Skip to main content
आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी प्रा.केशव काकडे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्रसाहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे भरवण्यात येणाऱ्या २९ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सासवड येथील,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राध्यापक,जेष्ठ कवी, साहित्यप्रेमी, प्रा.केशव मुगुटराव काकडे यांची निवड झाली आहे. अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषदेच्या सासवड येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते,साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष अँड. अण्णासाहेब खाडे यांसह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. सासवड येथील,८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना मध्ये, सुकाणू समितीचे सदस्य म्हणून,सक्रिय सहभाग घेऊन,संमेलन यशस्वी होण्याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले होते याची दखल घेऊन, दोन्ही संस्थांनी त्यांना स्वागताध्यक्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पुढील महिन्यात १३ ऑगस्ट रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात हे एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडणार आहे.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पुरंदर शैक्षणिक संकुलातून सेवा निवृत्त झालेले प्रा.केशव काकडे यांना महाराष्ट्र शासन सहित, अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांना कवितेविषयी विशेष रुची असुन,अनेक सामाजिक कार्यातही ते अग्रभागी असतात. डॉ.बापूजी साळुंखे यांच्यावर, "शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे सुसंस्काराचे महामेरू"या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले असुन,त्यांच्या स्वतःच्या जीवनावरील "केशवायन* हे पुस्तक लक्षवेधी ठरले आहे. सेवा निवृत्तीनंतरही,पुरंदर शैक्षणिक संकुल सासवड येथील,डॉ.बापूजी साळुंखे यांचे स्मारक स्वखर्चातून, उभे करण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.प्रा. काकडे हे योगाभ्यासक असून, योगाभ्यासाचा प्रसार व प्रचार ते आजही करत आहेत. त्याचप्रमाणे,ते अनेक राज्यस्तरीय कवी संमेलनातुन,आपल्या परिवर्तनशील काव्यरचना सादर करून,समाज परिवर्तन करण्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment