Skip to main content
पुरंदर तालुक्यातील पत्नीचे नावही सातबारा उताऱ्यावर नोंदवा पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांचे आवाहन सासवड येथील कार्यशाळेमध्ये सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : "वारसदार म्हणून असे" आपण मुलांची नाव लावतो, तर तसेच मुलीचीही नाव मूळ हक्कांमध्ये लावले पाहिजे, शासनाच्या लक्ष्मीमुक्ती योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर सह हिस्सेदार म्हणून नोंदवावे असे आव्हान पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे. पुरंदर तालुक्यातील मासूम संस्था आणि महसूल प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी मुक्ती योजना प्रभावीपणे राबवली जात आहे, या उपक्रमांतर्गत आत्तापर्यंत 150 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावले आहे. या निमित्ताने सासवड तालुका पुरंदर येथील आयोजित शेतकरी कार्यशाळेमध्ये तहसीलदार बोलत होते. ग्राम गौरव प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत बोरावके, यांनी शाश्वत शेतीसाठी निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मीना शेंडकर यांनी सातबारा वर नाव लागल्यामुळे, महिला खऱ्या अर्थाने शेतकरी होतील, यामुळे त्यांचे समाजातील दुय्यम स्थान संपून त्यांना सन्मान मिळेल व त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, त्यांनी महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याची व विविध कार्यकारी सोसायटीच्या सभासद होण्याची आव्हान करण्यात आले, यावेळी ललिता जाधव, महादेव शेंडकर, शीतल पवार यांनी आपले अनुभव कथन केले, सातबारा उताऱ्यावर नाव लागल्यामुळे महिला शेतकरी उत्पादक कंपनीची सुरुवात करता आली, तसेच शेती अवजारासाठी अर्ज करणे सोपे झाल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक कृषी अधिकारी मनीषा कांजळे यांनी मार्गदर्शन केले. मोनाली कुंभारकर यांनी सूत्रसंचालन तर वैशाली कुंभारकर यांनी प्रास्ताविक केले. मंगल मगर यांनी आभार मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment