Skip to main content
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान श्रावणी यात्रेसाठी सज्ज झाले असून, पुरंदरचे नायब तहसीलदार संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे अधिकारी व माळशिरस ग्रामस्थ यांची श्रावणी यात्रा नियोजन बैठक संपन्न झाली. पंचायत समितीचे सदस्य माऊली यादव यांनी येथील समस्या सांगितल्या, या बैठकीत अनेक विषयावर चर्चा करण्यात आली, मंदिराकडे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहने वन विभागाच्या कमानी बाहेर अडवण्यात येणार आहेत, वन विभाग ते भुलेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. श्रावणी यात्रा 13 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर पर्यंत असल्याने, लाखो भाविक भुलेश्वर दर्शनासाठी येत असल्याने, त्यांची सोय आणि सुरक्षितेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. माळशिरस ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने महिनाभर आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत, अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने येथील खाऊची दुकाने व प्रसादाच्या पेढ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने वाढीव बंदोबस्त देण्यात येणार आहे, यावेळी गट विकास अधिकारी अविनाश थोरात, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम काळे, सासवड आगार व्यवस्थापक वृषाली तांबे ,जीवन ठोंबरे, विस्तार अधिकारी सागर कांबळे, मालशिरसच्या सरपंच आरती यादव, उपसरपंच छाया यादव, पोलीस पाटील पूजा यादव, प्रियांका साळुंखे, एस एस निंबाळकर आधी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment