Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील त्रिमूर्ती मोबाईल शॉपी मधून शेजारील साई ए 1 नावाच्या सलून दुकानातील कामगाराने काउंटर वरून विवो कंपनीचा एक्स 300 इलाईट ब्लॅक कलरचा मोबाईल चोरून नेला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील त्रिमूर्ती मोबाईल शॉपी असून, मोबाईल शॉपीच्या शेजारी साई ए 1 नावाचे सलून दुकान आहे, त्यामधील कामगार सानिब मलिक राहणार कुंडा राज्य उत्तर प्रदेश हा कामाला त्या ठिकाणी सलून दुकानांमध्ये असून, तो सतत दुकानांमध्ये मोबाईल शॉपी मध्ये येत असतो, त्यामुळे शॉपीतील कामगार हे सानिब यास चांगल्या पद्धतीने ओळखतात, दिनांक सात मे रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारांमध्ये मोबाईल शॉपी मधील साफसफाई करून, झाल्यानंतर दुकानांमध्ये येणाऱ्या गिरायकाला मोबाईल दाखवण्यासाठी पाच ते सहा डेमो मोबाईल काउंटर या ठिकाणी ठेवले असता, त्या ठिकाणी मोबाईल शॉपी मध्ये दहा पंचेचाळीस वाजता सानिब मलिक हा दुकानात आला असता, तो मोबाईल पहात होता, काही वेळाने तो आमच्या मोबाईल शॉपी मधून निघून गेला असता, मोबाईल शॉपीतील कामगार ऋषिकेश पिलाने यांनी काउंटर ठेवलेले मोबाईल पैकी विवो कंपनीचाx300 ही लाईट ब्लॅक बारा जीबी 256 क्षमतेचा डेमो मोबाईल देते, त्या ठिकाणी दिसून आला नाही, मोबाईल शॉपीच्या दुकानातील लावलेली सीसीटीवी कॅमेरे चेक केले असतास, आणि मलिककडे मोबाईल हातात घेऊन पाहत होता त्याचवेळी दुकानातील ऋषिकेश हा दुसऱ्या गिर्हाईकांना मोबाईल दाखवत असल्यामुळे, त्याचे लक्ष दुसऱ्या गिरायकाकडे होते त्यावेळी सानिब मलिक यांनी काउंटर मधील डेमो मोबाईल त्याच्या हातात घेऊन, बाहेर जात असताना कॅमेरा मध्ये दिसून आला, मोबाईल शॉपी मधून सानिब मलिक यांना फोन केला असता, त्याचा फोन बंद लागत असल्या कारणामुळे, त्याच्या राहत्या घरी तसेच सासवड परिसरामध्ये आजूबाजूला शोध घेतला असता तो दिसून आला नाही, त्यामुळे शॉपीतील मालकाची पूर्णपणे खात्री झाली की, शॉपीतील विवो कंपनीचा डेमो मोबाईल्स आणि मलिक याने चोरून नेलेला आहे. 45 हजार 599 रुपये vivo कंपनीचा एक्स 300 इलाईट ब्लॅक बारा जीबी 256 क्षमतेचा डेमो मोबाईल त्याचा आयएमई नंबर 8672030883157 93 असा आहे सानिब मलिक राहणार कुंडा राज्य उत्तर प्रदेश यांनीच हा मोबाईल चोरी करून नेलेला आहे, त्याची पूर्ण नाव पत्ता माहित नाही, त्यामुळे त्याच्या विरुद्ध सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिगंबर हेरंब बोरकर वय 42 वर्ष व्यवसाय मोबाईल शॉपी राहणार नारायणपूर ता. पुरंदर यांनी सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. सासवड पोलीस स्टेशन गु.र. नंबर 212/ 2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303 (2) नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या अधिपत्याखाली पोलीस नाईक चव्हाण सुनिल हे पुढील तपास करीत आहेत.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment