ बंटी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुरंदर तालुका नाभिक महामंडळाची कार्यकारिणी निवड व शूरवीर जिवाजी महाले जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात झाली. कोअर कमिटीचे मुन्ना शिंदे,नितीन राऊत तसेच संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे व डॉ मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. या बैठकीत मागील बारा वर्षे अध्यक्षपदावर राहुल मगर व कार्यकारिणीने उत्कृष्ट केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. या बैठकीत अध्यक्षपदी सुशील गायकवाड,कार्याध्यक्ष मल्हार राऊत,उपाध्यक्ष मनोज जगताप,संजय क्षीरसागर,सचिव स्वप्नील शिंदे,सहसचिव प्रवीण साळुंखे,खजिनदार पांडुरंग काशिद कार्यकारिणी सदस्य संतोष पांडे,अमोल राऊत,रामदास क्षीरसागर,संतोष विभाड,अमोल गवळी, दत्तात्रय मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शूरवीर जिवाजी महाले यांची शासकीय पातळीवर जयंती साजरी करावी. नाभिक समाजाचे शौर्याचे प्रतीक व छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची शासकीय पातळीवर जयंती साजरी व्हावी अशी मागणी समाजाचे नेते मुन्ना शिंदे यांनी केली असून या संदर्भात मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे मुन्ना शिंदे यांनी सांगितले. 10 ऑक्टोबर रोजी सासवड येथे जिवाजी महाले यांची जयंती साजरी करण्यात येणार असून यावेळी जिवाजी महाले यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान,समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान,तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुशील गायकवाड यांनी सांगितले. यावेळी सासवड शहर अध्यक्ष पोपट राऊत,अमित शिंदे,सूरज क्षीरसागर, जेजुरी शहर अध्यक्ष उमेश गायकवाड, नीरा शहर अध्यक्ष नंदकुमार काशवेद ,ज्येष्ठ कार्यकर्ते सुशील राऊत,वैभव शिंदे,बालाजी शिंदे आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचे पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे अध्यक्ष नीलेश पांडे,चंद्रकांत जगताप यांनी अभिनंदन केले.फोटो पाठविले आहेत. पुरंदर तालुका नाभिक महामंडळाच्या नूतन कार्यकारिणी सदस्यांना निवडीचे पत्र देताना कोअर कमिटी पदाधिकारी.
- Get link
- X
- Other Apps
उवसग्गहरं स्तोत्राच्या दशकपूर्ती सोहळ्यात ८ हजार भाविकांची मंत्रमुग्ध साथसामुदायिक जापाने बिबवेवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला; अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पुणे प्रतिनिधी : पुरंदर प्राईम न्यूज मुख्य संपादक जैन धर्मपरंपरेत परमपावन आणि संकट निवारणासाठी श्रद्धेने जपले जाणारे ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र’च्या सामुदायिक जापाच्या उपक्रमाने यंदा दशकपूर्तीचा टप्पा गाठला. त्यानिमित्त रविवार, ६ सप्टेंबर रोजी बिबवेवाडी येथील जैन स्थानकाच्या प्रांगणात भव्य आध्यात्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास सुमारे ८ हजार भाविकांनी उपस्थित राहून एकसुरात ‘श्री उवसग्गहरं स्तोत्रा’चा जाप केला. सामुदायिक जापाच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.दुपारी चार वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने जैन समाजबांधव तसेच भाविक सहभागी झाले होते. भव्य मंडपात भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहून सामुदायिक जापात सहभाग घेतला. एकाच सुरात हजारो भाविकांकडून स्तोत्राचा जाप होत असताना निर्माण झालेले आध्यात्मिक वातावरण उपस्थितांसाठी अत्यंत भावस्पर्शी ठरले.या मंगल सोहळ्यास दिगंबर आचार्य पू. श्री प्रणामसागरजी म. सा., वाणीचे जादूगार पू. श्री रमणिकमुनिजी म. सा., वीरायतनच्या शिल्पकार आचार्य पू. श्री चंदनाजी म. सा. यांच्या सुशिष्या पू. श्री विभाजी म. सा. व पू. श्री संघमित्राजी म. सा., तसेच बिबवेवाडी येथील आर. एम. डी. स्थानकात चातुर्मास सुरू असलेल्या साध्वी पू. श्री जयश्रीजी म. सा. आदिठाणा यांच्यासह साधू-साध्वीगणांची उपस्थिती व आशीर्वचन लाभले.दहा वर्षांची अखंड परंपराआर. एम. डी. धारीवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन आणि उपाध्यक्षा शोभाताई धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांपासून ‘उवसग्गहरं स्तोत्र’ सामुदायिक जापाचा उपक्रम आयोजित केला जात आहे. यंदाच्या दशकपूर्ती सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.स्वागतपर मनोगतात शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी या उपक्रमामागील वैयक्तिक अनुभव सांगितला. जैन धर्मातील हजारो वर्षांच्या संस्कार आणि अध्यात्मिक परंपरेत विविध मंत्रांना विशेष स्थान आहे. त्यापैकी ‘उवसग्गहरं स्तोत्र’ हे संकट निवारणासाठी श्रद्धेने जपले जाते. या स्तोत्राच्या जापाचा स्वतःला सकारात्मक अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले.रसिकलालजी धारीवाल रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असताना ‘उवसग्गहरं स्तोत्र’च्या जापातून मिळालेल्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांचे प्राण वाचल्याचा आपला ठाम विश्वास असल्याचे शोभाताई धारीवाल यांनी सांगितले. या अनुभवातून निर्माण झालेल्या श्रद्धेतून गेल्या दहा वर्षांपासून हा सामुदायिक जापाचा उपक्रम अखंड सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनदशकपूर्ती सोहळ्यात केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांनाच महत्त्व न देता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचीही जोड देण्यात आली. सोहळ्याच्या ठिकाणी खास पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉलवरून भाविकांना विविध आध्यात्मिक व धार्मिक विषयांवरील पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले.तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुमारे २०० भारतीय प्रजातींच्या रोपांचे निःशुल्क वाटप करण्यात आले. अध्यात्म, संस्कार, ज्ञानप्रसार आणि निसर्गसंवर्धन यांची सांगड घालणारा हा उपक्रम उपस्थित भाविकांच्या विशेष पसंतीस उतरला.हजारो भाविकांच्या सहभागाने सोहळ्याला भव्यतादशकपूर्तीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सामुदायिक जापात पुणे शहरासह विविध भागांतून भाविक सहभागी झाले होते. हजारो भाविकांनी एकत्रितपणे स्तोत्राचा जाप केल्याने बिबवेवाडी जैन स्थानकाचा परिसर भक्तीमय वातावरणाने भारावून गेला. साधू-साध्वीगणांचे मार्गदर्शन, सामुदायिक जाप, आध्यात्मिक साहित्याचे वाटप आणि वृक्षारोपणासाठी रोपांचे वितरण यामुळे या सोहळ्याला धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकीचीही जोड मिळाली.दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने दशकभर सातत्य राखत हजारो भाविकांना एकत्र आणले. श्रद्धा, सामूहिक प्रार्थना, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा दशकपूर्ती सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सोनोरी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामामध्ये मोठा भ्रष्टाचाराचा आरोप ; तर चौकशीची सोनोरी ग्रामस्थांची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सोनोरी जिल्हा परिषद शाळेच्या नवीन दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामा संदर्भात मोठा भ्रष्टाचाराचा ग्रामस्थांचा आरोप तर चौकशीची सोनोरी ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येत आहे. सोनोरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या मजल्यावर दोन वर्ग खोल्यांच्या जिना, संरक्षक भिंत स्टेज वॉल कंपाऊंड ग्रील्स व रेलिंग आधी विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आरपीआय चे पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे, भारतीय जनता पार्टीचे लक्ष्मण अण्णा पवार, ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सुळके यांनी केला आहे .सोनोरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीासाठी काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी देणगीच्या माध्यमातून तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून तब्बल सात वर्ग खोल्यांचे बांधकाम केले होते ,या शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात, दरम्यान सन 2025- 26 या कालावधीमध्ये विद्यमान आमदार विजय (बापू) शिवतारे यांच्या निधीतून शाळेतील दोन वर्ग खोल्या जिना ,संरक्षण भिंत, डागढुजी तसेच स्टेज च्या कामासाठी तब्बल एक कोटी दोन लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे.असा आरोप बळीराम सोनवणे, लक्ष्मण आण्णा पवार, शिवाजी सुळके यांनी केलेला आहे. या कामाबाबत माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागूनही संबंधित प्रशासकीय लोकसेवकाकडून समाधानकारक व योग्य माहिती नसल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या कामांमध्ये नेमका किती खर्च झाला प्रत्यक्षात कोणती कामे झाली आणि कामाचा दर्जा काय आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आढळल्यास संबंधित ठेकेदार तसेच तत्कालीन सरपंच व उपसरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ,अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल ,असा स्पष्ट इशारा आरपीआयचे पुरंदरचे अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी दिला आहे .याच बरोबर सोनवणे, पवार, सुळके यांनी दलित वस्ती व साठे नगर येथील सुद्धा काम पारदर्शक वापर झाला आहे का ?याची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी आणि ग्रामस्थांना एक प्रकारे न्याय द्यावा अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असाही स्पष्ट इशारा लक्ष्मण आण्णा पवार,शिवाजी सुळके, बळीराम सोनवणे यांनी दिलेला आहे. यावेळी ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी सुळके, सुभाष काळे, बबनराव काळे, तुळशीराम काळे, विठ्ठल माळवदकर सोनोरी गावातील ग्रामस्थ आधी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps
शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याचे शालेय कुस्ती स्पर्धेत यश सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी शिवाजी व्यायाम मंडळ, सासवड येथे शालेय कुस्ती स्पर्धा – पुरंदर तालुका उत्साहात पार पडल्या.या स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात प्रतीक संदीप शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.प्रतीक हा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सासवड संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवडचा विद्यार्थी आहे.त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. अभिजीत टकले, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम, क्रीडा शिक्षक संतोष गलांडे सर तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमध्ये गावठी पिस्तुलासह एका तरुणासअटक सासवड पोलिसांची कारवाई गुन्हेशोध पथकाची कारवाई सहित सात लाख 35 हजाराचा मुद्देमाल सासवड पोलीस कडून जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील 16 सप्टेंबर रोजी 17: 20 वाजता च्या सुमारांमध्ये गावच्या हद्दीमधील चंदन टेकडीच्या जवळ के. के. पेढा दुकानाच्या पाठीमागील बाजू मध्ये 1)पस्तीस हजार रुपये एक स्टीलचे लोखंडी बॉडीचे गावठी पिस्टल त्याचे बॅरल ची लांबी 15.5 सेंटीमीटर असून, व्यास आठ मिमी पिस्टल ला ट्रायगर व मोठीवर्धिनी बाजूने काळे रंगाची प्लास्टिक पट्टीचे साह्याने फिट केलेली, 2) सात लाख रुपये किमतीची एक काळे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची फ्रॉक्स चार चाकी गाडी तिचा आरटीओ नंबर एम एच बारा झेड डब्ल्यू 4762 असा असून, एकूण मुद्देमाल 7 लाख 35 हजार रुपयेचा मुद्देमाल पंच समक्ष पंचनामा आणि जप्त करून ताब्यात घेण्या:%चत आला आहे. आरोपी शुभम सतीश कामठे वय 25 वर्ष राहणार शिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांनी बेकायदा विनापरवाना बेकायदेशीर हेतूसतिश तो आपल्या कब्जातील एक घावटी पिस्टल वाहनांमध्ये बाळगल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध सरकारतर्फे शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 प्रमाणे फिर्याद सासवड पोलीस स्टेशन येथे तुषार बाळू लोंढे सासवड पोलीस स्टेशन यांनी त्या ठिकाणी त्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ही घटना 9ते 10 वर्षानंतर पहिलीच कारवाई सासवड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
- Get link
- X
- Other Apps
पुरंदर तालुक्यातील सासवड बाजारामध्ये ज्वारी प्रतिक्विंटला 4,400दर ;तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सासवड उप बाजारांमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणामध्ये आवक झाली असून, बुधवार दि.16 सप्टेंबर ज्वारीला प्रतिक्विंटला सर्वाधिक 4,400 रुपयांचा दर; तर गहू प्रति क्विंटला 3,200 दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी दिली. सासवड उप बाजारात वाघापूर, माळशिरस, परिचे, गराडे, दिवे,वाल्हे, राजुरी, सह संपूर्ण पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, भोर अशा विविध भागातून ज्वारी, बाजरी, गहू ,तांदूळ, हरभरा असे धान्य विक्रीसाठी येते, एक नंबर प्रतिच्या ज्वारीला कमाल 4,400तर दोन नंबरच्या ज्वारीला किमान 2,800 तर सरासरी 3,600 हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर, एक नंबर प्रतीच्या गहू कमाल 3,200 तर दोन नंबरच्या गहू ला किमान 2,800 तर सरासरी 3,000 हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला असे सचिव मिलिंद जगताप यांनी सांगितले. यावेळी सभापती संदीप फडतरे, गणेश होले, सुशांत कांबळे,उपसभापती बाळासो शिंदे, संचालक शरद जगताप, वामन कामठे, देविदास कामठे, शरयू वाबळे, भाऊसो गुलदगड, uपंकज निलाखे, अनिल माने, अशोक निगडे, संचालिका शहजान शेख,बाळासाहेब गुलाब जगदाळे,लिपिक विकास कांबळे,यासह व्यापारी रूपचंद कांडगे, सत्यवान पवार, , बाबु पवार ऋषिकेश टेडसॅ, शैलेश विरकर, गुळाला 5,250 रुपये भाव निरा बाजारात गुळाची आवक 3,91बॉक्स 78 क्विंटल झाली होती, या गुळाला प्रतिक्विंटल किमान 5,150 कमाल दर 5,400रुपये तर साधारण5,200रुपये मिळाला याबाबत सहसचिव नितीन किकले, कृष्णा खलाटे, प्रवीण कर्णवर यांनी माहिती दिली. यावेळी गुळ व्यापारी शांती कुमार कोठडीया उपस्थित होते, उप बाजारातील धान्य आवक दर, प्रतिक्विंटल, मध्ये पीक, किमान, कमाल, सरासरी ज्वारी 2,800,4,400,3,600. बाजरी 2,700,3,100,2,900. गहू 2,800,3,200,3,000. तांदूळ ---------------------.हरभरा 5,400, 5,900,5,650.
- Get link
- X
- Other Apps
‘स्क्रिप्टशिवाय मी आज तुमच्यासमोर उभा आहे’ – मयूर गायके पुरुषोत्तम करंडक विजेत्या संघाचे वाघिरे महाविद्यालयात अनुभवकथन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या उद्घाटनानिमित्त पुरुषोत्तम करंडक २०२६ स्पर्धेतील विजेत्या संघाच्या अनुभवकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात पुरुषोत्तम करंडक २०२६ (पुणे विभाग) व हरी विनायक करंडक स्पर्धेत ‘आठवडे बाजार’ ही एकांकिका सादर करून सांघिक द्वितीय पारितोषिक मिळविणाऱ्या संघातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलाप्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जातात. याच पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या एकांकिका स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा अनुभव नवोदित कलाकारांपर्यंत पोहोचविण्यासाठी या अनुभवकथनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी आस्था काळे, मयूर गायके, दिपाली धुमाळ, आयुश्री मिश्रा आणि संस्कार फडके यांनी ‘आठवडे बाजार’च्या तालमीपासून अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास उलगडला. भूमिकेची तयारी, व्यक्तिरेखा समजून घेणे, संवादफेक, दिग्दर्शन, समूहातील समन्वय, तालमीसाठी दिलेला वेळ आणि स्पर्धेच्या वातावरणातील आव्हाने याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले.‘स्क्रिप्टशिवाय मी आज तुमच्यासमोर उभा आहे,’ असे सांगताना मयूर गायके यांनी रंगभूमीच्या अनुभवातून आत्मविश्वास आणि व्यक्त होण्याची क्षमता विकसित झाल्याचे नमूद केले. तालमीदरम्यान झालेल्या चुका, त्यातून घेतलेले धडे, सहकलाकारांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण सराव यामुळे सादरीकरण अधिक प्रभावी होत गेले, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.पुरुषोत्तम करंडकातील यशामागे केवळ रंगमंचावरील सादरीकरण नसून सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त, संघभावना, वेळेचे नियोजन आणि कलाकृतीविषयीची बांधिलकी महत्त्वाची ठरल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले. तालमीदरम्यान येणाऱ्या अडचणींवर एकजुटीने मात करत अंतिम सादरीकरणापर्यंतचा प्रवास कसा घडला, याचे अनुभव त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी शेअर केले.यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. महाविद्यालयीन जीवनात शिक्षणाबरोबरच कला, संस्कृती, नाट्य आणि विविध सर्जनशील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. रंगभूमीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संघभावना, संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. पुरुषोत्तम करंडकातील यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून विद्यार्थ्यांना भविष्यातही आवश्यक संधी व प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, रामकृष्ण मोरे प्रतिष्ठानच्या वतीने सौ. मीरा चिकणे यांनी एकांकिका स्पर्धेतील विजेत्या संघाला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. किरण गाढवे यांनी केले. त्यांनी सांस्कृतिक विभागाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रा. अभिलाष जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक विभागाशी संबंधित विद्यार्थी उपस्थित होते.प्रा. पूर्वाराणी जगताप यांनी आभार मानले, तर डॉ. सुवर्णा खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. विजेत्या संघाच्या अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांना रंगभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच महाविद्यालयातील नवोदित कलाकारांना सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली.यासाठी अधिक ठळक वर्तमानपत्रीय हेडलाईन हवी असल्यास, उदा. “रंगभूमीने दिला आत्मविश्वास; ‘स्क्रिप्टशिवाय’ मयूरने सांगितला यशाचा प्रवास” अशा धाटणीच्या पर्यायांतही बातमी मांडता येईल.
- Get link
- X
- Other Apps
आविष्कार स्पर्धा २०२६ मध्ये साबळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे आविष्कार स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या स्पर्धेमध्ये बी. फार्मसी विभागातील ३८ पोस्टर्स, एम. फार्मसी विभागातील १० पोस्टर्स तसेच डिप्लोमा विभागातील १३ पोस्टर्स, असे एकूण ६१ संशोधनपर पोस्टर्स विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संशोधन संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच समाजोपयोगी संशोधनाच्या कल्पना प्रभावीपणे मांडल्या.कार्यक्रमाचे स्वागत प्रा. सृष्टी जाधव यांनी केले. संशोधन समन्वयक डॉ. स्मिता पवार यांनी प्रास्ताविकातून आविष्कार स्पर्धेचे उद्दिष्ट व विद्यार्थ्यांसाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना आविष्कार पोस्टर सादरीकरणाबाबत मार्गदर्शन करताना संशोधनातील नाविन्यता, विषयाची मांडणी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रभावी सादरीकरण कौशल्य याविषयी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संशोधनामध्ये नाविन्यता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजोपयोगी संशोधन यांचे महत्त्व अधोरेखित केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य, पीडीईएचे वाघिरे कॉलेज, सासवड तसेच सदस्य, मॅनेजमेंट कौन्सिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.पोस्टर परीक्षणासाठी डॉ. मीरा सी. सिंग, प्रोफेसर, सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव (बु.), पुणे तसेच प्रोफेसर विषाखा गनवीर, वाघिरे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, सासवड यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. डिप्लोमा विभागातील पोस्टर्सचे परीक्षण प्रा. डॉ. जयश्री जगताप आणि प्राध्यापक डॉ. अमोल काळे यांनी केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाच्या संकल्पना मांडण्यासाठी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी तसेच आपल्या संशोधनकार्याला व्यासपीठ मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली.कार्यक्रमाचे नियोजन संशोधन समन्वयक डॉ. स्मिता पवार आणि प्रा. दिपाली जगताप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. पूजा पेटकर यांनी केले.
- Get link
- X
- Other Apps
सासवड ते सोनोरी रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी 20 लाख, माञ खड्डे जाग्यावरच कामाच्या चौकशीची आरपीआयची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील सासवड सोनोरी रस्त्याची खड्डे भरण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर तसेच जिल्हाधिकारी यांना या कामाची चौकशी व्हावी. यासंदर्भात सात सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. सासवड - सोनोरी रस्ता गेली अनेक वर्ष खड्ड्यामुळे वाहतुकीस अडचणीचा झाला असून या मार्गावरून एसटी बस, शेतकरी, विद्यार्थी जात असतात. हे खड्डे बुजविण्यासाठी 20 लाख रुपये कामाची निविदा देण्यात आली असून त्या रकमेचे काम झाल्याचे दिसत नाही सदर रस्त्याचे खड्डे आजही जागेवरच आहेत. इतकी मोठी रक्कम रस्ता दुरुस्तीसाठी दिली असताना हे काम दर्जेदार झाल्याचे दिसत येत नसून यात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यामुळे पुरंदर तालुका आरपीआयचे अध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या कामाचे योग्य तपासणी होत नाही तोपर्यंत बिल आदा करू नये, असे निवेदनात म्हटले आहे. आरपीआयचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. यावेळी लक्ष्मण पवार, आनंद काळे, सुनील शिंदे, शंकर राजू काळे, विलास किसन काळे, किसन बाजीराव काळे , आदी उपस्थित होते. फोटो : सासवड- सोनोरी रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे टेंडर देऊनही खड्डे मात्र जागेवरच.
- Get link
- X
- Other Apps