Skip to main content
स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांची पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांच्या पुण्यतिथी व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान, सासवड यांच्या वतीने कृषी औद्योगिक विद्यालय, कोडीत येथे विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी संतोष जगताप यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, गुरूंचे जीवनातील स्थान आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण हीच खरी संपत्ती असून ज्ञानाच्या बळावर जीवनात मोठे यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.स्व. श्रीमती शांताबाई एकनाथ जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय सॅक व वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले.विद्यालयाच्या वतीने स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करण्यात आले. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांची परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भैय्यासाहेब खैरे होते. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव व स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, प्रतिष्ठानचे सदस्य माधव शिवरकर, नाना जगताप, शिक्षक जयप्रकाश सरक , सीमा शेंडकर, दीपक निकाळजे, सुरेश क्षीरसागर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उत्तम लकडे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment