Skip to main content
शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची भव्य विसर्जन मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथे यावर्षी ‘अन्नसुरक्षा व निरोगी जीवन’ या संकल्पनेतून गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या विसर्जनानिमित्त विद्यालयाच्या वतीने लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल ते संगमेश्वर मंदिर अशी भव्य विसर्जन मिरवणूक आयोजित करण्यात आली. या मिरवणुकीत विद्यालयाच्या ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक आणि ध्वज पथकाने उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली . ढोल-ताशांचा गजर, लेझीमचे तालबद्ध सादरीकरण आणि आकर्षक ध्वज प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून अन्नसुरक्षा, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह व शिस्त विशेष कौतुकास्पद ठरली.मिरवणुकीची सांगता संगमेश्वर मंदिर येथे झाली. यावेळी गणरायाची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर पर्यावरणपूरक पद्धतीने श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाचे विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत टकले, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम तसेच संस्थेचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, कर्मचारी आणि पालक यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले.‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment