Skip to main content
पुरंदर तालुक्यातील आषाढ अमावास्येनिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानात भाविकांची अलोट गर्दी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा; हजारो भाविकांनी घेतले श्रीनाथ म्हस्कोबांचे दर्शनवीर, ता. पुरंदर, जि. पुणे | बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६आषाढ अमावास्येनिमित्त पश्चिम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान फअसलेल्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान, वीर येथे आज पहाटेपासून हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने श्रीनाथ म्हस्कोबांचे दर्शन घेतले. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.सकाळी ६ वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा देवाला विधिवत अभिषेक करण्यात आला. पारंपरिक पद्धतीने दहिभाताची पूजा संपन्न झाली. दुपारी १२ वाजता धूपारती झाल्यानंतर धार्मिक विधींसाठी मुख्य गाभारा सुमारे सव्वा तास दर्शनासाठी बंद ठेवण्यात आला. त्यानंतर दुपारी १.१५ वाजता पुन्हा भाविकांसाठी दर्शन सुरू करण्यात आले. दिवसभर महिला व पुरुष भाविकांनी शिस्तबद्ध रांगेतून दर्शन घेतले. काही भाविकांनी मधील गाभाऱ्यातूनही दर्शन घेतले.महाप्रसादाचा हजारो भाविकांनी घेतला लाभआजचा महाप्रसाद रामदादा धुमाळ, विठ्ठलशेठ धुमाळ, व सुशीलकुमार जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.देवस्थान ट्रस्टकडून भाविकांसाठी सुविधाभाविकांची गैरसोय होऊ नये तसेच दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वच्छ पिण्याचे पाणी, वापरासाठी पाण्याची व्यवस्था, जनरेटर सुविधा, स्वच्छतागृह, दर्शनबारीचे नियोजन तसेच स्वयंसेवक व होमगार्डची नियुक्ती करण्यात आली होती. दर्शन सुरळीत पार पडावे आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांचेसमवेत संपूर्ण विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ, सेवेकरी, सहकारी व स्वयंसेवक दिवसभर भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment