Skip to main content
पुरंदर तालुक्यातील संत सोपानदेव महाराज पालखीचे व संत चांगावटेश्वर महाराज पालखीचे सासवड मधून उत्साही वातावरणात असे प्रस्थान सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: ज्येष्ठ वद्य द्वादशीच्या पावन दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपान देव महाराज यांच्या पालखीचे हजारो वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये आषाढी वारीसाठी सासवड येथून भक्तिमय वातावरणामध्ये व उत्साहामध्ये प्रस्थान झाले टाळ मृदूगांच्या गजरात न्यानोबा तुकाराम आणि माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता, मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून, पालखी पूर्व दरवाज्यातून बाहेर पडताच भाविकांनी दर्शन घेत पालखीचे स्वागत केले, शहरातून मार्गक्रमण करताना सासवडकर आणि रस्त्याच्या तूतर्फ उभे राहून पुष्पवृष्टी व जयघोष करून पालखीचे स्वागत केले, जेजुरी नाका येथे सासवड नगरपालिकेच्या वतीने पालखीचे स्वागत व निरोप देण्यात आल्यानंतर ,सोहळा पांगारे येथील मुक्कामासाठी रवाना झाला, प्रस्थान दिनानिमित्त पहाटे काकड आरती महापूजा व धार्मिक विधी पार पडले, सकाळी अकरा वाजता प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ झाला मानाच्या दिड्यांची प्रमुख देऊळ वाड्यामध्ये दाखल झाल्यानंतर मानाचे अभंग सादर करण्यात आले, यावेळी मानकरी अण्णासाहेब केंजळे ,सोहळा प्रमुख एडवोकेट त्रिगुण गोसावी, श्रीकांत गोसावी व गौतम गोसावी यांच्या हस्ते देवघरातील सुहासिनीनी औवक्षण केलेल्या संत सोपानदेव महाराजांच्या पादुका ,विना मंडपातील पालखीत विधी व स्थापन करण्यात आल्या त्यानंतर देवस्थान ट्रस्ट व सोपान काका बँकेच्या वतीने सर्व दिंडी प्रमुख, विणेकरी, आळंदी देवस्थानचे प्रमुख डॉक्टर भावार्थ ढेकणे, मानकरी प्रशासन आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये एकूण 126 दिड्या सहभागी झाल्या असून, रथापुढे 27 तर रथामागे 99 दिंड्या मार्ग क्रमांक करणार आहेत, अंजनगाव चे अजित परकाळे यांचे मानाचे अश्व,सुरटेवाडी येथील केंजळे यांची बैल जोडी, निरा येथील कुलकर्णी यांचा नगारा गाडी, राज्य शासन दगडूशेठ गणपती ट्रस्ट व भाजप जिल्हा वैद्यकीय सीएलच्या रुग्णवाहिका तसेच सिद्धेश शिंदे, मनोज रणवरे आणि अभय जगताप यांच्या सहभागामुळे सोहळ्याची शोभा अधिक वाढली ,प्रस्थान सोहळ्यास आळंदी देवस्थानचे प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संजय जगताप ,बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संजय कदम, सोपान काका बँकेचे रमनिक कोठडीया ,ग्रामीण संस्थेच्या राजवर्धिनी जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, उपविभागी पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत,सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. संत सोपानदेव महाराजांच्या पालखीच्या प्रस्तानानंतर चांगावटेश्वर महाराज पालखी ही आषाढी वारीसाठी रवाना झाली. या सोहळ्यामध्ये सोहळा प्रमुख जनार्दन वाबळे, जबाबदार शशिकांत जगताप यांच्यासह हजारो वैष्णव आणि दिंडी सहभागी झाल्या होत्या.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment