Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील भोंडे नगर, लाईट बोर्ड समोर जेजुरी नाका व एसटी स्टँड च्या बाजूला असणाऱ्या तीन मेडिकल दुकाने चोरट्यांनी फोडली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड येथील जेजुरी नाका ते एसटी स्टँड परिसरामधील तीन मेडिकल दुकाने चोरट्याने फोडली असून, चोरट्याने रोख रकमेसह लॅपटॉप प्रिंटर व कॉस्मेटिक्स असा ऐवज लंबास केला असून, याशिवाय दुकानाची शटर व फर्निचरचे नुकसान केले आहे, ही घटना मंगळवारी दिनांक 25 रोजी रात्री नऊ ते बुधवार दिनांक 26 रोजी पहाटे साडेपाचच्या दरम्यान घडली आहे. याबाबत संतोष महादेव कामठे ,सागर शहाजी सस्ते , पवन जयकुमार सुतार यांची दुकाने फोडून चोरट्यांनी रोख पैसे, लॅपटॉप प्रिंटर आणि कॉस्मेटिक्स असा सुमारे 96 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे, तसेच शटर व फर्निचरचेही नुकसान केलेले आहे. याप्रकरणी संतोष महादेव कामठे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरटे दोन असल्याचेही सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही राऊत हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment