Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड एसटी स्थानकामधील बस मध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने, एका महिलेच्या पर्समधील दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी आणि डोरले असलेली पोत चोरून नेली, या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे, फिर्यादी निर्मला अशोक गाढवे (वय 48) राहणार ठाणे या गुरुवारी दि. 30 रोजी पहाटे ठाणे पंढरपूर एसटीने सासवड येथे आल्या होत्या, दुपारी अडीचच्या सुमारामध्ये सासवड मध्ये उतरून त्यांनी मिठाई खरेदी केली, त्यानंतर सासवड एसटी स्थानकावरून पुन्हा बस मध्ये चढत असताना, प्रवाशाची मोठी गर्दी होती बस मध्ये चढल्यानंतर निर्मला यांना त्यांच्या पर्सची चैन उघडी असल्याचे आढळले, त्यांनी पर्सची तपासणी केली असता, त्यात एका पिवळ्या रंगाच्या छोट्या पर्समध्ये ठेवलेले दोन तोळे वजनाचे सोन्याचे मनी आणि डोरले असलेली पोत गायब असल्याचे ती निदर्शनास आले एस टी मध्ये आणि स्थानक परिसरामध्ये शोध घेऊनही दागिने मिळाले नाहीत, चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर, त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली, या प्रकरणी सासवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment