Skip to main content
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची भेट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमधील जनकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (JDBIMSR) येथे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीचे आयोजन करण्यात आले. “शिक्षण, संस्कृती आणि शाश्वत विकास” या विषयावर आधारित या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद व विचारांची देवाणघेवाण झाली.या कार्यक्रमाचे आयोजन एसएनडीटीवी महिला विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ .हेमलता बागला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कुलसचिव प्रा.विलास नांदवडेकर यांच्या सहकार्याने करण्यात आले. विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास डॉ. गणेश चव्हाण, पुणे कॅम्पस समन्वयक व प्राचार्य, एसएनडीटी कॉलेज ऑफ होम सायन्स, तसेच डॉ. रचना शिखरे, संचालक, JDBIMSR पुणे कॅम्पस, सर्वास स या संस्थेच्या देसाई व डॉ. रुपाली मेनने आणि विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.MBA आणि MCA अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींशी उत्स्फूर्त संवाद साधला. इटली ,फ्रान्स, स्पेन, बेल्जियम, तैवान, थायलंड, दक्षिण कोरिया या संवादातून शिक्षण, संस्कृती, शाश्वत विकास, आंतरराष्ट्रीय अनुभव, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्यपूर्ण शिक्षण यांसारख्या विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली.डान्स अकॅडमी मार्फत गणेश वंदना या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर सर यांनी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विशेष उपक्रमांची माहिती दिली. पुणे आवर प्रमुख प्राचार्य डॉ.गणेश चव्हाण सर यांनी विद्यापीठातील सांस्कृतिक शैक्षणिक आणि शाश्वत विकासाच्या कार्यक्रमांची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या भेटीमुळे,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रमुख पाहुण्यांना भारताची संस्कृती, शिक्षणपद्धती आणि दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळाली.विद्यार्थिनींना जागतिक दृष्टिकोन, सांस्कृतिक जाणीव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संवाद साधण्याचा आत्मविश्वास विकसित होण्यास या उपक्रमाची मदत झाली.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी, प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये संवाद व विचारांची देवाणघेवाण करण्यात आली.एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 'संप्रेषण आणि माध्यम अभ्यास विभाग' (Department of Communication and Media Studies) द्वारे निर्मित, महर्षी कर्वेष यांच्या कार्याचा वारसा दर्शवणारी ७ मिनिटांची दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment