Skip to main content
कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त वाघीरे महाविद्यालयात प्रतिमापूजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. संजय झगडे यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेले कार्य तसेच ‘कमवा आणि शिका’ या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची जाणीव निर्माण केली. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण यावेळी करण्यात आले.डॉ. संजय झगडे यांनी कर्मवीरांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबनाची भावना जोपासावी, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. किरण गाढवे यांनी सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमातून कर्मवीरांच्या शैक्षणिक विचारांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रसंगी डॉ.संजय झगडे उपप्राचार्य, डॉ. एन. एस. गिरी वाणिज्य विभाग समन्वयक, प्रा. सचिन कुमार शहा विज्ञान विभाग समन्वयक तसेच सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment