Skip to main content
पुरंदर तालुक्याचा एकच उत्पादित ब्रँड डेव्हलप केल्यास मार्केटिंग करणे सोपे होईल : रूपाली झेंडे सासवड येथे प्रभागातील प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना सर्टिफिकेट वाटप क-हामाई महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : महिलांनी मसाले, लोणचे पापड, पारंपारिक व्यवसाय करण्यापेक्षा वेगवेगळ्या व्यवसाय करण्यावर भर देण्यात यावा. तसेच महिलांनी एकत्र मिळून व्यवसाय केला तर खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल, त्याचप्रमाणे प्रभागाचे किंवा तालुक्याचे एकच उत्पादन असेल तर त्याचा ब्रँड डेव्हलप करून, मार्केटिंगसाठी सोपे होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रूपाली झेंडे यांनी केले. सासवड येथील जयदीप मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत क-हामाई महिला प्रभागसंघाची (दिवे गराडे जिल्हा परिषद गट) वार्षिक सर्वसाधारण सभा सासवड या ठिकाणी पार पडली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या रुपाली झेंडे, पंचायत समिती सभापती सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, गटविकास अधिकारी अविनाश थोरात, संचालक पुणे संजय मांढरे, मंगेश माने, बँक ऑफ इंडिया बँक शाखा व्यवस्थापक सासवड सचिन दोलताडे, वैशाली काळे आदी उपस्थित होते. प्रभागसंघ अध्यक्ष अलका बडदे, सचिव हेमलता खेडेकर, कोषाध्यक्ष वंदना गायकवाड, लिपिका दिपाली भोराडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सपना करकंडे, तालुका व्यवस्थापक नंदा कुरडे, तालुका व्यवस्थापक गणेश किकले, महंतवीर घाडगे, समन्वयक रमेश भंडलकर, सागर ढाकणे, महमंद शेतसंदी, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी दिवे गावातील महिलांना दोन कोटीचे बँक कर्ज वाटप करण्यात आले. सर्व ग्राम संघाचे सर्व ग्राम सखींचे त्याच प्रमाणे उद्योजक महिलांचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी संजीवनी गायकवाड आंबळे तसेच शुभांगी काळे सोनोरी यांनी बचत गटाच्या उत्पादनांचे स्टॉल लावले होते.चौकट : तालुक्यातील प्रभागातील एकल विधवा, परितक्ता, जात प्रवर्गानुसार वंचित घटकांमधील महिलांचे गट बांधणी करावी. जिल्हा अभियान सहसंचालक श्रीकांत खरात.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment