Skip to main content
पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील जमिनीच्या व्यवहारांमध्ये बनावट असे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरा मधून दोन दस्त : तर एक कोटी 79 लाखांचा व्यवहार, तीन जणांना अटक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: वनपुरी तालुका पुरंदर येथील एक कोटी 79 लाख रुपयाच्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये जमीन मालक असलेल्या महिलेच्या नावानेच कथित असे बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड तयार करून, त्या व्यक्तीच्या ऐवजी तोतया महिला उभी करून, दोन जमीन खरेदी दस्त नोंदवून, तब्बल अशा एक कोटी 79 लाख रुपयाचा व्यवहार केला असून, विनोद प्रल्हाद सुद्रिक वय 45 राहणार कोंढवा पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने तपासा अंती बाबू उर्फ सुशील सोपान शिवरकर, दशरथ बबन जानकर आणि मोहन हिरामण गायकवाड या तीन जणांना अटक केली आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे, रोहित संजय पवार, संतोष किसन मेमाणे तसेच प्रियाली परदेशी या नावाने दस्तावर सही करणाऱ्या अनोळखी महिलेविरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. व्यवहाराचा केलेला आरोप असताना फिर्यादी जमीन खरेदी विक्रीचे एजंट असून ,पुरंदर तालुक्यातील वनपुरी येथील गट क्रमांक २५२ मधील ७५ गुंठे आणि गट क्रमांक २५८ मधील 14 एकर पन्नास गुंठे जमीन विक्रीस असल्याचे त्यांना सांगण्यात आले असताना, या जमिनी ची मालकी प्रियाली राकेश परदेशी यांच्या नावावर असल्याचे नमूद करण्यात आले. 12 फेब्रुवारी 2025 रोजी सासवड दस्त नोंदणी कार्यालयामध्ये संबंधित जमिनीचे दोन दस्त करण्यात आले आहेत .गट क्रमांक २५२ मधील व्यवहारासाठी दस्त क्रमांक 1788/ 2025 तर गट क्रमांक 228 साठी दस्त क्रमांक 1789/ 2025 असा करण्यात आला आहे. या व्यवहारांमध्ये चेक द्वारे 20 लाख रुपये आणि दस्तावर चार लाख रुपये असे घेण्यात आल्याचे, तसेच रोख स्वरूपामध्ये एक कोटी 55 लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलेला आहे. बोगस महिलेचा वापर प्रामुख्याने ऍडव्होकेट विद्या संदीप कामथे दस्त नोंदणी वेळी मूळ जमीन मालक प्रियाली परदेशी यांच्या नावाने दुसऱ्या महिलेला उभी करून तिची ओळख पटवून, देण्यात आल्याचा आरोप केलेला आहे. एडवोकेट विद्या संदीप कामथे यांनीच प्रियाली परदेशी असल्याचे सांगितल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केलेले आहे. सातबारा उतारा तपासल्यानंतर मूळ मालकांच्या निदर्शनास हा प्रकार आलेला आहे. त्यानंतरच सासवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळेच कथित बनावट ओळखपत्रे जमीन मालकीची पडताळणी दस्त नोंदणीची प्रक्रिया आणि पैशाच्या देवाण-घेवाणीची साखळी ही पूर्णपणे तपासाचा महत्त्वाचा एक प्रकारे भाग ठरणार आहे, दस्त नोंदणीच्या वेळी सादर करण्यात आलेली ओळखपत्रे छायाचित्रे अथवा नोंदणीशी संबंधित असणाऱ्या माहितीची दुय्यम निबंधक कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बँक व्यवहार आणि रोख रकमेच्या व्यवहाराचे देवाण-घेवानिशी काय संबंध आहे, त्याचीही पुरावे तपासात महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यामुळेच आर्थिक गुन्हे शाखेने बाबू उर्फ सुशील शिवरकर, दशरथ जानकर आणि मोहन गायकवाड यांना अटक केलेली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, असे आर्थिक गुन्हे शाखेने प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment