Posts

खंडू खैरेवाडी , सुपे (ता. बारामती) येथे तूर व उडीद पिकावरील मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने खंडू खैरेवाडी (ता. बारामती) येथे तूर व उडीद पिकाचे उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महेशजी जाधव यांनी केले.या शिबिरात कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ डॉ. धीरज शिंदे व पोपट जी गावडे यांनी तूर व उडीद पिकामध्ये अधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गावडे आणि जाधव (आत्मा) यांनीही शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना तूर व उडीद पिकाचे दर्जेदार बियाणे मोफत वितरित करण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तसेच तानाजी बापू पवार यांना जिजामाता पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजयजी काकडे, जिल्हा महामंत्री वैभव आटोळे, शिवसेना आरोग्य कक्षाचे नेते मंगेशजी खताळ, जिल्हा मीडिया प्रमुख अप्पासाहेब भोपाळ , सरपंच चांदगुडेवाडी अशोक खैरे, सदस्य विनोद सस्ते , ग्रामपंचायत मोरगाव सदस्य सचिन गार्डी, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब भोंडवे, विजय खैरे, प्रकाश चांदगुडे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून विविध कृषी विषयक शंकांचे निरसन करून घेतले. आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनवाढ साध्य करण्यासाठी अशा मार्गदर्शन शिबिरांचा मोठा लाभ होत असल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Image

पुरंदर तालुक्यातील भिवडी येथील मल्हार एक्वा मध्ये वीज चोरी श्रीकांत गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भिवडी ता. पुरंदर येथील मल्हार एक्वा या व्यावसायिक आस्थापनामध्ये वीज मीटरपूर्वी अनाधिकृत जोडणी करून, वीज चोरी केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथक बारामती येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथाबा गोफने यांनी फिर्याद दिली असून, श्रीकांत मल्हारी गायकवाड राहणार भिवडी ता. पुरंदर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे फिर्यादीनुसार 10 मार्च 2026 रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथाबा गोफने, सहाय्यक अभियंता संदीप अनिल रणदिवे, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी विजय पांडुरंग गडसिंग ,वरिष्ठ तंत्रज्ञ विनोद अशोकराव देवने आणि जयकुमार आदिनाथ गावडे यांनी भिवडी येथील गट क्रमांक 830 मधील मल्हार एक्वा या आस्थापनाची तपासणी केली त्यावेळी वीज ग्राहक श्रीकांत मल्हारी गायकवाड आदी उपस्थित होते.तपासणी दरम्यान पोलवरून येणाऱ्या इन क्रमिक सर्विस वायरला वीज मीटरपूर्वी अनाधिकृत टेप घेऊन 2.5 चौरस मि. मी निळ्या रंगाच्या वायर द्वारे थेट वीजपुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे वीज मीटरवर वीज वापराची योग्य नोंद होत नसल्याने, वीज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले ही बाब श्रीकांत मल्हारी गायकवाड यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ती मान्य केल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत .तपासणी दरम्यान मीटरचे रीडिंग 389 युनिट असून, प्रत्यक्ष जोडलेला भार 3.63 किलो वॅट आढळला तर मजूर भार केवळ एक किलो वॅट होता, घटनास्थळी पंचनामा करून तपासणी अहवाल 32, 158 तयार करण्यात आला वी चोरीसाठी वापरलेली अंदाजे तीन फूट लांबीची 2.5 चौ मि.मी निळ्या रंगाची वायर जप्त करून शील बंद करण्यात आली ,व ती अतिरिक्त कार्यकारी अभियंता रघुनाथ नाथाबा गोफने यांच्या ताब्यात देण्यात आली. महावितरणच्या नोंदणी नुसार श्रीकांत मल्हारी गायकवाड यांनी मागील 18 महिन्यात 7870 युनिट वीज अनाधिकृत रीत्या वापरल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची मूल्य एक लाख 81 हजार 686 आहे त्यांनी 13 मे 2026 रोजी पावती क्रमांक 00 63 582 द्वारे एक लाख 83 हजार 550 रुपये भरले असले तरी वीस हजार रुपयाची जवळ रक्कम अद्याप भरलेली नसल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याची नोंद दाखल अमलदार पोलीस नाईक हिप्परकर गोकुळ यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार जाधव हे करीत आहेत ,या प्रकरणावर सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनानुसार हा तपास चालू आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वर कारवाई ; तर 4.08 लाखाचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाणे यांच्या पथकाने सटलवाडी गावाच्या हद्दीमधील परिंचे सासवड रस्त्यावरील कांबळवाडी कॉर्नर येथे बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत विशाल बाळासो जाधव वय 38 राहणार सटलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे याला ताब्यात घेतली असून, त्याच्याकडून चार लाख आठ हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्या विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर 314/ 2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारामध्ये ही कारवाई आरोपी विशाल जाधव हा कोणताही वैद परवाना नसताना ईरटीगा कार मधून मध्याची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले, तपासणी दरम्यान टॅगो पंच कंपनीच्या 90 मिलिच्या दोन बॉक्स मधील दोनशे बाटल्या किंमत सात हजार रुपये, तसेच मॅजिक मोमेंट कंपनीच्या 180 मिलीच्या सहा बाटल्या किंमत एक हजार सहाशे वीस रुपये असा एकूण 8,620 मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एम एच बारा एक्स क्यू 4696 क्रमांकाची एर्टिगा कार किंमत चार लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण चार लाख आठ हजार 620 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत ज्ञानदेव नरळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस नाईक हिप्परकर यांनी गुन्हा दाखल अंमलदार म्हणून कार्यवाही केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार संदीप हे करत आहेत. ही कारवाई सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्या विरोधात अशीच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे.

Image
qa 31!!

म.ए.सो.प्रशालेत "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" उपक्रम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेने यावर्षी "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" या संकल्पनेवर आधारित वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल व म.ए.सो.चे बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील फ्रेंड्स ऑफ रेपटाईल्स अँड एन्व्हारमेंटल सेव्हिंग ट्रस्ट (FOREST) या संस्थेच्या वतीने  म.ए.सो.चे माजी विद्यार्थी सागर कुटे, चेतन निगडे आणि सागर पाटील यांच्या हस्ते सुमारे १००० सीडबॉल्सचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सीडबॉल्सचा योग्य वापर करून पावसाळ्यात विविध मोकळ्या जागांमध्ये त्यांचे रुजवणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षांची निर्मिती होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी पावसाच्या सरींसोबत हरित स्वप्न रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याची प्रेरणा घेतली.यावेळी , म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , मंजुषा चोरामले , माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, भाऊसाहेब येळे, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, निकिता होले, रेश्मा जगताप आदी उपस्थित होते.

Image

पुरंदर तालुक्यात पालखी सोहळ्यासाठी सासवड नगरी सज्ज असे मत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड शहरांमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जुलै रोजी आगमन होणार असून, 12 जुलै रोजी मुक्काम आणि 13 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे, तसेच श्री संत सोपान काका महाराज व श्री संत चांगावटेश्वर महाराज यांच्या पालख्याही बारा जुलै रोजी सासवड मधून पंढरपूरकरकडे मार्गस्थ होणार आहेत, नगराध्यक्षा नंदी काकी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने पालखी सोहळ्याच्या स्वागताकरता व वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता नगरपरिषद सज्ज आहे अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी दिली आहे स्वच्छता व आरोग्य व्यवस्था निर्मल वारी अभियानांतर्गत सुमारे 10,800 असणे फायबर शौचालयांची उभारणी विविध ठिकाणी करण्यात आली आहे. पालखीतळ परिसराची संपूर्ण स्वच्छता स्वच्छतागृहाची दुरुस्ती पाणी व व्यवस्था करण्यात आली आहे, शहरातील स्वच्छता फॉगिंग पालखी मार्गावरील स्वच्छता यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जंतुनाशक व तन नाशक साठा उपलब्ध करून फवारणी सुरू आहेत, तात्पुरती स्नानगृही उभारली जाणार असून, दोन ठिकाणी जर्मन हँगरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्लास्टिक बंदी संदर्भात असता पनांना नोटीस देण्यात आले असून,स्टोअरधारकांना कचरा संकलनासाठी पिशव्या व कचरापेटी ठेवण्यात येणार आहेत, पालखी प्रस्तावनानंतर शहरात पुन्हा जंतुनाशक फवारणी केली जाणार आहे, शाळा, हॉटेल यांची स्वच्छता व तपासणी करण्यात येत आहे, मच्छी व मटन विक्रेतांना तात्पुरते दुकाने बंद ठेवण्याची निर्देश देण्यात आले आहेत, पाणीपुरवठा व अग्निक क्षमण व्यवस्थापन आणि पुरवठ्यासाठी 12 विहिरीवर टँकर भरण्याची व्यवस्था करण्यासोबतच पाण्याची नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत, ब्लिचिंग पावडर टाकण्याची व्यवस्थापन यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक दक्षता घेतली आहे, अखंड विज पुरवठ्यासाठी महावितरणला पत्रव्यवहार करण्यात आला आहे ,अग्निशमन दलाचे वाहन टँकर व तात्काळ पथक सज्ज ठेवण्यात आले आहे, विद्युत व्यवस्था शहरातील सर्व स्ट्रीट लाईट कार्यरत राहतील यासाठी नियोजन करण्यात आले आहे, पालखी मार्ग पालखी तळ व सोपानदेव मंदिर परिसरात विक्री व्यवस्था व दिवे बसवण्यात आले आहेत, जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, विद्युत तारा व झाडांच्या फांद्यांची छाटणी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात येत आहे, बांधकाम व नगर रचना पालखीतळाची सपाटीकरण पाणी साचू नये यासाठी उपाय योजना मुरूम भरणे व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवणे खड्डे बुजवणे व रस्ते वाहतुकीसाठी मध्ये ठेवण्याचे काम सुरू आहे, अनधिकृत होर्डिंग करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे,सीसीटीव्ही व एलईडी व्यवस्था सुरक्षेसाठी पालखीतळ व सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून, भाविकांसाठी एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहेत, नियंत्रण कक्षा, दूरध्वनी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, स्वागत निरोप व पूजा व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत तसेच संत सोपान देव संत चांगावटेश्वर महाराज पालखीचा निरोप कार्यक्रमासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, पालखीतील पादुकांची महापूजा नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे, स्वागत निरोप व पूजा व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत तसेच संत सोपान देव व संत चांगावटेश्वर महाराज पालखीचा निरोप कार्यक्रम साठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून, पालखीतील पादुकांची महापूजा व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे, शाळा वगैरे कक्षा दिंडी प्रमुखाच्या मागणीनुसार शाळा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, आचार्य यात्रे सांस्कृतिक भवन येथे हिरकणी कक्ष स्थापन करून ,महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, नियंत्रण कक्ष पालखीतळा शेजारी व नगरपालिका कार्यालयासमोर असे दोन नियंत्रण कक्ष उभारण्यात आले असून ,24 तास कार्यरत राहतील प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध राहणार आहे ,पुरुष व महिला भाविकांसाठी स्वतंत्र रांगा व बॅरिकेटिक व्यवस्था करण्यात आली आहे, या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी 185 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, विविध विभागांच्या माध्यमातून व्यापक तयारी करण्यात आली आहे ,दिवे नाका येथे पालखीचे स्वागत तर जेजुरी नाका येथे निरोप देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, भाविकांना सुलभ सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरात दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांनी दिली आहे.

Image
जगताप च

पुरंदर तालुक्यातील माहूर धरणावर शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबल व मोटार चोरी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील माहूर धरण परिसरातील अज्ञात चोरट्याने शेतकऱ्यांच्या पाणी उपसा मोटारीच्या केबल वायर तसेच एक मोठी चोरी केलीची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजी जयसिंग गोळे, नितीन विठ्ठल जगताप, बाळा सुभाषराव जगताप, गजानन प्रल्हाद जगताप, सोमनाथ बारीकराव खोमणे, आणि ज्ञानेश्वर जयवंत जगताप या माहूर येथील शेतकऱ्यांचे मिळून 36,500 रुपयांचा आयवेज चोरीस गेला असून, सासवड पोलीस ठाण्यामध्ये आज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303 /2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जुलै रोजी दुपारी बारा ते सहा जुलै रोजी सकाळी दहा या कालावधीमध्ये माहूर धरण परिसरामध्ये ही चोरी झाली फिर्यादी शिवाजी जयसिंग गोळे हे धरणावरील त्यांच्या मोटारची पाहणी करण्यासाठी गेले असता ,मोटारी जवळील केबल वायर कापून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, त्यानंतर परिसरातील इतर मोठया धारकांची पाहणी केली असता, नितीन विठ्ठल जगताप यांची 200 फुट लांबीची केबल वायर ,बाळा सभाजीराव जगताप यांची 200 फुट केबल वायर ,गजानन प्रल्हाद जगताप यांची 200 फुट केबल वायर, सोमनाथ बारीकराव खोमणे यांची १०० फूट केबल तसेच ज्ञानेश्वर जगताप यांची 200 फुट केबल वायर आणि टेक्समो कंपनीची पाच एचपी क्षमतेचे मोटर चोरीस केल्याची समोर आले असून, फिर्यादी शिवाजी जयसिंग गोळे यांची ही शंभर फूट लांबीची केबल वायर चोरट्याने कापून नेल्यास स्पष्ट झालेया सर्व शेतकऱ्यांचा केबल वायर व मोटार असा एकूण 36 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल आज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे .परिंचे दूरक्षेत्र येथे दाखल झालेल्या तक्रारीवरून सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा क्रमांक ३१०-२०२६ नोंदवण्यात आला आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार समर बनसोडे करीत असून,सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध सुरू आहे.

Image

पुरंदर तालुक्यातील नारायणपूर मंदिर परिसरातून चार मोबाईल चोरी प्रदीप मेटकरी सह अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील मंदिर परिसरामधील दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे एकूण एक लाख 60 हजार रुपयांची चार मोबाईल फोन चोरीला गेलेची घटना गुरुवारी दि. 9 जुलै रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी मुंकिदा राजाराम काकडे वय 39 राहणार कोरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून, सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ दाखल करण्यात आला असून ,भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 303( 2) व 3 (5) अन्वये प्रदीप वसंत मिटकरी वय 31 राहणार सोपानबाग घोरपडी गाव पुणे व त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ जुलै रोजी दुपारी तीन वाजता नारायणपूर मंदिर परिसरामध्ये आरोपींनी फिर्यादी मुकुंदा राजाराम काकडे यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस 24 18 सुमारे 47 हजार रुपये किमतीचा मोबाईल , बबन कोंडभर यांचा 43 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, दत्तात्रय प्रतापराव पवार यांचा 30,000 रुपये किमतीचा मोबाईल तसेच विजय सोपंखीवळे यांचा ४०,००० रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस 25 प्लस मोबाईल असा एकूण एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला त्यानंतर फिर्यादीने सासवड पोलीस आकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्य वाही केली असून, पोलीस हवालदार जाधव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत, पोलीस अधिकारी संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी प्रदीप वसंत मेटकरी व त्यांच्या फरार अनोळखी साथीदारांचा शोध सुरू असून, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती सासवड पोलिसांनी दिली.

Image