Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी रंगणार पुरंदर केसरीचा थरार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर हवेलीतील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेली पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धा रविवारी दि. 26 व सोमवारी दि.27 रोजी सासवड ता. पुरंदर येथील श्री भैरवनाथ कुस्ती मैदानावर रंगणार आहे, खुल्या गटातील विजेताला चांदीचे गदा आणि पस्तीस हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे ,सहकार महर्षी स्वर्गवासी चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ आणि पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, स्पर्धेत 30 किलो पासून खुल्या गटापर्यंत एकूण दहा वजन गटांचा समावेश आहे, यावेळी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा विशेष असा सन्मान होणार आहे, तसेच ज्ञानेश्वर मांगडे यांना राज्यस्तरीय आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी पुरस्कार तर शिवाजीराव ताकोले यांना मल्हार केसरी पुरस्कार प्रदान करण्यात येईल.उत्कृष्ट आखाडा नियोजनाबद्दल पांगारे येथील निषणाई देवी यात्रा कमिटी आणि वडकी येथील श्री काळभैरवनाथ उत्सव समिती यांचाही गौरव करण्यात येईल, स्पर्धेसाठी रविवारी दि.26 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये वजने घेतले जातील, खेळाडूंनी आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आणि दोन फोटो सोबत आणणे अनिवार्य आहे, पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या नियमानुसार या कुस्त्या होतील ,कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिव रवींद्र पंत जगताप यांनी केले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment