Skip to main content
एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा साजरा.... सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल,सासवड येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून पालखी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून संतपरंपरेचा वारसा जपत कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांनी संतरुपी बालकांचे व पालखीचे पूजन करून विद्यार्थ्यांना पालखी सोहळ्याचे महत्त्व, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संतांच्या शिकवणीचे महत्त्व पटवून दिले.पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी संतांची ओळख करून देणारी आकर्षक नाटिका सादर केली. तसेच इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंग, हार्मोनियम यांच्या सुरेल साथीने विविध संतांचे अभंग सादर करून संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.यावेळी भाऊसाहेब येळे, मानसी बोरकर व रुचिरा गार्डी यांनी पालखी सोहळ्याची परंपरा, वारकरी संप्रदाय आणि संतांचे समाजप्रबोधनपर कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पूर्वप्राथमिक विभागाच्या शिक्षिका अश्विनी खळदकर, अंकिता जगताप आणि योगिता जाधव यांनी सुश्राव्य भजन सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता जगताप यांनी केले. शेवटी सर्वांनी एकत्रितपणे 'पसायदान' म्हणत कार्यक्रमाची सांगता केली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment