Skip to main content
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची मागणी;; पोलिसांकडून तक्रारीची दखल सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: जेजुरी येथील श्री खंडोबा गडावर जाणाऱ्या आपत्कालीन रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित ठेवून भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाशी संबंधित वाहने वगळता इतर चारचाकी वाहनांना या मार्गावर प्रवेश देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची जेजुरी पोलिसांनी दखल घेतली असून, दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या वाहनांव्यतिरिक्त इतर चारचाकी वाहनांना प्रवेश देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.ही मागणी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधात नसून, जेजुरीकर नागरिक, भाविक तसेच रस्त्याच्या कामात कार्यरत कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अनावश्यक वाहनांची ये-जा टाळल्यास कामही सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल.पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार, वाहनांना प्रवेश दिल्यामुळे अपघात झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांवर राहील व कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. याबाबत श्री मार्तंड देवसंस्थान व्यवस्थापनालाही लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत.प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.सुरक्षित रस्ता सुरक्षित भाविक सुरक्षित जेजुरी.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment