Skip to main content
आषाढी वारीत श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टची वारकऱ्यांसाठी सेवाभावी परंपरा सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. १२ व १३ जुलै रोजी पाच पालख्यांचे भक्तिभावाने स्वागत, महाप्रसाद, विश्रांती, मोफत पाणी, रुग्णवाहिका व विविध सुविधांची व्यवस्थावीर,येथे दि. १३ : आषाढी पंढरपूर वारीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दि. १२ व १३ जुलै २०२६ रोजी वारीतील पाच पालख्यांचे भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. "वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून ट्रस्टने वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, विश्रांती, स्वच्छ पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक सुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करून सेवाभावी परंपरेचे दर्शन घडविले.दि. १२ जुलै रोजी श्री संत गोरोबाकाका पालखी, सद्गुरु आनंदाश्रम पालखी (बनेश्वर) आणि संत घावरेबाबा पालखी (बेलवडे) यांचे देवस्थान परिसरात आगमन झाले. त्यानंतर दि. १३ जुलै रोजी श्रीसंत मुक्ताई देवी पालखी (आळंदी) आणि श्रीसंत सोपानकाका पालखी (सासवड) यांचे आगमन झाले. दुपारी सुमारे २.३० वाजता श्रीसंत सोपानकाका पालखी देवस्थान परिसरात दाखल होताच टाळ-मृदुंगाचा निनाद, विठ्ठलनामाचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात पालखीचे जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने पालखीचे दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक दिंडीतील वीणेकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रत्येक दिंडीला अल्पोपहारासाठी चिक्कीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था, विश्रांतीसाठी स्वतंत्र जागा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.वारीसोबत असलेल्या सर्व १०० पैकी जास्त पाणीटँकरमध्ये देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोफत पाणी भरून देण्याची सेवा करण्यात आली. त्यामुळे वारकऱ्यांसह दिंडीतील स्वयंसेवक आणि सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. याशिवाय परिंचे ते मांडकी या मार्गावर देवस्थान ट्रस्टची रुग्णवाहिका दिंडीसोबत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी सतत कार्यरत ठेवण्यात आली होती. या उपक्रमामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह आरोग्य सुविधेलाही महत्त्व देण्यात आले.देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मोहनराव रावसाहेब धुमाळ यांच्यासमवेत सर्व विश्वस्त, पदाधिकारी, सुनील धुमाळ, हनुमंत धुमाळ, सल्लागार मंडळाचे सदस्य, स्वयंसेवक आणि सेवेकरी यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सेवा बजावली. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याचे वारकऱ्यांनी मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले. आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टने जपलेली सेवाभावी परंपरा, वारकऱ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी यामुळे उपस्थित भाविक, वारकरी व ग्रामस्थांकडून ट्रस्टच्या कार्याचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment