Skip to main content
पुरंदर तालुक्यातील नारायणपूर मंदिर परिसरातून चार मोबाईल चोरी प्रदीप मेटकरी सह अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नारायणपूर येथील मंदिर परिसरामधील दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे एकूण एक लाख 60 हजार रुपयांची चार मोबाईल फोन चोरीला गेलेची घटना गुरुवारी दि. 9 जुलै रोजी दुपारी घडली असून, याप्रकरणी मुंकिदा राजाराम काकडे वय 39 राहणार कोरेगाव तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून, सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१२/२०२६ दाखल करण्यात आला असून ,भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम 303( 2) व 3 (5) अन्वये प्रदीप वसंत मिटकरी वय 31 राहणार सोपानबाग घोरपडी गाव पुणे व त्याच्या अनोळखी साथीदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ जुलै रोजी दुपारी तीन वाजता नारायणपूर मंदिर परिसरामध्ये आरोपींनी फिर्यादी मुकुंदा राजाराम काकडे यांचा सॅमसंग गॅलेक्सी एस 24 18 सुमारे 47 हजार रुपये किमतीचा मोबाईल , बबन कोंडभर यांचा 43 हजार रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल, दत्तात्रय प्रतापराव पवार यांचा 30,000 रुपये किमतीचा मोबाईल तसेच विजय सोपंखीवळे यांचा ४०,००० रुपये किमतीचा सॅमसंग गॅलेक्सी एस 25 प्लस मोबाईल असा एकूण एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला त्यानंतर फिर्यादीने सासवड पोलीस आकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस हवालदार अमोल लडकत यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्य वाही केली असून, पोलीस हवालदार जाधव हे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत, पोलीस अधिकारी संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी प्रदीप वसंत मेटकरी व त्यांच्या फरार अनोळखी साथीदारांचा शोध सुरू असून, मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्याच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याची माहिती सासवड पोलिसांनी दिली.
Popular posts from this blog
Comments
Post a Comment