Skip to main content
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा... गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात... सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मा. मुख्याध्यापिका सरोज जांगडा यांच्या हस्ते व्यासमुनींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विविध भाषणे व माहितीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. माधुरी साठे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसो येळे यांनी केले. "गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा" या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमात गुरुजनांविषयी आदर, कृतज्ञता आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment