Skip to main content
पुरंदर तालुक्यातील दिवे घाटामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग हडपसर दिवे घाट मार्ग दोन तास बंद राहणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग लगत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवे घाट येथे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी सोमवार दि. 20 जुलै 2026 रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. या कामामुळे दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णत बंद ठेवण्यात येणार आहे ,पुणे शहर पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखेकडून रविवारी दि. 19 जुलै रोजी व सायंकाळी सात वाजता याबाबत वाहतूक सूचना जारी करण्यात आली असून, आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामांतर्गत दिवेघाट येथे रस्ता बंदी करण्याचे काम सुरू असून, या कामासाठी संबंधित ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी एक ते तीन या कालावधीमध्ये हडपसर दिवेघाट मार्गावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करता येणार नाही, त्यामुळे नागरिकांनी व वाहन चालकांनी या कालावधीमध्ये पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. ब्लास्टिंग चे काम सुरू असताना नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनाचे पालन करून, सहकार्य करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांनी केले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment