Skip to main content
महाराष्ट्रातील क्रांतिकारांची बारडोली. - सासवडपुरंदर च्या मातीतील क्रांतिकारी इतिहास आता चित्रपट आणि पुस्तक रूपात झळकणार सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आपल्या भारत देशावर १५० वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी ब्रिटिश सरकारला 'सळो की पळो' करण्याचे काम देशातील अनेक क्रांतीकारकांनी आपल्या शौर्याने आणि बलिदानाने केले. १९४२ ची “ चलेजाव” चळवळ भारतातील प्रत्येक "खेडोपाडी" गांधीं चळवळ म्हणून राज्यातील घराघरातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली. स्वातंत्र्याची धगधगती ज्वाला भडका घेऊन इंग्रजांना भारत सोडण्यास मजबूर झाली. या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड - पुरंदरच्या मातीतील क्रांतीकारी आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सिंहाचा वाटा आहे.इतिहास वाचला पाहिजे, जपला पाहिजे , त्यातील सकारात्मक गोष्टींचा अर्क पुढच्या पिढीला सुपुर्त केला पाहिजे तरच नविन तरुण पिढी चांगली घडेल आणि भारत देशाच्या सामाजिक , ऐतिहासिक , सांस्कृतिक, एकात्मतेचा वारसा भविष्यात टिकेल . ही मनात भावना ठेवून सासवड चे सुपुत्र चित्रपट कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी एक पाऊल पुढे उचलले आहे.त्यांनी हा संपूर्ण धगधगता इतिहास चित्रपट आणि पुस्तक रूपात जगापुढे आणण्याचे ठरवले आहे.याच संदर्भात कर्हानदीकाठावरील सरदार पुरंदरे यांच्या राम बागेतील श्री राम मंदिरात नुकतीच स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज आणि सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या देशाविषयी कृतज्ञता असणाऱ्या मंडळींची सभा जोरदार रंगली.सामाजिक क्षेत्रात काम करणारे ज्येष्ठ लोकनेते माननीय रावसाहेब आण्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ विधितज्ञ आण्णासाहेब खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध सिने अभिनेते, लेखक - दिग्दर्शक डॉ. सुधीर निकम यांच्या कलात्मक नजरतेतुन स्वतंत्र्य पुर्व काळातील सासवड - पुरंदरच्या या बारडोली मध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.सासवड - पुरंदर परीसरातील स्वातंत्र्य चळवळीची मशाल रणरागिणी प्रेमाताई कंठक , पुज्य , शंकरराव देव, आचार्य भागवत , यांच्या प्रेरणेने सासवड ला अनेक स्वातंत्र्य सैनिक दिले . त्यापैकी भिकु तात्या जगताप , आनंदमामा जगताप, निवृत्ती इनामके, चंदनलाल मुथा, तानुबाई मोजे, बबन मोजे, माणिकचंद मुथा, शांताबाई कोटेचा, ताराबाई मुथा , भाऊसाहेब तारकुंडे,अंबर मदनलाल मुथा ,दिगंबर चौधरी, लालचंद मुथा,अब्दुल आत्तार, यशवंत भोंगळे जयवंत भोंगळे ,माधवराव मेमाणे, गणेश गोळे,गुंडोपंत दिडभाई , वामनपुरी गोसावी, विठ्ठल टकले, वरून महागावकर, गहिनाजी म्हेत्रे, शंकर जगताप,गणपतराव इंदलकर, गणपतराव निरगुडे, वसंतराव निरगुडे, रघुनाथ पवार, नानासाहेब पवार, गणपतराव ताकवले,गुलाबराव ताकवले,महादेव होले,रघुनाथराव काकडे, सर्जेराव ताकवले, गोविंदराव भोसले,भगवानराव कुलकर्णी, भुजबळ सिद्धूभाऊ,बोकील रंगराव, नीलकंठ देशमुख,गोविंद जाधव, गणपत बोथरे, गोविंद कवीतकर,विष्णू जाधव,नारायण देसाई याच्यासह अनेक क्रांतिकारी महिला पुरुषांनी संपूर्ण जीवनभर योगदान दिलेचार तास चाललेल्या या कार्यक्रमासाठी स्वातंत्र्य सैनिक यांचे वंशज, तुकाराम इनामके, धनंजय जगताप,परशुराम देशमुख,माजी सैनिक किरण पुरंदरे,विनोद इनामके,अमोल इनामके,शाम महाजन, मयूर इंदलकर, मोहन बागडे,संतोष काकडे,राजेंद्र भोंगळे,अरुण भोंगळे,विलास ताम्हाणे,निलेश शिंदे,संजय काटकर,देवा भालेराव,दिलीप पायगुडे,अय्युब आतार,अब्रार आतार, हारून आतार, दिलीप निरगुडे,बापू म्हेत्रे, मोहिनोद्दीन आतार, हनुमंत जगताप,संतोष आबा काकडे,धनंजय जगताप, परशुराम देशमुख , आदींनी दस्तावेज, ताम्रपत्र, त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांनी लिहून ठेवलेल्या रोजनिशी, पुरातन फोटो, पुस्तक संदर्भ, ऐकीव माहिती आधीच्या साथीने आठवणींना उजाळा दिला. आलेल्या सर्वांचे गांधीजीची आत्मकथा हे पुस्तक आणि गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संदीप इनामके स्टुडिओ च्या संचालीका सौ.नवनी संदीप इनामके क्रिएटिव्ह दिग्दर्शक निनाद देशपांडे, संकलक करण घुले,सहाय्यक छायाचित्रकार स्वतेज गायकवाड यांनी केले होते.या नंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला,आलेल्या सर्व मान्यवरांचे तुकाराम नाना इनामके आणि सहपरिवार यांनी आभार मानले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment