Skip to main content
पुरंदर तालुक्यातील काळेवाडी या ठिकाणच्या परिसरामध्ये रस्ता ओलांडताना एसटीच्या धडकेमध्ये पादचारी ठार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: काळेवाडी परिसरातील रस्ता ओलांडत असताना, एसटी बसची जोरदार धडक बसल्या कारणाने, 85 वर्षीय जेष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला असून, नामदेव मारुती कुंजीर (वय 85 )राहणार आंबळे रेल्वे स्टेशन ता. पुरंदर असे त्यांचे नाव आहे, ही घटना गुरुवारी दि. 30 रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी संबंधित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मिळालेल्या माहितीनुसार कुंजीर हे दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारामध्ये काळे लॉन्स समोर रस्ता ओलांडत होते, त्यावेळी भरधाव एसटी एमएच14 एमएच 26 46 ने त्यांना धडक दिली, या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर धुकापत झाली होती, या परिसरातील नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय सासवड येथे हलवले असता, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासामध्ये एसटी बसचा चालक सिद्धेश्वर प्रल्हाद घाडगे (वय 35) राहणार दळवी विहार सोसायटी सासवड याने निष्काळजी पनाने वाहन चालून हा अपघात घडविण्याचे समोर आले आहे, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment