Skip to main content
म. ए. सो. प्रशालेत 'पावनखिंड दौड'चे उत्साहात आयोजन सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'पावनखिंड दौड' या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघीरे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी केले. त्यांनी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या शौर्याचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.कार्यक्रमात नरेंद्र महाजन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख व्याख्याते कुंडलिक पाटोळे यांनी पावनखिंडीच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व, वीर बाजीप्रभूंचे अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले सर्वोच्च बलिदान याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या ओजस्वी भाषणाने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव सुधीर भोसले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य समजून घेऊन त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले.यावेळी, बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे, उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , पर्यवेक्षिका अर्चना लडकत तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने पावनखिंड दौडीत सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खैरनार यांनी प्रभावीपणे केले. आभार भाऊसाहेब बडधे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातील शौर्यगाथेची प्रेरणा मिळाली आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment