Skip to main content
पुरंदर तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे दुहेरी यश सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पुरंदर तालुकास्तरीय शालेय हॉलीबॉल स्पर्धा दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सासवड येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दोन गटांत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.* तसेच 17 वर्षांखालील मुलांच्या गटातही विद्यालयाच्या संघाने दमदार कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.या दोन्ही संघांची पुढील जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी सांघिक भावना, उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत टकले सर, उपप्राचार्य सुषमा रासकर मॅडम, क्रीडा शिक्षक संतोष गलांडे सर, तसेच श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन केले आणि आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा अध्याय जोडला गेला असून, जिल्हास्तरीय स्पर्धेतही विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment