Skip to main content
म.ए.सो.प्रशालेत "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" उपक्रम सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थेने यावर्षी "एक पाऊल पर्यावरणासाठी, एक झाड भविष्यासाठी" या संकल्पनेवर आधारित वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत सासवड येथील एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूल व म.ए.सो.चे बाल विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांना पुणे येथील फ्रेंड्स ऑफ रेपटाईल्स अँड एन्व्हारमेंटल सेव्हिंग ट्रस्ट (FOREST) या संस्थेच्या वतीने म.ए.सो.चे माजी विद्यार्थी सागर कुटे, चेतन निगडे आणि सागर पाटील यांच्या हस्ते सुमारे १००० सीडबॉल्सचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना सीडबॉल्सचा योग्य वापर करून पावसाळ्यात विविध मोकळ्या जागांमध्ये त्यांचे रुजवणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या माध्यमातून अधिकाधिक वृक्षांची निर्मिती होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संरक्षणाची जाणीव आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे उपस्थितांनी सांगितले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी पावसाच्या सरींसोबत हरित स्वप्न रुजविण्याचा निर्धार व्यक्त केला आणि पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्याची प्रेरणा घेतली.यावेळी , म.ए.सो. बाल विकास मंदिर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे , एम.ई.एस. इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सरोज जांगडा , मंजुषा चोरामले , माणिक शेंडकर, नरेंद्र महाजन, भाऊसाहेब येळे, दिपक कांदळकर, नितीन ठोंबरे, निकिता होले, रेश्मा जगताप आदी उपस्थित होते.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment