Skip to main content
श्री केदारेश्वर विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात अभिमानास्पद कामगिरी सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान २०२५-२६ (टप्पा २) मध्ये श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित श्री केदारेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज काळदरी या विद्यालयाने ५ वी ते १२ वीच्या शाळा असलेल्या अ गटात पुरंदर तालुक्यात अभिमानास्पद कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला. शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानात संपूर्ण पुणे जिल्ह्यातून १६२० शाळांनी सहभाग नोंदविला होता. तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय परीक्षकांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, अध्यापन पद्धती, उपक्रमांची अंमलबजावणी, सहशालेय उपक्रम, शालेय परिसर, स्वच्छता व सुशोभीकरण आदी निकषांवर आधारित मुल्यांकन केले. विद्यालयाचा परीसर, बगिचा, इ-लर्निग सुविधा, भव्य आखीव रेखीव क्रिडांगण, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विद्यार्थी शिस्त, शालेय अभिलेखे इ बाबींची पाहणी करुन त्यांनी सर्वांचे कौतुक केले. प्राचार्य विजय चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि काळदरी ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून काळदरी विद्यालयाने तालुक्यात सर्वाधिक गुण मिळवून अव्वल स्थान कायम राखले. पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभात शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर, पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ गणपत मोरे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे आदी उपस्थित होते. विद्यालयाचे प्राध्यापक संतोष नवले व सहशिक्षिका सुनंदा टकले यांनी या पारितोषिकाचा मान्यवरांच्या उपस्थितीत स्विकार केला. विद्यालयाच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आनंदी(काकी) जगताप, सचिव मा. आमदार संजय जगताप, संस्थेचे मार्गदर्शक तथा सनदी अधिकारी बापूसाहेब जगताप, संस्थापक-सचिव डॉ. एम. एस. जाधव, सहसचिव दत्तात्रय गवळी , व्यवस्थापक कानिफनाथ अमराळे, सहव्यवस्थापक रविंद्रपंत जगताप यांनी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment