Posts

निधन वार्ता प्रकाश उर्फ आबासाहेब क्षीरसागर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील प्रकाश उर्फ आबासाहेब गोपाळराव क्षीरसागर (वय ७९) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजी अधीक्षक माणिक क्षीरसागर यांचे ते पती होत. हॉटेल किचन इक्विपमेंटचे उद्योजक केदार क्षीरसागर व सॉफ्टवेअर इंजिनियर ऋषिकेश क्षीरसागर यांचे ते वडील होत. तर सासवड शहर भाजपा माजी महिला अध्यक्षा रूपाली क्षीरसागर व सॉफ्टवेअर इंजिनियर ज्योती क्षीरसागर यांचे ते सासरे होत. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनेक पक्ष, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची गर्दी होती. आबासाहेब क्षीरसागर यांनी सासवड येथील शरद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदाची धुरा काही काळ सांभाळली होती. सामाजिक व सहकारी क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार तसेच दिवंगत माजी आमदार बापूसाहेब खैरे यांचे ते खंदे समर्थक म्हणून परिसरात ओळख होती. पुणे जिल्हा व पुरंदर तालुक्यात त्यांची निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख होती. पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी वस्तीवरील अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील गोठ्यातून 80 हजाराची गाभण म्हैस चोरीला तर अज्ञात चोरट्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल परिसरामध्ये एक प्रकारे खळबळ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी येथील दिघे वस्ती परिसरामधील गोट्यात बांधून ठेवलेली तब्बल ८० हजार रुपये किमतीची घाबन असणारी म्हैस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही चोरी शनिवारी दिनांक तीन रोजी रात्री दहा ते रविवारी दिनांक चार रोजी पहाटे चार या कालावधीमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकामध्ये एक प्रकारे चिंता निर्माण झालेली असून, याबाबत सोमनाथ लक्ष्मण दिघे राहणार दिघे वस्ती भिवडी तालुका पुरंदर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांनी शनिवारी रात्री आपली म्हैस नेहमीप्रमाणे गोठ्यात बांधून ठेवली होती मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घोट्यात प्रवेश करून, म्हैस चोरीला नेल्याची रविवारी पहाटे निदर्शनास आले असून,आज्ञात चोरटे आणि पशुधनावर डल्ला मारल्याचे या परिसरामध्ये एक प्रकारे खळबळ उडालेली आहे. पोलिसांकडून परिसरातील हालचाली संभाव्य मार्ग तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. 80 हजाराची भिवडी येथील म्हैस चोरीला गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानी बरोबरच पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे ,सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली पोलीस हवालदार एस एल जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

Image

डॉ. ललिता भगत यांची समाजकार्य विषयासाठी PhD Guide म्हणून नियुक्ती:डॉ. ललिता भगत यांची समाजकार्य विषयासाठी PhD Guide म्हणून मान्यता सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : SNDT कॉलेज ऑफ होम सायन्स, पुणे येथील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. ललिता भगत यांना मानव्यविद्या विद्याशाखेअंतर्गत समाजकार्य (Social Work) विषयासाठी PhD Guide म्हणून मान्यता मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत मान्यता पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले.डॉ. भंगत यांच्या शैक्षणिक, अध्यापन व सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाली आहे. या मान्यतेमुळे समाजकार्य विषयातील संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी त्यांना प्राप्त होणार असून, संशोधन क्षेत्रातही त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे.या यशाबद्दल डॉ. ललिता भगत यांनी SNDT कॉलेज ऑफ होम सायन्सचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण सर यांचे तसेच लाईफ लॉंग लर्निंग व सोशल वर्क विभागाचे प्रमुख डॉ प्रभाकर चव्हाण,डॉ. भास्कर इगवे सर विशेष आभार मानले. त्यांनी दिलेला सातत्यपूर्ण पाठिंबा, प्रेरणा आणि संधी यामुळे हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच डॉ. इगावे सर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.डॉ. ललीतेता भंगत यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Image

‘जल्लोष २०२६’मध्ये वाघिरे महाविद्यालयाची दमदार कामगिरीविविध कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी पटकावली पारितोषिके; महाविद्यालयात जल्लोष सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे आयोजित ‘जल्लोष २०२६’ या युवा महोत्सवातील विविध कला प्रकारांत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवडच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली. विविध दहा कला प्रकारांत विद्यार्थ्यांनी पारितोषिके मिळविल्याने महाविद्यालय परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.शास्त्रीय नृत्य प्रकारात शमिका मोने हिने प्रथम क्रमांक मिळविला. व्यंगचित्र प्रकारात श्रेयस पवार याने द्वितीय, तर कोलाज प्रकारात नूतन वैराट हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्थळ छायाचित्रणात तेजस फडतरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. स्वरवाद्य वादनात ज्ञानेश्वरी पवार हिने, तर पोस्टर मेकिंगमध्ये गायत्री म्हेत्रे हिने तृतीय क्रमांक मिळविला.सांघिक कला प्रकारांतही वाघिरे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखविली. पथनाट्याने द्वितीय क्रमांक, तर एकांकिका, मूकनाट्य आणि लोकवाद्यवृंदाने तृतीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी सादरीकरणातील कल्पकता, कलात्मकता आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर ही कामगिरी केली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. किरण गाढवे, प्रा. पूनम काळे, प्रा. उत्कर्षा जगताप आणि शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना कला सादरीकरणासाठी सातत्याने प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्याने हे यश संपादन करता आले.या उल्लेखनीय यशाबद्दल प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बबन माने, समन्वयक डॉ. नरसिंग गिरी आणि प्रा. सचिनकुमार शहा यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

Image

आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे सिंधुताई सपकाळ यांच्या लेकींशी कृष्णराज महाडिक यांचा फेस टू फेस संवाद“• ममता बाल सदन संस्थेला दिली सदिच्छा भेट सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: मुुलींनो स्वतःला कधीच कमजोर समजू नका. कारण आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध करू लागल्या आहेत. जर तुमच्या “लाईफमध्ये अप-डाऊन आले तर स्पोर्ट्समधून प्रेरणा मिळते. स्पोर्ट असे क्षेत्र आहे की जे तुम्हाला कायम स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहील ज्यामुळे तुमच्यामध्ये शिस्त निर्माण होईल. मी स्वतः स्पोर्ट्समधून पुढे आलेलो आहे. त्यामुळे आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्पोर्ट्स कल्चर फार महत्त्वाचे ठरते, असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या मायेने आणि संस्कारांनी उभ्या राहिलेल्या ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सदिच्छा भेट देऊन माईंच्या लेकींशी फेस-टू-फेस मनमोकळा संवाद साधला. मुलींनीही क्रीडा क्षेत्र, करिअर आणि भविष्यातील संधींबाबत उत्सुकतेने संवाद साधला. यावेळी क्रीडा क्षेत्रातील आपले अनुभव मुलींसमोर मांडले. शिक्षण, रोजगार, स्वावलंबन, सुरक्षितता, करिअर आणि जीवनातील अडचणींपासून ते मनाच्या तळातून आलेल्या प्रश्नांपर्यंत मुलींनी अनेक प्रश्न महाडिक यांच्यासमोर मोकळेपणाने मांडले. यावेळी मुलींशी संवाद साधताना कृष्णराज महाडिक म्हणाले, “काही प्रश्न शिक्षणाचे असतील... काही रोजगाराचे असतील... काही स्वावलंबनाचे असतील... काही मुलींच्या सुरक्षिततेचे असतील... तर कदाचित एखादा प्रश्न अगदी मनाच्या तळातून आलेला असेल. कुठलाही प्रश्न असो, आपण मला मनमोकळेपणाने विचारा. मी आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.”“तुमच्यासारख्या मुलींच्या स्वप्नांना समाजाची साथ कशी मिळेल?” या प्रश्नाचे उत्तर केवळ शब्दांत नव्हे, तर संवादातून आणि संवेदनशीलतेतून मिळायला हवे, अशी भावना व्यक्त करत त्यांनी माईंच्या सर्व लेकींना आवाहन केले, “मनातला प्रश्न मनात ठेवू नका... आज मनमोकळेपणाने विचारा! कारण माईंच्या घरात प्रश्न विचारण्यासाठी परवानगी लागत नाही; इथे प्रश्न मायेने ऐकले जातात आणि उत्तरांना आधाराची जोड दिली जाते.”या आवाहनानंतर मुलींनीही मनातील अनेक प्रश्न थेट महाडिक यांच्यासमोर मांडले. महाडिक यांनी मुलींच्या प्रत्येक प्रश्नाला मनापासून आणि समर्पक उत्तरे देत त्यांच्या जिज्ञासेला प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ माईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांच्या हस्ते कृष्णराज महाडिक यांचा शाल, श्रीफळ तसेच पिंपळ व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमानंतर महाडिक यांनी ममता बाल सदन परिसराची पाहणी केली. त्यांनी संस्थेची गोशाळा आणि बेकरी यांना भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. माईंच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी आस्थेने पाहणी केली. यावेळी पुणे व सासवड परिसरातील भाजपचे तुषार झुरंगे,अजिंक्य टेकवडे तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अधीक्षिका स्मिता पानसरे, संचालक गोपाल गायकवाड, प्रसन्न गायकवाड, संजय गायकवाड, सुजाता गायकवाड, सरपंच मंजुषा गायकवाड, नाना कुंभारकर यांच्यासह ममता बाल सदनमधील मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी यांनी केले. चौकट *असे विचारले प्रश्न ?* “एक चांगला नेता होण्यासाठी अभ्यास, वक्तृत्व, धाडस आणि संवेदनशीलता यापैकी कोणत्या गुणाला आपण सर्वाधिक महत्त्व देता?”, “अनाथ किंवा वंचित मुलांना समाजात समान संधी मिळण्यासाठी युवकांनी कोणती भूमिका बजावली पाहिजे?”, “आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला असा कोणता संस्कार आहे, जो आपण आयुष्यभर जपता?”, “ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण आणि चांगल्या करिअरच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन आणि समाजाने आणखी काय करायला हवे?”, तसेच “महाराष्ट्रभर प्रवास करताना युवकांच्या कोणत्या प्रश्नाने आपल्याला सर्वाधिक विचार करायला लावले?” असे विविध प्रश्न मुलींनी विचारले. मुलींच्या प्रश्नांना सुद्धा त्यांनी तितकीच दिलखुलास उत्तरे दिली.

Image

निखिल जगताप यांना ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ने सन्मानित सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील बेलसर गावचे सुपुत्र, पत्रकार,साहित्यिक व प्रसिद्ध निवेदक निखिल सतिश जगताप यांना हडपसर येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे रविवार (दि.२७) रोजी झालेल्या १०० व्या राज्यस्तरीय पुणे मराठी काव्य संमेलनात ‘आदर्श पत्रकार साहित्य रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.रानकवी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानाई फाउंडेशन कला साहित्य विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत निखिल जगताप यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बेलसर गावच्या सुपुत्राला मिळालेल्या या सन्मानामुळे पुरंदर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.या पुरस्काराबद्दल निखिल जगताप यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Image

वाघीरे महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे १५७ व्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय छात्रसेनेच्या (NCC) वतीने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत, क्षयरोगमुक्त भारत व तंबाखूमुक्त भारत या विषयांवर कॅडेट्सनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली.या कार्यक्रमात ३६ महाराष्ट्र बटालियन, २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट च्या एकूण १०४ NCC कॅडेट्सनी सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पोस्टर स्पर्धा, जनजागृती रॅली आणि नुक्कड नाटक यांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, क्षयरोग प्रतिबंध आणि तंबाखूविरोधी जनजागृतीचा संदेश देण्यात आला. यावेळी लेफ्टनंट गजेंद्र अहिवळे यांनी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. सौ. मयुरी जाधव यांनी गर्ल कॅडेट्स ना मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास श्री. अंकुश धायगुडे व श्री. आकाश यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी श्री अंकुश धायगुडे व आकाश राऊत व NCC कॅडेट्स आणि एनसीसी प्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

Image