Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी घरगुती गॅसची चोरी उघडकीस ; तर व्यावसायिक सिलेंडरचा साठा जप्त पुरवठा विभागाची कारवाई सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मधील अनुदानित गॅस अवैधरित्या काढून तो व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये भरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा सासवड पोलीस आणि पुरंदर तालुका पुरवठा विभागाने संयुक्त रीत्या कारवाई पर्दाफाश केला आहे. सासवड कोंढवा मार्गावरील सुप्रभा कंपनी जवळील एका ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर तसेच गॅस हस्ताक्षरांसाठी वापरला जाणारा वजन काटा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्या घटकांमध्ये खळबळ उडालेली आहे. गुरुवारी दि. 30 जुलै रोजी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या संयुक्तरीत्या ही कारवाई करण्यात आली. सासवड कोंढवा रस्त्यावर सुप्रभा कंपनी पासून सुमारे 900 मीटर अंतरावर असलेल्या दोन खोल्यांमध्ये सुरू असलेल्या अवैधरित्या गॅस भरण्याच्या प्रकाराचा शोध घेण्यात आला. या कारवाई दरम्यान घरगुती वापरासाठी असलेल्या एचपी याच्या पाच आणि भारत गॅसच्या दोन अशा एकूण सात रिकामे घरगुती सिलेंडर आढळून आले .तसेच व्यावसायिक वापरासाठी असलेल्या वीस रिकाम्या एचपी गॅस 19 रिकाम्या भारत गॅस तसेच 28 भरलेल्या एचपी गॅस 18 भरलेल्या भारत गॅस आणि दोन इंडियन गॅस सिलेंडरसह मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय गॅस हस्तक्षणासाठी वापरला जाणारा वजन काटा हि ताब्यात घेण्यात आला आहे. असा एकूण रक्कम 11, 06 ,100 रुपये किमतीचा माल मिळून आला आहे. त्याविषयी पोलीस स्टेशन सासवड येथे त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर सिलेंडर मधून गॅस चोरी करणारा एक जण आरोपी सासवड पोलिसांनी जेरबद्ध केलेला आहे. आरोपी श्रवण कुमार बाबुराव भीष नोई राहणार सासवड हिवरे रोड तालुका पुरंदर जिल्हा पुणे मूळ राहणार विष्णू नगर तालुका लोहा जिल्हा जोधपुर राज्य राजस्थान व इतर एक फरार हे आरोपी असून, जप्त करण्यात आलेल्या सर्व गॅस सिलेंडर सुरक्षिततेच्या दृष्टीने सासवड येथील प्रवीण गॅस एजन्सी येथे जमा करण्यात आल्याची माहिती पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे यांनी दिली. याप्रकरणी संबंधिताविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, ही कारवाई मध्ये तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक गोपाळ ठाकरे, गणेश मखरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय शेगर तसेच सासवड पोलीस पथकाच्या संयुक्त सहभागामधून ही प्रक्रिया पार पडली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment