Skip to main content
सासवडच्या वाघीरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दरवर्षी आळंदीपासून पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीतील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी दरवर्षी विद्यालय विद्यार्थी दिंडीचे आयोजन करते. या वर्षी सासवड येथे पालखीचे आगमन शनिवार दि ११ जुलै २०२६ रोजी झाले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे,पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर पालखीच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या विद्यार्थी दिंडी सोहळ्यात शाळेतील सुमारे ८० विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. वारकरी वेष धारण करून, टाळांच्या तालावर संतांचे अभंग गात गात या दिंडीमध्ये विद्यार्थी सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर , निवृत्तिनाथ, मुक्ताई ,आणि सोपानदेव, संत तुकाराम या संतांची वेशभूषाही केली होती. ही विद्यार्थी दिंडी प्रशालेतून निघाली आणि पुणे-सासवड या पालखी महामार्गावरून सासवडकडे येणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला स्वागतासाठी सामोरी गेली. या प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अनुप्रिया पाडळकर हिने साक्षरता आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर वारकऱ्यांचे प्रबोधन करण्याकरता लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण इयत्ता आठवी तक्षशिला आणि नालंदा या वर्गातील अनुप्रिया पाडळकर, संस्कृती जगताप. गार्गी नाचण, कार्तिकी ठाकरे, स्वराली शिवरकर आणि जान्हवी शेंडकर या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना या विद्यार्थी दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या विद्यार्थिनींना विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका संगीता रिकामे आणि शिक्षक सूर्यकांत खैरनार यांनी मार्गदर्शन केले होते. विद्यार्थी दिंडीत सहभागी झालेल्या विद्यालयातील शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांसोबत वारकरी नृत्य केले. विद्यार्थी दिंडीचे नियोजन विद्यालयातील शिक्षक शिवहार लहाने, हिरामण सहारे , शंकर विभाड इत्यादी शिक्षकांनी केले होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment