Skip to main content
जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त औषध गुणवत्ता व रुग्णसुरक्षेबाबत मार्गदर्शन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक, सासवड येथे जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ निमित्त विशेष जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावर्षीच्या कार्यक्रमात “औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता सुनिश्चित करण्यात अन्न व औषध प्रशासन आणि फार्मासिस्टची भूमिका” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पुणे विभागाच्या अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक मा. रझिया शेख या प्रमुख अतिथी व व्याख्यात्या म्हणून उपस्थित होत्या.यावेळी सासवड केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धैर्यशील शिंदे तसेच पुणे जिल्हा महिला कार्यकारिणी सदस्या सौ. शुभांगी जगताप यांनी फार्मासिस्ट प्रतिनिधी म्हणून प्रमुख उपस्थिती दर्शविली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण यांनी फार्मसी व्यवसायातील बदलत्या जबाबदाऱ्या अधोरेखित करताना रुग्णांच्या सुरक्षिततेमध्ये फार्मासिस्टची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.मार्गदर्शनपर व्याख्यानात मा. रझिया शेख यांनी औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता व परिणामकारकता, योग्य साठवणूक, वितरण व्यवस्था, नियामक नियमांचे पालन, औषधांची तपासणी तसेच रुग्णांना योग्य औषधविषयक मार्गदर्शन या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.तसेच त्यांनी अन्न व औषध प्रशासनाची कार्यपद्धती, औषध निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या, औषधांच्या गुणवत्तेची तपासणी, निकृष्ट दर्जाच्या औषधांपासून होणारे संभाव्य धोके, औषधांच्या सुरक्षित वापरासाठी आवश्यक खबरदारी तसेच फार्मासिस्टच्या व्यावसायिक व नैतिक जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत संवादात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना औषधांच्या सुरक्षित वापराबरोबरच औषधांची गुणवत्ता, रुग्णसुरक्षा आणि रुग्णहिताचे संरक्षण यामध्ये फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेण्यास मदत झाली.या कार्यक्रमाच्या माध्यमातून “फार्मासिस्ट हा केवळ औषधांचे वितरण करणारा व्यावसायिक नसून औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि रुग्णहित यांचा महत्त्वपूर्ण संरक्षक आहे,” हा प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. चव्हाण, उपप्राचार्य डॉ. एस. जे. पवार, पॉलिटेक्निक विभागाच्या विभागप्रमुख सौ. व्ही. एस. गायकवाड, श्री. एस. व्ही. भिसे, कु. पी. के. म्हस्के आणि सौ. पी. ओ. पाटसकर यांनी समन्वय साधला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment