Skip to main content
वाघिरे महाविद्यालयात NCC रँक प्रदान सोहळा, पालक सभा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सासवड येथे राष्ट्रीय छात्रसेनेच्या (NCC) वतीने रँक प्रदान सोहळा, पालक सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट गजेंद्र म. अहिवळे यांनी केले. यावेळी त्यांनी 36 महाराष्ट्र बटालियन NCC आणि महाविद्यालयातील NCC प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. सब लेफ्टनंट सुनील शिंदे यांनी 3 महाराष्ट्र नेव्हल युनिटमधील प्रशिक्षणाची माहिती दिली. तसेच प्रा. मयुरी जगताप यांनी 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधील छात्र सैनिकांनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेत मुलींसाठी उपलब्ध असलेल्या विविध संधींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमादरम्यान प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे तसेच संबंधित NCC अधिकाऱ्यांच्या हस्ते पात्र कॅडेट्सना विविध रँक प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 36 महाराष्ट्र बटालियन आणि 2 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या आर्मी विंगमधील सिनियर अंडर ऑफिसर, ज्युनियर अंडर ऑफिसर, कंपनी सार्जंट मेजर आणि कंपनी क्वार्टर मास्टर सार्जंट, तसेच नेव्हल विंगमधील कॅडेट कॅप्टन आणि पेटी ऑफिसर कॅडेट या रँकचा समावेश होता.NCC मधील रँक ही केवळ गणवेशावरील ओळख नसून नेतृत्वगुण, शिस्त, जबाबदारी आणि संघभावनेचे प्रतीक आहे, असे यावेळी नमूद करण्यात आले.प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी सांगितले की, महाविद्यालयात सन 1975 पासून NCC उपक्रम सुरू असून, संस्थेने NCC क्षेत्रातील 50 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. कॅडेट्सना शारीरिक प्रशिक्षण, ड्रिल, शस्त्र प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक सेवा आणि नेतृत्व प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयात रायफल ड्रिल, सेरेमोनियल ड्रिल, सेरेमोनियल स्वॉर्ड ड्रिल आणि मार्चपास्ट यांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे हे स्वतः 36 महाराष्ट्र बटालियनमार्फत NCC चे A, B आणि C प्रमाणपत्र प्राप्त कॅडेट राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात आणि कारकिर्दीत NCC चे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पालक सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी NCC प्रशिक्षण, कॅडेट्सची शैक्षणिक प्रगती, व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, सहभाग आणि NCC मधील विविध संधी याबाबत पालकांशी संवाद साधण्यात आला. कॅडेट्सच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय आणि पालक यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात महाविद्यालयातील तिन्ही NCC युनिट्सच्या कॅडेट्सनी विविध भारतीय नृत्यप्रकारांचे सादरीकरण केले. या सांस्कृतिक कार्यक्रमातून भारताची सांस्कृतिक विविधता आणि ‘विविधतेत एकता’ हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.यावेळी वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, वाणिज्य विभागाचे समन्वयक डॉ. संजय गिरी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष जगताप, पालक आणि छात्र सैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन CPL तनिष्का प्रजापती, कॅडेट अक्षरा आणि कॅडेट तुषार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली NCC अधिकारी, कॅडेट्स, धायगुडे, दगडे आणि संतोष लोणकर यांनी नियोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment