Skip to main content
पॅन्ट्स शाईन प्रा. लि.तर्फे पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात पॅन्ट्स शाईन प्रा. लि.चे भव्य अन्नदान सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पॅन्ट्स शाईन प्रा. लि. यांच्या वतीने वारकरी भक्तांसाठी सेवाभावातून अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे भव्य आयोजन करण्यात आले. हजारो वारकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेत कंपनीच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.या उपक्रमांतर्गत १०० किलो साबुदाणा, ५० किलो वरईचा भात, ४,५०० कप चहा तसेच ५,००० पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले. पालखी मार्गावर आलेल्या वारकऱ्यांना शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.पॅन्ट्स शाईन प्रा. लि.चे मालक श्री. भुजंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. वारकरी संप्रदायाप्रती असलेली श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेतला.यावेळी श्री. भुजंग गायकवाड म्हणाले, "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. समाजोपयोगी उपक्रमांद्वारे समाजाचे ऋण फेडण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील. संतांच्या विचारातून सेवा, समता आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य आम्ही करत राहू."या सेवाकार्यात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांना प्रेमाने सेवा दिली. वारकरी बांधवांनी पॅन्ट्स शाईन प्रा. लि. आणि श्री. भुजंग गायकवाड यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment