Skip to main content
पुरंदर तालुक्यातील सटलवाडी येथे बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या वर कारवाई ; तर 4.08 लाखाचा मुद्देमाल जप्त सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड पोलीस ठाणे यांच्या पथकाने सटलवाडी गावाच्या हद्दीमधील परिंचे सासवड रस्त्यावरील कांबळवाडी कॉर्नर येथे बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत विशाल बाळासो जाधव वय 38 राहणार सटलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे याला ताब्यात घेतली असून, त्याच्याकडून चार लाख आठ हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याच्या विरुद्ध सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर 314/ 2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारामध्ये ही कारवाई आरोपी विशाल जाधव हा कोणताही वैद परवाना नसताना ईरटीगा कार मधून मध्याची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले, तपासणी दरम्यान टॅगो पंच कंपनीच्या 90 मिलिच्या दोन बॉक्स मधील दोनशे बाटल्या किंमत सात हजार रुपये, तसेच मॅजिक मोमेंट कंपनीच्या 180 मिलीच्या सहा बाटल्या किंमत एक हजार सहाशे वीस रुपये असा एकूण 8,620 मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एम एच बारा एक्स क्यू 4696 क्रमांकाची एर्टिगा कार किंमत चार लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण चार लाख आठ हजार 620 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वसंत ज्ञानदेव नरळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली असून, त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस नाईक हिप्परकर यांनी गुन्हा दाखल अंमलदार म्हणून कार्यवाही केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार संदीप हे करत आहेत. ही कारवाई सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. बेकायदा मद्य वाहतूक आणि विक्री करणाऱ्या विरोधात अशीच धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी सांगितले आहे.
qa 31!!
Popular posts from this blog
Comments
Post a Comment