Skip to main content
पुरंदर येथील विमानतळ भूसंपादनाला एकरी एक कोटी 61 लाखाचा दर ; तर 7 मे पासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी व्याजासह प्रति एकर एक कोटी 61 लाख एक हजार 925 रुपये एवढा दर जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय या जमिनी मधील झाडे, विहिरी, बोरवेल, घरे असे सर्वांचे मूल्यांकन करून, स्वतंत्र मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे सरासरी एक एकर साठी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपये मिळणार आहेत, पुरंदर विमानतळा संदर्भात भूसंपादनाच्या पॅकेजची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली असून, भूसंपादनाचे संमती पत्र आणि करारनामा झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 7 मे पासून पैसे वर्ग करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, सहमतीने जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना 10% परतावा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाणार आहे, दहा टक्के परताव्यामध्ये शेतकऱ्याची जेवढी जमीन घेतली जाईल, त्याच्या दहा टक्के विकसित भूखंड युरो सिटी मध्ये दिला जाणार आहे, ज्या कुटुंबाचे घर जाणार आहे, त्यांना घरासाठी अडीच गुंठे अतिरिक्त जमीन दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, विमानतळासाठी एकूण 1216.75 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे, जिल्हाधिकारी डुडी मनाले की, सहमतीने भूसंपादन करण्यात येईल, सिताफळ झाडाला 11 ते 13 हजार रुपये ,आंब्याला 50 ते 60 हजार रुपये, सिताफळ 11 ते 13 हजार, अंजीर 10 ते 13 हजार, नारळ 4 ते 6 हजार, चिंच 40 ते 50 हजार, चिकू 13 ते 17 हजार रुपये असा मोबदला प्रत्येकी झाडासाठी दिला जाईल, फळझाडांची मूल्यांकन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. याशिवाय बाभुळसाठी 4,899 रुपये, कडुलिंब 6,392, निलगिरी 11,783, पिंपळ 21, 980, उंबर 11,783, वड 21 हजार 979 रुपये असा मोबदला दिला जाणार आहे. विहिरीसाठी 3 ते 17 लाख रुपये,बोरवेल साठी 40 ते 60 हजार रुपये, त्याचबरोबर पक्के घर असल्यास 3 ते 40 लाख रुपये मिळू शकतील, घरासाठी प्रति चौरस मीटर 5,700 रुपये दर निश्चित करण्यात आलेला आहे,या प्रकल्पासाठीसुमारे सात गावातील 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे, दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे, जमिनी व्यतिरिक्त, घरे, विहिरी, बोरवेल, शेड, झाडे आधी घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून, त्यावर दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे ,आंबा, चिंच, सीताफळ यासारख्या फळ झाडासाठी बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे, विमानतळ प्रकल्प रद्द झाला आहे, अशा अफवा पसरविल्या जात आहेत, परंतु चुकीच्या माहितीला आणि संभ्रमाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये, सुरुवातीला कमी आणि शेवटी अधिकचा दर मिळेल, अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यां निराधार असून, जो सुरुवातीला दर आहे तोच दर शेवटी जमीन देणाऱ्याला मिळणार आहे ,त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, भूसंपादन मोबदल्या पोटी मिळणारे सर्व पैसे हे करमुक्त असतील 6,000 कोटी रुपयांची कर्ज भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहे, त्यातील 500 कोटी रुपयांची रक्कम जिल्हाधिकाऱ्याकडे उपलब्ध आहे, टप्प्याटप्प्याने ही रक्कम मिळणार आहे, दहा टक्के जमिनीचा परतावा मागितल्यास दहा टक्के रक्कम मोबदल्या मधून कपात भूसंपादन होणारे शेत्र हेक्टर मध्ये उदाची वाडी 54.34 हेक्टर, वनपुरी 154.06 हेक्टर, कुंभारवळण 245.46 हेक्टर, खानवडी 279.22 हेक्टर,मुंजवडी 82.56 हेक्टर, एखतपुर 199.03 हेक्टर, पारगाव188.07 हेक्टर असे क्षेत्र केले जाईल ,10 जून नंतर सक्तीने भूसंपादन संमती पत्र व प्रतिज्ञापत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर, पुरंदर प्रांत अधिकारी कार्यालय सासवड येथे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे ,6 मे ते 10 जून पर्यंत या कालावधीमध्ये संमती पत्र सादर केल्यास घोषित पॅकेज प्रमाणे दर मिळेल ,मात्र संमती पत्र सादर न केल्यास सक्तीचा भूसंपादन निविदा जाहीर करून, जमिनी संपादित केल्या जाणार आहेत ,जे शेतकरी भूमिहीन होणार आहेत ,त्यांना 750 दिवसाची मजुरी रक्कम दिली जाणार आहे, अल्पभूधारक शेतकऱ्यास पन्नास दिवसाची मजुरी रक्कम देण्यात येईल, घर स्थलांतर करण्यासाठी 40 हजार रुपये, तर गोठा स्थलांतरासाठी 20,000 रुपये दिले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले आहे.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment