Skip to main content
‘सृजनरंग’मध्ये वाघीरेच्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित वाघीरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित ‘सृजनरंग’ सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेची महाविद्यालयीन फेरी उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांतून आपल्या सर्जनशीलतेचा प्रभावी आविष्कार सादर केला.स्पर्धेचा प्रारंभ ‘वृक्ष संजीवनी’ उपक्रमाने करण्यात आला. त्यानंतर एन.एस.एस. गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. काव्यवाचन, निबंध लेखन, वक्तृत्व, भित्तीचित्र (पोस्टर मेकिंग), पोवाडा गायन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सामाजिक जाणीव, राष्ट्रनिर्माण, पर्यावरण संवर्धन आणि व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्यिक व कलात्मक अभिव्यक्तीतून प्रभावी भाष्य केले. स्पर्धेतील गुणवत्तेच्या आधारे निवड झालेले विद्यार्थी आगामी जिल्हास्तरीय व विद्यापीठस्तरीय ‘सृजनरंग’ स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.यावेळी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “राष्ट्रीय सेवा योजना ही समाजासाठी काहीतरी ठोस करण्याची आणि विचारांना सकारात्मक दिशा देण्याची संधी आहे. सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो,” असे सांगितले.राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारीपदी नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. शीतल कल्हापुरे यांचा प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. बबन माने, वाणिज्य शाखेचे समन्वयक डॉ. नरसिंग गिरी व कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. जगताप यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजना समितीचे सदस्य व कार्यक्रम अधिकाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.डॉ. शीतल कल्हापुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पूनम काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. संग्राम निगडे यांनी आभार मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment