Skip to main content
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त पथनाट्याद्वारे सासवडमध्ये आरोग्य जनजागृती सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त “निरोगी भविष्यासाठी फार्मासिस्टचे सक्षमीकरण” (Empowering Pharmacists for a Healthier Future) या संकल्पनेवर आधारित पथनाट्य स्पर्धा व जनजागृती अभियानाचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी अँड पॉलीटेक्निक, सासवड यांच्या वतीने करण्यात आले.फार्मासिस्टची सामाजिक बांधिलकी, आरोग्यविषयक जनजागृती तसेच समाजाच्या आरोग्य संवर्धनातील फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरासह सासवड शहरातील जिल्हा व सत्र न्यायालय परिसर (कचेरी), पीएमटी बस स्थानक, सासवड नगरपरिषद, भाजी मार्केट तसेच शहरातील विविध प्रमुख सार्वजनिक ठिकाणी प्रभावी सादरीकरण करून नागरिकांचे प्रबोधन केले.विद्यार्थ्यांनी औषधांचा योग्य व सुरक्षित वापर, स्व-औषधोपचार टाळण्याचे महत्त्व, लसीकरणाचे महत्त्व, औषधांचा दुरुपयोग, प्रतिजैविक प्रतिकारशक्ती (Antimicrobial Resistance), औषधोपचारातील फार्मासिस्टची भूमिका आणि निरोगी जीवनशैली यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. मनोरंजनासोबतच सामाजिक व आरोग्यविषयक संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.“फार्मासिस्ट हा समाजाच्या आरोग्याचा विश्वासू भागीदार आहे” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी फार्मसी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.पथनाट्य स्पर्धेसाठी डॉ. जयश्री जगताप व सृष्टी जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सागर भिसे, पायल पाटसकर व कु. पद्मजा मस्के यांनी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.या उपक्रमास पदवी अभ्यासक्रमाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण तसेच डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्राचार्या विशाखा गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती लाभली.“जागरूक समाज – निरोगी भविष्य; फार्मासिस्ट नेहमी तुमच्या सोबत!” या संदेशातून विद्यार्थ्यांनी समाजाच्या आरोग्यपूर्ण भविष्यासाठी फार्मासिस्टची भूमिका अधोरेखित केली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment