Skip to main content
गुरोळी शाळा परिसरात उभारला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा पावसाच्या छायाछेत्रात (Rain Shadow Region) येतो. या तालुक्यात सरासरी वार्षिक पर्जन्यमान केवळ ४०० ते ५५० मिमी इतके असून, ते जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत सुमारे ३५% ने कमी आहे. परिणामी, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या ११ तालुक्यांमधील सुमारे ४.२ लाख लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पुरंदर हा सर्वाधिक प्रभावित तालुका आहे.एप्रिल २०२६ पर्यंत परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. ४०°C पेक्षा जास्त तापमानामुळे नागरिकांना पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे.या गंभीर परिस्थितीचा विचार करून व अपुरा पाऊस पडल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नामदेव गंगाराम शिंगाडे माध्यमिक विद्यालय गुरोळी या शाळांमध्ये 28 एप्रिल रोजी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारून पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी सायन्स क्लब व जिओ रोटी घर संस्थापक राजेश रसिकलाल शहा यांच्याकडून मदत करण्यात आली. पुरंदरच्या पूर्व भागातील शाळांमध्ये उभारलेला पहिलाच प्रकल्प आहे. गुरोळी गावामध्ये पाणीटंचाई असते तसे दिवसेंदिवस पाण्याची पातळी ही खोल जात आहे. पाणीटंचाईचे चटके डिसेंबर महिन्यात जाणवण्यास सुरुवात होते. भूगर्भात पाण्याचा उपसा हा अधिक प्रमाणात होतो परंतु त्याचे पुनर्भरण होत नाही. यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. यासाठी या प्रकल्पाचे नियोजन माध्यमिक व जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये केले भविष्यात या प्रकल्पामुळे शाळेतील परिसरामध्ये पाणीटंचाईवर मात होईल. तसेच 4 लाख लिटर पाणी जमिनीत मुरणार शाश्वत पर्यावरणाचा प्रयत्न आहे असे उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर यांनी सांगितले. शाळेच्या परिसरात असलेल्या इमारतीच्या छतावरील वाहून जाणारे पाणी पाईपलाईनद्वारे बोरवेल मध्ये पुनर्भरण करण्यात आले. यासाठी या पाण्याला फिल्टर बसवण्यात आला. पावसाच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा सदुपयोग या निमित्ताने होणार आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल.यावेळी उपजिल्हाधिकारी प्रशांत खेडेकर, लायन्स क्लब संस्थापक राजेश शहा, जिओ रोटी क्लब संस्थापक मितेश शहा, संचालक पर्जन्य रेन वॉटर हार्वेस्टिंग शशिकांत दळवी, अनिरुद्ध तोडकर, विनेत्तर सिंग, राजू तेली ग्रामपंचायत उपसरपंच जीवन खेडेकर, रामचंद्र खेडेकर, मुख्याध्यापक राजेंद्र चांदगुडे व शिक्षक वर्ग इतर ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो : गुरोळी (ता. पुरंदर) शाळा परिसरात उभारला रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यावेळी मान्यवर.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment