Skip to main content
बाल विकास मंदिर शाळेत नवागतांचे स्वागत सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बाल विकास मंदिर शाळा पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या आवाजाने गजबजून गेले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला इयत्ता पहिलीत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण तसेच पुष्पवृष्टी करून सुमधुर संगीतात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेत सर्वत्र फुगे लावण्यात आले होते. ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. विशेष म्हणजे विद्यार्थी व पालकांना आकर्षित करणारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. या ठिकाणी पालकांनी विद्यार्थ्यांचे फोटो काढले. शासन नियमानुसार पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके देण्यात आली. तसेच गोड खाऊ दिला. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे, मंजुषा चोरामले, शारदा यादव, पहिलीच्या वर्गशिक्षिका साधना राऊत , शितल चौधरी, अश्विनी कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment