Skip to main content
सासवड येथील पुरंदरेवाड्यात आषाढस्य प्रथम दिवसे कार्यक्रमात "राम पर्वा"त गीत रामायण सादर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: बुधवार दिनांक १५ जुलै रोजी पुरंदरे परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात येणारा "आषाढस्य प्रथम दिवसे" हा सांस्कृतिक कार्यक्रम यंदा ५१ व्या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडला. पुरंदरेवाडा, ब्राह्मण आळी, सासवड येथे आयोजित या कार्यक्रमास रसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.ज्येष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, नानासाहेब पुरंदरे, महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे आणि ना. सं. इनामदार यांच्या प्रेरणा व स्मृतीस अभिवादन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी "व्यक्ताव्यक्त", पुणे प्रस्तुत "राम पर्व" हा रामायणातील विविध प्रसंग व पात्रांवर आधारित सुरेल संगीत कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात हेमंत आठवले, शुभदा आठवले, पार्थ गोखले, जान्हवी गोखले,अवधूत धायगुडे,वेधा पोळ आणि केदार तळवणीकर या कलाकारांनी आपल्या प्रभावी गायन व सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. संगीताच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग जिवंत करणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.या कार्यक्रमासाठी मा.आ.संजय जगताप, विजय कोलते, शशिकला कोलते, राजवर्धिनी जगताप, प्रकाश खाडे, दिलीप निरगुडे, सुनील लोणकर दत्ता भोंगळे, विजय पुरंदरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरंदरे परिवारातील केशवराव पुरंदरे, कौशिक पुरंदरे, अजय पुरंदरे, विजय पुरंदरे, प्रसन्न पुरंदरे, आदित्य पुरंदरे तसेच सर्व आप्तेष्टांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थित मान्यवर व रसिकांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या उपक्रमांचे स्वागत केले.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment