Skip to main content
निधन वार्ता प्रकाश उर्फ आबासाहेब क्षीरसागर सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील प्रकाश उर्फ आबासाहेब गोपाळराव क्षीरसागर (वय ७९) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभाग माजी अधीक्षक माणिक क्षीरसागर यांचे ते पती होत. हॉटेल किचन इक्विपमेंटचे उद्योजक केदार क्षीरसागर व सॉफ्टवेअर इंजिनियर ऋषिकेश क्षीरसागर यांचे ते वडील होत. तर सासवड शहर भाजपा माजी महिला अध्यक्षा रूपाली क्षीरसागर व सॉफ्टवेअर इंजिनियर ज्योती क्षीरसागर यांचे ते सासरे होत. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी अनेक पक्ष, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची गर्दी होती. आबासाहेब क्षीरसागर यांनी सासवड येथील शरद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पदाची धुरा काही काळ सांभाळली होती. सामाजिक व सहकारी क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग होता. लोकनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार तसेच दिवंगत माजी आमदार बापूसाहेब खैरे यांचे ते खंदे समर्थक म्हणून परिसरात ओळख होती. पुणे जिल्हा व पुरंदर तालुक्यात त्यांची निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सर्वत्र ओळख होती. पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गाव,वाडी वस्तीवरील अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment